Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 29 July 2012

भाग ~ ~ ५९ एक प्रेम कथा

Update 59नीरुने काहीवेळ असंच पडून राहिल्यानंतर डोळे उघडले... समोर बसलेला रोहन कधीपासून तिचे डोळे उघडण्याची प्रतीक्षा करत होता... त्याच्या आश्चर्याचा ठिकाणा नाही राहिला जेव्हा नीरु डोळे उघडल्यानंतर एकटक त्याच्याकडेच बघत राहिली...

"अशी का बघतेस नीरु...? आम्ही एका तासापासून तुझ्या उठण्याची वाट बघत आहोत... काही आठवलं कि नाही...?" रीतुने पकडून तिला हलवले...


"मला जुन्यावाड्याजवळ जायचे आहे... !" नीरु उठून बसली... पण अजूनपर्यंत तिची नजर रोहनकडेच होती...


"हो... .हो... चला...! आम्ही कुठे मनाई केली आहे...?" रवी खुश होत बोलला...


"नाही... आम्ही दोघेच जाणार... तुम्ही इथेच राहा
प्लीज...!" नीरु रवीकडे बघत बोलली...

"मी नाही जाणार... तुझ्यासोबत एकटी जुन्या वाड्याजवळ... मला रोहनच्या तोंडून तिथली कहाणी ऐकूनच भीती वाटत होती... आपण दोघी मुली आहोत यार..." रितू बोलली...

"मी तुला नाही बोलत रितू... मी आणि देव.. सॉरी... रोहन तिथे जाणार... फक्त आम्ही दोघे..!" नीरु बोलली...

निरुने रोहनला देव बोलताच तिकडे बसलेल्या तिघांचे डोळे चमकले... खुश होवून रीतुने निरुला मिठी मारली... नीरु लाजली आणि शरमेने दुसरीकडे तोंड केला...

"अभिनंदन देव साहेब...! शेवटी तुम्हाला वहिनी भेटल्या.." रवीने रोहनला छेडत त्याचे गाल खेचले...

"काय आहे यार...?" रोहन वरच्यावर राग दाखवत बोलला आणि हसायला लागला..

"काय आहे...? अबे गाढवा तुझं लग्न आहे... आत्ता अजून काय राहिलं... ?" रवी खुश होत बोलला...

निरुला जास्तवेळ रोहनशी नजर न मिळवणे नाही राहवलं गेलं... ती परत सरळ झाली आणि राहून राहून रोहनला बघायला लागली...

"पण वही... सॉरी..." रवी आपले बोलणे अधुरे सोडत निरूच्या प्रतीक्रीयाची वाट बघायला लागला... निरुने काही क्षण त्याला रागाने बघितली आणि नंतर एकदम जोरात हसायला लागली... सगळे रवीकडे बघत हसायला लागले...

"म्हणजे... आत्ता लाईन क्लिअर आहे... वहिनी बोलू शकतो ना तुम्हाला...?" रवीने पण एवढं बोलून आपले दात दाखवले...

"हम्म..." नीरु एवढीच बोलली आणि रोहनकडे बघत बोलली, "ह्यांना विचारा...!"

"हा तर केव्हा पासून त्याच्यामुळे धक्के खात आहे वहिनी... ह्याला काय विचारायचे... पण आत्ता जुन्या वाड्याजवळ जाऊन करायचे काय आहे...? आणि तुम्ही एकटे का जाणार... मी पण येणार.. मी नाही ऐकणार ह्या वेळी...!" रवीने पहिले निरुला आणि मग रोहनला बघून बोलला...

"नाही... जायला तर लागणार... रोहनच्या स्वप्नात प्रिया काय बोलली होती... आठवतंय...का...?" निरुने विचारले...

"हो यार... तिचं मन तर तिथेच आहे... हीच गोष्ट आहे ना...?" रीतुने निरुला विचारले...

"ओह हो... पण एकटे का...? मी पण सोबत येणार... !" रवी बोलला...

"पण पप्पांना कळायला नाही पाहिजे कि आपण जुन्या वाड्याजवळ जात आहोत.. ते आपल्यांना तिथे जाऊ देणार नाहीत... एकट तर बिलकुल नाही... मी त्यांना काहीतरी सांगतो... तुम्ही सगळे लक्ष्यात ठेवा.. त्यांना माहिती नाही पडली पाहिजे..." रोहनने सगळ्यांना चेतावणी दिली...

"ठीक आहे यार.. बघून घेवूया... पण नीरु तू पूर्ण गोष्ट सांग... मी केव्हा पासून ऐकण्यासाठी आतुर आहे...!" रितू बोलली...

"हो हो... वहिनी... जे काही तुम्हाला आठवले आहे ते सगळं... सांगा...!" रवी बोलला...

"सगळं काही आठवलं आहे...कोणी
मध्येच  नका बोलू...?" नीरु बोलली आणि सगळे जण शांत झाले...

निरुने त्यांना राजकुमारीने देवला पहिल्यांदा बघितल्यापासून कहाणी सांगायला सुरुवात केली...

-------------------------

स्वप्नाची कहाणी पूर्ण झाल्यावर किती तरी वेळ चौघेही सुन्न होवून बसले होते.. कोणालाच काहीच समजत नव्हते कि काय प्रतिक्रिया द्यावी... रोहनला तर विश्वासच नव्हता कि तो कधी 'देव' होता...

"केव्हा जायचं जुन्या वाड्या जवळ...?" रवी निरूच्या गप्प होण्यानंतर बोलणारा पहिला होता...

"तुम्ही नाही जात आहात...! फक्त आम्ही दोघे जाणार तिथे..." नीरु जोर देत बोलली...

"पण मी का नाही...? मला पण यायचे आहे... मला पण बघायचे आहे कि तुम्हाला सगळं आठवलं तर तुम्ही काय करता...?" रवी बोलला तर रोहनने रागाने त्याच्याकडे बघितले...

"पण कोणाला तरी घेवून जायलाच लागणार... तरीपण तिथे रात्रीच जायचे आहे... आपलं एकट तिथे जाणे ठीक नाही आहे..." रोहन रवीच्या गोष्टीचं समर्थन करत बोलला...

"हो... हेच तर मी बोलत आहे..." रवी बोलला...

"ओके... तर मग आपण चौघे जाऊया... पण तुम्ही दोघे जुन्या वाड्याच्या बाहेर उभे राहा... आतमध्ये तर आम्हीच जाणार..." नीरु बोलली...

"तर आजच निघूया काय...?" रवी खुश होत बोलला...

"मग काय...? चालायचे आहे तर आजच चला... नंतर आम्हाला परत पण यायचे आहे..." रीतुने पण रवीच्या गोष्टीचं समर्थन करत बोलली...

"ह्म्म्म.. ठीक आहे... मी पप्पांना फोन करून गाडी मांगावतो... त्यांना मी हेच सांगणार कि आम्ही मित्राकडे जात आहोत..."

---------------------

"काय झाले तुला... भीती वाटते काय...? आत्ता तर आपण गावातच आहोत... यार... तू असं करणार तर आमचे हाल काय होणार..." रवीने रोहनच्या डोळ्यात पाणी बघत बोलला...

रोहनने काहीच उत्तर दिलं नाही... ते लोकं त्यावेळी श्रुतीच्या घरासमोरून जात होते... घराचा दरवाजा बंद बघून रोहनचे डोळे पाणावले होते... श्रुतीचा सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला होता... बेचारी...!!!

"काय झालं...?" पाठी बसलेल्या निरुने रवीची गोष्ट ऐकताच विचारले...

"काहीच नाही...ते..." रोहनने थांबून एक दीर्घ श्वास घेतला..., "पाठी जो घर गेला तो श्रुतीचा होता..."

"कोणता...?" तिघांनी एकदम मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला, "हा... जो आत्ताच पाठी गेला आहे... एकच घर...!" रीतुने विचारले...

"हो...!"

"आम्हाला जायला पाहिजे होते तिथे..." नीरु बोलली...

"मन तर माझं पण करतंय... पण हिम्मत नाही होत आहे...!" रोहनने उत्तर दिलं...

"तू तर पागल आहेस यार... जे पण झालं.. त्यात आपली काय चुकी होती... ? मग तिच्या वडिलांना भेटून येणं तिला चांगलंच वाटलं असतं..." रवी बोलला...

"हो.... हो. चला एकदा तिच्या घरी होवून येवूया...!" रितू बोलली...

"आत्ता तर अकरा वाजणार आहेत... पुढे गाडी नाही जाणार... पायी चालून गेलो तर एक तास तरी लागेल... १२ वाजेपर्यंत आपल्यांना तिथे पोहोचायचे आहे... येतांना बघूया..!" रोहन बोलला आणि गाडी चालवत राहिला...

"काय...? ह्या सामसूम रस्त्यावर पायी चालायला लागणार...? ते पण एवढ्या रात्री...?" रितू थोडी भयभीत झाली..., "मला तर तुम्ही तिथेच उतरवलं असतं... श्रुतीच्या घरी..!"

"हा हा हा हा .... आत्ता काय झाले...?" रवीने मस्करी केली...

"तुला काही बोलली मी...? आपलं तोंड सरळ ठेव..." रितू रागात बोलली...

"कमीत कमी इथे तर ऐकत जा...! तुमची तर कुत्रा-मांजरासारखी मैत्री आहे..." नीरु मध्येच बोलली...

"हे हे हे... रवीला कुत्रा बोलली..." रितू जोर जोरात हसायला लागली...

"नाही... नाही... मी हे नाही बोलली... माझा अर्थ असा होता कि..." नीरु बिचकत बोलली...

"ठीक आहे वहिनी... इथे सगळं चालतं.. पण हिला मांजरीच्या जागी कोणतं चांगलं नाव दिलं पाहिजे... हा हा हा...!"

"घ्या... गाडी इथेच थांबवायला लागणार... पुढे पायीच चालायला लागणार... ब्याटरी आणली आहेस ना..?" रोहन गाडी साईडला उभी करत बोलला...

"हो... आणली आहे..." रवी बोलला आणि सगळे जण गाडीतून उतरले.

----------------------

रस्ता गेल्यावेळी सारखाच भयस्पद, विचित्र आणि एकदम शांत होता... पण माहित नाही का आज रोहनला भीती नाही वाटत होती... कदाचित तो स्वतःला आज देवच्या रूपातच दाखवणार आणि दिसणार होता... किंवा नीरु त्याच्या सोबत असल्यामुळे त्याला मानसिक ताकत भेट होती... नीरु पण त्याच्या पाठी पाठी लक्षपूर्वक चालत होती... निरूच्या पाठी रितू आणि सगळ्यात शेवटी ब्याटरी घेवून
रवी चालत  होता...

"एवढ्या फटाफट नको चालूस यार... मी मागे राहते..." रीतुने निरूचा हात पकडून खेचला...

"मी काय करू...? हाच पळतोय..." नीरु तिच्यासोबत येत बोलली..

"ए भाऊ... जरा आरामात चल... मी पाठी राहिलो तर पळून जाईन... पहिलेच सांगतो..." रवीने रीतूची गोष्ट ऐकताच बोलला...

"बोलू नका यार... गपचूप चालत राहा... आम्हाला १२ वाजायच्या आताच पोहोचायला पाहिजे..." रोहनने आपल्या चालण्याची गती कमी नाही केली...

"बोलू नका बोलतोयस... इथे माझा जीव सुखत चालला आहे... कोणीतरी पाठी खेचले तर... तू तर विचार करशील मी परत पळालो... मी हरवलो तर मला शोध भाऊ... मला वाटते कि माझ्या पाठी पाठी कोणीतरी चालत आहे...!" रवी चालता चालता बोलला...

"आईईईई..." रितूने अचानक किंचाळून नीरुला मिठी मारली...

सगळेजण अचानक दचकून उभे राहिले, "काय झालं रितू...?" निरुने तिने सांभाळत विचारले...

"काहीच नाही... हा खालीफुकट
का मला घाबरवतोय ..." रितू बोलली...

"घ्या... मागे पुढे मीच भेटतो का तुला कोस्ण्यासाठी... मी काय केले..." रवीने विचारले...

"हा... असं का बोलतोय कि ह्याच्या पाठी कोणीतरी आहे... माझा तर जीवच निघाला होता..." रीतुने रवीच्या प्रश्नाचे उत्तर निरुला दिले... ह्यावेळी तिने निरूचा हात नाही सोडला...

"का नाही बोलू...? कोणी बोललं होतं का सोबत यायला...? मला तर वाटते... असं पण वाटतंय कि जसं पाठून कोणीतरी माझी कॉलर पकडून खेचत आहे... आणि झाडांमधून मोठ मोठे डोळे पण चमकतांना दिसत आहेत... तू तर गेलीस आज...!" रवी थट्टा करत बोलला... रीतुने परत एकदा घाबरून निरुला घट्ट मिठी मारली...

"नाही... मला पुढे नाही जायचे आहे... परत चला... मला सोडून या..." रितू घाबरत बोलली...

"का मस्करी करतोयस यार... आत्ता तर पोहोचलो पण आहोत... ती बघा लाईट जळत आहे..." रोहनने हाताने इशारा केला... तेव्हा अचानक नीरुला चक्कर येवून पडल्यासारखं झालं...

"काय झालं... शिनू...? हे... शिनुला काय झाले...?" तिला आपल्या बहुपाश्यात सांभाळून रितू घाबरून रडायला लागली...

"काहीची नाही... असंच चक्कर आली होती..." नीरु आपल्या कपाळावर हात ठेवत बोलली... आणि परत उभी राहून त्या प्रकाराशाकडे बघायला लागली..., "तुम्ही इथेच थांबा... पुढे आम्ही दोघेच जाणार..."

"नाही... मी इथे नाही राहणार... ह्याच्या बरोबर तर बिलकुल नाही... हा तर मला घाबरवून घाबरवूनच मारून टाकेल...!" रीतुने रवीकडे काळोखातच रागाने बघितले...

"पण हे का नाही येवू शकत... मला तर... चल ठीक आहे... रवी भाऊ... काय करतोयस यार... हि काय मस्करी करायची वेळ आहे...?"  रोहन रवीकडे बघत बोलला...

"चल ठीक आहे... मी काहीच नाही बोलणार... पण जर इथून पाठून कोणी आलं तर..." रवी बोलला..

"बघ... बघ कसा बोलतोय... मी ह्याच्या जवळ नाही राहणार... ह्याच्यापेक्षा ह्याला पण घेवून जावा तिकडे... मी एकटीच राहणार इथे..."

"प्लीज रवी...! ऐकत जा... " नीरु प्रेमाने बोलली तर रवी एकदम खुश होवून तैय्यार झाला...

"ठीक आहे... वहिनी साहेब तुम्ही जावा... मी हिची आपल्या जिवापेक्षा रक्षा करणार..." रवी बोलला...

निरुने स्मित हास्य दिलं... आणि रोहनकडे बघत बोलली, "चला...!"

रवी आणि रितूला तिथेच सोडून ते दोघे पुढे निघाले...
क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment