Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 28 July 2012

भाग ~ ~ ५८ एक प्रेम कथा

Update 58नीरु आत्ता पण घाबरत होती कि आत्ता पप्पा काय बोलतील आणि काय नाही... तेवढ्यात रोहनचे वडील तिच्या जवळ आले आणि बोलले "हे घे तुझे पप्पा तुझ्याशी बोलायला बघत आहेत... आणि मी सगळं सेट केलं आहे चिंता नको करूस... बोल"

निरुने कापणाऱ्या हाताने फोन कानाला लावला, "हो... पप्पा ते...!"

"तू खुश आहेस ना बेटा....?" पप्पाने प्रेमाने फक्त एवढेच विचारले...

"हो... ते... सॉरी... पप्पा...मी...!" नीरु अजूनपर्यंत घाबरत होती...

"सॉरीला गोळी मार यार... तू आरामात राह तिकडे... तुझे सासरे खूप चांगले आहेत... चिंता नको करूस... मी येतोय तिथे... एक दोन दिवसात... आणि काही बोलायचे आहे तर बोल...?"

"धन्यवाद पप्पा..!" निरूच्या ह्या दोन शब्दांनीच तिच्या पप्पांच्या डोळ्यातून अश्रू झर झर वाहायला लागले...

"चिंता नको करूस... मी तुझ्या सोबत आहे...!"

-------------------------

"तू विचार काय करतेस शिनू... ? कमीत कमी मला तरी सांग..." चिंतीत असणारी रितूने नीरु एकटी भेटताच विचारले...

"ए... रितू ! मला शिनू नको बोलूस...!" नीरु थोडा वेळ थांबून बोलली...

"अरे देवा..! आणि काय बोलू मी...? आत्ता हे नाव पण चेंज करशील काय...?" रीतु आपल्या कपाळावर हात मारत बोलली...

"हो... परत तेच नाव ठेवणार... नीरु...!" नीरु बोलली...

"तू माझं डोकं खराब नको करूस... पहिले खरं खरं सांग तू विचार काय केला आहेस... रोहनच्या विषयी...." रीतुने जोर देत विचारले...

"माहित नाही.." एवढं बोलून नीरु बेडरूमच्या छताकडे बघायला लागली...

"माहित नाही म्हणजे...? तुला नाही माहित असणार तर कोणाला माहिती असणार... हे नाव परत का बदलतेस... तू...?" रितूला काहीच समजत नव्हते...

"यार..." निरुने मध्येच एक दीर्घ श्वास घेतला..., "आज सकाळ पासून माहित नाही असं का वाटतंय... रात्री जे मी स्वप्नं बघितलं होतं... ते तुकड्या तुकड्यांमध्ये ह्या प्रकारे आठवत आहे... जसं माझ्याबरोबर काही हे सगळं आजकालमध्येच घडलं आहे... खूप वाईट... कधी माझ्या मनात येतं कि जसं मला माहित नाही काय मिळालं... आणि अचानकच वाटतं कि काहीतरी हरवलं आहे... खूप प्रेमळ..."

"मन एकदम कावरं बावरं झालं आहे... मी स्वप्नात राजकुमारीचं रडणं बघितलं आहे... सकाळ पासून किती तरी वेळा मला असं वाटलं आहे कि जसं राजकुमारी आत्तापण माझ्या आत रडत आहे... कोणाला तरी हाक मारत आहे..."

"केव्हा वाटते कि देव राजकुमारीला वचन देवून गेला आहे... परत येण्याचं... मनात येतं कि जसं त्याने वचन राजकुमारीला नाही... मला दिला आहे... खूप विचित्र फील होत आहे... यार..."

"असं वाटतंय जसं ती राजकुमारी मीच आहे... माहित नाही का...? पण मनातल्या मनात मी अजूनपर्यंत देवला हाका मारते... काहीतरी गोष्ट आहे रितू... काही तरी गोष्ट आहे..."

"ते तर मी पण बोलत होती कि काही तरी आहे... पण तू विचार काय केला आहेस.. हे तरी सांग माझ्या आयशे...!" रीतुने तिला मध्येच टोकले...

"मी विचार केला आहे कि जे होतंय ते होवू दे... जास्तीत जास्त काय होणार... विचार करून करून पागलच होणार ना... मला जाणायचे आहे कि... देवला कोणी मारले...? मला जाणायचे आहे कि... राजकुमारी बरोबर नंतर काय झाले...? एक गोष्ट अजून... ज्या लॉकेट विषयी रोहनने सांगितले होते माझं 'मन' त्यामध्ये अटकलं आहे.. मला हे पण आठवत आहे कि शेवटी जाताना देवने एक लॉकेटपण राजकुमारीला दिले होते... जर पूर्ण गोष्टीची माहिती नाही पडली तर मी विचार करून करूनच पागल होणार... माहित नाही काय होतंय...?" नीरु बोलून थांबली...

रितू पूर्ण कहाणी ऐकण्यासाठी बेचैन झाली..., "स्वप्नात तू जे बघितले आहे.. ते तुला किती आठवले आहे...?"

"ह्म्म्म... राजकुमारीने देवला पहिले कुठे बघितले ते आठवतंय... देवचा चेहरा आठवत आहे... राजकुमारी वेश बदलून देवच्या घरी गेली होती... तिथे जेवली होती... जे देवने बनवले होते... मग... एक मिनट... आठवू दे..." निरुने आपले डोळे बंद केले...

"देव कसा होता दिसायला..." रितूला राहवलं गेलं नाही...

"तू आपल्या मानव बद्दल विचार कर... माझ्या देव विषयी काय विचारतेस..." एवढं बोलून नीरु हसायला लागली...

"ओहो... खूप मोठी राजकुमारी झालीस...!" रीतुने नीरु वर व्यंग करत हसायला लागली... नंतर अचानक सिरिअस होत बोलली, "तू एकदम आरामात पूर्ण स्वप्न आठव... मग डिटेलमध्ये सांग... मी त्यांना बोलावून आणू ना...?"

"ह्म्म्म... ठीक आहे... १०-१५ मिनिटानंतर बोलाव... तो पर्यंत गप्प बस... मला आठवू दे..." एवढं बोलून नीरु डोळे बंद करून झोपून गेली...

--------------------

"बोलावून आणू आत्ता...? २० मिनिटं झाली..." रितू २० मिनिटं एकदम गप्प बसली होती...

"शु..."निरुने आपल्या ओठांवरती बोट ठेवून रितूला गप्प राहण्याचा इशारा केला... तिच्या हावभावने असे वाटत होते... जसं तिला स्वप्नं आठवत आहेत... किंवा स्वप्नाच्याही पलिकडलं...

रितू स्तभ्द राहून तिच्या जवळ बसली होती... निरूच्या चेहऱ्याचे भाव क्षणाक्षणात बदलत होते... रितू चुपचाप उठली आणि रोहन आणि रवीला बेडरूममध्ये बोलावलं....

-----------------------

"ऐका... ऐका... ऐका... राज्यातल्या सगळ्या निवासींना सूचित करण्यात येत आहे कि महाराज विक्रमच्या मैत्री प्रस्तावाला लात मारून... दोन्ही राज्यातल्या जनतेला युद्धात झोकणारे... आणि... राजकुमार अभिषेक सहित हजारो सैनिकांच्या हत्येचे दोषी होण्या कारणाने; मृत्यूची शिक्षा निश्चिंत जाणून राजा वीर प्रतापने आत्महत्या केली आहे... महाराणीने पण आत्महत्या केली आहे... राजकुमार युद्धभूमीमध्ये मारले गेले आहेत; आजपासून ह्या राज्याची कमान यशस्वी महाराज विक्रमच्या कृपेने सेनापती कुंवरपालच्या हातात देण्यात येत आहे.. उद्या महाराज विक्रम त्यांच्या राज्याभिषेकसाठी राज्यात येत आहेत... ऐका.... ऐका.... ऐका..."

राजमहालात पळत पळत आलेल्या आणि एकदम घाबरलेल्या लताला द्वारपालांनी बाहेरच रोखले, "थांबा...!! आतमध्ये जाण्याची अनुमती कोणालाच नाही आहे...!"


"पण... पण माझं राजकुमारीला भेटणं अति अनिर्वार्य आहे... आत्ता आणि ह्याच क्षणी...!" लताच्या चेहऱ्यावर भय दिसत होतं....


"राजकुमारी प्रियदर्शिनीला आत्ता राजा कुंवरपालच्या आदेशानुसार राजमहालात बंधी बनवण्यात आले आहे... आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांना भेटण्याची अनुमती कोणालाच नाही देवू शकत..." द्वारपाल बोलले...


अचानक आतमध्ये फेऱ्या मारणारे पूर्व सेनापती आणि आत्ता इथले राजा, कुंवरपाल जोरात हसायला लागले, "हा हा हा हा हा... ! राजकुमारीची सखी...! येवूद्या हिला आतमध्ये... कदाचित हिच्याच गोष्टींवर विश्वास करून राजकुमारी स्वप्नातून परत धर्तीवर येईल... ती आत्तापण देवची वाट बघत आहे... हा हा हा हा... जा... आणि जावून तिला खरं सांग... कि देवला मी ह्या दुनियेतून कायमस्वरूपी संपवलं आहे... आत्ता नखरे करणं सोडून महाराज विक्रमची
पटराणी बनण्यासाठी स्वतःला मानसिक आणि शारीरिक रूपाने तैय्यारी करा... महाराज तिला खूप प्रेम करतील... शेवटी तो भिक्षुक योगी तिला काय देवू शकला असता, जे ते देवू नाही शकत...!"

द्वारपालांनी तिला आतमध्ये जाऊ दिलं... पळत जाऊन लता कुंवरपालच्या पुढे जाऊन थांबली, "कुठे आहे राजकुमारी..."


"ती आपल्या शयन कक्षातच आहे... लक्ष्यात ठेव... महालात जागोजागी आमचे गुप्तचर नजर ठेवून आहेत... किंचित पण चलाखी करण्याचा प्रयत्न केला तर शिक्षा मृत्यू दंड असणार...! जा... जाऊन समजव तिला... हट्टाला पण काही सीमा असते... जो गेला आहे... राहून राहून त्याच्या नावाचा ढोल वाजवून तो परत नाही येणार..." कुंवरपाल बोलले...


लताने आपली नजर झुकवली आणि पळत पळत शयन कक्षा जवळ आली... शयन कक्षेच्या बाहेर तिला परत अडवण्यात आले पण तिने नवीन राजाची आज्ञा असल्याचे सांगितल्यावर तिला आतमध्ये सोडण्यात आले..


"लता...!" बेचैन बसलेली राजकुमारीने जसं लताला बघितले... तिच्या डोळ्यातून अश्रूंची नदी वाहायला लागली, "तू कुठे होतीस अजूनपर्यंत..? आम्ही केव्हा पासून तुझी वाट बघत होतो... बघ ना...! आम्हाला आमच्या देवपासून दूर ठेवण्यासाठी पिताश्री काय काय करत आहेत... मी जाणून चुकली आहे कि देवच्या शौर्याने आपण आत्तापर्यंत विजय प्राप्त केली असेल... पण आम्हाला माहित नाही काय काय सांगितले जात आहे... पिताश्री आणि माताश्री आमच्यासमोर येत नाही आहेत... तो कुंवर बोलतो... कि देव... माझा देव... तूच बोलना... पूर्ण गोष्ट... आम्हाला बाहेरपण सोडत नाही आहेत... बोल ना सखी... माझा देव... आणखी किती वाट पाहायला लावणार...? अजून किती तडपवणार ... आपल्या दर्शन देण्याच्या पहिले...!"


लताची नजर झुकली गेली...
एक मोठी आह तिच्या छातीतून निघाली... राजकुमारीची हालत बघून तिला रडू पण येत नव्हतं, "तुम्ही इथून निघा राजकुमारी... तुमचे कपडे मला द्या...!"

"नाही... आम्हाला तुझ्या तोंडून पूर्ण गोष्ट ऐकल्या शिवाय चैन नाही पडणार... आणि देव आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही... त्यांनी आम्हाला वाट पाहायला सांगितली आहे... तू पूर्ण गोष्ट सांग ना... जेवढ्या सुंदरतेने तू त्यांच्या बहादुरीची व्याख्या करतेस... अजून कोणीच नाही करू शकत... तू लवकर आम्हाला सगळं काही खरं खरं सांग... जर पिताश्रींना कळलं कि तू इथे आली आहेस तर ते तुला इथे थांबू देणार नाहीत...?"


लताच्या चेहऱ्यावरचे दुःख साफ वाचू शकतो, "राजकुमारी... युद्धात देवला पराजित करण्यासाठी स्वतः देवच्या पण वशमध्ये नव्हते... देव युद्धभू..."


लताला राजकुमारीने मध्येच टोकले... उत्साहपूर्ण नजरेने तिला बघत राजकुमारी तिच्या जवळ सरकली... आणि बोलली, "ए सखी... 'माझा देव' बोल ना...! आम्हाला खूप चांगलं वाटतं जेव्हा तू अशी बोलतेस..."


लताच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते... पण प्रेमामध्ये गुंतलेली प्रिया त्या अश्रूंचा अर्थ नाही समजली... , "हो राजकुमारी... तुमचा देव पूर्ण रणभूमीमध्ये... असं होता जसं... पूर्ण शत्रू सेनेला तो 'वीर' एकटाच स्वाहा करेल... आकाशात असणाऱ्या एका सुर्यासारखा एकटा 'देव' शत्रू सेनेची छाती चिरत पुढे जात होता... कोणामध्येच त्याचा सामना करण्याची हिम्मत नव्हती...


मूर्ख अभिषेक आपल्या सेनेमध्ये झालेली पळापळ बघून आगडबंब होत देवच्यासमोर आला, "काय रे...? एका 'खेळात' विजयी काय झालास... तू तर खूप मोठे मोठे स्वप्नं बघायला आरंभ पण झालास... युद्धात येवून 'अभिषेक'ला चेतावणी देण्याची मूर्खता तुझ्यासारखा 'मूर्ख'च करू शकतो... आमच्या सेनेला छिन्न-भिन्न करून हे नको समजूस कि तू 'योद्धा' झालास... युद्धात तर तू माझ्यासमोर अजून नादान आहेस... 'मूर्ख' समजून मी तुला हे सांगून ठेवतो कि माझी लढाई तुझ्या राज्याच्या विरुद्ध नाही आहे... आमचं लक्ष फक्त राजकुमारीला मिळवणं आहे... आणि जर तू आमच्या रस्त्यामधून बाजूला होवून आपला जीव वाचला पाहिजे असं तुला वाटते तर तुला आम्ही अभयदान देवू शकतो... जा 'निघ' जा..!"


"तुमच्या देवच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वासाचं स्मित हास्य आलं..., "माझ्याकडून दिलेली हि शेवटची चेतावणी समज राजकुमार... मी पण तुमचे राज्य जिंकण्यासाठी नाही.. आपल्या राज्याची 'आन' जिंकण्यासाठी इथे आलो आहे... माझ्या तुमच्याशी किंवा युद्धात लडणाऱ्या कुठल्याही सैनिकाशी काहीच दुष्मणी  नाही आहे... तुझी सेना पळत आहे... आणि तू बघत आहेस कि आमची सेना कोणाच्याही पाठीवरती वार नाही करत आहेत... तुझ्याजवळ पण संधी आहे... तू आत्ता पण परत जाऊ शकतोस...!"


"आपला पराजय समोर बघून आगडबंब झालेला अभिषेक देव जवळ आला... आणि क्षणाचाही वेळ न लागता देवची तलवार आकाशात अशी चालायला लागली... अभिषेक एकदम दिग्भ्रमित झाला... पागलसारखा तो हवेत असाच वारा वर वार करत राहिला... जसाच तो देव जवळ आला... देवने तलवार लगेच अभिषेकच्या मानेवर चालवली आणि अभिषेकचं डोकं त्याच्या धडापासून खूप दूर जाऊन पडलं..."


"त्याच्या नंतर तर वाचलेले सैनिक पण मैदान सोडून पळायला लागले... आणि मैदान खाली होताच स्वतः महाराज विक्रमचा सामना देवशी झाला... महाराजने एकदा देवच्या तलवारीला बघितले जी रक्ताने एकदम माखली होती आणि नंतर त्यांनी देवच्या चेहऱ्याकडे बघितले जो एकदम 'रौद्र' रूप धारण केलं होतं... अचानक त्यांची नजर अभिषेकच्या 'डोकं' कापलेल्या धडावर्ती गेली आणि ते थरथर कापायला लागले... पुढच्याच क्षणी त्यांनी 'सारथी'ला विरुद्ध दिशेला पळायला सांगितले... तेव्हा कोणीतरी देवला सूचना दिली कि महाराज वीर प्रताप घायळ झाले आहेत...


देव सगळं काही सोडून लगेच त्यांच्याजवळ पोहचले होतेच कि पूर्व सेनापती 'कुंवरपाल' त्यांच्या समोर आले आणि क्षमा याचना करत आपल्या प्राणाची भिक मांगायला लागले...


"सेनापती देव...! आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे कि आमचा गुन्हा कुठल्याही प्रकारे मृत्युदंडाच्याहि पेक्षा कमी नाही आहे.. तरी पण... मी तुमच्या चरणात पडून आपल्या प्राण-रक्षाची भिक्षा मांगतो.. मला अभयदान द्या..." त्याने आपल्या घोड्यावरती उतरून देवचे चरण धरले...


"क्षमा तुम्हाला राज्याशी मांगितली पाहिजे... कुंवरपाल.. मी तर महाराजांच्या ओजस्वी सेनेचा एक साधारण सैनिक आहे... आणि आपल्या राज्याचा एक देशभक्त नागरिक... तुम्ही तर देश द्रोही आहात... राज्यच तुमच्या विषयी काही निर्णय घेईल..." देवने बेशुद्ध पडलेल्या महाराजांना उठवण्याचा प्रयत्न केला....


"तरीपण... मला इथेच पश्चाताप करायचा आहे... सेनापती...! माला आदेश द्या..." कुंवर देवच्या चरणामध्ये नतमस्तक झाला होता...


"ह्म्म्म... तुम्ही स्वतः सेनेचे सेनापती राहिले आहात कुंवरपालजी... आपल्यांना आज्ञा घ्यायची आवश्यकता काय आहे...? शत्रू सेना पळत आहे... मुश्कीलने 'ते' आपल्या सेनेच्या आर्धेच उरले आहेत... आपण जाऊन सेनेला सांभाळा... मी महाराजांना राजमहालात सोडून येतो..." एवढं बोलून देव जसेच महाराजांना सांभाळण्यासाठी वळले... भित्रा आणि कपटी 'कुंवरपाल' ने देवच्या पाठीत सुरा खुपसला...


"आह.." राजकुमारीने अशी प्रतिक्रिया दिली जशी सुरा देवच्या पाठीत नाही त्यांच्या पाठीत कोणीतरी खुपसला आहे..., "हो... आम्ही बघितली होती ती जखम... पुढे काय झाले लता...?" राजकुमारी ऐकण्यासाठी अधीर होत बोलल्या...


"ती मामुली जखम नव्हती राजकुमारी... तो सुरा त्यांच्या आरपार झाला होता... कदाचित त्यांना त्याचवेळी जाणीव झाली होती...कि..." लता पुढे बोलू शकली नाही...


"काय... बकवास करतेस तू... काय जाणीव झाली होती त्यांना...? मला तुझ्याशी हि अपेक्षा नव्हती... तू पण पिताश्रींनी दिलेल्या लालचीमध्ये शेवटी आलीच.. मी कधीच विचार केला नव्हता कि काही स्वर्ण मुद्रेच्या लालचीमध्ये तू पण मला दिग्ब्र्हमित करशील... माझ्या देव पासून मला दूर करण्यासाठी..." राजकुमारी विचलीत आणि क्रोधीत होत बोलली...


लता काहीच नाही बोलली... बस तिच्या डोळ्यातले दोन अश्रू खाली पडून प्रियाच्या हातावरती पडले....


"आम्हाला घाबरवतेस ना... देव येणारच आहे ना.. बघ... बघ.. तू लवकर बोलून टाक.. नाहीतर मी... मी महाराजांना तुझी तक्रार करेन... मी... देवला पण सांगेन...."

"ल ssssता तू बोलत का नाही.. काय झालं आहे तुला...?" प्रियदर्शनी अचानक किंचाळली..

"आत्ता... आत्ता बोलण्यासाठी उरलंच काय आहे राजकुमारी... महाराज... नाही राहिले... राजकुमार नाही राहिले... कुमार दीक्षित कुठे आहेत माहित नाही... महाराणीने आत्महत्या करून घेतली..." लताचे अश्रू थांबण्याचे नावच नाही घेत होते... ती मध्ये मध्ये हिचकोळे घेत बोलली, "देव..."


"नाही... नाही... देव विषयी आम्ही तुझी काहीच बकवास नाही ऐकणार... देवला कोणीच हरवू शकत नाही... देवला आमच्यापासून कोणीच हिसकावून घेवू नाही शकत... देव फक्त आमचाच आहे.. पिताश्री नाही राहिले तर काय झालं..? आत्ता देवच ह्या राज्याचा राजा आहे... येवू दे देवला... आम्ही तुमची तक्रार त्यांना करणार..." बोलता बोलता राजकुमारी थकली आणि थोडा वेळ थांबून परत बोलायला लागली,


"बोलून टाक ना सखी.. तू आम्हाला अस्वस्थ का करतेस... आत्ता तर तू देवच्या कारनाम्याच्या विषयी आम्हाला सांगत होतीस... तू बोलत होतीस ना... देव युद्धभूमीमध्ये ह्या प्रकारे पुढे होता... जणू... जणू पूर्ण शत्रूंच्या सैनिकांना एकटाच स्वाहा करून टाकेन... तूच बोलत होतीस ना कि कसा शत्रू देशचा राजा त्याच्या समोर येण्यासाठी घाबरत होता... आणि देवसमोर येताच कसा पळत सुटला... तूच तर सांगितले होतेस कि कसं त्या हरामी अभिषेकचं डोकं कसं आपल्या देवने एकाच वारेने त्याच्या धडापासून वेगळं केलं होतं... देव तर अपराजय आहे ना सखी... तूच तर काल सांगत होतीस... त्यांचा कोणी कसा सामना करू शकतो... त्यांना कोणी कसं मारू... ना
ssssssssssssही."

"सांभाळा... स्वतःला... राजकुमारी...! सगळ्यात पहिले इथून निघा तुम्ही... तो दुष्ट विक्रम आत्ता तुम्हाला आपली राणी बनवण्याच्या लालचीमध्ये आहे... आपण निघा इथून लवकर..." लता पण तिच्या बरोबरच रडत होती...

"माझं लग्न तर झालं आहे लता... जन्मोजन्मासाठी... आमच्या देवबरोबर...! ऐकलं आहे कि ह्या जीवनाच्या पलीकडे पण दुसरं जीवन असतं... जर हे खरं आहे तर देव तिथे आमची वाट बघत असेल... माझं तर केव्हाच सगळं काही त्यांचं झालं आहे...लता...! जर ते ह्या दुनियेत नाही आहेत.. तर माझे प्राण माझ्या शरीरात अजून का आहेत... नाही नाही... तू खोटं बोलतेस... ते आत्ता इथेच आहेत... हे बघ... त्यांनी स्वतः मला सोपवलं आहे... " प्रिया आपल्या गळ्यातून तो लॉकेट काढत बोलली..., "हे बघ... हा आहे माझा देव... देवने देवाला सगळं काही सोपवून आम्हाला मांगीतलं आहे... देव असे निष्टुर कसे होवू शकतात लता... देव आम्हाला वेगळं वेगळं कसे करू शकतात... बोलून टाक कि सगळं खोटं आहे... बोल ना सखी..." प्रियाचे रडण्याने जणू ते राजमहालपण भयभीत झाले होते... तिचे रडणे दूर दूर पर्यंत ऐकायला येत होते...

तेव्हा शयन कक्षात कुंवरपालने टाळी टाळी वाजवत प्रवेश केला, "वाह...! काय प्रेम आहे...? मृत्यूसारख्या शाश्वत सत्याला पण स्वीकार करण्यासाठी नकार देत आहे प्रेम...! वाह...! तर हा आहे तुझा देव...!"

कुंवरपालने जवळ येवून प्रियाकडून ते लॉकेट हिसकावून घेतले...

"ह्याला आपल्या पापी हातांनी स्पर्श नको करूस राक्षसा... नाहीतर ह्याच्या तेज अग्नीमध्ये तुला भस्म व्हायला वेळ नाही लागणार... 'माझा' देव मला परत कर... माझा देव मला परत दे..." राजकुमारी त्याच्याकडून लॉकेट हिसकावून घेण्यासाठी जशीच शैय्यावरून उठली... जमिनीवर पडली... जीव जसा उरलाच नव्हता... तिच्या शरीरात... फक्त काही श्वास बाकी होते... जे राहून राहून आपल्या 'देव'ला बोलावत होते...

"अच्छा..? जरा बघू 'तुझ्या' देवच्या 'तेज' अग्नीला... बघूया किती उष्मा सहन करतं हे...?" अठ्ठहास करत कुंवरपाल स्वयंपाक गृहाच्या दिशेने गेला जिथे उद्यासाठी सार्वजनिक शाही भोजसाठी एक विशालकाय भट्टी तैय्यार केली होती... प्रिया पडत झडत त्याच्या पाठी जात होती...
"हे घे...! उष्मेला उष्मेमध्ये स्वाहा करून टाकले... आत्ता तर हा मला भस्म नाही करणार ना... हा हा हा..." कुंवरपालने लॉकेटला त्या भट्टीत टाकले...

पण प्रियाला तर त्याच्या गोष्टींवर सरोकारच नव्हतं... तिचं लक्ष्य तर फक्त तिच्या देवकडेच होतं... बाकी तर तिला काहीच दिसत नव्हते... आत्ता तिलापण तिच्या देवकडे जाण्याचा रस्ता भेटला होता... आत्ता तिची पावलं डगमगली नाहीत... न डगमगता तिने सरळ भट्टीत प्रवेश केला... स्वाहा...!!!

अचानक स्वयंपाक गृहात स्फोट झाला आणि पूर्ण स्वयंपाक गृहात अग्नीच्या ज्वाळाच दिसत होत्या...

------------------------------

निरूचा चेहरा आत्ता एकदम शांत झाला होता... स्वयंपाक गृहातील  आग शांत झाल्यावर तिला त्या भट्टीच्या बाहेर एक मृतदेह दिसला... कुंवरपालचा...!!!
क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment