Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 27 July 2012

भाग ~ ~ ५७ एक प्रेम कथा

Update 57द्वारपाल पळत पळत राजमहालात आला आणि महाराणीच्या समक्ष आपली मान खाली करून उभा राहिला..., "महाराणी...! सेनापती देव महाराजांसोबत राजमहालात येत आहेत... महाराज शुद्धीत नाही आहेत... सेनापती पण त्यांच्या सोबत आतमध्ये येण्याची अनुमती मांगत आहेत... आपण आदेश दिला होता कि त्यांना महलात प्रवेश नाही दिला पाहिजे... आम्ही दुविधेमध्ये आहोत... महाराजांची वस्तुस्थिती तेच तुम्हाला सांगू शकतात... आम्हाला आदेश द्या..."

"लवकर घेवून या त्यांना आतमध्ये...!" महाराणी महाराजांचे बेशुद्ध होण्याची बातमी ऐकून... एकदम विचलित झाली त्यांना देवच्या आतमध्ये येण्याच्या पहिले प्रियाला तिथून लांब पाठवण्याची गोष्ट सुचलीच नाही...


काहीच क्षणात देव महाराजांना घेवून महाराणीसमोर उपस्थित झाला... देवच्या शरीरावर किती तरी जागी जखमांचे निशाण होते आणि पूर्ण शरीर घामेने भिजला होता... त्याच्या पाठीची जखम तर खूप मोठी होती.. आणि जीव-घेणी प्रतीत होत होती... त्यांच्या कमरेतून रक्त स्त्रवत होतं... पण महाराणीने त्यांच्या जखमेवर जास्त लक्ष न देता...


"काय झाला ह्यांना...?" महाराणीने विचारले... आणि शैय्यावर पहुडलेल्या महाराजांच्या छातीवर अश्रू वाहवत राहिली...


"महाराणीजी...! घाबरू नका... हे घायळ झाले आहेत आणि रक्त जास्त गेल्यामुळे कदाचित बेशुद्ध झाले असं प्रतीत होत आहे... पण चिंता करण्यासाठी कुठलीच गोष्ट नाही आहे... मला परत जायला लागणार.. आपण लवकरात लवकर वैद्यला बोलवा.."


देवच आवाज ऐकून उत्साहित होवून राजकुमारी पळत पळत त्याच्याकडे आली... पण देवच्या जखमांनी भरलेल्या शरीराला आणि त्याची अवस्था बघून तिच्या तोंडून एक किंचाळी निघाली, "काय झालं देव..! हे काय झालं तुम्हाला...?"


रडत रडत राजकुमारी देवच्या बहुपाश्यात समावली, त्यांच्याकडे बघून महाराणी थोडी क्रोधीत झाली पण नंतर त्यांनी लगेच वैद्यला बोलवायला सांगितले...


"स्वतःला सांभाळा प्रिया...! मला काहीच नाही झाले आहे... हे तर खूप मामुली जखम आहेत... रणक्षेत्रापर्यंत जाता जाता पूर्ण भरतील.. तुम्ही चिंता नका करू..." देव प्रियाला दिलासा देत बोलला...


"काय...? आत्ता तुम्ही परत जात आहात.. नाही... मी तुम्हाला ह्या अवस्थेमध्ये जाऊ देणार नाही... आपली अवस्था तरी एकदा बघा जरा..." एवढं बोलून राजकुमारी देवच्या छातीवरती हृदयाजवळ बनलेल्या जखमाला बघून जोरात रडायला लागली...


"माझा विश्वास करा राजकुमारी...! मला काहीच नाही झाले आहे... तुमच्या वर वाईट नजर टाकणाऱ्या अभिषेकचं डोकं मी त्याच्या धडापासून वेगळं केलं आहे... आत्ता फक्त एक शेवटची लढाई बाकी आहे... मला जाऊ द्या..." देवने खूप प्रेमाने नाजुकश्या राजकुमारीला आपल्या शरीरापासून वेगळं करत बोलला...


"तुम्हाला काही झालं तर मी जिवंत राहू शकणार नाही... वचन द्या तुम्ही लवकरात लवकर परत येणार..." प्रियदर्शिनी पाणावलेल्या डोळ्याने बोलली...


राजमहालातून प्रस्थान करण्यासाठी पाठी फिरलेला देव परत वळून राजकुमारी जवळ आला... काही वेळ तो असाच राजकुमारीला बघत राहिला जणू त्या चंद्रासारख्या चेहऱ्याला शेवटचं बघत आहे... मग तिच्याकडे बघून स्मित हास्य दिलं आणि आपल्या गळ्यात घातलेला एक अस्ताधातु यंत्र (लोकेट) काढून राजकुमारीच्या गळ्यात घातला...


"तुम्हाला आत्ता माझ्यापासून कोणीच दूर नाही करू शकत प्रिया... ह्या यंत्रात जीवनभरच्या सत्कर्माचा योग निहित आहे... मी आज माझं सगळं पणाला लाऊन देवाशी तुम्हाला मांगीतलं आहे... जन्मोजन्मासाठी..." देवने राजकुमारीच्या कपाळाला एक चुंबन दिलं आणि परत निघून गेला...


राजकुमारी ओरडत राहिली, "वचन तर देवून जा...देव...!"


--------------------


पुढच्या दिवशी राजकुमारीची सखी लता तिच्याजवळ आली... तिचा चेहरा ह्या प्रकारे पिवळा पडला होता जणू त्या चेहऱ्यावरून हसणं कायमस्वरूपी गायब झालं आहे...


"तुम्ही असं का बघत आहात लता... सांग ना काय बातमी आणली आहेस माझ्या देवची...!" राजकुमारी विचलित होत बोलली...


लता काहीच नाही बोलली... बस तिच्या डोळ्यातले दोन अश्रू जाऊन प्रियाच्या हातावरती पडले...


"आम्हाला घाबरवतेस ना... देव येणारच आहे ना... बघ... बघ... तू लवकर बोल... नाही तर मी... आम्ही महाराजांना तुझी तक्रार करणार... आम्ही... देवला पण सांगू..."


"ल
ssssता तू बोलत का नाही.. काय झालं आहे तुला...?" प्रियदर्शनी अचानक किंचाळली..

"आत्ता... आत्ता बोलण्यासाठी उरलंच काय आहे राजकुमारी... महाराज... नाही राहिले... राजकुमार नाही राहिले... कुमार दीक्षित कुठे आहेत माहित नाही... महाराणीने आत्महत्या करून घेतली..." लताचे अश्रू थांबण्याचे नावच नाही घेत होते... ती मध्ये मध्ये हिचकोळे घेत बोलली, "देव..."


"नाही... नाही... देव विषयी आम्ही तुझी काहीच बकवास नाही ऐकणार... देवला कोणीच हरवू शकत नाही... देवला आमच्यापासून कोणीच हिसकावून घेवू नाही शकत... देव फक्त आमचाच आहे.. पिताश्री नाही राहिले तर काय झालं..? आत्ता देवच ह्या राज्याचा राजा आहे... येवू दे देवला... आम्ही तुमची तक्रार त्यांना करणार..." बोलता बोलता राजकुमारी थकली आणि थोडा वेळ थांबून परत बोलायला लागली,


"बोलून टाक ना सखी.. तू आम्हाला अस्वस्थ का करतेस... आत्ता तर तू देवच्या कारनाम्याच्या विषयी आम्हाला सांगत होतीस... तू बोलत होतीस ना... देव युद्धभूमीमध्ये ह्या प्रकारे पुढे होता... जणू... जणू पूर्ण शत्रूंच्या सैनिकांना एकटाच स्वाहा करून टाकेन... तूच बोलत होतीस ना कि कसा शत्रू देशचा राजा त्याच्या समोर येण्यासाठी घाबरत होता... आणि देवसमोर येताच कसा पळत सुटला... तूच तर सांगितले होतेस कि कसं त्या हरामी अभिषेकचं डोकं कसं आपल्या देवने एकाच वारेने त्याच्या धडापासून वेगळं केलं होतं... देव तर अपराजय आहे ना सखी... तूच तर काल सांगत होतीस... त्यांचा कोणी कसा सामना करू शकतो... त्यांना कोणी कसं मारू... ना
ssssssssssssही."

*****************************************

One of my friends has rightfully narrate the feelings of the princess:
काळाचे बांध फुटून जातात,
वाहून जाते सहवासाचे पाणी,
तरीही अंकुर तग धरून राहतात,
कारण भिजत असतात त्या आठवणी.
****************************************

-------------------------------------"नाssssssssssssही."


बेडरूममधून आलेल्या ह्या किंचाळीने रोहन आणि रवी अचानक उडून उभे राहिले... रोहनने घाबरून सरळ बेडरूमकडे धाव घेतली... रवी पण त्याच्या पाठी पाठी होता...


बेडरूममध्ये निरुची किंकाळी ऐकून उठून बसलेली रितू तिला बसवण्याचा प्रयत्न करत होती... पण नीरु अजूनपर्यंत झोपेतच वाटत होती... आणि ती अजुपर्यंत काही तरी बडबडत होती... निरूचा चेहरा घामेने आणि अश्रूंनी भरला होता...


जसेच निरुने आपले डोळे उघडले समोर उभा असलेल्या रोहनला बघितले... ती पटकन उठली आणि पळत जाऊन रोहनच्या बहुपाश्यात सामावली..., "देव...!"


सगळे जण हैराण होवून... अचानक हे निरुला झालं तरी काय आहे...?


नीरु खूप वेळ रोहनच्या बाहुपाश्यात होती... रोहन बिचकत सरळ उभा राहून कधी रितूला तर कधी रविला बघत होता... कोणालाच काहीच समजत नव्हते...


अचानक जसं आत्ता आत्ताच आपल्या तंद्रीत आलेली नीरु रोहनशी ह्या प्रकारे उभी आहे असं पाहून ती पण हैराण झाली... ती काही वेळ लाजेने अशीच उभी राहिली... मग हळू हळू रोहनच्या गळ्यातून आपले हात काढले आणि आपली मान खाली करून पळत आपल्या बेडवर जाऊन चादर ओढून त्याच्यात घुसली...


रोहन आणि रवीची नजरानजर झाली आणि ते दोघे हसले...


रीतुने तिच्या चेहऱ्या वरतून चादर बाजूला केली, "काय झालं होतं तुला शिनू...?"


"सॉरी, स्वप्नं होतं...!" नीरु बोलली आणि रीतुकडे स्मित हास्य देत परत तिच्याकडून चादर हिसकावून घेतली...


------------------------


"चल ये.. ते दोघे नाश्ता करण्यासाठी आपली वाट बघत आहेत.." दुसऱ्या दिवशी सकाळी रितू निरुला बेडरूममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती...


"नाही... मला नाही यायचे बाहेर... इथेच चहा आण...!" निरूचा चेहरा रोहनच्यासमोर जाण्याच्या नावानेच गुलाबी पडला होता....


"चल ना...! अत्ता असे नखरे नको करूस... चल उठ...!" रीतुने तिचा एक हात पकडून खेचला..


रितू निरुला खेचत बाहेर घेवून आली... नजर खाली झुकवून नीरु रोहनच्या समोर जावून बसली... आणि चहाचा कप उचलला...


"शिनू... सांग ना... असं कोणतं स्वप्नं आलं होतं तुला रात्री...?" रितू चहाची चुस्की घेत बोलली... रवी आणि रोहन एकदम शांत बसले होते... रोहन राहून राहून काण्या डोळ्याने निरुलाच बघत होता....


निरुने रात्रीच्या विषयी बोलणाऱ्या रितूला एकदा रागाने बघितले... आणि परत आपली नजर झुकवली...


रीतुने पुढच्या वेळी अजून जोर देत विचारले, "अरे... सांग ना यार... आम्ही सगळे ऐकायला उतावीळ होत आहोत... तुला रोहनच्या सारखंच कोणतं स्वप्नं तर नाही आलं... तुझ्या स्वप्नात देव आला होता काय... ?"


"माहित नाही... आत्ता तर मला काहीच आठवत पण नाही... पण हो... कोणतं तरी स्वप्नं आलं होतं मला..." निरुने शेवटी रोहनसमोर आपली वाचा खोलली....


"पण तुम्ही आमच्या समोर काल रोहनला देव बोलला होता... आम्हा सगळ्यांना चांगलं आठवणीत आहे..." रवी बोलला...


"केव्हा...?" नीरु काहीतरी आठवत बोलली...


"तेव्हा, जेव्हा तुम्ही पळत येवून रोहनला मिठी मारली होती... मला तर 'देवदास' मूवी आठवली होती तेव्हा... मी तर बस रडणारच होतो..." रवीने आपल्या चेहऱ्यावरती आपला हात ठेवून आपल्या हसण्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करायला लागला पण लपवू शकला नाही... पण काही वेळानंतरच तो गळा फाडून हसायला लागला... "हा हा हा हा हा..."


अचानक निरूच्या चेहऱ्यावरती शरमेने लाली आली... रवीच्या गोष्टीवरती राग आल्याचा दाखवत ती उठून पळण्याचा प्रयत्न करू लागली... पण रीतुने तिचा हात पकडून परत तिला खाली बसवले... रोहनने प्रेमाने रवीच्या डोक्यावर एक टपली मारली, "सकाळी सकाळी उठताच सुरु होतोस... वेळ तर बघत जा.."


"अशी का करतेस शिनू..? काही तरी सांग... काही तरी आठवणीत असेल तुला स्वप्नाविषयी...!" रीतुने प्रेमाने विचारले...


"मला तर फक्त एवढेच आठवणीत आहे कि कोणी राजकुमारी पागल होवून रडत होती..." निरुला जे आठवले ते तिने सांगितले...


"आणि... देव नव्हता प्रिया बरोबर...?" रोहनने उत्सुक होवून विचारले...


"नाही... हो... आठवलं... राजकुमारीचं नाव कदाचित प्रियाच होतं.. ती एका दुसऱ्या मुलीला सारखी सारखी देव विषयीच विचारात होती... आणि खूप रडत होती..." निरु पुढे आठवताच बोलली...


"आत्ता पण तुम्हाला रोहनच्या स्वप्नांवर विश्वास नाही आहे काय...? आत्ता पण तुम्ही परत जाण्याच्या हट्टावर ठाम असणार काय...? तुम्हाला असं स्वप्नं येणं... मग रोहनला बघून झोपेत त्याच्याजवळ पळणे... ह्याला देव बोलणे.. मी पण तर ह्याच्या बरोबरच उभा होतो... तुम्ही मला देव का नाही बोललात...? मला तर ते क्षण आठवताच वाटते कि तुम्ही स्वतः 'प्रिया' सारखा व्यवहार करत आहात... आपण रडत पण होता आणि रोहनला देव समजून ह्याच्याकडे पळत पण आल्या होत्या... आत्ता विश्वास करायला काहीच उरलं नाही आहे...?" रवीने दीर्घ श्वास घेत आपलं बोलणं संपवलं....


"एक मिनट फोन द्या जरा...!" निरुने रोहनकडून फोन घेतला आणि आपल्या वडिलांना फोन लावला...


"पप्पा, मी शिनू...!" नीरु बोलली...


पप्पा कदाचित ऑफिससाठी निघाले होते, "हो बोल बेटा...!"


"तुम्ही... अजून पर्यंत माझ्यावर रागावला आहात...?" नीरु बोलली...


"अरे बेटा... सोड आत्ता त्या गोष्टींना... परत केव्हा येताय... २ हफ्त्या नंतर रितूचं लग्न आहे... तैय्यारी पण तर करायची असणार तिला..." पप्पा बोलले...


"हो, पप्पा...! आम्ही येतो... तुम्हाला एक विचारायचे होते..." नीरु बोलली...


"हो... विचार..."


"ते... तुम्ही माझं नाव बदलण्याच्या पाठी मला कारण सांगितलं होतं ना..?" निरूच्या गोष्टीला पप्पांनीमध्येच टोकले


"आत्ता हे काय... सकाळी सकाळी घेवून बसली आहेस...!"


"नाही पप्पा.. फक्त एक गोष्ट विचारायची आहे... ते तुम्ही बोलत होता कि मी कोणतं तरी नाव घेवून बेशुद्ध झाली होती... नाव आठवतंय तुम्हाला...?" निरुने विचारले...


"आत्ता... नाव कसं आठवणीत असणार... १५ वर्ष झाली त्या गोष्टीला...!" पप्पा बोलले...


"ते... मी तेच विचारत होती... कुठे मी... 'देव' तर नाही बोलली होती..?" नीरुने थांबून थांबून विचारले...


"देव... अरे हो... हेच तर नाव सांगितलं होतं तुझ्या प्रिन्सिपलने... हो... तू 'देव' बोलूनच बेशुद्ध झाली होतीस... पण तुला कसं आठवणीत आहे...?" पप्पांनी आश्चर्यचकित होवून गाडीला ब्रेक लावला..


"आठवत नाही आहे पप्पा... पण आज रात्री परत मला ते विचित्र स्वप्नं आले होते... आणि आज परत मी हेच नाव घेवून ओरडत होती..." नीरु आश्चर्याने रोहनच्या डोळ्यात बघायला लागली...


"अरे देवा....! तो तांत्रिक एकदम ठीक बोलला होता... जुन्या नावाला कायमस्वरूपी विसरण्यासाठी... तू परत तेच नाव घेतलंस बेटा... का केलंस तू असं...? सारखं सारखं तेच नाव विचार करूनच तुला असले स्वप्नं आले असतील... मला चिंता होते बेटा... तू लवकर घरी ये...!" पप्पांच्या आवाजामध्ये  निराशा साफ माहिती पडत होती...


"नाही पप्पा... अशी कोणती गोष्ट नाही आहे... मी एकदम ठीक आहे... मी संध्याकाळी फोन करते..." नीरु बोलली आणि पप्पांच्या ओके बोलल्यानंतर फोन कट केला...


निरुची स्थिती काही ह्या प्रकारे झाली होती...
"कुछ धुंधला सा नजर आने लगा है,
ख्वाबों में मुझको सताने लगा है...
ये साथ ऐसा है जनम-ओ-जनम का,
मेरा दिल अब मुझको बताने लगा है...!!!
 


----------------------------


"काही त्रास तर झाला नाही ना बेटा...?" रोहनचे पप्पा सकाळी येवून सरळ नीरू आणि रितूकडे  गेले...


"नाही पप्पा... " नीरु बोलली...


"तू मला काहीतरी टेन्शनमध्ये वाटतेस... काहीच चिंता नको करूस...? मी सगळं काही ठीक करतो... प्रेम करतेस ना माझ्या नालायक मुलावर..." रोहनचे पप्पा बोलले...


बेचारी नीरु काहीच नाही बोलली... ती काहीच बोलत नव्हती हे बघून रोहनने मध्येच हस्तक्षेप केला, "पप्पा, ते..."


"ओय... तू मध्ये काहीच नको बोलूस... हे बाप लेकीचं बोलणं आहे.. बोलना बेटा... प्रेम करतेस ना माझ्या रोहनशी..." पप्पाने मध्येच बोलणाऱ्या रोहनला बजावले...


नीरु काहीच नाही बोलली आणि आपली मान खाली घातली...


"मी समजलो... दे तुझ्या वडिलांचा नंबर दे..." पप्पाने प्रेमाने निरुला सांगितले...


बेचारी काय करणार तिने लगेच नंबर सांगितला...


"हि झाली ना गोष्ट... नाव काय आहे...?"


"श्री. अजय सिंघ..." नीरु बोलली...


"गुड... आत्ता बघ मी काय जादू चालवतो..." पप्पा बोलले आणि तिच्या वडिलांशी बोलायला लागले...क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment