Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 7 August 2012

भाग ~ ~ ३ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग - ३ 

घटनेच्या पुढे....

अनघाची तबियत परत खराब होतांना बघून सोनालीने डॉक्टरांना लगेच बोलावले पण डॉक्टरांनी मामुली कमजोरी आल्यामुळे तिला असं झालं, हे सांगून निश्चिंत राहायला सांगितलं. डिस्चार्जची फोर्म्यालीटी पूर्ण करून सोनालीने अनघाला आपल्या सोबत गाडीमध्ये बसून घराकडे निघाली. रस्त्यामध्ये सोनालीने सांगितले कि गुरव साहेबांच्या जुन्या असीस्टंटचं लग्न झाल्यामुळे ती आत्ता काम सोडून जाणार आहे आणि गुरव साहेबांनी एका पब्लिशर (पुस्तकं छापणाऱ्या कडून) मंथली कॉलंम्स (Monthly Columns) लिहिण्यासाठी २ वर्षांचं अग्रीमेंट (Agreement) करून ठेवलं आहे, ज्यामधून ८ महिने तर झाले आहेत आणि १६ महिने बाके आहेत. सुट्टी शिवाय काम करण्याची अट त्यामुळे त्या वृत्त पत्रात दिली होती.

सोनालीने हे पण सांगितले कि ती स्वतःपण एक समाजसेविका आहे आणि काल ज्या अजित कुलकर्णी नावाच्या माणसाचा खून झाला आहे त्याला ती चांगल्या प्रकारे ओळखते, माहित नाही त्याला एवढ्या क्रूरतेने कोणी व का मारले..? गुरव साहेबांना पण तुमचं ह्या लफड्यामध्ये पडण्याची खंत वाटते. ते बोलत होते कि तुमची यात्रा आरामात आणि सुखद होईल त्यामुळे हा विचार करून त्यांनी A.C. फर्स्ट क्लासमध्ये तुमचं रिझर्वेशन केलं होतं, पण हा विचार कुठे केला होता कि त्या एकाकी पणामुळे तुम्हाला एवढा त्रास होईल. हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी तुझ्या मानेवरती रक्ताची एक रेष बघितली तेव्हा मला तुझी खूप काळजी वाटली पण डॉक्टर्सनि ती खूप मामुली जखम आहे असं सांगून माझी चिंता दूर केली. असल्याच काही गोष्टींमध्ये कधी गुरव साहेबांचा बंगला आला हे अनघाला माहितीच नाही पडले. बंगला बघून जो पहिला शब्द अनघाच्या तोंडून आवाज न करता आला तो होता ' वाह '.


तिने आपल्या जीवनात एवढा सुंदर बंगला बघितलाच नव्हता. जुन्या जमान्यातल्या कोणत्या नवाबी शान-ओ-शौकतची दास्तान ऐकवणारा बंगला आपल्या त्याच अकडने सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करत होता. मेन गेटपासून बंगल्या पर्यंतचा रस्ता जवळ जवळ ५०० यार्ड लांब होता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एवढे मोठे मोठे बाग होते जे पूर्ण क्रिकेट मैदानात आपण बदलू शकतो. त्या बागेत दुनियेच्या जवळ जवळ प्रत्येक वेगवेगळी झाडं लागली होती ज्यांचे रंग आणि सुगंध एकदम मनमोहक होते. सोनालीने जेव्हा अनघाला आतमध्ये यायला सांगितले तेव्हा अनघाला लक्ष्यात आले कि ती किती तरी वेळेपासून आपले तोंड उघडून हे सगळं मनमोहक आणि रम्य दृश्य बघत होती. ती सोनालीच्या पाठी पाठीच आतमध्ये दाखल झाली.


आतमधली छता तर बाहेरपेक्षा निराळी होती. सजावटिच्या प्रत्येक उपलब्ध साजो-सामानांनी भरलेला एक सुंदर हॉल आपली सुंदरता दाखवून तो तिला नखरे करून दाखवत होता. सोनालीने कोणा ' रम्या ' ला आवाज दिला ज्याला ऐकून एक माणूस नोकराच्या एकदम सफेद वर्दीमध्ये तिच्या समोर एकदम आदराने हजर झाला आणि येताच मोठ्या नाटकीय अंदाजमध्ये तोंड वाकडं करत बोलला... ' काय...! मालकीणबाई तुम्ही मला माझ्या अर्ध्या नावानीच हाक मारता, किती वेळा तुम्हास्नी सांगितलं कि माझं पूर्ण नाव सचिन रामू शिंदे सोलापूरकर आहे पण प्रत्येकवेळी तुम्ही मला माझ्या मधल्याच नावाने हाक का मारता.' सोनाली चीढत बोलली कि आत्ता तर हे पण नाव घेते आणि आत्ता जर तू जास्त बडबड केलीस तर फक्त 'शिंदे'च नावाने हाक मारेन. कदाचित त्याच्यावर ह्या धमकीने काम केलं आणि लगेच त्याने आपल्या चेहऱ्यावर आणलेले नाराजगीचे खोटे भाव उतरवून टाकले.


नंतर सोनाली त्याला अनघाचा परिचय देत बोलल्या कि ह्या आत्ता पासून आमच्या सोबत वरच्या रूममध्ये राहणार आहेत तर तुम्ही बाहेर जाऊन हे बघा कि ह्यांचं सामान जे गाडीमध्ये आहे ते व्यवस्थित त्यांच्या रूममध्ये पोहोचलं आहे कि नाही. त्याने आदराने आपली मान झुकवली आणि बाहेर निघून गेला. जाता जाता तो हे पण बोलला कि गुरव राहेबांनी हे सांगितले आहे कि ह्या म्याडमशी दुपारी जेवण्याच्यावेळी डाईनिंग एरियामध्ये भेटणार, तोपर्यंत ह्या फ्रेश होवून नाश्ता वैगेरे करून आराम करा. तो गेल्यानंतर सोनालीने अनाघाकडे स्मित हास्य देत बघितले आणि बोलली ' ह्याच्या ' पासून जरा सांभाळून राहा, हा जरा बडबड करणारा आणि चिपकू माणूस आहे. लहानपणापासून इथे काम केलं आहे त्यामुळे ह्या घराचा वफादार नोकर आहे. इथे नोकरांना पण आम्ही पूर्ण सम्मान देतो आणि तुमच्याकडून पण हीच अपेक्षा आहे.


अनघाने गोष्ट ऐकून आपली मान होकारार्थी हलवली. ती स्वतःपण कोणत्याही भेद-भावात विश्वास नाही ठेवायची. सोनालीने पुढे बोलणे सुरु केलं हा रम्या तुम्हाला पण स्वतःला पूर्ण नावाने बोलायला सांगेन पण तुम्ही स्वतःच विचार करा कि कोणी भलं गुरव साहेबांचं नाव एवढ्या मोठ्याने कसं घेणार, एवढीशी गोष्ट हा पागल समजत नाही आणि प्रत्येक वेळी तोंड फुगवून बसतो.


आत्ता जावून अनघाला समजलं कि ' सचिन ' बोलायला सोनाली एवढी का अडखळते... हि गोष्ट समजताच अनघा स्मित हास्य देते आणि तिचे हसणे पाहून सोनालीच्या चेहऱ्यावर नारी सुलभ लाजेचं स्मित हास्य आलं. तोपर्यंत रम्या २ ब्याग्स आणि एक स्युटकेस उचलून घेवून आला आणि दम लागल्यागत विचारतो कि हे सगळं सामान कुठे जाणार मालकीणबाई हे ऐकून सोनालीने आपले डोळे बटाट्यासारखे मोठे करून त्याला रागाने बघितले तेव्हा रम्या काहीच न बोलता जिन्यांकडे वळला.

सोनाली अनघाला बोलली कि तुम्ही पण आपल्या रूममध्ये जावून फ्रेश वैगेरे व्हा तोपर्यंत तुमचा नाश्ता तुमच्याच रूममध्ये पाठवते. अनघा रम्याच्या पाठी पाठीच वरती जाते.

बंगल्याच्या दुसऱ्या माळ्यावर ३-४ रूम्स बनले होते. त्याच मधला एक रूम जिन्यांच्या खूप जवळ आहे, रम्या सगळं सामान घेवून त्या रूममध्ये गेला. रूम खूप आकर्षक आणि मोठा होता, ज्यामध्ये दोन्ही बाजूला मोठ मोठ्या खिडक्या होत्या, ज्यांच्यावर बाहेरून येणाऱ्या उन्हाला थांबवण्यासाठी खूप मोठे आकर्षक पर्दे लावले होते. रूमच्या सोबतच एक अट्याच्ड (attached) बाथरूम होता ज्यामध्ये जवळ जवळ सगळी उटीलिटीज होत्या. अनघाने दीर्घ श्वास घेवून रूमच्या चारही बाजूने आपली नजर फिरवली आणि प्रभावित होत ती एका खुर्चीवर बसली.

रम्या जो एवढ्या वेळेपासून गपचूप सगळे सामान व्यवस्थित करत होता त्याने आपला गळा साफ करून अनघाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलं. अनघा त्याच्याकडे बघून बोलली कि रम्याजी..! आत्ता तुम्ही जाऊ शकता... रम्या नाव ऐकताच श्रीमानचा चेहरा परत एकदा पडला आणि तो एकदम रागात चीढत बोलला कि असं तर इथे खूप साऱ्या सुविधा भेटतात, आणि तोंड वाकडं करत बोलतो पण राम जाणे केव्हा पूर्ण नावाने हाक मारून बोलवणारं स्वप्न कधी पूर्ण होणार. रम्या पण प्रेमाने बोलावतात ना तुम्हाला, अनघा त्याला समजवत बोलली.

हि गोष्ट तर तुम्ही एकदम बरोबर बोललात म्याडम. जेव्हा मी सोलापूरहून इथे आलो होतो तेव्हा बारा वर्षांचा होतो. तिथे खूप मोठा पूर आला होता, माझं तर पूर्ण घर आणि शेती उध्वस्त झाली होती. आमचा गाव हे भीमा नदीच्या नजीक वसलेलं एक छोटंसं गाव आहे. आमच्या इथे उसाची शेती जास्त प्रमाणात होते म्याडम. माझे बाबा सोलापुरातल्या महाविद्यालयाच्या समोर चहाची टपरी लावायचे, एवढी चांगली चहा बनवायचे कि मुलांमध्ये मारामारी व्हायची पहिले चहा पिण्यासाठी. रम्याची बडबडीची ट्रेन कोणत्या अल्प विराम आणि पूर्ण विराम सारख्या छोट्या मोठ्या स्टेशन्सवरती थांबल्याशिवायचं चालत होती आणि अनघा स्वतःला ओरड्ण्यापासून आणि कठोर शब्द बोलण्यापासून स्वतःला खूप मुश्कीलने थांबवत होती.

तेव्हा तिच्या नशिबाने तिला साथ दिली आणि कोणी तरी ' रम्या 'ला आवाज दिला आणि रम्याला जे आवडत नव्हते ते पुन्हा घडले, बोलवणाऱ्याने रम्या नावानेच हाक मारली होती. ठीक आहे म्याडम तुम्ही आराम करा मी थोड्या वेळातच येतो, साले कुठे चैनशी बोलून पण देत नाही. एवढं बोलून रम्या रूममधून बाहेर पडला आणि अनघाने आनंदाने एक दीर्घ श्वास घेतला आणि रूमची कडी लावली.क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment