Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 16 August 2012

भाग ~ ~ ८ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ ८

घटनेच्या पुढे.... 

जसं तसं घरातील सगळे नोकर राहुलला त्याच्या रूममध्ये घेवून गेले, आत्ता पर्यंत राहुल पूर्ण पणे बेशुद्ध अवस्थेत गेला होता, फक्त त्याच्या शरीराला राहून राहून झटके लागत होते. राहुलचा रूम बंगल्याच्या फर्स्ट फ्लोरवरती होता, पण घरात एलीवेटोर (लिफ्ट) असल्यामुळे गुरव साहेब पण तिथे पोहोचले, त्यांची बैचेणी ह्यावेळी बघण्या लायक होती. साफ माहिती पडत होतं कि ते आपल्या छोट्या भावावर किती प्रेम करत होते ते. सगळे नोकर राहुलच्या हातापायांची मालिश करायला लागले होते, सोनाली आपल्या फोनवरून सतत डॉक्टरांच्या संपर्कात होती आणि बाकी लोकांना स्टान्डींग इंट्रक्शन (standing instruction) देत होती.

थोड्या वेळातच डॉक्टर पण आपल्या छोट्या टीम बरोबर तिथे पोहोचले आणि हालत बघून त्यांची टीम फटाफट राहुलच्या उपचाराच्या कामाला लागली. डॉक्टरांनी राहुलला कोणतं तरी इंजेक्शन दिलं ज्यामुळे थोड्या वेळातच राहुलच्या शरीरात सतत येणारे झटके थोडे कमी झाले तथा हळू हळू तो एकदम शांत झाला आणि कदाचित औषधांच्या प्रभावामुळे तो झोपला पण. अनघा पण ह्या सगळ्या हंगाम्याला राहुलच्या रूमच्या दरवाजावर उभी राहूनच बघत होती. ती बेचारी ह्या पूर्ण घटनेचा दोषी स्वतःलाच मानत होती. तिचं कोमळ हृदय तिच्या डोळ्यातून अश्रू वाहवून आपली संवेदना प्रकट करत होतं.


राहुलच्या शरीराला लागणारे झटके आत्ता कमी झाली होते, त्याचं शरीर आत्ता ढील पडलं होतं. डॉक्टरांनी सगळ्यांना रूममधून बाहेर जाण्यास सांगितले, आणि स्वतः पण गुरव साहेबांसोबत आणि सोनाली सोबत बाहेर आले.


डॉक्टर... "एवढ्या दिवसानंतर आज अचानक कसं हे सगळं घडलं...? कोणत्या गोष्टीमुळे आज हे एवढे उत्तेजित झाले..?"


गुरव साहेब... "काय सांगणार डॉक्टर साहेब...! काल पासून हा अनघाला बघून चिंतीत होता, काल सकाळी कोण जाणे कसा हा आपल्या रूम मधून निघून तिच्या रूममध्ये घुसला होता... मग अनघाला प्रिया प्रिया बोलून तिला आपल्या मिठीत घेतलं होतं... सोनाली आणि रम्याने ह्याला कसं तरी शांत केलं... पूर्ण रात्र हा झोपला नाही... झोपेची गोळी जो हा तुमच्या अनुसार खात होता, काल तीपण बेसर साबित झाली... सकाळ पर्यंत बेचाऱ्या रम्याने ह्याला जसं तसं झोपवलं.. उठल्या नंतर पूर्ण पणे हा एकदम नॉर्मल होता... आम्ही पण ह्याला कोणता तरी प्यानिक अट्याक (panic attack) समजून नजरंदाज करून टाकले.... आत्ता थोड्या वेळापूर्वी हा एकदम शांत आणि एकदम नॉर्मल वागत होता... पण अनघाला बघून कोण जाणे काय विचार करत होता आणि शेवटी हे सगळं घडलं..."


डॉक्टर... "हि अनघा कोण आहे...?" अनघा जी एवढ्या वेळेपासून एकदम शांत उभी राहून सगळं ऐकत होती... तिने पुढे येवून डॉक्टरांना आपला परिचय दिला.


डॉक्टर... "तुमची ह्यांच्या बरोबर पहिले कधी भेट झाली आहे का...?"

अनघा... "नाही तर...!"

डॉक्टर (गुरव साहेबांना).. "जर तुम्हा लोकांना असं वाटतं राहुल एकदम व्यवस्थित झाला पाहिजे तर काही दिवसांसाठी अनघाला प्रिया बनवून टाका.."


हे ऐकून अनघा दचकून उभी राहिली आणि गुरव साहेब तथा सोनालीकडे बघायला लागली... तिचं दचकण बघून गुरव साहेबांनीच डॉक्टरांना त्याचं कारण विचारलं...


डॉक्टर... "हे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे कि, जेव्हा पासून ती घटना राहुल बरोबर झाली आहे तेव्हा पासून तो एवढा उत्तेजित झाला नाही आहे जेवढा काल आणि आज झाला आहे हे तुम्ही बघितलं आहे... ह्याला झटके तर पडायचे पण जास्त तर हा शांतच असायचा... ह्याने कोणा बरोबर पण कोणतंही वाईट वागणूक केली नाही आहे, हा फक्त बस आपल्याच विचारात असायचा पण अनघाच्या येताच जे चेंजेस झाले आहेत ते मेडिकलच्या दृष्टीकोणातून एकत्र नेगेटिव आणि पॉंजीटीव दोन्ही आहेत... नेगेटिव ह्यासाठी... कि एवढी जास्त उत्तेजना ब्रेन-ह्याम्रेजचं (brain-hammerage) कारण पण बनू शकते... आणि पॉंजीटीव ह्यासाठी कि.... पहिल्यांदा कोणतं असं कारण बघायला भेटलं जे ह्याला एवढं उत्तेजित करू शकतं... डोक्याला अश्याच उत्तेजित अवस्थेत परत स्टेबल (स्थिर) करू शकतो..."


गुरव साहेब... "मी आत्ता पण तुमची गोष्ट समजू शकलो नाही आहे डॉक्टर साहेब...! शेवटी अनघाला भलं आम्ही कसं प्रिया बनवू शकतो...? आम्ही लोकं तर स्वतः प्रिया विषयी काही खास नाही जाणू शकलो... मग भलं आम्ही कसं राहुलला विश्वास देणार कि हि अनघा नाही प्रिया आहे...?"


डॉक्टर... "तुम्हा लोकांना काहीच नाही करायचे आहे, अनघाला प्रिया बोलायच्या शिवाय... बाकीची गोष्ट राहुलचं अनस्टेबल माईंड (अस्थिर मस्तिष्क) त्याला स्वतः विश्वास देणार... हा एक शेवटचा प्रयत्न आहे ज्याने आपण राहुलला एकदम ठीक करू शकतो... माझ्या मते ह्या प्रयत्नामध्ये काहीच हरकत नाही आहे... अनघाला पण ह्यामध्ये काहीच आपत्ती नाही व्हायला पाहिजे..." एवढं बोलून डॉक्टरांनी अनाघाकडे एकदा प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले, ज्याला बघून अनघा काहीच उत्तर देवू शकली नाही, ती गोंधळल्यासारखी तिथेच उभी होती.


डॉक्टर गुरव साहेब आणि सोनालीकडे बघत बोलले... "तुम्ही सगळे एकदम चांगल्या प्रकारे ह्या विषयी विचार करा आणि हा प्रयत्न करून बघा..." एवढं बोलून डॉक्टर एकदा परत राहुलकडे जाऊन त्याची नस वैगेरे चेक करून आणि काही औषधं एका कागदावर लिहून निघून गेले.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment