Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 29 August 2012

भाग ~ ~ ११ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ ११

घटनेच्या पुढे.... 

स्टडी रूममधून दोघेही दुसऱ्या माळ्यावरती अनघाच्या रूममध्ये पोहोचले... आश्चर्य हे झालं कि त्या काळात रम्या एकदम शांत होता... असो दोघेही रूममध्ये पोहोचले... ते रूममध्ये पोहोचताच रम्या एकदम अनघाचे पाय पकडून रडक्या अंदाजमध्ये बोलायला लागला...

रम्या... "आमच्या छोट्या मालकाला तुम्ही बरं करा... मी आपली चामडी काढून तुमच्यासाठी एक चप्पल बनवेल..."


अनघा... "(रम्याची गोष्ट ऐकून राहुलप्रती त्याचं प्रेम बघून अनघा भावूक झाली...) अरे अरे हे काय करत आहात तुम्ही रम्या दादा... माझे पाय सोडा आणि चला उठा आत्ता..."


रम्या... "तुम्ही पूर्ण नावाने हाक नाही मारली तरीही तुम्ही मला दादा बोललात मन एकदम शांत झालं... विचारा...! काय विचारायचे आहे तुम्हाला...? मी सगळं सांगेन..."


अनघा... "आत्ता मी असं काय विचारू तुम्हाला... जे पण तुम्हाला वाटेल आणि आठवणीत आहे... मला सगळं सांगा..."


रम्या... "हट...! (थोडा लाजत...) सगळं कसं सांगू शकतो तुम्हाला... हे सगळं मुलांची गोष्ट... तुम्हाला कसं सांगणार आम्ही..."


अनघा... "(तो लाजल्यामुळे स्मित हास्य देत...) ओफ्फो..! तर अशी पण गोष्ट आहेत काय तुमच्यामध्ये ज्याला सांगतेवेळी तुम्हाला लाज वाटते... बघा जो पर्यंत तुम्ही मला राहुलची काही खास गोष्ट नाही सांगणार तर... मला त्यांना समजण्यासाठी कठीण होईल आणि मग त्यांचा आजार कसा ठीक होणार. "


अनघा... "मालकीणबाई... (सोनाली) एकदम ठीक बोलतात कि मी खूप बडबड करतो... आत्ताच बघा ना... गोष्ट काय चालली आहे आणि मी काय बोलतोय... आमच्या सोलापुरात पण... (बोलता-बोलता त्याची नजर जेव्हा अनघा वर पडली तर तिच्या चेहऱ्या वरचा राग बघून आपली जीभ आपल्या दातात चावली...) आत्ता नाही बोलणार मी आपल्या सोलापुरा बद्दल... ती सगळी गोष्ट नंतर सांगेन मी तुला... पहिले कामाची गोष्ट झाली पाहिजे... (मग काही विचार करून... खाली बघत...) ते मी लाजत ह्याच कारणामुळे आहे कि छोटे मालक..! लव्ह लेटर लिहिण्यासाठी माझी मदत करायचे... (एवढं बोलताच रम्या ने आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांनी लपवला...)"


अनघा त्याचं लाजणं बघून एकदम जोर जोरात हसायला लागली... हसता हसता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं... रम्या तिच्या हसण्यामुळे नाराज होत.


रम्या... "ह्याच कारणामुळे मी तुम्हाला हि गोष्ट नाही सांगणार होतो... आत्ता तर तुम्ही एवढे हसता आहात कि आत्ता मी तुम्हाला कुठलीच पर्सनल गोष्ट नाही सांगणार.. तुम्ही तर माझी गोष्ट ऐकून असंच हसत राहाल आणि कोण जाणे हि सगळी गोष्ट तुम्ही मालकीणबाईला सांगितली तर... (थोडं घाबरून) त्या पहिल्यापासूनच माझ्यावर चीढ्लेल्या असतात..."


अनघा... "(ती आत्ता थोडी शांत झाली होती पण राहून राहून तिला हसायला येतंच होतं) अरे नाही नाही दादा..! मी तुमच्या गोष्टी वर नाही तुमच्या लाजण्यावर हसत आहे... ते काय आहे कि असं कोणत्या मुलाला लाजताना आत्ता नाही पाहिले आहे ना..."


रम्या... "हे घ्या...! तुम्ही ह्या गोष्टीवर हसत आहात... आत्ता आम्ही एवढे पण बेशरम तर नाही आहोत ना जे आपल्या प्रेम पत्राची गोष्ट लाजल्याशिवाय सांगू..."


अनघा... "ती आहे तरी कोण जिला तुम्ही प्रेम पत्र लिहायचे..?"


रम्या... "अरे आत्ता कोणीच नाही आहे... (अनघा हैराणीने त्याला बघते) अरे तुम्ही एवढं हैराण का होत आहात... जेव्हा माझं लग्न होईल... तेव्हा ह्याची गरज पडणार...ते आमच्या सोलापुरात..."


आत्ता अनघाला सोनालीने दिलेली वार्निंग आठवायला लागली जी तिने राम्यासाठी तिला दिली होती आणि त्यामुळे तिने रम्याला सरळ प्रश्नच विचारण्यामध्ये भलाई समजली...


अनघा... "(रम्याला मध्येच टोकत...) अच्छा हे सांगा कि, तुमची राहुलशी त्या घटने आगोदर वार्ता झाली होती का ज्यात राहुलने प्रियाचा उल्लेख केला असेल...?"


रम्या... "नाही पण फोनवरती बोलले होते कि घरी येवून तुला एक आनंदाची बातमी ऐकवणार... मी पटकन समजलो कि जरूर कोणत्या तरी पोरीचं चक्कर असणार... ते काय आहे छोटे मालक आम्हाला सारखे (काही आठवत) ते त्याला काय बोलतात जी मुलगी आपल्या स्वप्नात सारखी सारखी येते."


अनघा... "ड्रीम गर्ल..?"


रम्या.. "हो हो तेच... डीरीम गरल... तिचीच वार्ता करायचे... कि ती अशी असणार... ती तशी असणार... तर मी पण पटकन त्यांना बोललो कि माझी छोटी मालकीणबाई फायनल केली काय... तर छोटे मालक पण बोलले... रम्या..! तू तर एकदम हुशार आहेस आणि लाजून फोन ठेवून दिला... फोन ठेवता ठेवता परत बोलले कि उद्या परत फोन करतो पण देवाचं खेळ बघा...! आमचे हस्ते खेळणारे छोटे मालक... एकदम भूत बनून राहिले... आत्ता बस तुम्ही त्यांना बरं करा मी तुमचे आभार मरे पर्यंत मानणार..."


अनघा... "ह्याचा अर्थ असा कि त्यांनी तुमच्याशी प्रिया बद्दल काही बोलले होते...?"


रम्या... "नाही बोलले होते... हे नाव तर त्यांच्या तोंडून तेव्हा सारखं सारखं आलं होतं जेव्हा ते शुद्धी वर आले होते... माहिती नाही कोण जकीण होती ती जिने आमच्या छोट्या मालकाची हि हालत केली... मला फक्त एकदा भेटली पाहिजे... सोलापूरची शपथ तिचा गळा दाबून तिला मारून नाही टाके पर्यंत मी कधीच सोलापुरात आपले पाऊल पण नाही ठेवणार..."


अनघा समजली कि ह्याच्याशी वार्ता करण्यासाठी सोनाली किंवा गुरव साहेब जवळ असले पाहिजेत... कुठून पण रम्या आपली गाडी सोलापुरलाच घेवून जात होता... अनघाने पण बाकीची गोष्ट गुरव साहेब आणि सोनाली समोर विचारण्याचाच निर्णय घेतला...




 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment