Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 23 August 2012

भाग ~ ~ ९ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ ९

घटनेच्या पुढे.... 

डॉक्टर गेल्यानंतर गुरब साहेब, सोनाली आणि अनघा एकदम शांत बसले होते, त्यांच्यामधलं कोणीच काहीच नाही बोलत होतं. शेवटी अनघाच बोलायला लागली...

अनघा... "मी प्रिया बनायला तैय्यार आहे पण हि प्रिया आहे तरी कोण...? मी खरोखर तिच्या सारखी दिसते का..?" तिचं प्रश्न आणि उत्तर ऐकून दोघेही एकदम खुश झाले. गुरव साहेब तर एवढे खुश झाले कि त्यांनी आपली व्हील खुर्ची पुढे करून अनघाचा हात आपल्या हातात घेवून सारखे सारखे धन्यवाद बोलायला लागले. अनघाने त्यांना अश्वस्त करून प्रिया विषयी पुन्हा तोच प्रश्न विचारला.


गुरव साहेब.. "तुम्हाला प्रियाच्या कहाणी सोबत आणखी काही तरी गोष्टी सांगणार पण आपण चला स्टडी रूममध्ये जाऊन बसू या..." सोनालीने पण हामि भरत गुरव साहेबांच्या व्हील खुर्चीला घेवून स्टडी रूममध्ये गेल्या, स्टडी रूमच्या एका सोफ्यावर बसून गुरव साहेबांच्या व्हील खुर्चीला पण आपल्या बाजूलाच उभी केली... गळा साफ करून गुरव साहेब बोलायला लागले.


गुरव साहेब... "समजत नाही आहे कि कुठून सुरुवात करू, कदाचित एकदम सुरुवात पासून सुरु केलं तर ठीक राहील. आमच्या परिवाराच नाव प्रत्येक वेळी मोठ्या आणि श्रीमंत लोकांमध्ये गणल जायचं. जेव्हा आम्ही छोटे होतो... जवळ जवळ १३-१४ वर्षांचे माझ्या आईला एक असाध्य रोगाने शिकार बनवलं... बाबांनी दुनियाभर त्यांचा उपचार केला पण कुठेच काहीच पर्याय मिळत नव्हता... आईला पण आपला मृत्यू जवळ वाटत होता.. तर त्यांनी माझी काळजी करत आपल्या एका मैत्रिणीच जीने आपल्या पारिवारिक कारणांमुळे लग्न केलं नव्हतं तिच्याशी माझ्या वडिलांचं दुसरं लग्न करून टाकलं... बाबा पहिले तर हे लग्न करायला तैय्यार नव्हते पण... आईची शेवटची इच्छा म्हणून त्यांनी लग्न केलं... लग्नाच्या काही दिवसानंतरच त्या स्वर्गवासी झाल्या... माझी सावत्र आई ज्यांना मी आदराने छोटी आई बोलायचो त्यांनी मला भरपूर प्रेम दिलं... मला कधीच आपल्या आईची कमी वाटायला नाही दिली.. काही वर्षानंतर माझ्या छोट्या आईने माझा लाडका, माझ्या प्रेमळ गोंडस भावाला जन्म दिला..."


"म्हणजे हा सावत्र भाऊ आहे..." गुरव साहेबांची गोष्ट ऐकून अनघा मनातल्या मनात पुटपुटली.

गुरव साहेब... "हो..! राहुल माझा सावत्र भाऊ आहे.." हे ऐकून अनघा दचकलीच... आणि आश्चर्याने गुरव साहेबांना बघायला लागली.

गुरव साहेब... "एवढं दचकू नका...! पहिल्या पहिल्या वेळेस तर हे ऐकल्यानंतर सगळेच जण दचकतात आणि तो हीच गोष्ट समजतो जी तुम्ही समजताय... तर मला हि गोष्ट गेस (Guess) करणे काही कठीण नाही जात..."


अनघाने जसं गोष्टीला समजलं आणि सहमतीमध्ये आपली मान हलवली... गुरव साहेबांनी आपली गोष्ट पुढे चालू ठेवत बोलले...


गुरव साहेब... "कदाचित राहुलच्या नशिबात पण सख्ख्या आईचं प्रेम नाही लिहिलं होतं... त्याच्या जन्मानंतरच छोटी आई आजारी पडायला लागली.... आपल्या आजारी पणामुळे त्या खूप कमकुवत राहायला लागल्या... आईच्या प्रेमाला तरसणारा राहुल आपल्या मोठ्या भावामध्ये ते प्रेम शोधत होता... बाबा, आईच्या आजारपणामुळे त्रासून आधीच गेले..."


"पूर्ण परिवारात राहुलसाठी फक्त मीच वाचलो... त्याच्यासाठी आईचं असणं आणि नसणं एक सामान झालं होतं... तो माझ्यामध्येच आपली आई आणि बाप बघायचा... मी कॉलेजमध्ये आपल्या शिक्षणावेळी सोनालीला भेटलो... ह्या सुंदर देवीने माझं हृदय चोरी केलं आणि मला आपलं बनवलं (हे बोलता बोलता गुरव साहेबांनी एकदा मोठ्या प्रेमाने सोनालीला बघितले ज्यामुळे एवढ्या गंभीर वातावरणात पण सोनाली लाजली आणि अनघाने स्मित हास्य दिलं...)"


"सोनालीमध्ये त्या सगळ्या क्वालिटी आहेत ज्या आमच्या परिवारासाठी सुनेमध्ये असल्या पाहिजेत... आई ने पण सोनालीला भेटून आपली परवानगी दिली... लग्नानंतर सोनालीने पूर्ण घराला भरभरून प्रेम दिलं... राहुलला पण जसं आपली आईच भेटली... आई पण सोनालीला आपल्या राहुलशी प्रेमाचं व्यवहार बघून एकदम संतुष्ट होत्या पण तरीही त्यांच्या मनात काहीतरी चिंता होती काहीतरी व्याकुळता होती... आपल्या शेवटच्या श्वासला त्यांनी राहुलकडे एकदम करुणेने बघत मला बोलल्या होत्या कि ह्याची काळजी घे... मी पण आईला आश्वासन दिलं पण आईने विचारलं कि जर उद्या तुला कोणी मुल झालं तर तेव्हा पण तू असंच राहुलची काळजी घेशील का..."


"मी आईची मृत्यू सुखःद बनवण्यासाठी आणि आपल्या वर केलेल्या ममतेचा कर्ज उतरवण्यासाठी विचार करून त्यांना वचन दिलं कि 'तुम्ही चिंता नका करू आई...! मी मरेपर्यंत निसंतान राहणार... आणि राहुलला पण आपलाच मुलगा समजणार...' आईचे श्वास पण काही अश्याच वचनासाठी अटकले होते... आपल्या चेहऱ्यावर संतुष्टीचे भाव घेवून त्यांनी आपले डोळे कायमस्वरूपी मिटले.."


एवढं बोलून गुरव साहेब शांत झाले... पूर्ण रूममध्ये एक विचित्र शांतता पसरली... ती शांतता फक्त सोनालीचे रडणेच भंग करत होती.


गुरव साहेब... "आम्हाला माहिती आहे सोनाली आम्ही तुमचे गुनेह्गार आहोत... आईला असं कोणतंही वचन देण्या आगोदर आम्हाला तुमच्याशी पण चर्चा केली पाहिजे होती... पण वेळ आणि हालातच तसे होते कि आम्ही भावनेमध्ये व्हावून गेलो आणि आईला वचन देवून बसलो... राहुल स्वतःपण ह्या गोष्टींवर्ती माझ्यावर रागावला होता आणि हजार वेळा मला हे वचन तोडण्यास सांगत होता... पण भलं आम्ही असं करून आपल्या छोट्या आईला काय तोंड दाखवलं असतं...?"


अनघा पूर्ण गोष्ट शांत होवून ऐकत होती... तिच्या नजरेमध्ये गुरव साहेबांची इज्जत अजूनच वाढली... गुरव साहेबांनी पुढे गोष्ट चालू ठेवण्यासाठी अनघाकडे बघत परत बोलायला लागले...


गुरव साहेब... "आत्ता राहिला प्रश्न प्रिया कोण आहे...? तर तिच्या विषयी आम्हाला पण जास्त माहिती नाही आहे... खरं म्हणजे असं झालं होतं कि लोणावळ्याला आमचा एक फार्म हाऊज आहे ज्याची देख भाल करण्याची जवाबदारी आम्ही राहुलवर सोपवली होती... गेल्या मे-जून महिन्यात नवीन धान्याची लागवडीसाठी राहुल तिथेच गेला होता... जवळ जवळ एका महिन्या नंतर तिथल्या म्यानेजरचा फोन आला कि, राहुल गेल्या एक आठवड्या पासून हरवला आहे... हे ऐकून आम्ही चिंतीत झालो आणि तत्काळ आम्ही दोघे तिथे जाण्यासाठी निघालो... पूर्ण ८-९ तासांच्या प्रवासानंतर जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा म्यानेजर बोलला कि लोकल पोलिसांना खबर दिली आहे... आणि विचारल्या वरती माहिती पडले कि राहुलला कोणत्यातरी मुली बरोबर बघितलं गेलं आहे, जिला तो आजकाल खूप वेळा भेटायचा..."


"पोलिसांनी एका जळालेल्या घरातून राहुलला घायळ अवस्थेमध्ये बाहेर काढले होते... त्याच्या डोक्यावर एक गंभीर ईजा झाली होती, ज्याच्यामुळे तो आज ह्या हालातीमध्ये आहे. शुद्धीवर आल्यानंतर हा कोणत्या तरी प्रिया मुलीचा उल्लेख सारखा सारखा करायचा... आम्ही पण त्या मुलीच्या विषयी माहिती करण्याचा प्रयत्न केला पण काहीच फळ भेटलं नाही... तिथल्या लोकांनी फक्त एवढंच सांगितलं कि ती मुलगी आपल्या पप्पांबरोबर कोणत्यातरी दुसऱ्या शहरातून आली होती आणि तिचं कोणाशीच भेटणं होत नव्हतं... माहिती नाही राहुल तिला कसा भेटला आणि ह्या हालातीमध्ये पोहोचला. कमालीची गोष्ट हि होती कि त्या घरातून दुसऱ्या कोणाचीही डेड बॉडी भेटली नाही... म्हणजे ती जी कोणी आहे ती ना केवळ जिवंत आहे उलट ती राहुलच्या ह्या हालातीची जवाबदार पण आहे..."


एवढं बोलून गुरव साहेब शांत झाले... मग सोनालीने त्यांना पाणी पाजले जे पिऊन गुरव साहेब पुन्हा बोलायला लागले...


गुरव साहेब.... "आज जेव्हा डॉक्टरांनी तुमच्या रूपात आम्हाला आशेचं एक नवीन किरण दाखवलं, ते आम्हालाच माहिती आहे कि आम्ही किती खुश आहोत... अनघा...! जर तुम्ही आमच्या भावाला ठीक करण्यासाठी मदत करत असाल तर आम्ही जिवंत असे पर्यंत तुमचे आभारी आहोत..."


एवढं बोलता बोलता गुरव साहेबांनी अनघाच्या समोर आपले दोन्ही हात जोडले... अनघाने पण आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी आपली स्वीकृती दिली... आणि गुरव साहेबांना असे हात जोडण्यासाठी मनाई केली.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment