Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 8 August 2012

भाग ~ ~ ४ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ ४ 

घटनेच्या पुढे....

रम्या गेल्यानंतर अनघाने आपले कपडे कपाटामध्ये व्यवस्थित ठेवले. बाथरूममधून फ्रेश होवून निघताच तिचा नाश्ता तिच्या रूममध्ये आला होता. रम्याच्या ऐवजी ह्यावेळी घराची एक मोलकरणी होती जी फक्त कामाशीच अर्थ ठेवायची. नाश्ता केल्यानंतर अनघा आपल्या आईशी वार्ता केली आणि परत भावूक झाली. आईशी वार्ता करून जेव्हा तिला स्वतःला थकवा जाणवला तर ती लेगेच बेडवरती पहुडली.

थोडा वेळच झाला होता कि तिच्या दरवाजावरती थाप पडली जी पहिले हळू आवाजात थाप पडत होती नंतर ती थाप जोर जोरात पडायला लागली. दरवाजावर जोरात थापा पडत असल्यामुळे अनघा थोडी घाबरली आणि काही वेळ काहीच हरकत न करता आपल्याच जागेवर उभी राहून विचार करायला लागली, भलं दरवाजा असं कोण ठोकवणार..?


दरवाजावर थाप पडणे चालूच होते, मग अनघाने थोडी हिम्मत दाखवून दरवाजा खोलला. दरवाजा खोलताच जे झाले त्याची अनघाने अपेक्षा पण केली नव्हती. दरवाजावर थापा मारणारा एक नवयुवक दरवाजा खुलताच तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिला ' आय लव्ह यु ' बोलत तिच्या गालांना चुंबन द्यायला लागला.


अप्रत्याशित झालेल्या ह्या चुंबन हमल्यांनी घाबरलेल्या अनघाची किंकाळी निघाली पण तो नवयुवक तसाच तिला मिठीत धरून राहिला उलट त्याच्या मिठीची पकड अजूनच मजबूत झाली.


अरे छोटे मालक...! आपण इथे कसे पोहोचलात..? अनघाची किंकाळी ऐकून तिथे पोहोचलेल्या रम्याने त्या नवयुवका पासून अनघाची सुटका करत बोलला. सोड मला, हि माझी ' प्रिया ' आहे, जी माझ्या जवळ परत आली आहे, तो नवयुवक रम्या पासून सुटण्याचा प्रयत्न करत बोलला. अनघा तो पर्यंत रूमच्या दुसऱ्या कोपऱ्यात असणाऱ्या बाथरूम जवळ पोहचून आपल्या जोर जोरात चालणाऱ्या श्वासेला संयमित करत त्या नवयुवकला बघायला लागली.


तो एक सुंदर आणि बलिष्ट शरीराचा मालक होता ज्याचं पूर्ण शरीर ह्या वेळी आवेगामुळे थर-थर कापत होतं. किंकाळी ऐकून सोनाली पण तिथे पोहोचली, जिला बघून तो नवयुवक जरा शांत झाला पण त्याच्या शरीराचा आवेग अजून तसाच होता. हे इथे कसे पोहोचले, सोनालीने रम्याला विचारले. माहिती नाही मालकीणबाई, मी तर ह्यांना पाणी पाजत होतो तेव्हा माळीने मला बोलावले त्यामध्येच कदाचित छोटे मालक इथे पोहोचले.


तुम्ही ह्यांना त्रास का देत आहात...? ह्या प्रिया नाही आहेत... सोनाली त्या नवयुवकला बोलली. हि प्रिया आहे प्रिया, तो नवयुवक जवळ जवळ ओरडतच बोलला, बघा हिचे डोळे पण लागोपाठ मलाच बघत आहेत. रम्या ह्यांना इथून घेवून जा... नाही..! मला इथेच राहायचे आहे माझ्या प्रिया जवळ.


जेव्हा तो जास्त हट्ट करायला लागला तर सोनालीने पुढे येवून त्याच्या कपाळाच्या बरोबर मधोमध जिथे प्रत्येक महिला
टिळा लावतात तिथे स्पर्श करून त्याच्या डोळ्यात क्रोधाने बघितले ज्याचा असर तत्काळ झाला आणि तो नवयुवक लगेच शांत झाला.

रम्या...! ह्यांना इथून घेवून जावा आणि ह्याच्या पुढे लक्ष्य असू द्या... रम्या त्या नवयुवकला पूर्ण आदराने घेवून गेला. सोनालीने अनघा जवळ जाऊन तिची पाठ थोपटली आणि तिला सांत्वना दिली आणि बोलली, हे आमच्या गुरव परिवारचे एकुलते वारीस आहेत.


हे ऐकून अनघाचं तोंड उघडं ते उघडंच राहिलं, त्यावेळी सोनालीच्या चेहऱ्यावरती काही विचित्र भाव होते ज्यांना समजणे थोडे कठीण होते सोनाली आत्ता अजून काही बोलणार तोपर्यंत घराची एक मोलकरीण आली आणि त्यांना बोलली कि गुरव साहेब त्यांना खाली बोलवत आहेत कदाचित आत्ता आत्ता झालेल्या ह्या प्रकाराचा आवाज त्यांच्या कानी पण पडला होता. सोनाली जेवण्याच्या वेळी भेटू असं बोलून तिथून निघून गेल्या.


सोनालीच्या जाताच अनघाने परत आपला दरवाजा बंद केला आणि बेडवर पहुडली. त्या नवयुवकाचे अचानक येवून मिठी मारणे एवढं अप्रत्याशित होतं कि त्या वेळी तिला जाणीव पण नव्हती, पण आत्ता तिचं मन जेव्हा शांत झालं तेव्हा राहून राहून तिला त्या नवयुवकाचा स्पर्श आठवणीत येत होता, त्याच्या अधीर नजरेची कशिश, आपल्या मानेवर सोडलेला त्या नवयुवकाचा गरम श्वास तथा तो पहिला आलिंगण जो अनघाचा कोणत्याही युवकाद्वारे केलाला पहिला आलिंगण होता, हे सगळं तिच्या शरीरात एक वेगळंच रोमांच उत्पन्न करत होते.


अनघाचं शिक्षण निसंदेह को-एड (co-ed) झालं होतं आणि तिच्या मैत्रीमध्ये किती तरी मुलं पण होते पण तिने सगळ्यांसोबत प्रत्येक वेळी एका मर्यादेमध्ये राहूनच वागणूक केली होती. हि पहिलीवेळ होती जेव्हा कोणी युवकाने तिला आपल्या आलिंगणमध्ये घेतलं आहे आणि तिच्या गालांना चुंबन दिलं आहे. गालांवरती भेटलेलं चुंबन लक्ष्यात येताच आपसूकच तिचे हात तिच्या गालावरती गेले आणि त्यांना स्पर्श करायला लागले. त्या नवयुवकाच्या चुंबनाची जाणीव अजून पर्यंत तिथे उपस्थित होते. ज्याला स्पर्श करताच अनघाच्या नसांमध्ये तिचं रक्त
स्त्राव खूप जलद गतीने वाहू लागलं आणि तिने लाजून आपले डोळे बंद केले.

हा युवक सोनालीचा कोण होता...!!!, मुलगा तर नाही वाटत, मग हे एकुलता वारीसवाल्या गोष्टीचा अर्थ काय असू शकतं..! असेच काहीतरी गोष्ट विचार करता करता अनघाचे डोळे कधी बंद झाले आणि ती कधी झोपली तिला
समजलं नाही. काही तासांच्या झोपेनंतर जेव्हा अनघाचे डोळे उघडले तर तिने घड्याळात वेळ बघितली आणि तिला जाणवलं कि जेवणाची वेळ झाली आहे. ती फटाफट बेडवरून उठली आणि बाथरूममध्ये जाऊन हात तोंड धुवून फ्रेश झाली आणि झोपल्यामुळे चूरगरळेल्या कपड्यांना व्यवस्थित करते.

तेव्हा दरवाजाच्या बाहेर तिला रम्याचा आवाज ऐकू येतो तो तिला बोलावण्यासाठी आला असतो. अनघा त्याच्या पाठी पाठी खाली जाते. खाली उतरताच अनघा एकदा परत बंगल्याच्या विशालतेने आणि भव्यतेने प्रभावित होते. जेवणासाठी अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत साहेबांनी तुम्हाला स्टडी रूममध्ये बोलावले आहे, एवढं बोलून रम्या तिला गुरव साहेबांच्या स्टडी रूमकडे घेवून जातो.


स्टडी रूमच्या बाहेर रम्या अचानक आपल्या कपाळावर हात मारतो जसं त्याला काही तरी आठवलं आहे,
आणि जोरात बोलतो अरे...! मी तर तिथे घ्यास (gas) वरती खीर ठेवून आलो आहे... कुठे जळून गेली तर... बाईसाहेब तुम्ही सरळ निघून जा, आतमध्ये गुरवसाहेब बसले आहेत आणि तुमचीच वाट बघत आहेत... मी आत्ताच घ्यास बंद करून येतो.

अनघा हो बोलून सरळ आतमध्ये जाते. ज्याला स्टडी रूम समजून अनघा आतमध्ये घुसली होती तो तर तिच्या कॉलेजच्या लाईब्ररी (library) पेक्षा मोटा हॉल होता. नॉर्मली कोणत्या वकिलाच्या इथे फक्त वकिलीची पुस्तकं भेटतात पण गुरव साहेबांच्या स्टडी रूममध्ये दुनियाभरची साहित्यिक पुस्तकं ठेवली होती.


हॉलमध्ये एका बाजूला एक स्टडीटेबल ज्याला एक्जीक्यूटीव (executive) टेबल बोलणे जास्त चांगलं राहील, च्या एका बाजूला एका भव्य एक्जीक्यूटीव खुर्चीवर एक रुबाबदार व्यक्तित्वाचे स्वामी श्री. सचिन गुरव बसले होते. त्यांची पर्सनालीटी एवढी शानदार होती कि त्यांना बघूनच कोणीपण प्रभावित झालं असतं. काही अशीच हालत अनघाची पण झाली. ती गुरव साहेबांच्या पर्सनालीटीच्या पुढे संमोहित होवून उभी होती. जेव्हा गुरव साहेबांची नजर तिच्यावर पडली तर त्यांनी तिला बसण्याचा इशारा केला.


अनघा गपचूप टेबलाच्या समोर पडलेल्या ४ खुर्च्यांपैकी एका खुर्चीवर बसली.. तुमची तबियत आत्ता कशी आहे... गुरव साहेबांनी विचारले... एकदम ठीक आहे... अनघा हळू आवाजात बोलली... आम्हाला सांगितलं गेलं होतं कि तुमच्या गळ्यावर पण जखम झाली आहे... अशीच काही गोष्ट त्यांच्यामध्ये होत राहिली तेव्हा सोनाली तिथे पोहोचली जिला बघून गंभीर मुद्रेत बसलेले गुरव साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि त्यांनी अनघाला विचारले ह्या एवढ्या सुंदर मल्लिकाच्या म्हणजे माझ्या शरेक-ए-हयात (बायकोला) तर तुम्ही भेटलाच असाल.


हे ऐकून अनघाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि सोनालीच्या चेहऱ्यावर
तीच चीत-परीचीत लाजेची लाली दिसायला लागली. सोनालीने डोळे मोठे करून गुरव साहेबांना खोटा राग दाखवला ज्याला गुरवसाहेबांनी प्रेमाने नजर अंदाज केलं. लग्नाच्या एवढ्या दिवसानंतर सुद्धा तुमची हि सवय जरा पण नाही बदलली.... सोनाली रागात बोलली... ज्यावर गुरव साहेब बोलले...

डोळे माझे बस तुलाच बघत असतात,
तुझ्या पुढे ओ प्रिये, हे मला पण विसरत असतात, 

पण ह्या नजरांनी केल्या आहेत किती अश्या चुका,
कि दिवस असो किंवा रात्र, हे बस तुझाच नजराणा बघत असतात. 

आदाब अर्ज है... बोलून गुरव साहेबांनी खूप मोठ्या नाटकीय प्रकारे सोनालीला आदराने आपली मन झुकवून प्रणाम केला, ज्याला बघून अनघा हसल्याशिवाय राहू शकली नाही आणि सोनाली परत एकदा लाजली. अच्छा चला जेवण तैय्यार झालं आहे, सोनालीने गुरव साहेबांना अजून संधी न देता बोलली. तर घेवून चल ना, आम्ही तर कधीपासून तुझीच वाट बघत आहोत. सोनाली गुरव साहेबांच्या
पाठी जाऊन त्यांच्या एक्जीक्यूटीव खुर्चीला थोडंसं मागे खेचलं आणि जसं अजून एक आश्चर्य अनघाची वाट बघत होतं.

जिला अजूनपर्यंत अनघा एक्जीक्यूटीव खुर्ची समजत होती ती खरं म्हणजे एक व्हील खुर्ची होती जिला सोनाली टेबलाच्या पाठून पुढे काढून घेवून आली होती आणि तेव्हा कुठे जाऊन गुरव साहेबांचं पूर्ण शरीर अनघाच्या समोर होतं. त्यांच्या शरीरावर एक किमती सफारी स्युट होतं ज्याची प्यांट गुढघ्याच्या खाली लोंबकळतांना दिसत होती. साफ - साफ दिसत होतं कि त्यांचे पाय गुढघ्या पासून खाली नव्हतेच.


अनघाची हैराणी सोनाली आणि गुरव साहेबांपासून, लपली नाही गेली. गुरव साहेब स्मित हास्य देत बोलले हे एका अक्सीडेंट (accident) मध्ये असे झाले आहेत पण आत्ता मी ह्यांच्याही पेक्षा चांगल्या आणि सुंदर पायांच्या सहाय्याने चालत आहे तर मला ह्यांच्या नसण्याचा काहीच दुखः नाही आहे. त्यांची जिंदादिली बघून अनघाचे डोळे पाणावले आणि ओठांवरती एक स्मित हसू उमटलं.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment