Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 5 August 2012

भाग ~ ~ २ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग - २NOTE:: (ही कथा पुर्णपणे काल्पनिक असून यातील घटना, स्थळ, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद!)

घटनेच्या पुढे....

समता नगरची सकाळ आळस देत आपल्या साखर झोपेतून जागत होती तेव्हा त्याच्या रेल्वेस्टेशन वरती गोंधळ उडाला होता. ते झालं असं कि ट्रेन जेव्हा समता नगरला पोहचली तेव्हा जसं प्रत्येक वेळी होतं कि कुली (सामान उचलणारा) ट्रेनच्या प्रत्येक डब्यात जाऊन सामान उचलण्यासाठी आपली सेवा प्रस्तुत करतो, ठीक तसंच आज हि झालं, जसंच एका कुलीने अनघाच्या कॅबिनचा दरवाजा
उघडला
समोरचं दृश्य बघून किंचाळत बाहेर पळत आला. घटनेची सूचना मिळताच रेल्वे पोलिसांची एक टीम तिथे पोहोचली. कॅबीनमध्ये एक रक्ताने माखलेला मृतदेह आणि एक बेशुद्ध मुलगी होती. पोलिसांनी लेडीज कॉनस्टेबलला बोलावून अनघाच्या बेशुद्ध शरीराला हॉस्पिटलमध्ये तत्काळ पोहोचवले आणि मृतदेहाला पोस्टमॉरटमसाठी नजीकच्या हॉस्पिटलात पाठवले. गनिमत होती कि गुरव साहेबांकडून जी गाडी अनघाला घ्यायला आली होती तिच्या ड्राईवरने अनघाच्या दुर्दशेच्या विषयी गुरव साहेबांना फोनवरती सगळं काही सांगितलं होतं.

अनघाचे डोळे उघड्ल्यावरती तिने स्वतःला हॉस्पिटलात आहे हे जाणवले, तिच्या जवळ एक महिला कॉनस्टेबल आणि नर्स बसली होती, अजून एक महिला आपल्या चेहऱ्यावर ममत्वमयी स्मित हास्य घेवून तिच्याकडे बघत होती. तिच्या शुद्धीवर येण्याची खबर ऐकताच थोड्या वेळात तिथे पोलिसांचे काही मोठे अधिकारी आणि काही सिनिअर डॉक्टर्सची टीम तिथे हजर झाली. एवढ्या अपरिचित लोकांसमोर आपलं कोणीच नाही आहे हे जाणून अनघा थोडी विचीलीत दिसत होती. डॉक्टर्सने तिचा बी.पी चेक करून तिला बयाणा देण्यालायक घोषित केलं. पोलिसांचे ऑफिसर्स तिच्या सोबत नरमीने वागत होते, ज्याची हैराणी अनघाच्या मनात सारखी सारखी उत्पन्न होत होती. तिने जे पण ट्रेनमध्ये घडलं होतं ते सगळे काही तिने सांगितले. ह्या घटनेचा वृत्तांत सांगतांना पण तिचं शरीर भयमुळे शहरात होतं. पोलीस ऑफिसर्सना डॉक्टरांनी तिला जास्त त्रास न देण्यासाठी सांगितले, हे स्वीकार करून पोलिसांनी काही प्रश्न नंतरसाठी ठेवले. जेव्हा पर्यंत हे सगळं होत होतं तेव्हा ती महिला जिच्या चेहऱ्यावर अनघाला ममत्वमयी स्मित हास्य दिसलं होतं त्या आपल्या जागेवरून उठून हि सगळी कार्यवाही बघत होत्या. त्या महिलेने डॉक्टर्स तथा पोलिसांच्या टीमशी काही चर्चा केली. अनघाने बघितले कि पोलीस ऑफिसर्स आणि डॉक्टर्स त्या महिलेशी एकदम आदराने वार्ता करत आहेत.

सगळेजण गेल्यावर ती महिला अनाघाजवळ येवून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत तिच्या जवळ ठेवलेल्या एका खुर्चीवर बसली. मग तिने सांगितले कि ती गुरव साहेबांची धर्म-पत्नी सोनाली आहे. सोनालीच्या परस्नालीटीमध्ये तिच्या उंच रसूख आणि संपन्नता होण्याची झलक दिसत होती, पण तिच्या चेहऱ्याचे भाव आणि हास्य एकदम सौम्य एवं म्रीदुल होते. सोनालीने आपला मोबाईल काढून अनघाच्या हातात आपल्या घरच्यांशी वार्ता करण्यासाठी दिला आणि हि पण ताकीद दिली कि हि घडलेली दुर्घटना घरी नको सांगू. अनघाला पण हि गोष्ट चांगल्या प्रकारे माहित होती कि चिंतेत डूबलेली माझी आई हे ऐकून अजून चिंता करत बसेल. अनघाने घरी फोन करून आपल्या आई आणि भावंडांशी बोलली, पप्पांची तबियतपाणी विचारताना तिचे डोळे पाणावले होते. तिच्या भावंडांना वेळेने आणि हालातीने वेळेपूर्वीच हुशार बनवले होते. तरीपण आपल्या प्रेमळ ताई बरोबर बोलता बोलता ते पण भावूक झाले होते. अनघाने नंतर बोलायचं बोलून फोन कट केला. जास्त वेळ वार्ता केली असती तर कदाचित ती रडली असती त्यामुळे तिने लवकर फोन कट केला होता. फोन कट करून तिने जेव्हा सोनालीकडे बघितले तेव्हा ती आपल्या ड्राईवरला ज्यूस वैगेरे मांगवण्यासाठी पैसे देत होती. तेव्हा मोबाईलची घंटी वाजायला लागली आणि स्क्रीन वर शोन्या लिहिलेलं दिसत होतं. सोनालीने फोन घेवून आपल्या कानाला लावत प्रेमाने हेल्लो बोलली होतीच कि तिथून एक जोरदार मुआहहह चा आवाज आला. देणाऱ्याने एवढ्या एवढ्या प्रेमाने आवाज काढला होता कि तो अनघाला पण ऐकायला आला. कदाचित सोनालीला आभास झाला होता कि अनघाने ऐकलं आहे त्यामुळे सोनालीने फोन करणाऱ्याला लाजत प्रेमाने झाडले आणि बाहेर निघून गेली.

अनघाच्या चेहऱ्यावर माहिती नाही पण कितीतरी वेळानंतर हास्य उमटलं होतं. थोड्या वेळातच सोनाली परत त्या रूममध्ये आली आणि अनघाला आपल्याकडे हसताना बघून परत एकदा लाजली. मग स्वतःच वार्ता सुरु करण्यासाठी बोलली कि हा गुरव साहेबांचा फोन होता ज्यांनी इथल्या हालातीचा आणि तुमच्या तबियत पाणीची खबर ऐकण्यासाठी फोन केला होता. असं तर तुम्ही एकदम ठीक आहात पण डॉक्टर्सना तुम्हाला त्यांच्या निगराणीमध्ये एक रात्र इथे ठेवायचे आहे. डॉक्टर्सच्यानुसार तुम्ही काल रात्री जे काही बघितले त्याच्या दहशतीमुळे तुमचा बी.पी. लो झाला होता ज्यामुळे तुमची शुद्ध हरपली होती. पण आत्ता तुम्हाला घाबरण्याची काहीच जरुरत नाही आहे, इथे गुरव साहेबांचं खूप नाव आहे, त्यांनी पोलिसांना तुम्हाला खालीफुकट त्रास न देण्यासाठी मनाई केली आहे. डॉक्टर्सची पण बेस्ट टीम तुम्हाला आपल्या निगराणीमध्ये ठेवलं आहे. आत्ता तुम्हाला फक्त एक चांगली झोप काढायची गरज आहे. ज्याच्या नंतर तुम्ही आमच्या सोबत घरी येण्याच्या लायक होणार.

थोडावेळ सोनाली तिथे बसून तिच्या घरच्यांची विचारपूस करत राहिली, आणि थोड्यावेळातच सोनालीला कळलं होतं कि हि मुलगी एकदम शांत, भोळी आणि सभ्य आहे. आज कालची हवा हिला शिवून सुद्धा गेली नाही आहे. अनघाला दवेच्या नशेमध्ये जांभई घेताना बघून सोनाली तिला निघण्याची आणि उद्या सकाळी येवून तिला डिस्चार्ज करण्याचं बोलून निघून गेली. अनघाला पण झोप आली होती ती पण लगेच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी एक नर्स येवून तिला स्पोंज (ओल्या कपड्याने स्नान) करवलं, तिच्या जरुरी टेस्टसाठी स्याम्पल्स घेतले तोपर्यंत सोनाली तिथे आली. सिनिअर डॉक्टर्सनी पण अनघाला डिस्चार्ज करण्यासाठी अनुमती प्रदान केली. हॉस्पिटलची फोर्मलिटी पूर्ण करते वेळी जेव्हा रिसेप्शनवरती अनघा उभी होती तेव्हा तिची नजर वृत्तपत्रावरती पडली ज्यामध्ये कालच्या घटनेचा उल्लेख एकदम सनसनीखेज अंदाजामध्ये केला होता.

"शहरातले सुप्रसिद्ध विख्यात बिल्डर आणि समाज सेवी श्री. अजित कुलकर्णी ह्यांची चालत्या ट्रेनमध्ये निशंस हत्या. हत्याऱ्याने खूप मोठ्या बेहरमीने अजित कुलकर्णीचा खून केला आहे. मृतकाच्या शरीरावर पोलिसांच्या आणि डॉक्टरांच्या अनुसार जवळ जवळ सव्वाशे (१२५) पेक्षा जास्त वेळा वार केले गेले आहेत, हत्यारा खूप जुनुनी आणि क्रूर बोलला जात आहे. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा हत्याऱ्याने मृतकाच्या दोन्ही डोळ्यांना हि नाही सोडले." हे सगळं वाचता वाचता अनघाला ते दृश्य परत आठवले आणि तिची हालत परत खराब व्हायला लागली.

क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment