Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 10 August 2012

भाग ~ ~ ६ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ ६

घटनेच्या पुढे.... 

किती तरी वेळ अनघा तिथेच पडून राहिली, जेव्हा रात्रीच्या जेवणासाठी रम्या तिला बोलवायला आला तर तिचा दरवाजा जास्त वेळ ठोकवल्यावर पण जेव्हा अनघाने दरवाजा नाही उघडला तेव्हा रम्याने खालून सोनालीला बोलावून आणले. सोनालीने आणखी काही नोकरांच्या मदतीने दरवाजा खोलला. फर्शवरती पडलेल्या अनघाला बघून सोनाली चिंतेत पडली, डॉक्टरांना लगेच बोलावले गेले. डॉक्टरांनी तपासून सांगितले कि कुठल्यातरी घटनेमुळे ती बेशुद्ध झाली आहे. इजेक्शन देवून डॉक्टर निघून गेला आणि अनघाने फक्त आराम केला पाहिजे ह्याची काळजी घेण्यासाठी बजावले.

सकाळी जेव्हा अनघाची झोप उडाली तेव्हा घरातली एक मोलकरीण तिथे बसली होती, तिने लगेच सोनालीला ह्या गोष्टीची सूचना दिली. सोनालीने येवून अनघाची तबियत पाणी विचारली आणि बेशुद्ध होण्याचं कारण विचारलं. जेव्हा अनघाने तिला काल रात्रीची घटना सांगितली तर सोनालीच्या हैरानीचा ठिकाणाच नाही उरला. त्यांनी अनघाची गोष्ट ऐकल्यानंतर एकदा  खिडकीला आणि खिडकीच्या बाहेर लक्ष्य पूर्वक बघितले. ती खिडकी दुसऱ्या मजल्यावर होती आणि तिच्या खाली असं काहीच नव्हतं ज्याचावर कोणी उभा राहू शकतो. पण जेव्हा अनघाने ह्या गोष्टीचा दावा आपण पूर्ण शुद्धीवर येवून बोलत आहे असं बोलली तेव्हा सोनालीने हि सगळी गोष्ट गुरव साहेबांना ऐकवली. त्यांनी पण हैराणी व्यक्त केली पण गोष्टीची गंभीरता जाणून त्यांनी लगेच पोलिसांना खबर केली.


पोलिसांच्या तर्फे जो ऑफिसर पाठवला गेला होता तो कदाचित ' विचार-पूस' करण्यात जास्त इंटरेस्टेड होता. त्याने फक्त असंच काहीतरी थोडे प्रश्न अनघाला आणि घरातल्या नोकरांना विचारून, उचित कार्यवाहीचं आश्वासन देवून निघून गेला. गुरव साहेबांनी पण घराच्या सिक्युरिटी गार्डसला पण एकदम चौकस राहायचे निर्देश दिले. हे सगळं होता होता नाश्त्याची वेळ झाली होती, अनघा पण रात्रीपासून भुकी होती त्यामुळे सोनालीने फटाफट नाश्ता लावायला सांगितले. नाश्त्याच्या टेबलावरती आज छोटे मालक पण बसले होते, जे सारखे सारखे अनाघालाच बघत होते. त्याच्या डोळ्यांची तपिश अनघाला आपल्या पूर्ण शरीरावर जाणवत होती. त्याचे शांत डोळे सारखे सारखे काही असं बोलत होते जे अनघा समजायला बघते पण तिला काहीच समजत नाही आहे.


गुरव साहेब...! जे किती तरी वेळेपासून हे बघत होते त्यांनी बोलणं चालू करून त्या नवयुवकाला विचारले... रात्री तुम्ही आरामात झोपला होता कि नाही राहुल...! ह्म्म्म... बोलून राहुलने उत्तर दिलं.... अच्छा तर राहुल नाव आहे ह्याचं... अनघाने आपल्या मनात विचार केला... अरे हे झोपले कुठे होते...? हे तर रात्रभर आपला तून-तुणा वाजवत बसले होते... रम्या नाराजगीने बोलला... रम्या...! त्याला गिटार बोलतात... सोनाली बोलली. अरे त्याला काही पण बोलो... पण माझी तर पूर्ण झोपच खराब करून टाकतात छोटे मालक... रम्या परत चीढत बोलला... सोनालीने ह्यावेळी त्याला आपले बटाट्यासारखे डोळे काढून रागाने बघितले तर तो घाबरून लगेच किचनमध्ये घुसला...


ह्याच्यापासून वेगळं पण राहू शकत नाही आणि खोटं खोटं वाकडं तोंड करतो... गुरव साहेब स्मित हास्य देत बोलले... तेव्हा गुरव साहेबांच्या गेटकीपरने कोणी सी.आय.डी. ऑफिसर आल्याची खबर दिली जी अजित कुलकर्णीच्या मर्डर केसच्यासाठी अनघाला भेटायला आली आहे.


त्यांना लिविंग रूममध्ये बसवून चहा वैगेरे पाजा तोपर्यंत अनघा नाश्ता करून येते... गुरव साहेब एकदा अनाघाकडे बघत बोलले जी आत्ता अस्वस्थ दिसत होती... तुम्ही चिंता नका करू, तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती केली जाणार नाही ह्याचं आश्वासन देतो... गुरव साहेबांनी अनघाला चिंता मुक्त करण्याचा प्रयत्न केला. काल रात्री घेडलेला प्रसंग त्यांना नाही सांगितला तर जास्त ठीक राहील... खरं म्हणजे तो तुमच्या थकलेल्या आणि घाबरलेल्या मनाचा एक भास असेल... सोनाली बोलली... पण अनघाला पूर्ण विश्वास आहे ना कि जे तिने बघितले आहे ती वास्तविकता होती ना कि तिचा भास... आत्ता गुरव साहेब बोलले... अनघा स्वतःच विचारात पडली कि काल रात्री घडलेला प्रसंग तिचा भास होता कि वास्तविकता...?


ह्याच सगळ्या गोष्टींना विचार करत ती लिविंग रूममध्ये पोहोचली... तिथे तिला ती सी.आय.डि. ऑफिसर चहा पिताना दिसली... अनघाला बघताच तिने चहाचा कप सेंटर टेबलावरती ठेवला आणि एक स्मित हास्य देवून तिचं स्वागत केलं आणि आपला हात पुढे करत बोलली, मला शर्वरी साळुंखे बोलतात, मी सी.आय.डि. डिपार्टमेंटमध्ये डि.एस.पी. सारख्या छोट्या पदावर नोकरी करते. काही छोटे मोठे केस सोल्व केल्यामुळे माझा डिपार्टमेंट मला खूप हुशार आणि चालाक ऑफिसर समजतो. दोन दिवस आगोदर झालेल्या कुलकर्णीच्या
मर्डरची पडताळणी आत्ता आमच्याच निगराणीमध्ये होणार आहे आणि मी ह्या केसची ऑफिसर इंचार्ज असणार. अनघा तिच्या पुढे केलेल्या हाताला आपल्या हाताने मिळवायच्या बदली तिने नमस्काराने तिचं अभिवादन केलं... आपल्या पुढे केलेल्या हाताला मागे घेत ती समजली कि ह्या मुलीला अजून पर्यंत मोठ्या शहरातील हवा लागली नाही आहे.

मी आपले
स्टेटमेंट पहिलेच दिले होते आणि आत्ता अजून काय विचारायचे आहे तुम्हाला....! अनघाने लिविंग रूमच्या एका सोफ्यावर बसत बोलली. ती तर एक साधारण पोलिसांची फोर्मलिटी होती म्याडम, आत्ता हा केस सी.आय.डि.च्या हाताखाली आला आहे. तुमची साक्ष्य अजित कुलकर्णीच्या पर्सनालिटीच्या हिसाबाने फिट नाही बसत.... थोडा वेळ शांत राहून शर्वरी परत पुढे बोलली..., तुमच्या विवरणानुसार अजित कुलकर्णीने त्या काळ्या कपडेवाल्याशी वाचण्यासाठी तुमच्या मानेवर चाकू ठेवला होता, ज्याची अपेक्षा कोणा रस्त्यावरच्या एका गुंड्याशी करू शकतो पण अजित कुलकर्णी सारख्या सभ्य माणसाशी नाही. एक वेळ हे मानू शकतो कि कोणत्या तरी संकटात सापडून कदाचित ते असं करू शकतात पण आपल्या खिश्यात चाकू ठेवणे... हे तर अजित कुलकर्णी सारख्या सुप्रसिद्ध माणसाच्या विषयी विचार करणे पण कठीण आहे.

बघा...! मी त्या अजित कुलकर्णी आणि काळ्या कपड्यावाल्या माणसाला ओळखत पण नाही... माझं नशीबच खराब होतं कि मी त्या रात्री त्या ट्रेनच्या त्या कंपार्टमेंटमध्ये होती जिथे ह्या सगळ्या घटना घडल्या. तुमचे अजित कुलकर्णीने तर माझ्या मानेवरती चाकू ठेवत मला स्वतःची ढाल बनवायला बघत होते, त्याच्याच चाकूने झालेल्या जखमेचा निशाण तुम्हाला माझ्या मानेवरती पण दिसेल, ज्याला तुम्ही सभ्य शहरी म्हणून दर्जा देत आहात. अनघा आपली गोष्ट संपवत बोलली. ह्याच तर त्या काही गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे स्टेट गवरमेंटने हा केस, कुठलाही विलंब न करता आम्हावर सोपवला आहे... शर्वरी चहा संपवत बोलली.


तेव्हा गुरव साहेब आपल्या व्हील खुर्चीवरती तिथे पोहचले आणि शर्वरीला भेटून बोलले... तुमच्या सामान्य ज्ञाना
चं क्षेत्र थोडं वाढवा डि.एस.पी. साहिबा...! अजित कुलकर्णीवर आमच्याच एन.जी.ओ.ने किती तरी वेळा गरीब लोकांच्या जमीन हडपण्याचे केसेस केल्या आहेत. पण कोणताही केस आजपर्यंत प्रुव्ह झाला नाही आहे गुरव साहेब... शर्वरी पुढे येवून गुरव साहेबांशी हात मिळवत बोलली.

तुमच्याशी पहिले कधी भेट नाही झाली पण तुमच्या नावाचे चर्चे खूप ऐकले आहेत गुरव साहेब, आणि विश्वास करा जेवढं पण ऐकलं आहे सगळं चांगलंच ऐकलं आहे... शर्वरी स्मित हास्य देत बोलली. मी पण तुमच्या विषयी चांगलंच ऐकून बसलो आहे डि.एस.पी. साहिबा... गुरव साहेबांनी प्रतिउत्तर पण स्मित हास्य करूनच दिलं. जास्त दिवस नाही झाले आहेत त्या वृत्ताला, जेव्हा वृत्त पत्रात एका युवा पोलीस ऑफिसर द्वारा कॉ-ऑपरेटीव ब्यांकच्या घोटाळा करणाऱ्या गुनेह्गारांना आपल्या बुद्धीने आणि बहादुरीने पकडण्याच्या वृत्ताने ते वृत्तपत्र भरले पडले होते. प्रेसिडन्ट मेडल जिंकून तुम्ही ना केवळ आपल्या आई वडिलांचा बल्की आमच्या पूर्ण शहराचं नाव रोषण केलं आहे.. आपली गोष्ट जारी ठेवत गुरव साहेब बोलले... तुम्ही अजित कुलकर्णीच्या दुसऱ्या रंगांना पण बघण्याचा प्रयत्न करा डि.एस.पी. साहिबा...!


आमच्या नजरेपासून कोणतेही रंग लपू शकत नाही गुरव साहेब बस काही दिवसांची गोष्ट आहे, असो मी पुन्हा येणार अनघाशी आणि तुमच्याशी भेटायला, पण आत्ता तर अजून काही जरुरी काम आठवले आहेत... एवढं बोलून शर्वरी दोघांशी हात मिळवून लिविंग रूममधून निघून गेली.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment