Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 4 August 2012

भाग ~ ~ १ Illusion .... एक भास..????

 Illusion .... एक भास..????

भाग - १NOTE:: (ही कथा पुर्णपणे काल्पनिक असून यातील घटना, स्थळ, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद!) हि कथा माझी नाही आहे... ह्या कथेचा मुल लेखक माझा मित्र आलोक आहे... त्यानेच मला मराठीत भाषांतर करून इथे पोस्ट करण्यासाठी सांगितली आहे...

रात्रीच्या शांततेला भंग करत शहराच्या आबादिपासून लांब जंगलात आणि छोट्या छोट्या पर्वतांमधून आपल्या पूर्ण वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधले काही प्रवासी झोपले होते किंवा बसल्या बसल्या आळस देत होते. ह्याच ट्रेनमधल्या A.C. 1st क्लासच्या एका केबिनमध्ये बसलेली अनघा आपल्या हातामध्ये पकडलेल्या आपल्या नियुक्ती पत्राला सारखी सारखी बघत होती. ह्या पत्राला बघून तिला तिच्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे चेहरे राहून राहून तिच्यासमोर येत होते. ती विचार करत होती कि काय मी आपल्या परिवारावर आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी काही मदद करू शकेन? आत्ता काही दिवसांपूर्वी तर सगळं काही एक दम सुरळीत चाललं होतं पण अचानक तिच्या पप्पांना लकवा मारल्यामुळे त्यांच्या घरावर आर्थिक संकट आलं होतं.

तिचे पप्पा एक वकील होते, त्यांची प्राक्टिस (practice) खूप जास्त नव्हती पण हो, त्यांच्या घराच्या खर्चांपुरते तरी चालून जायचे. घरामध्ये ५ व्यक्ती होते, तिची आई, वडील, छोटा भाऊ जो मेडिकल इंट्रान्स (entrance)ची तैय्यारी करत होता, एक छोटी बहिण जी इन्जिनिअर बनायचे स्वप्न बघत बसली होती आणि पाचवी व्यक्ती मी स्वतः अनघा! आपल्या आई-वडिलांची सगळ्यात मोठी आणि हुशार मुलगी. पप्पांसारखं मला पण एक हॉनेस्ट वकील बनायचे होते आणि चांगल्या मार्काने पास होऊन आपला आभ्यास पूर्ण करून एल. एल. बी. ची शेवटची परीक्षा दिल्या नंतर त्यांची सहाय्यक म्हणून मी माझी प्राक्टिस (practice) सुरु करायला
जातंच होती कि पप्पांबरोबर हे झालं. बेचारे! आमच्या बरोबर बोलता बोलता त्यांच्या हातापायांना सिंकींग सुरु झाली आणि जबडा वाकडा झाला. आई! जी पूर्ण पणे एक घरेलू महिला होती, तिने खूप परिश्रम घेवून आम्हाला सांभाळायचं प्रयत्न करत होती, पण दुखं जे होते ते एका पाठोपाठ एक येतंच जात होते. घरातली बचत पप्पांच्या उपचारावरती हळू हळू कमी होत होती.

अशामध्ये मला माझे मन माझ्या परिवारसाठी काही न काही तरी करायचे आहे असं सारखे सांगत होते पण मी काय करणार? एका वकिलाच्या नात्याने माझी ओळख अजून जास्त झाली नव्हती, म्हणून खूप मुश्कीलने दिवसातून २-३ हलफनामा बनवून १००-१५० रुपयेच कमाऊ शकत होती, ज्याने आजच्या जमान्यात माझ्या दोन्ही भाऊ-बहिणीच्या शाळेची फीस पण नाही भरू शकत होते. एक निराशा, एक बैचेनी माझ्यावर येत होती. मग एक दिवस वृत्त-पत्रात नोकरी शोधत शोधत माझी नजर एका वृत्तावर गेली जी मला कामाची वाटली.


(" We required a young Lawyer who can work for us for next 16 months without taking any leave in Samata Nagar. Home, food and medical facilities shall be provided. Freshers/newly-graduate can also apply for the same.")

("गरज आहे एका युवा वकिलाची जो १६ महिन्यांपर्यंत सुट्टी शिवाय समता नगरमध्ये राहून काम करू शकतो, राहण्याची, खाण्याची आणि मेडिकलची सुविधा देण्यात येईल. अनुभव नसलेला व्यक्ती पण अप्लाय करू शकतो.")"

हे वाचून माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. समता नगर आमच्या शहरा पासून ६ तासांच्या अंतरावर वसलेले एक मोठं आणि खूप लवकर विकसित झालेलं एक डोंगराळ शहर आहे. हे १६ महिन्यांची शर्तीला / अटीला घेवून तिचं मन थोडं विचलित झालं होतं. पण
घराच्या हालातीला बघून आणि अजून काही उपाय पण नव्हता. त्या  लोकांनी जो पगार ऑफर केला होता त्यामुळे त्याने माझ्या आणि माझ्या घरच्या खर्चांसाठी एकदम ठीक ठरणार होता. मनात एक प्रकारची आशा घेवून मी आईला न सांगता अप्लाय पण करून टाकले होते. ठराविक काळानंतर टेलिफोनिक इंटरव्युव झाला त्यामध्ये काही टेक्निकल आणि काही पर्सनल प्रश्न विचारले गेले... जसे... हेच कार्य करण्यासाठी तू किती मेहनत घेवू शकते... किती समर्पण करू शकतेस... फ्लेक्सिबल वेळेत पण काम करण्याचं धैर्य तथा आणि काही प्रश्न माझ्या कामासंबंधीत (लीगल म्याटर्स) ज्यांची उत्तरं मी आपल्या क्षमतेपेक्षा हि जास्त दिलं होतं. खरं म्हणजे हि नोकरी समता नगरच्या सुप्रसिद्ध वकील सचिन गुरव ज्यांना पूर्ण समता नगर तथा पूर्ण देश गुरव साहेब म्हणून ओळखतात त्यांची पर्सनल असीस्टंट म्हणून संधी आली होती. असो नशिबाने साथ दिली आणि माझं सिलेक्शन झालं. जेव्हा मी नोकरीची हि बातमी माझ्या आईला सांगितली तर आशेच्या विपरीत त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मला स्वीकृती दिली. कदाचित ती पण आपल्या हालातीपुढे पस्त झाली होती.

तेव्हा ट्रेनला एक झटका लागला आणि अनघा आपल्या विचारांच्या दुनियेतून परत वर्तमानात आली. खिडकीतून बाहेर इकडे तिकडे नजर फिरवल्यावर तिला माहिती पडले कि कोणतं तरी छोटं स्टेशन आलं आहे जिथे दुसऱ्या सुपरफास्ट ट्रेनला पास करण्यासाठी ह्या ट्रेनला थांबवले होते. थोड्यावेळानंतर ट्रेन चालू झाली, अनघाच्या
कॅबिनच्या दरवाजावर थाप पडण्याचा आवाज आला ज्याला ऐकून तिने दरवाजा उघडला, समोर टी.टी. एका माणसासोबत उभा होता. विचारल्या वरती माहिती पडले कि एक बर्थ त्याला भेटत आहे. अनघाला भला ह्या गोष्टीवर काय आपत्ती असणार ती चुपचाप आपल्या बर्थवर झोपण्यासाठी गेली. समता नगर यायला अजून १ ते १.५ तास बाकी होते, तो वेळ ती झोपून काढणार होती. नव्या प्रवाशीने आपल्या बर्थ जो अनघाच्या समोरच होता त्यावर आपले आसन जमवले होते. त्याच्या नशेत डूबलेल्या लाल लाल डोळ्यांमुळे अनघा स्वतःला अस्वस्थ फील करत होती. दारूच्या वासेने तिला श्वास पण घेणे कठीण जात होते.

अचानक कॅबीनचा दरवाजा खोलून काळ्या कपड्यांमध्ये एक माणूस आतमध्ये दाखल होतो ज्याला बघून समोरच्या बर्थवर पहुडलेल्या माणसाची एक घुटमळणारी किंचाळी निघते आणि तो दचकून उठून अनघाच्या बर्थवर जातो. आपल्या खिश्यातून एक चाकू काढून तो अनघाच्या मानेवर ठेवतो. हे सगळं एवढ्या पटापट घडतं कि अनघाला काहीच कळत
नाही आणि ती फक्त डोळे फाडून बघत असते. जेव्हा ती त्या काळ्या कपड्यावाल्या माणसाला बघते तर तिला दिसतं कि त्या काळ्या कपड्यावाल्या माणसाने आपला चेहरा काळ्या घोंगडीने लपवला आहे. काळ्या कपड्यावाल्या माणसाच्या डोळ्यात अनघा दुनियाभरचा राग, द्वेष बघू शकत होती,  पण तो शस्त्रावीना तसाच उभा होता आणि पूर्ण आरामात अनघाला वर पासून खाल पर्यंत बघत होता. अनघाच्या मानेवर ठेवलेल्या व्यक्तीने तिला उठवून तिला आपल्या व काळ्या कपड्यावाल्या माणसाच्या मध्ये उभं केलं. अनघाला एवढं तर समजून चुकलं होतं
कि ह्या दोघांची काही तरी जुनी दुष्मनी आहे आणि आत्ता तिला समजत नव्हते कि काय केले पाहिजे. कॅबीनमध्ये उभे तिघेही एकदम शांत होते पण अनघा आणि चाकुवल्या माणसाचा श्वास खूप जोरात चालू होता त्या उलट त्या काळ्या कपडेवाल्या माणसाच्या चेहऱ्यावर कुठलीही बैचेनी नाही आणि एकदम आरामात उभा त्या दोघांना बघत होता. अनघाची त्या काळ्या कपड्यावाल्या माणसाशी नजरा-नजर झाली पण त्याच्या नजरेतला राग अनघा सहन करू शकली नाही आणि तिने लगेच आपली नजर खाली केली. चाकुवाल्या माणसाने काळ्या कपड्या वाल्या माणसाला बोलला... मला माहिती आहे तू ह्या मुलीला नुकसान नाही पोहचवू शकत, आत्ता आपल्या खिशात ठेवलेला रीवोल्वर चुपचाप माझ्या स्वाधीन कर आणि निघून जा इथून. मी तुला काहीच नाही करणार. काळ्या कपड्यावाल्या माणसाने खूप आरामात आपल्या खिश्यातली रीवोल्वर काढून आपल्या हातात घेतली. A.C. कॅबीनमध्ये पण अनघा पूर्ण घामाने भिजली होती. ती थरथर कापत होती आणि त्या कठीण प्रसंगावेळी ती आपल्या आराध्य दैवताला मनातल्या मनात आठवत होती.

काळ्या कपड्यावाल्याने आपल्या हातात पकडलेली रीवोल्वर सरळ केली आणि चाकूवाल्या माणसाच्या नजरेला नजर भिडवत अनघाच्या पायांच्यामध्ये दिसणाऱ्या त्याच्या पायावर फायर केलं. गोळी सरळ जाऊन चाकुवाल्याच्या डाव्या पायाला लागली आणि तो किंचाळत खाली पडला. अनघाच्या मानेला चाकूने हलकीशी जखम झाली ज्याने तिथून रक्ताची एक लाईन खाली जायला लागली. काळ्या कपड्यावाल्याने पुढे होऊन अनघाला तिच्या बर्थवरती बसवले आणि स्वतः चाकुवाल्या माणसाला लाताने मारायला लागला. त्याच्या डोळ्यात दुनियाभारचा द्वेष सामावला होता. चाकुवाला माणूस प्रत्येक लातेवर हलाल होणाऱ्या बकऱ्यासारखा
कण्हत
विव्हळत होता. ट्रेनमध्ये चालवलेल्या एकमात्र गोळीचा आवाज आणि त्याचं प्रत्येकवेळी विव्हळणं ट्रेनच्या आवाजामध्ये गडप होत होतं. लाता मारता मारता जेव्हा काळे कपडेवाला माणूस थकला तेव्हा त्याने अनघा जवळ ठेवलेल्या पाण्याच्या बॉटलने पाणी प्यायला आणि खाली पडलेला चाकू उचलून आपल्या सरळ हातात घेतला. त्याची मनशा ओळखून अनघाने आपला चेहरा आपल्या दोन्ही हाताने लपवला. आत्ता तिच्या कानात फक्त चाकूचा सsssssssप्प सsssssssप्प खsssssssच खsssssssच आणि त्याचबरोबर चाकुवाल्या माणसाची दबलेली किंचाळी येत होती. मग काही वेळानंतर तिला आभास झाला कि काहीच आवाज येत नाही आहे तर तिने घाबरत घाबरत आपले डोळे उघडले तर समोरचे दृश्य बघून तिची बोलतीच बंद झाली. 

काळे कपडे वाला माणूस आत्ता आरामात तिच्या समोरच्या बर्थवर डोळे बंद करून बसला होता आणि कॅबिनच्या फर्शवरती त्या चाकुवाल्या माणसाचा मृतदेह एकदम विचित्र प्रकारे फाटलेल्या अवस्थेत पडला होता. अनघाचं श्वास घेणे जोरात चालू होते आणि ती आत्तापण थरथर कापत होती. तेव्हा काळ्या कपडेवाल्याचा हळू आवाज तिच्या
कानी
पडला... तुम्ही! घाबरू नका, हा ह्याच लायकीचा होता, माझी तुमच्याशी काहीच दुष्मनी नाही आहे आणि मी तुम्हाला काहीच नुकसान नाही पोहचवणार. बस पुढच स्टेशन येई पर्यंत मी इथे थांबणार नंतर निघून जाईल. अनघा चुपचाप आपल्या जोर जोरात चालणाऱ्या श्वासेने त्याला बघत होती. एवढी क्रूर हत्या करून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर किंचित सुद्धा फरक पडला नव्हता. स्टेशन आलं आणि तो काळे कपडेवाला माणूस कॅबीनमधून बाहेर निघून गेला. जाता जाता तो त्या मृत देहावर थुंकला आणि चाकू तथा रीवोल्वर आपल्या सोबत घेवून गेला.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment