Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 11 August 2012

भाग ~ ~ ७ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ ७

घटनेच्या पुढे.... 

गुरव साहेबांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं स्मित हास्य खेळत होतं... ते समजत होते कि हि व्यक्ती जी आत्ता आत्ता इथून उठून गेली आहे ती एवढ्या सहजतेने ऐकणारी नाही आहे... त्यांनी अनाघाकडे पाहिले आणि बोलले, "तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची चिंता नका करू, बस काही दिवसातच हि पण विचारपूस करून केस रफादफा करून टाकेल. आत्ता जर तुम्ही स्वतःला कंफर्ट फील करत असाल तर मला पूर्ण गोष्ट एकदम अचूक सांगा.."

"विचारा...! काय विचारयचे आहे तुम्हाला..." अनघा बोलली...

गुरव साहेब... "काही अश्या गोष्टी ज्या अजून पर्यंत तुम्ही त्या पोलीस ओफिसरांना पण नाही सांगितल्या आहेत..."

अनघा... "जेवढं मी बघितलं होतं आणि जेवढं मला आठवत होतं, तेवढं सगळं मी सांगितलं आहे सर...! मला कुठली पण गोष्ट लपवायची गरजच काय आहे... म्हणून तर मी काहीही न लपवता सगळं सांगून टाकलं..."

गुरव साहेब... "तरीपण काही तरी असं असेल जे तुम्ही नंतर नोटीस केलं असणार, अच्छा हे सांगा जेव्हा कुलकर्णीने तुम्हाला आपल्या चाकूने कवर केलं होतं तेव्हा त्या हत्याऱ्याने जे फायर केलं होतं ते तुम्हाला वाचवत केलं होतं किंवा तुम्हाला असं वाटलं असेल तुम्हाला गोळी लागो वा न लागो त्याला काहीच नाही फरक पडत..."

अनघा... "नाही नाही सर...! त्या माणसाने खूप साध्यापणे कुठलीहि हडबडी न करता निशाणा लावला होता, कदाचित तो आपल्या निशाण्याच्या प्रती खूप कॉन्फिडें असेल..."

गुरव साहेब... "ह्म्म्म...! हि गोष्ट तर तुमची एकदम बरोबर आहे... अच्छा हे सांगा पूर्ण घटनेच्या वेळी तो असं काही बोलला ज्याने तुम्हाला विचित्र वाटलं असेल..."

अनघा... "नाही सर...! त्याने पूर्ण घटनेच्या वेळी एक शब्द पण नाही बोलला होता, त्याच्या हावभावमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठेहराव होता, त्याच्या कोणत्याही अक्शन (action)मध्ये कुठलीच घाई दिसत नव्हती, तो पूर्ण आरामात कुलकर्णी समोर निशस्त्र उभा होता.."

गुरव साहेब... "(हैराणीने)... निशस्त्र उभा होता... ह्याचा काय अर्थ आहे..?"

अनघा... "जेव्हा तो कॅबीनमध्ये घुसला होता तेव्हा त्याच्या हातामध्ये काहीच नव्हते, कुलकर्णीने जेव्हा माझ्या मानेवरती चाकू ठेवला होता तेव्हा कुठे जाऊन त्याने आपल्या खिश्यातून रीवोल्वर काढली होती. कुलकर्णीवर फायर केल्यानंतर त्याने परत त्या रीवोल्वरचा वापर पण केलं नव्हता... पण सर...! तो जो कोणी होता, त्याचा कुलकर्णीवर खूप राग होता, त्याच्या डोळ्यात मला पूर्ण दुनियेचा राग दिसत होता.."

गुरव साहेब... "असो... ते तर मला वृत्तपत्रात वाचूनच समजले होते.... पण काय त्याने त्यावेळी एकही शब्द बोलला नव्हता...?"

अनघा... "बोलला होता ना सर...! जेव्हा तो कुलकर्णीवरती चाकूने वार करत होता तेव्हा मी आपले डोळे बंद करून घेतले होते... कॅबीनमध्ये जेव्हा कुलकर्णीचे ओरडणे बंद झाले तेव्हा मी आपले डोळे उघडून बघितले तर तो माझ्या समोरच एकदम शांत मुद्रेत बसला होता, मला घाबरलेलं बघून त्याने मला सत्वाना दिली कि तो मला काहीच नाही करणार आणि कुलकर्णी बरोबर त्याने जे केलं तो त्याच लायकीचा होता असं तो बोलत होता..."

गुरव साहेब... "हम्म...! त्याचा आवाज परत ऐकला तर तुम्ही त्याला ओळखाल...?"

अनघा... "मी एकदम पक्का काहीच नाही सांगू शकत सर...! तो एकदम हळू आवाजात बोलला होता जसं कोणी कुज-बुजत बोलतं तसं आणि तरीपण त्या ट्रेनच्या आवाजात ते पण मी काही साफ ऐकलं नव्हतं..."

"जर तुम्हा दोघांना काहीच त्रास नसेल तर मी पण तुमच्या सोबत इथे बसू शकतो का...?" त्या नावयुवकाने आत येवून खूप निरागसपणे विचारले...

गुरव साहेब... "अरे छोट्या...! भलं तुम्हाला माझ्याकडे येण्यासाठी परवानगी मांगायची गरज केव्हा पासून पडायला लागली.."

हा राहुल होता जो ह्या वेळी काही नॉर्मल माणसासारखा वागत होता. तो येताच अनघा थोडी अस्वस्थ फील करत होती.. करणार का नाही... राहुलची नजर सारखी सारखी तिलाच जे बघत होती... गुरव साहेबांच्या नजरे पुढे हे लपलं गेलं
नाही.. त्यांनी राहुलला आपल्या व्हील खुर्चीच्या जवळच्या सोफ्यावर बसण्याचा इशारा केला ज्याला मान्य करून राहुल तिथे बसला... अनघा त्याची प्रत्येक गती-विधी एकदम लक्ष्यपुर्वक बघत होती आणि तिला राहून राहून हैराणी होत होती कि काल सकाळी तिच्यावर पागल सारखा हमला करणारा माणूस आज एवढा सभ्य व्यवहार कसा करत आहे...?

गुरव साहेबांनी तिला स्वस्थ करण्यासाठी परत बोलायला सुरुवात केली..., "अनघा...! तुम्ही आमच्या छोट्या भाउंशी भेटलाच असाल, हे आमचे लाडके छोटे भाऊ आहेत..."

"मग हे छोटे भाऊ आहेत..." अनघाने मनातल्या मनात विचार केला, पण भलं हा एकुलता वारीस कसा झाला... गुरव साहेबांना पण मुल असेल... तिच्या विचारांनी तिला अजूनच अडकवले... पण भलं ह्या सगळ्या गोष्टी मी कशाला विचार करू... जसं विचारांच्या तंद्रीतून आपली मान झटकून तिने गुरव साहेबांकडून आपल्या रूममध्ये जाण्याची परवानगी मांगितली आणि उठण्याचा उपक्रम करायला लागली...

तिला उठताना बघून राहुल अचानक एकदम उभा राहिला आणि अनघा जवळ जाऊन.. एकदम जवळ जाऊन तिला जवळून पाहायला लागला.. एकदा परत अनघा अस्वस्थ झाली. गुरव साहेबांनी तिला ' घाबरू नको ' चा इशारा केला पण अनघाच्या चेहऱ्यावर ती घाबरलेली आहे हे साफ जाणवत होतं. राहुल तिच्या एकदम जवळ उभा होता, तो तिला हात तर नाही लावत होता पण अनघाला तो आपल्या शरीरावर आहे ह्याची जाणीव होत होती. गुरव साहेबांनी राहुलला आवाज दिला पण राहुलने जसं त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं, तो एकटक फक्त अनघालाच बघत होता, नंतर परत एकदा गुरव साहेबांनी त्याला आवाज दिल्यावर तो बोलायला लागला...

राहुल.. "दादा...! हि माझी प्रियाच तर आहे... तोच चेहरा, तेच डोळे, तोच बांधा... हि तीच आहे दादा... तीच आहे... माझी प्रिया... तुम्ही लोकं किती हि बोला पण हि माझी प्रियाच आहे..."

हे सगळं बोलता बोलता राहुलचा चेहरा आवेशमध्ये एकदम लाल लाल होत जात होता आणि अनघाचं हृदयाचे ठोके परत कोणत्या तरी अनहोणीच्या आशंकेने जोर जोरात धडधडायला लागले होते. गुरव साहेबांनी पण हि गोष्ट लक्षात येताच लगेच रम्याला आवाज दिला, ज्याला ऐकून रम्या पण धावतच आला. राहुलची मुठ आवळली होती आणि त्याचं शरीर कापायला लागलं होतं, ज्याला बघून अनघाची घुटमळलेली किंकाळी निघाली आणि ती तिथून पाठी हटणार होती कि तो पर्यंत राहुलने तिचा हात पकडला आणि... "मला सोडून नको जाउस प्रिया... प्लीज प्रिया..!" बोलायला लागला. आज त्याच्या आवाजात जुनून कमी आणि तडप जास्त होती. हि एक अशी तडप होती ज्याला बघून अनघा स्वतःला खूप विचित्र अवेस्थेत जाणवत होती. तिला एकत्र भीती आणि करुणा दोघांचे मिळतं जुळतं जाणीव होत होती... कदाचित करुणाच कोणत्याची नारीची सगळ्यात मोठी ' शक्ती आणि कमजोरी ' दोन्ही असतात.

रम्या... "छोटे मालक...! ह्यांना सोडा, ह्या प्रिया नाही आहेत, साहेब...! लवकर डॉक्टरांना बोलवा... छोट्या मालकांना परत होत आहे आहे..."

रम्याने जशी हि गोष्ट बोलली अनघाचं लक्ष्य राहुलच्या चेहऱ्याकडे गेलं, त्याच्या तोंडातून आत्ता फेस निघायला सुरुवात झाली होती. गुरव साहेबांनी बाकीच्या नोकरांना तथा सोनालीला आवाज देवून लगेच डॉक्टरांना बोलवायला सांगितले. ४-५ नोकर पळत पळत लिविंग रूम मध्ये आले आणि राहुलचे हात पाय पकडून त्याला उचलून त्याच्या रूमच्या दिशीने घेवून जाण्याचा प्रयत्न करू लागले. राहुलचे डोळे आत्ता पर्यंत बंद व्हायला लागले होते. त्याच्या तोंडातून निघणारा फेस आत्ता तर अजूनच जास्त निघत होता. सोनाली, जी आत्ता रूममध्ये पोहोचली होती तिने धावत येवून राहुलच्या मर्म-स्थानावर हात ठेवून त्याला शांत करण्याचा प्रयत्न कला. पण आज तर हि प्रक्रिया पण अप्रभावी साबित होत होती.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment