Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Monday, 27 August 2012

भाग ~ ~ १० Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ १०

घटनेच्या पुढे.... 

खरं तर अनघाने हे कार्य करण्यासाठी आपली स्वीकृती दिली होती पण तिच्या स्वभावाला जाणून सोनालीने परत एकदा तिला विचारले... "कुठे तू कोणत्या दडपणाखाली येवून तर हा निर्णय नाही घेतला आहे ना, जर तू नकार जरी दिलास तरी आम्ही तुला दोष देणार नाही..."

अनघा... "नाही नाही सोनालीजी...! मी विचार करूनच ह्या गोष्टीला स्वीकृती दिली आहे... बस तुम्ही मला राहुलच्या विषयी काही तरी सांगा... त्यांच्या बरोबर कसे बोलायचे आहे आणि कसे नाही. ते कोणत्या गोष्टीवरती जास्त उत्तेजित होतात.. 'प्रिया' बनण्याचं नाटक करण्यावर पण कोणत्या तरी गोष्टी असतील ज्यावर लक्ष ठेवायला पाहिजे..."

गुरव साहेब.. "माझ्या मते आम्ही हि गोष्ट डॉक्टरांनाच विचारली पाहिजे आणि त्यांच्या कडूनच  समजून घेतली पाहिजे..."

सोनाली... "हो हे ठीक राहील..." एवढं बोलून तिने डॉक्टरांना फोन लावला आणि फोन गुरव साहेबांना दिला.

गुरव साहेब... "हेल्लो डॉक्टर साहेब...! (गुरव साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यालायक होता...) अनघा तुमच्या म्हणण्यानुसार काम करायला तैय्यार झाली आहे... हो..! तिने स्वतः आम्हाला हि गोष्ट सांगितली आहे.. आमचं कोणतंच दडपण नाही आहे तिच्यावर..." तेव्हा सोनालीने त्यांना टोकत बोलली, "तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना का सांगत आहात...? डॉक्टरांना भलं ह्या गोष्टीशी काय घेणं देणं असू शकतं.."

गुरव साहेब... "(माउथ पीस वर हात ठेवून..) अरे हो यार...! मी तर भावनेमध्येच बहकलो आहे... (आणि मग ते लगेच डॉक्टरांशी बोलायला लागले...) खरं म्हणजे मी ह्या साठी फोन केला आहे कि अनघाला प्रिया बनवून राहुल समोर पेश करते वेळी कोणत्या कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे..."

डॉक्टर... "(फोनवर गुरव साहेबांशी...) तुम्ही लोकं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कि राहुल समोर अनघाला प्रियाच बोलवा... बाकी सगळं तर औषधांनी आणि वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटनेच होणार.. पण 'प्रिया'च्या रूपात आपणाला राहुलचा मेंदू स्टेबल करण्यासाठी एक साधन तरी मिळालं..." एवढं बोलून आणि काही गोष्ट करून गुरव साहेबांनी फोन ठेवून दिला आणि अनघाला बघत बोलले...

गुरव साहेब... "अनघा...! कदाचीत आज पासून तुम्हाला ह्या घरात अनघा म्हणून कोणीच हाक नाही मारणार... तुम्ही पण ह्या गोष्टीची जाणीव ठेवा कि राहुलच्या समोर तुम्हाला फक्त प्रियाच बनून रहायचं आहे... जर ह्या गोष्टीमध्ये जराशी पण चूक झाली तर आम्ही राहुलला हरवून बसू... तर तुम्ही तुमच्या मनाला एकदम पक्कं करून ठेवा आणि दृढ निश्चय घेवूनच हे कार्य करण्यासाठी पुढे व्हा.."

अनघा... "जेव्हा मी ह्या गोष्टीला स्वीकृती दिली होती तेव्हाच मी दृढ निश्चय केला होता... फक्त मी आपल्या संस्कारांच्या पलीकडे जाऊन जिथपर्यंत करू शकेल तिथपर्यंत करणार... मी जरूर करणार..."

गुरव साहेब... "आम्ही स्वतःपण हे लक्षात ठेवणार कि तुमच्या संस्काराला हानी नाही होवू देणार... राहुल खूप सभ्य आणि साधा मुलगा आहे.. त्या घटनेच्या पहिले पण आणि आत्ता पण आणि आत्ता पण तुमच्याशिवाय इथे त्याने कोणत्याही व्यक्तीशी हे केलं नव्हतं.. कदाचित...! जेव्हा तुम्ही त्याला प्रियाच्या रूपात भेटणार तेव्हा पण तो सभ्यच व्यवहार करेल... बाकी कोणतीही चिंता नका करू आम्ही इथेच आहोत... तर तुम्ही आरामात चिंता मुक्त होवून आमची मदद अपेक्षा नुसार करा... आम्ही मरेपर्यंत तुमचे आभारी आहोत..."

अनघा... "सर..! मी तुम्हाला पहिलेच ह्या गोष्टी बोलण्यापासून बजावले आहे... तुम्ही प्लीज सारखं सारखं ह्या गोष्टी बोलून आम्हाला लाजवू नका..."

सोनाली... "खरं म्हणजे राहुलच्या विषयी तुम्हाला आमच्याही पेक्षा कोणी चांगल्या प्रकारे सांगू शकतो तो आहे रम्या... रम्या आणि राहुल लहानपणापासून एकत्र खेळून मोठे झाले आहेत... त्यांच्या मध्ये मालक आणि नोकर प्रेक्षा मित्रत्व जास्त आहे.. रम्यानेच राहुलची देख रेख सगळ्यात जास्त केली आहे.. कदाचित माझ्या पेक्षा जास्त..." एवढं बोलून सोनालीने रम्याला आवाज दिला... रोजच्या सारखं रम्याला त्याच्या पूर्ण नावाने बोलावल्या न गेल्यामुळे तो रागातच तिथे आला... त्याचा राग बघून जवळ जवळ सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं...

गुरव साहेब... "रम्या...! आज पासून आम्ही सगळेच अनघाला प्रिया नावानेच हाक मारणार... तुम्ही बाकी सगळ्या लोकांना ताकीद देवून ठेवा कि कमीत कमी राहुलच्या समोर तरी अनघाला प्रियाच बोलायला लावा..."

रम्या... "(हैराणीने आपलं डोकं खाजवत) म्हणजे काय... आणि भलं हि देवी केव्हा पासून प्रिया बनली, कशी बनली हि प्रिया... (तोंड वाकडं करून) मला कसं माहिती नाही पडलं..?"

सोनाली... "(थोडंसं चीढत...) का...! का तुमच्या कडून परवानगी घेतली पाहिजे ह्या गोष्टीसाठी..."

रम्या... "कशाला गरीबाची थट्टा करत आहात मालकीण बाई... आम्ही फक्त हेच जाणायला बघत होतो कि भलं हि देवी प्रिया कशी असू शकते...?"

गुरव साहेब... "सचिन रामू शिंदेजी..! (रम्या एकदम खुश झाला...) इथे तुम्हाला तेच सांगण्यासाठी तर बोलावले गेले आहे... तुम्ही तर बघितलेच आहे कि कश्या प्रकारे राहुल हिला प्रिया नावाने बोलावतो... हीच गोष्ट जेव्हा आज डॉक्टर साहेबांना माहिती पडली तेव्हा त्यांनीच आम्हाला हे नाटक करायला सांगितले आहे... त्यांचं म्हणण असं आहे हे केल्याने आपला राहुल बरा होवू शकतो..."

रम्या.. "(डोळ्यात एक वेगळ्या प्रकारची चमक घेवून...) काय खरोखर आपले छोटे मालक बरे होवू शकतात.. (गुरव साहेबांनी आपली मान होकारार्थी हलवली...) आत्ता बघा साहेब... मी काय मस्त नाटक करतो ते... अरे हे तर काहीच नाही... आमच्या सोलापुरात तर आम्ही खूप नाटक केलं होतं..." रम्याची गाडी पुन्हा अल्प विराम आणि पूर्ण विराम सोडायला लागली होती कि तेव्हा सोनालीने त्याला टोकत थांबवले आणि बोलली...

सोनाली... "(जवळ जवळ ओरडतच...) रम्या...! काळ वेळ बघून तरी बोलत जा... जेव्हा बघू तेव्हा बडबड करत असतो... तुम्हाला इथे ह्या साठी बोलावले आहे कि तुम्ही अनघाला राहुल विषयी चांगल्या प्रकारे समजवाल पण तुम्ही आहात कि तुमची सोलापूरचे किस्से सांगायला सुरुवात करताय... आत्ता अनघाला त्यांच्या रूममध्ये घेवून जावा आणि राहुलची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जी तुम्हाला माहिती आहे, ती अनघाला सांगा.. (मग अनाघाकडे बघत...) आत्ता तुम्ही आपल्या रूममध्ये जावून ह्याच्याकडून सगळी गोष्ट ऐकून घ्या पण लक्षात ठेवा कि ह्याची गाडी परत सोलापूरला जायला नाही पाहिजे..."

अनघा स्मित हास्य देत आणि रम्या परत रागात घराच्या दुसऱ्या माळ्यावर अनघाच्या रूमकडे जातच होते कि तेव्हा... 'प्रिया'...! गुरव साहेबांनी पाठून आवाज दिला, ज्याला ऐकून अनघा दचकली... तेव्हा गुरव साहेब तिला बोलले..

गुरव साहेब... "आज पासून का आत्ता पासून तुम्ही ह्या नावाची सवय लावून घ्या..."

अनघा आपली 'टेम्पररी' ओळख घेवून त्या रूममधून बाहेर निघाली.

 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment