Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 9 August 2012

भाग ~ ~ ५ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ ५ 

घटनेच्या पुढे.... 

अनघासुद्धा आपल्या खुर्चीवरून उठली आणि त्या दोघांच्या पाठी पाठी डाईनिंग एरियामध्ये आली. डाईनिंग टेबल एकदम भारी होता आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन सजवून ठेवले होते. अनघाला जोराची भूक तर लागलीच होती पण त्या जेवणाच्या सुगंधाने तिची भूक अजूनच वाढली. टेबलाच्या मुख्य जागेवर गुरवसाहेबांची व्हील खुर्ची लावून सोनाली स्वतः त्यांच्याजवळच बसली. अनघाला पण सोनालीने आपल्या जवळच बसवले होते. रम्यासोबत अजून एक नोकर जेवणाची सर्विसिंग सांभाळत होता ज्यावर रम्या राहून राहून हुकुम चालवत होता. गुरव साहेबांनी हे बघून रम्याला बोलले कि, अरे भाऊ सचिन रामू शिंदे...! का त्या साध्या भोळ्या गरिबाला एवढं सतावत आहेस... आपलं पूर्ण नाव ऐकून रम्या एकदम खुश झाला आणि त्या खुशीत त्याने लगेच दुसऱ्या नोकराकडून सगळे काम स्वतः आपल्या हाती घेवून दुप्पट खुशीने सर्विसिंग करायला लागला.

जेवणाच्या वेळी गुरव साहेबांनी रम्याला विचारले कि छोटे साहेब जेवले काय... नाही साहेब ते तर बस आपल्या रूमच्या खिडकीजवळ आपला तुनतुणा वाजवत बसले आहेत, खूप बोलल्यावरती  पण ते जेवले नाही. रम्या सर्विसिंग चालू ठेवतच बोलला.. अनघा लगेच समजली कि हि गोष्ट त्या नवयुवकासंबंधी होत आहे. अनघाला काही विचार करतांना बघितले तेव्हा सोनालीने सकाळी घडलेल्या घटनेची पुन्हा एकदा क्षमा मांगितली ज्याला ऐकून अनघाने लगेच काहीच गोष्ट नाही आहे असे बोलून टाळलं. उलट तिच्या डोक्यात खूप सारे प्रश्न फिरत होते त्याला विचारण्यासाठी तिला हि उचित वेळ नाही वाटली.


रम्याने आपल्या बनवलेल्या खिरने जेवणाचा अंत केला. गुरव साहेब जेवण झाल्यानंतर अनघाला बोलले कि आपल्या जुन्या
असीस्टंटशी सगळं काम व्यवस्थित समजून घेणे. जुनी असीस्टंट पण तो पर्यंत आली होती. अनघाने जेवण संपवून परवानगी मांगितली आणि जुन्या असीस्टंट सोबत स्टडीरूममध्ये गेली. अनघाला  सगळं काम व्यवस्थित समजून घेण्यासाठी जवळ जवळ संध्याकाळ झाली होती. गुरव साहेब आपल्या पायांच्या मुळे कमीच कोर्टात जायचे पण त्यांच्या पोईंट्सवर त्यांचे जुनिअर वकिलच कोर्टात संवाद घालायचे. ज्या पब्लिशरच्या बुकमध्ये गुरव साहेबांचे लेख छापायचे ती एक साप्ताहिक म्याग्जीन (magazine) होती, ते काम पण पूर्ण व्यवस्थित व्हायचे. गुरव साहेबांचा एक स्वतःचं ब्लॉग पण आहे जिथे ते लोकांना काही लीगल उपदेश द्यायचे आणि मार्गदर्शन करायचे. अश्याच छोट्या मोठ्या कामांमध्ये त्यांना असीस्टंटची गरज लागायची.

सगळी काम व्यवस्थित समजून अनघा खूप थकली होती, जाता जाता जुन्या
असीस्टंटने तिला आजचे काही नोट्स पण दिले होते ज्याला टाईप करून उद्या सकाळ पर्यंत तिला गुरव साहेबांना द्यायचे होते. असीस्टंटसाठी भेटलेल्या ल्यापटोपला (laptop) तीने उचलून आपल्या रूममध्येच आणले आणि तिथेच बसून ती टाइपिंगचं काम पूर्ण करायला लागली. बाहेर आत्ता काळोख झाला होता, रात्रीच्या जेवणाला अजून वेळ होता, मोठ्या घरांमध्ये रात्रीचे जेवण १० वाजायच्या आगोदर नाही करायचे अतः इथे पण जवळ जवळ तीच परंपरा चालू होती. आज संध्याकाळ पासूनच वातावरण एकदम बदललं होतं आसमंतात काळे ढग येवून भारी पावसाची आशंका जाहीर करत होते. हवा पण जोरात चालू होती.

खिडकीचे पर्दे हवेमुळे सारखे सारखे भड-भडत होते, खिडकीला बंद करण्यासाठी अनघा बेडवरून उठून खिडकी जवळ गेली आणि खिडकीच्या दारांना जे कि बाहेर खुलतात त्यांना बंद करण्यासाठी तिने आपला हात बाहेर काढला. तेव्हा अनघाच्या हातांना कोणीतरी पकडले, अनघाची तर किंचाळीच निघाली आणि मग बाहेर तिने जे बघितले ते तर तिची शुद्ध हरवण्यासाठी पुष्कळ होतं. खिडकीच्या समोर तोच काळे कपडेवाला माणूस तिचे हाथ पकडून उभा होता. अनघाचं शरीर पूर्णपणे घामेने भिजलं होतं आणि ते कोणत्या नदीच्या तुटलेल्या बांधावानी तिच्या शरीरातून खाली पडत होते. मग हळू हळू तिचे पाय डगमगायला लागले जणू तिच्या पायात जीवच उरला नव्हता आणि तिथेच ती फर्शवरती बेशुद्ध होवून पडली.
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment