Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 26 July 2012

भाग ~ ~ ५६ एक प्रेम कथा

Update 56ते सुखःद क्षण तर राजकुमारीला आठवत होतेच पण.. तिच्या हेही आठवणीत आले कि शेजारच्या राज्यातून एक दूत संदेश घेवून आला होता....

----------------


"महाराज...! मी, महिपाल, महाराज विक्रमच्या द्वारा आपल्यासाठी पाठवलेल्या ह्या अतिविशिष्ट संदेशाला आपल्या सगळ्यांच्या संमुख उच्चारीत करण्यासाठी आपल्या द्वारा आज्ञा मिळवण्यासाठी पात्र आहे...!"


शेजारच्या राज्यातून आलेल्या दूताने महाराजाकडे संदेश वाचण्याची अनुमती मांगितली... राजकुमारी प्रियदर्शनी सोबत महाराणी पण तिथे उपस्थित होत्या...


"महाराज, त्यांनी संदेश पाठवला आहे कि..., " एवढं बोलून त्या दूताने ती संदेश पत्रिका खोलली आणि त्यामध्ये वाचून तो बोलायला लागला...


"आपण आमच्या सुपुत्र राजकुमार अभिषेकसाठी; आपल्या सुपुत्री; सुकुमारी प्रियदर्शनीच्या बरोबर; लग्न-संबंध जोडण्यासाठी आमच्या मित्रवत प्रस्तावाला ठोकर देवून; आणि; राजकुमारी प्रियदर्शनीच्या लग्न संबंधी स्वयंवरच्या शर्तीवर ठाम राहून; दोन्ही राज्यांमध्ये वर्षांपासून चालत आलेल्या मैत्रीचा; एका क्षणीच; खूप मोठ्या क्रूरतेने गळा दाबण्यासारखं काम केलं आहे...


आपण ह्या संबंधी लगेच काही तो विचार करून आमच्या दूताबरोबरच आपला शेवटचा निर्णय; शीघ्र अतिशीघ्र आमच्या पर्यंत पाठवा. अन्यथा, आजच्या नंतर आपल्या राज्यावर हमला करून; आपलं राज्य आणि सुकुमारी राजकुमारीला जबरदस्ती घेवून जाण्याचे आमचे सगळे विकल्प सुरक्षित असतील...!"


संदेश वाचून दूताने संदेशपत्रिका बंद केली आणि आदरसहित आपली मान झुकवून उभा राहिला...


महाराजांबरोबर राजकुमारी प्रियदर्शनी आणि त्यांच्या बरोबर बसलेली महाराणी पण क्रोधीत झाल्या... महाराणीच्या चेहऱ्यावर क्रोधाबरोबर भयपण वेगळं वाचू जावू शकलं असतं... दोघी महाराजाच्या उत्तराची प्रतीक्षा करत त्यांच्याकडेच बघत होत्या...


काही वेळ शांत राहून महाराजांनी बोलणे सुरु केलं, "दूत! त्यांना जाऊन सांगा मित्रत्वाची हत्या आम्ही नाही, असे नापाक संदेश पाठवून त्यांनी केली आहे.. हिंदू धर्मात स्वयंवर काही नवीन परंपरा नाही आहे... तरी पण आम्ही मैत्रीसाठी राजकुमारीशी विचारपूस केली... राजकुमारीच्या स्पष्ट नकार दिल्याच्या पश्चात आमच्या ह्या प्रस्तावाला नकार देण्याशिवाय अजून कुठलाच उपाय उरला नव्हता...


आम्ही राजकुमारीच्या इच्छेनुसार स्वयंवर आयोजित करण्यासाठी बाध्य आहोत... आणि आत्ता तर फक्त स्वयंवरच होणार. जर त्यांच्या दोन्ही भुजांमध्ये खऱ्या क्षत्रियचं रक्त आहे तर कुमार अभिषेक स्वयंवरमध्ये या; आणि आपला दम दाखवा...!


त्यांना बोला कि आमच्या राज्यातल्या सैनिकांमध्येच नाही; इथल्या छोट्या छोट्या मुलांना पण 'देव' बनायची जिद्द एकदम डोक्यावर भूत बनली आहे; जो आत्ता आमच्या सेनेचं नेतृत्व करतोय.. त्यांच्या द्वारा हमला करण्याची केलीली मूर्खता कदापि सहन नाही होणार..."


महाराजाचे बोलणे ऐकून दूताने विनम्रतेने आपली मान झुकवली आणि बाहेर निघून गेला...


"महाराज...! तुम्ही ऐकत का नाही आहात... आपला त्यांच्यासमोर काय मुकाबला होणार...! सेना आणि संसाधनामध्ये (तोफ गोळे वैगेरे...) ते आमच्याहून खूप पुढे आहेत... जर त्यांनी हमला केला तर आपण काय करू शकतो...?" महाराणी थोडी घाबरत बोलली...


"महाराणी...! क्षत्रिय कधी शत्रू किती कमकुवत किंवा ताकतवर हे जाणून घेतल्या शिवाय मुकाबल्यासाठी तैय्यार नाही होत...! इथे लढाई आन, बान आणि आपल्या शानसाठी लढली जाते... त्याच्यामध्ये आपलं डोकं धडापासून वेगळं जरी झालं, तरीपण काहीच परवाह नाही आहे...!" महाराज रागात दात खात बोलले..., "त्यांच्या संदेशाच्या भाषेनेच कळतं कि त्यांनी राजकुमारीचा  हात नाही, आपली इज्जत मांगितली आहे... आत्ता काहीपण होवो... राजकुमारीचा स्वयंवर होऊनच राहणार...!"


महाराज रागात कापत होते... महाराणी उठून निघून गेली...


पण प्रियदर्शिनी अजूनपर्यंत तिथेच बसली होती... तिला आत्ता अजून एक चिंता सतावत होती... कुठे महाराजने देवला ती वचन देण्यापूर्वीच स्वयंवरमध्ये भाग न घेण्याचं वचन तर नाही घेतलं... (प्रियाने मनात पक्का निर्णय घेतला होता कि होणार तर देवचीच नाही तर कोणाचीच नाही... जेव्हा शेजारच्या राज्यातून तिला लग्नासाठी मांगणी आली होती तेव्हा तिनेच जाणूनबुजून नकार दिला होता आणि महाराजाला स्वयंवर रचवायला सांगितलं होतं... नंतर ती स्वतःच जाऊन देवशी वचन घेवून आली कि तुला पण ह्या स्वयंवरमध्ये भाग घेतला पाहिजे... देवने पण वचन दिलं कारण दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करायचे...).


"आत्ता काय करायचे पिताश्री...!" प्रियदर्शनी बोलली...


"आम्ही स्वयंवराचा विचारच केला नव्हता... तुम्ही ते बोलल्या होत्या पण आम्ही तुमच्याशी पूर्ण सहमत नव्हतो... पण आत्ता स्वयंवर कुठल्याही परीस्थित होवूनच राहणार... ते पण लवकरात लवकर...! आम्ही उद्याच सगळ्या राज्यात सूचना प्रेषित करतो.." महाराज आपल्या मुलीचा चेहरा बघून थोडे शांत झाले...


"पण... काय तुम्ही... देव बरोबर चर्चा केली आहे... ह्या विषयी...?" प्रियाने संकुचित होवून विचारले...


महाराज निश्चिंत होत बोलले, "देवची चिंता करायची गरज नाही आहे राजकुमारी... त्याला तर फक्त बोलायची देरी आहे... आम्हाला विश्वास आहे कि तो आमचा आग्रह कधीच नाही तोडणार..?"


"पण तरीसुद्धा..." प्रिया हे ऐकून खूप आनंदी झाली, "पिताश्री..! आम्हाला वाटते कि तुम्ही त्यांच्या बरोबर एकदा बोलावे... लवकरात लवकर...! आणि आम्ही पण तिथेच उपस्थित असणार.." प्रियाने अनुमती मांगितली....


"जशी तुमची इच्छा राजकुमारी...! आम्ही उद्याच त्यांना आमच्या जवळ बोलावतो... तुम्ही पण आमच्या सोबतच असा..! आम्हाला विश्वास आहे कि उद्या तुम्ही देवच्या आणखी एका रुपाला जाणू शकाल...!" महाराजांच्या चेहऱ्यावर देवची आठवण येताच एक चमक आली...


----------------------------


देवने एकदम आक्रमक चाल चालत आपल्या सेनापतीच्या वेशभूषेमध्ये राजमहालात प्रवेश केला... मुख्यद्वारावरती उभे असणाऱ्या दोन द्वारपालांनी विनम्रतेने आपली मान खाली झुकवली...


"महाराज कुठे आहेत...?" देवने आतमध्ये येवून तिथे उभा असलेल्या एका सैनिकाला विचारले...


"महाराज आपल्या विश्राम गृहेमध्ये आपलीच वाट बघत आहेत सेनापती जी ...!" सैनिकाने विनाम्रेतेने उत्तर दिलं, "मला सांगितलं आहे कि मी तुम्हाला तिथपर्यंत सोडून येवू...!... या...!"


सैनिक बोलला आणि विश्राम गृह्कडे निघाला... त्याच्यासोबत देवपण...


--------------------


"महाराज..! आपल्या आज्ञेच्या अनुसार मी सेनापतीजीला इथपर्यंत आणलं आहे... आत्ता आपल्याकडे आतमध्य पाठवण्याची आज्ञा मांगतो..." सैनिकाने देवच्या आगोदर जाऊन महाराजांशी अनुमती मांगितली...


राजकुमारी प्रियदर्शिनी त्यांच्या सोबतच बसली होती... ती आपल्या देवला सेनापतीच्या वेशभूषेत पाहण्यासाठी विचलित झाली होती... पण येणाऱ्या क्षणांबद्दल विचार करून तिचं हृदय आत्ता जोरात धडधड करायला लागलं होतं...


"ह्म्म्म...." महाराज प्रसन्नचित भावनेने बोलले, "त्यांना विनम्रतेने आत पाठवा...!"


"जी आज्ञा महाराज...!" सैनिक बोलला आणि आपली मान विनाम्रेतेने झुकवून वळला आणि बाहेर निघून गेला...


--------------------------


सेनापती देवने विश्रामगृहमध्ये प्रवेश करताच पहिले महाराजला मग नंतर राजकुमारीला प्रणाम केला... पण त्याने राजकुमारीला नजर वर करून सुद्धा पाहिले नाही... तिथे राजकुमारी प्रिया देवला ह्या रूपात बघून एकदम मंत्रमुग्ध झाल्या होत्या... देवच्या सुंदर, सुडौल आणि बळकट शरीरावर ती वस्त्र खूप चांगली दिसत होती...


"आपलं स्थान ग्रहण करा सेनापतीजी...!" महाराजने देवला विनम्रतेने त्यांच्या समोर बसण्याचा आग्रह केला...


"जी आज्ञा महाराज...!" देवने विनम्रतेने आपली मान झुकवली आणि महाराजांसमोर असलेल्या सिंहासनावर जाऊन बसला, "महाराज, अचानक मला इथे आमंत्रित करण्याचं काही विशेष कारण...?" देव महाराजांकडे बघत बोलला...


"हो, सेनापतीजी...! कारण अतिविशिष्ट आहे... त्यामुळे आम्ही तुमची अचानक आठवण काढली...!" महाराजने उत्तर दिलं...


"बोला महाराज...!" देवने राजकुमारीला अजूनपर्यंत नाही पाहिलं होतं...


"खरंम्हणजे आम्ही राजकुमारी प्रीयादर्शिनीच्या लग्नासंबंधी अतिशीघ्र एक स्वयंवर आयोजित करण्याचे मन बनवले आहे...!" महाराज बोलले...


"तर ह्याच्यामध्ये अडचण काय आहे महाराज...? आपण जेव्हा पाहिजे, तेव्हा स्वयंवराची तैय्यारी सुरु करायला सांगू शकता... ह्या पवित्र कार्यामध्ये जर मी कुठल्याही प्रकारची सहायता करू शकेन; हे माझं सौभाग्य आहे...!" देव एकदम शांतपणे बोलला...


"ह्म्म्म.. आम्ही तुमच्या उच्च आदर्शाचे आणि व्यक्तित्वाचे एकदम कायल झालो आहोत सेनापतीजी...! तुम्ही निश्चिंतच आमच्या राज्याचे एक अनमोल रत्न आहात... तुम्हाला सेनापतीच्या रूपात पाहून राज्य गौरवन्वितच नाही; तर कृतज्ञ पण झाला आहे..."


"पण..." महाराजांनी आपल्या बोलण्याला किंचित विराम देत नंतर बोलले, "तलवारबाजी प्रतीयोगीतामध्ये ज्याप्रकारे तुम्ही सगळ्या राजकुमारांचे मान मर्दन केले आहेत; आज पर्यंत पण तुमच्या ह्या कला शक्तीला आठवण करून त्यांना शहारे येत असतील... आम्हाला आशंका आहे कि स्वयंवरमध्ये ते राजकुमार भाग घेण्याच्या पहिलेच तुमची उपस्थिती जाणून मैदान सोडून पळून गेले तर.." महाराजने आपले बोलणे पूर्ण केल्यावर एक दिर्घश्वास घेतला...


"मी... समजलो नाही महाराज...! स्वयंवरमध्ये माझी उपस्थिती कोणत्याप्रकारे त्यांना भाग घेण्यासाठी बाधक ठरू शकते...?" देव बोलला आणि मग स्वतःच आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं प्रयत्न केलं, "ओह्ह... कुठे तुम्ही हा विचार करून तर आपण चिंतेमध्ये नाही आहात कि मी स्वयंवर..."


महाराजने देवचं वाक्य पूर्ण होण्याआधीच बोलायला सुरुवात केली, "हो...! तुम्ही बरोबर विचार करत आहात सेनापतीजी..! आमच्या चिंतेचं मूळ कारण तेच आहे... तुम्ही स्वयंवरच्या पहिलेच घोषणा करा कि तुम्ही स्वयंवरमध्ये भाग नाही घेत आहात...!"


देवच्या चेहऱ्यावर स्मित हास्य बघून राजकुमारीचं हृदय एकदम जोरात धडधडायला लागलं.. तिला आशंका होती कि ना जाणो देव तिला ओळखल्याशिवाय (कारण जेव्हा पण प्रियदर्शिनी त्याला भेटायला जायची ती आपली वेशभूषा बदलूनच जायची... आपल्या एका मैत्रिणीला ती आपले कपडे घालायला द्यायची आणि तिचे कपडे घालून ती स्वतः राजवाड्यातून गपचूप त्याला भेटायला जायची... त्यामुळे देवला माहिती नव्हते कि ती राजकुमारी आहे... आणि जेव्हापासून देव महाराजाच्या विश्रामगृहात आला आहे त्याने राजकुमारीला मान वर करून पाहिले सुद्धा नाही...) महाराजाला स्वयंवरमध्ये भाग न घेण्याचे वचन नाही दिलं पाहिजे; चिंतीत राजकुमारी महाराजाची अनुमती घेतल्याशिवाय सरळ वार्तेमध्ये उतरली, "मी ऐकलं आहे... कि तुम्ही आपलं वचन कुठल्याही परीस्थित निभावता... देव...!"


ओळखीचा आवाज ऐकून आणि राजकुमारीच्या तोंडून ह्याप्रकारे आपलं नाव ऐकून क्षणभरासाठी देवने आपली नजर वर करून राजकुमारीला पाहिले... देववर अचानक वज्र सोडल्यासारखं झालं... त्याची हालत बघण्यासारखी होती... आपल्या चेहऱ्यावर घोर आश्चर्याचे भाव घेवून तो त्याच क्षणी आपल्या सिंहासनावरून उभा राहिला... सगळं काही विसरून तो एकटक राजकुमारीलाच बघायला लागला...


"हे अचानक तुम्हाला काय झाले सेनापती..? सगळं खुशल तर आहे... ? तुम्ही अचानक असे उभे का झालात...? आपलं स्थान ग्रहण करा...!" देवची हालत बघून महाराजांचं  मन कावरं बावरं झालं...


"क्षमा करा महाराज...! पण मला माझं वचन निभावण्यासाठी स्वयंवरमध्ये भाग घ्यायलाच लागणार...!" देव आपली मान विनम्रतेने झुकवत बोलला...


राजकुमारीच्या मनात आता थोडी शांती आली... पण ह्या शांतीची अनुभूती काही क्षणापुर्तीच होती...


"हे तुम्ही काय बोलत आहात सेनापती...!" महाराजांचा कंठ पुढच्या क्षणीच थोडा रुद्र झाला... विचलित होऊन त्यांनी आपले बोलणे पुढे चालूच ठेवले, "मी आपलं तात्पर्य समजलो नाही... कोणतं वचन...?"


"क्षमा करा महाराज...! पण मी स्वप्नातपण विचार नाही केलं होता कि जिला मी आपली अर्धांगिनीच्या रूपात स्वीकार केलं आहे; आणि ह्या जन्मात मी कुठल्या हि परीस्थित मी त्यांना त्यांचा हात पकडून राहण्याचं वचन देत आहे... त्या... ह्या राज्याची राजकुमारी प्रियदर्शिनी आहेत...!" देवच्या शब्दांमध्ये हलकीशी आत्मग्लानी स्पष्ट दिसत होती... तरी पण त्याचे बोलले गेलेले प्रत्येक शब्द दगडावरची रेष होते...


आत्ता पाळी महाराजांची सिंहासन सोडून उभं राहण्याची होती... देवची गोष्ट ऐकून त्यांना जेवढं आणि जे काही समजलं, तेच समजून त्यांची आत्मा पण शहारली, "हि काय थट्टा आहे सेनापती...! आम्ही असलं काही नीच प्रयोजन कदापि सहन नाही करू शकत...!"


देवच्या चेहऱ्यावरचे भाव ठाम होते, "हे सगळं चुकून झालं आहे महाराज...! पण झालं आहे... मी राजकुमारीशी आणि राजकुमारी माझ्याशी प्रेम करतात..!"


"हो... पिताश्री..! आम्ही देव शिवाय नाही जगू शकत...! देवच आमच्या स्वप्नाचे राजकुमार आहेत... आत्ता तेच माझे आराध्य आहेत.. पिताश्री...!" प्रियाने महाराजांना आपली सहमती आणि देवच्या प्रती आपल्या खूप प्रेमाचा भास दिला...


"बकवास बंद करा राजकुमारी...! आमच्या नाकाखाली हे सगळं होत राहिलं; आणि आम्हाला भनकपण नाही लागली...!" महाराज प्रियाला बोलून देवकडे वळले, "तुम्ही आमच्या कृपेचा आणि अनुशासनचा अनुचित लाभ घेतला आहे देव...! तुने आमच्या विश्वासाचा खून केला आहे... आम्ही आत्ताच तुम्हाला सेनापतीच्या पदापासून विमुक्त करण्याचे आदेश देत आहोत...!" महाराज रागात एकदम लाल झाले होते...


"जी आज्ञा महाराज...!" देवच्या चेहऱ्यावरती त्यांच्या आदेशचा लेश मात्र फरक नाही पडला... तो आपलं मुकुट काढून पुढे झाला आणि त्याला महाराजांच्या चरणावरती ठेवलं..., "मी एक गोष्ट स्पष्ट करतो महाराज...! आज इथे येण्याच्या पहिले मला प्रिया हि राजकुमारी आहे ह्या विषयी किंचित पण माहिती नव्हतं..."


"जर असं आहे तर ह्याला चुकून झालेली चुकी मानून सगळं काही विसरून जा...! आम्ही तुमचे प्रशंषक आहोत... तुम्हाला माफ करून सेनापती पदापासून विमुक्त करण्याचा आमचा निर्णय परत घेवू...!!" महाराज काही नरम पडत बोलले...


देव आपल्या निर्णयावर ठाम होत बोलला, "प्रेम चुकून नाही होत महाराज...! चुकून मी फक्त राजकुमारी बरोबर प्रेम संबंध बनवायची चूक केली आहे... पण प्रेम प्रत्येक स्थितीमध्ये शास्वत आहे... मी ह्यांना अर्धांगिनीच्या रुपात स्वेच्छा स्वीकार केलं आहे... आणि... ह्यांना जीवनभर आपल्या सोबत ठेवण्याचं वचन दिलं आहे... मी आपल्या वचनावर अडीग आहे.. जो पर्यंत ह्या बोलतील... तो पर्यंत ह्या माझ्याच असणार... पण हो..! जर स्वयंवर ह्यांच्या इच्छेने होत आहे तर होवू द्या...! मी स्वयंवरच्या माध्यमाने ह्यांचं मन पुनः जिंकण्यासाठी यथासंभव प्रयत्न करेन..!"


"दे
sssssssssssssssssssव....!" महाराजांची गर्जना ऐकून बाहेर उभे असलेले द्वारपाल आतमध्ये आले... एकदम सतर्क असलेला देवचा हात लगेच तलवारीच्या मुठवर कसला गेला... प्रिया पागल होवून देवशी आलिंगणबद्ध होण्यासाठी त्याच्याकडे जात होती तर लगेच महाराजांनी तिचा हात एकदम सक्तीने पकडला... आणि द्वारपालांना हातांनी इशारा करत बाहेर जाण्याचा इशारा केला...

"पिताश्री...! देव आमचा जीव आहे... राजकुमारी होण्याचा गौरव आणि हे राजमहाल; हे वैभव; सगळं देवच्या चरणासमोर तुच्छ आहेत... आम्ही त्यांच्याशिवाय जिवंत नाही राहू शकत... आम्हाला आमच्या आत्म्याजवळ जाऊ द्या... पिताश्री..!" बोलता बोलता राजकुमारीचा देह बैचेनी आणि विवशताने पूर्ण कापत होता... ती भरपूर प्रयत्न करत होती; आपल्याला सोडवण्यासाठी... पण सफल नाही झाली...


महाराज काही बोलणार, तेवढ्यात एका दूताने दुर्त गतीने विश्राम गृहात प्रवेश केला, "महाराज...! अनहोनी झाली..." दूत आतमध्ये येवून सलाम न करताच बोलला...


महाराज बोलले, "आजचा दिवसच एक स्वतः अनहोनी आहे... बोला...! काय गोष्ट आहे...?" महाराज अजूनपर्यंत प्रियाचा हात पकडून उभे होते...


दूताने लगेच बोलणे सुरु केले, "महाराज...; विक्रमने आमेरच्या राजाच्या सोबत मिळून आपल्यावरती हमला करण्यासाठी सैनिकांना पाठवले आहे... आपले पूर्व सेनापातीपण त्यांना जाऊन मिळाले आहेत... त्यांनी संदेश पाठवला आहे कि आत्ता पण आपल्यांना जर प्रयालापासून वाचायचे आहे तर राजकुमारी प्रियदर्शिनीला त्यांच्या सुपूर्द करा... राज्यावरती गंभीर संकट आलं आहे महाराज...!"


"काय...?" महाराजांचं शरीर संदेश ऐकूनच शिथिल पडलं... त्यांच्या हाताची पकड प्रियाच्या हातातून लगेच ढिली पडली... त्यांच्या तोंडातून एक शब्द पण नाही निघाला...


प्रियाने तर जसं काही ऐकलंच नाही... जशी ती महाराजांच्या पकडशी मुक्त झाली... देवशी आलिंगणबद्ध होण्यासाठी त्यांच्या जवळ पळाली, आणि जाऊन 'आपल्या' देवच्या बाहुपाश्यात समावली.., "मला इथून घेवून चला देव...! मला इथून घेवून चला...! मी आत्ता इथे एक क्षण पण नाही राहू शकत... मी तुमच्याशिवाय एक क्षण पण राहू नाही शकत.. आपण कुठल्या दुसऱ्या राज्यात जाऊन राहू.. तुमचं वचन पूर्ण करा देव.. मला घेवून चला...!" प्रियाच्या डोळ्यात अश्रू बंद होण्याचं नावच घेत नव्हते...


"मला देश
द्रोही बनण्यासाठी मजबूर नका करू प्रिया...! आमच्या राज्यावर संकट आलं आहे... मला महाराजांच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा करू द्या...! निश्चिंत राहा...! मी जिवंत असेपर्यंत कोणीच तुम्हाला माझ्यापासून दूर नाही करू शकत..!"

प्रिया अशीच देवशी आलिंगणबद्ध राहिली आणि तिने आपलं डोकं उचलून महाराजांच्या समोर देवच्या गालावर एक चुंबन दिलं... पण देव एकदम स्थिर उभा राहून महाराजाकडेच बघत होता...

महाराजांचे डोळे शरमेने झुकली गेली... आत्ता कोणी सेनेला संगठीत करून युद्धात उतरण्यासाठी वाचला होता तो फक्त देवच होता...! पूर्व सेनापती तर गद्दार, देश द्रोही निघाला...!

"काय आदेश आहे महाराज...?" देवने स्पष्ट शब्दात महाराजांची मनशा विचारली...

महाराजांचे डोळे पाणावले होते, "जेवढं संभव आहे सेनापातीजी..! पण आम्ही नामार्दासारखं पळून नाही... लडून मरणे पसंत करतो..!"

"आपण आज्ञा द्या महाराज...! मी जिवंत असेपर्यंत राजवाड्याकडे कोणी नजर उचलून पण बघू नाही शकत... जो बघेल... आपली क्षत्रिय सेना त्याचे डोळे काढून टाकतील...!" देवची गर्जना पूर्ण राजमहालात प्रतिध्वनित झाली...

"तर जावा सेनापती...! जाऊन सेनेची कमान संभाळा... आम्ही काही क्षणातच तैय्यार होवून येतो... ह्या राज्याला तुमच्यासारख्या वीरवर सदैव गर्व असेल...!" महाराज बोलले...

"जी आज्ञा महाराज...!" देव एवढं बोलून अजूनपर्यंत आलिंगणबद्ध असणाऱ्या प्रियाच्या डोळ्यात पाहिले..., "मला जाउद्या प्रिया... देशाची आन मला बोलवते... मी परत येणार... वचन देतो...!"

रडून रडून पागल झालेली प्रिया, देवच्या वचनावर विश्वास ठेवून पाठी झाली... देवने अजून एकदा तिच्या प्रेमळ चेहऱ्याला बघितले आणि आज्ञा घेवून निघून गेला...


क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment