Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 1 August 2012

भाग ~ ~ ६० एक प्रेम कथा

Final Update 60"काय झालं...? तुम्ही गप्प का आहात...?" निरुने चालता चालता रोहनला टोकले...

"अ... नाही... काहीच नाही... पुढे चिखळ आहे... त्यामुळे सांभाळून चालत आहे..." रोहनने निरूच्या
टोकण्यावर बोलला... हि पहिली वेळ होती जेव्हा ते एकटे होते.. आणि कोणीच नव्हतं त्यांच्या सोबत...

"नाही येणार... तुम्ही आरामात चाला...!" नीरु बोलली...


"तुला नाही माहित.. गेल्यावेळी आमची प्यांट गुढघ्यापर्यंत चिखळांनी माखली होती... एक विचारू काय...?" रोहन बोलला...


"हम्म... काही पण विचार..." नीरु बोलली...


"तुम्हाला खरोखर भीती नाही वाटत आहे... किंवा तुम्ही भीती लपवत आहात...?" रोहनने प्रश्न विचारला...


"नाही... भीती नाही वाटत... आम्हाला भीती का वाटणार...?" नीरु बोलली...


"एवढ्या रात्री आपण ह्या सामसूम रस्त्यावर चालत आहोत... तुम्ही तरीपण मुलगी आहात... भीती वाटणे तर सहाजिकच आहे... अरे... चिखळ खरोखर नाही भेटला... आपण त्या तलावाच्या पलीकडे पोहोचलो..." रोहन दचकून बोलला आणि अचानक त्याला काहीतरी आठवले...


तो लगेच पाठी वळून उभा राहिला... त्याच्या थांबताच निरुपण एकदम तिथेच थांबली...


"कककोण आहेस तू...?" रोहन तिला लक्ष पूर्वक बघत एक पाऊल पाठी झाला...


नीरु स्मित हास्य देत बोलली, "आम्ही नीरु आहोत... आणि कोण..? चला आत्ता तरी...!"


"नाही... कोणतीवाली नीरु...? खरं सांगा प्लीज..." रोहन तिच्या तोंडून दोन वेळा 'आम्ही' हा शब्द ऐकला होता... पहिले तर नीरु कधी अशी बोलत नव्हती.. आणि तिने हे पण सांगितले कि चिखळ नाही भेटणार... त्याला आभास झाला कदाचित ती नीरु नाही 'प्रिया' आहे...


नीरु काहीवेळ अशीच उभी राहून स्मित हास्य देत राहिली आणि अचानक पुढे येवून रोहनला घट्ट मिठी मारली, "आम्ही तुमची नीरु आहोत... देवची प्रिया... आणि कोण...?"


"नाही... म्हणजे... तुम्ही... आय मीन... तुम्ही ह्या जन्माची नीरु आहात वा... प्रिया..." रोहन निरूच्या ह्या हरकतीने एकदम हडबडला...


नीरु रोहनच्या अशीच मिठीत उभी राहिली... तिने रोहनच्या प्रश्नाचे उत्तर काही अश्या प्रकारे दिले, "तुम्ही कसे समजणार... खूप वर्षानंतर भेटत आहात... मन किती व्याकूळ आहे तुमच्यासाठी... कशी सांगू...? काय काय नाही केलं...! कुठं कुठं नाही शोधलं तुम्हाला...! ह्या दुनियेचे पण नियम तोडले आणि त्या दुनियेचे पण... पण बघ... शेवटी आपण एकत्र झालोच... आम्ही बोललो होतो ना... तुमची राहणार जन्मोजन्मी...! तुमचीच राहिली... प्रत्येक जन्मी... तुमच्या शिवाय दुसऱ्यांच्या विषयी विचार सुद्धा केला नाही... प्रेम काय
असतं...? माझ्या शरीराने कधीच जाणलं सुद्धा नाही... आमचं मन इथेच तडपत राहिलं... तुमच्यासाठी... इथे... ह्या शांत जागेत..." बोलता बोलता नीरु रडायला लागली...

रोहनचा गळा भरून आला... त्याने अडखळत निरुला आपल्या बहुपाश्यात भरलं..., "आय लव यु...!" त्याने निरुला एकदम घट्ट आपल्या मिठीत भरलं..., "हे सगळं तुझ्याच प्रेमापायी घडलं आहे... मला तर काहीच आठवणीत नव्हते... हो... सगळे बोलायचे तू खूप विचित्र वागत आहेस... पण... मी... मला कधीच जाणीव नव्हती कि माझं काही तरी हरवलं आहे... हो... असं वाटायचं माझं मन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे... आज जाऊन मन शांत झालं आहे..."

दोघेही किती तरी वेळ असेच उभे राहिले... गप्प... आत्ता फक्त त्यांचे हृदय धडधडत होते.... श्वास बोलत होते.... आणि वेळ जणू तिथेच थांबली होती...

"आत्ता काय करायचे...?" रोहनने शांतता भंग केली...

"काहीच नका बोलू आत्ता... आम्हाला खूप वेळेनंतर एवढं चैन भेटलं आहे..." नीरु रोहनच्या मिठीत अशीच उभी राहिली...

काही वेळानंतर आपली नजर खाली करून ती त्याच्यात मिठीतून बाजूला झाली... फक्त थोडीशी बाजूला झाली...

"परत जाऊया काय...?" रोहनने विचारले..

"नाही... तो लॉकेट आणायचा आहे... जो तुम्ही मला घालून गेला होता... त्यामुळे तर तुम्हाला इथे बोलावले होते..." नीरु बोलली...

"पण... तुम्ही तर... म्हणजे नीरुने स्वप्नात बघितले होते कि लॉकेट तर त्या... कुंवरपालने त्या भट्टीत फेकलं होतं... ते जळाल नाही काय...?" रोहनने विचारले...

"नाही... जर ते जळाल असतं तर आम्ही कोणाच्या आधारे इथे राहिलो असतो... तो तर किती तरी वर्षांपासून आकाशातल्या ताऱ्यासारखा चमकत आहे... तो बघ..." निरुने प्रकाशाकडे इशारा केला...

"काय...? ते लॉकेट आहे...? तो तर बल्ब वाटतोय... आणि ती जागा तर आम्हाला कधीच भेटली नाही... आम्ही त्या दिवशी किती वेळा शोधलं होतं त्याला...!" रोहन आश्चर्याने त्या प्रकाशाकडे बघत बोलला...

"भेटेल आज... आम्ही आहोत ना आज तुमच्या सोबत... चला तरी..." निरुने त्याचा हात पकडला आणि पुढे निघाली...

त्याच गल्लीतून जाताना त्या प्रकाशाजवळ काही अंतर पोहोचले होतेच कि रोहनला तो छोटा मुलगा त्यांच्याजवळ उड्या मारत येताना दिसला...

"ताई.... मला घेवून चल ना सोबत..!" तो बोलला आणि जवळ येवून उभा राहिला... त्याच्या चेहऱ्यावर तसाच मासूमपणा होता... तोच सुनापण... तोच निरागसपणा...

"हा कुमार दीक्षित होता... आमचा छोटा भाऊ... आज ह्याच्या मुक्तीची वेळ झाली आहे... ह्याचा हात पकडा... आणि दुसऱ्या हाताने माझा हात पकडून राहा..." नीरु बोलली...

रोहनने बिचकून त्याच्याकडे बघत खुश होवून आपला हात त्याच्या पुढे केला... त्या छोट्या मुलाने पळत येवून रोहनचा हात पकडला आणि रोहनशी बोलला..., "चला... तुम्ही पण आमच्या सोबत राहणार...?"

रोहनने स्मित हास्य दिलं... त्याला आत्ता कसलीच भीती नव्हती..., "हात पकड माझा...!"

"पकडला आहे त्याने..." नीरु बोलली आणि चालत राहिली...

पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचायला आज त्यांना तितकाच वेळ लागला जेव्हा नितीन बरोबर येताना झाला होता... रोहन आश्चर्याने त्या
पिंपळाच्या झाडाच्या उंच शाखेवर चमकणाऱ्या त्या लॉकेटला बघत राहिला आणि अचानक दचकला, "तो... छोटा मुलगा कुठे गेला... सॉरी... तुझा भाऊ कुठे गेला..."

नीरु स्मित हास्य देत बोलली, "गेला तो... त्याला रस्ता मिळाला... ह्या दुनियेतून मुक्त होण्याचा... किती वर्षांपासून भटकत होता बेचारा.. " नीरु डोळ्यातले अश्रू पुसत बोलली, "जा... त्या लॉकेटला उतरवून आणा आत्ता..."

"हम्म... आत्ता चढतो..." रोहन खुश होत वरती चढला आणि तो लॉकेट काढून खाली आला, "घेवून आलो मी... आपला लॉकेट... आत्ता ह्याला घालू काय...?"

नीरु हसायला लागली, "ह्याला तुम्ही मला भेट दिलं आहे... आठवण नाही आहे काय...?" नीरु बोलली आणि लॉकेटला बघायला लागली...

"तर काय करू ह्याचं...?" रोहनने विचारले...

"आमच्या गळ्यात घाला... अजून काय करणार...?" नीरु स्मित हास्य देत बोलली... आणि मग लगेच आपले हात उचलून बोलली, "आम्हाला घेवून चला इथून... सोडून नका जाऊ...!"

रोहनने तिच्याकडे बघत स्मित हास्य दिलं आणि कोणत्या वरमालेसारखं ते लॉकेट तिच्या गळ्यात घातलं.... लॉकेट घालताच पहिलेच त्याचा हात पकडून उभी राहिलेली नीरु लगेच त्याच्या बहुपाश्यात चक्कर येवून पडली...

एका क्षणासाठी रोहन घाबरला... अचानक त्याला निरुने सांगितलेली गोष्ट आठवली... रोहनने तिला आपल्या खांद्यावरती उचललं तिला घेवून निघाला...

-------------------

निरुला आपल्या खांद्यावर घेवून येणारा रोहन जेव्हा रवी आणि रितूला दिसला.. दोघेही भयभीत झाले, "काय झाले...?" दोघांच्याही तोंडून एकसाथ हे वाक्य निघालं...

रोहन जवळ येताच जेव्हा तो त्यांना स्मित हास्य करताना दिसला तेव्हा त्यांना हायसं वाटलं...

"काय झालं भाऊ... वहिनीला...?" रवीने विचारले...

"काहीच नाही... ठीक आहे... पण आत्ता पर्यंत तर शुद्ध यायला पाहिजे होती..." रोहन बोलला, "जरा आवाज द्या.."

"नीरु... नीरु... शिनू..." रीतुने तिच्या गालावर हात मारून बघितलं, "काय झालं हिला...?" रितू एकदा परत घाबरली...

"काहीच नाही... ठीक होईल..." रोहन बोलला... पण आत्ता त्याला चिंता होत होती.., "चला... लवकर... गाडीमध्ये जाऊन बघूया..." रोहन तिला असाच आपल्या खांद्यावरती उचुलून राहिला...

गाडीपर्यंत पोहोचता पोहोचता रोहनचा श्वास जोर जोरात चालू होता, "जरा आतमधली लाईट चालू कर... मी हिला पाठी झोपवतो..." रोहनने रवीकडे गाडीची चावी देत बोलला...

लॉक खुलताच रोहनने दरवाजा खोलला आणि निरुला आतमध्ये झोपवले... चिंतेमध्ये त्याने तिच्या चेहऱ्याकडे बघून जेव्हा तिचे गाल थोपटले... तेव्हा नीरु हसायला लागली आणि उठून बसत आपला चेहरा आपल्या हाताने लपवला...

ती हसताच सगळे खुश झाले... रितू पण दुसऱ्या साईडने दरवाजा खोलून आतमध्ये आली होती, "तू ठीक तर आहेस ना..!"

"हो... ठीक आहे... मला काय झाले आहे...?" नीरु बोलली...

"तुला नाही माहित...? तू बेशुद्ध झाली होतीस... रोहन तुला आपल्या खांद्यावर उचलून इथे आला आहे... ४-५ कि.मी. तर असणारच..." रीतू बोलली...

"हो... माहित आहे...!" नीरु बोलली...

"काय माहित आहे...?" रीतुने परत विचारले...

नीरु तिच्या कानाजवळ आपले ओठ नेत बोलली..., "हेच कि हा मला एवढ्या लांबून उचलून घेवून आला आहे... मला तिथेच शुद्ध आली होती... हे हे हे..." नीरु बोलली आणि जोरात हसायला लागली...

"हम्म? माहित होतं तर बोलली का नाहीस...? आम्ही किती घाबरलो होतो... तुला माहित आहे... आणि बेचारा रोहन किती लांबून तुला खांद्यावरती घेवून आला आहे... ह्याची चिंता नव्हती काय...?" रीतुने गुपित सांगितलेली गोष्ट सगळ्यांना सांगितली... निरुने लाजून परत आपला चेहरा लपवला... रोहनशी...!

"घे बेटा... आपले पूर्वज बरोबर बोलून गेले आहेत... माणूस लग्नानंतर गाढव बनतो.. हा हा हा... तू तर पहिलेच वहिनीला उचलून आणलंस..." रवी बोलला...

पण रोहन दुसऱ्याच दुनियेत हरवला होता... गाडी चालवत तो विचार करत होता... 'काश! गाडी अजून थोडा पुढे उभी असती...'

"तू बोलली का नाहीस पहिले...!" रितूने विचारले...

"मला लाज वाटत होती..." निरुने हि गोष्ट पण तिच्या कानात बोलली...

"आत्ता सांगा...! काय झाले तिथे...?" रवीने विचारले...

"नाही... ते सगळं नंतर विचारूया... श्रुतीचं घर आलं आहे.. पहिले तिच्या घरी चला..." रितू बोलली...

"पण ह्यावेळी... रात्रीचे १.३० वाजले आहेत...?" रवी बोलला...

"हो हो... कोण जाणे आमचं उद्याच निघणं झालं तर... निरुचे पप्पा येत आहेत ना..." रितू बोलली...

रोहनने काही वेळ विचार करून गाडीला श्रुतीच्या घराच्या बाहेर उभी केली... सगळे खाली उतरले आणि दरवाजाच्या समोर जाऊन उभे राहिले...

रोहन सगळ्यात पुढे होता... त्याने दरवाजा ठोकवला.... पण काहीच उत्तर नाही मिळालं....

२-४ वेळा अजून दरवाजा ठोकवल्यावर आतमधून श्रुतीच्या वडिलांचा आवाज आला, "येतोय भाऊ... कोण आहे...?"

रोहनच्या तोंडून आवाजच नाही निघाला...

"नमस्ते काका..." जसंच चर्ररच्या आवाजाने दरवाजा उघडला... सगळ्यांनी नमस्ते केलं...

"कोण...?" श्रुतीच्या वडिलांनी जेव्हा लक्षपूर्वक बघितले तेव्हा त्यांनी रोहनला ओळखले, "अरे या या... बेटा... आज परत एवढ्या रात्री...? या... आतमध्ये या..."

रोहनला काहीच सुचत नव्हते... काय बोलावे काय ऐकावे काहीच कळत नव्हते...

"ह्या... मुली कोण आहेत...?" त्याने विचारले आणि आतमध्ये जाऊन आतमधल्या रूमचा दरवाजा ठोकवत बोलले, "श्रुती बेटा... जरा उठ एकदा...!!!!"

-------------------------

"श्रुती...!!!" सगळ्यांच्या तोंडून एकसाथ निघाले...

"हो... माझी मुलगी आहे... हि..." काका नाव आठवत बोलले, "रोहनला तर माहित आहे..." काकांनी कदाचित लक्ष नाही दिलं होतं कि आचार्याने सगळ्यात पहिले त्याच्याच तोंडून श्रुतीचं नाव निघालं होतं....

तेव्हा दरवाजा उघडला गेला आणि एकदम सुंदर श्रुती आळस देत बाहेर निघाली... पण २ मुलांनासमोर बघून लाजली आणि अचानक आपले हात खाली केले... त्यांच्यामध्ये ती एकाला चांगल्या प्रकारे ओळखत होती...

रोहन आणि रविला जसं आपल्या डोळ्यांवरती विश्वासच बसला नाही, "हि... इथे कशी आली..?"

श्रुती बरोबरच दचकून काकांनी रवीकडे बघत बोलले, "स्वप्नं बघत आहेस काय बेटा... रात्री हि आपल्या घरी नाही तर कुठे भेटणार...!" तुम्ही आतमध्ये बसा मी येतो... बेटा... काही जेवण वैगेरे...?"

"हो बाबा... आत्ता बनवते..." एवढं बोलून श्रुती किचनमध्ये गेली... रितू आणि निरुपण बिचकून काही माहिती पडेल त्यामुळे तिच्या पाठी पाठी गेले...

रवीला आतमध्ये बसणं नाही जमलं, "एक मिनट काका... मी आत्ता येतो..." एवढं बोलून तो बाहेर निघाला आणि मुलींचा आवाज ऐकून किचनमध्ये घुसला...

अजून पर्यंत जोरात हसणारी श्रुती रविला बघताच शांत झाली... रितू आणि नीरु रवीकडे बघायला लागल्या...

"एक मिनट... तुम्हाला हात लावून बघू शकतो काय...?" रवी बोलला..

श्रुतीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले... ती त्याची गोष्ट नाही समजली...

पण एवढा वेळ रविला शांती कुठे होती... त्याने आपल्या एका बोटाने श्रुतीच्या हाताला स्पर्श केला आणि आश्चर्याने बोलला, "तुम्ही तर... बटाला...?" आणि एवढं बोलून गप्प झाला...

"तुम्ही जावा... आम्ही बोलतो...!" रितू बोलली आणि रवीकडे रागाने बघायला लागली...

रवीतर तिच्यावरती बटालामध्येच फिदा झाला होता, "तुझं लग्न झालं आहे काय...?" त्याने रीतुच्या गोष्टीवर्ती लक्ष्य नाही दिलं...

श्रुती स्मित हास्य देत बोलली, "काय बोलत आहात...? मला काहीच नाही समजत...!"

"नाही... मी पण कुंवारा आहे... त्यामुळे..." रवी आपली गोष्ट पूर्ण पण करू शकला नाही कि रीतुने त्याला धक्का मारत किचन मधून बाहेर काढले...

"हा मला हात लावून का बघत होता...?" श्रुतीने हसत विचारले...

"ते तर आम्ही पण बघितलं होतं... तू लक्ष नाही दिलंस वाटतंय..." रितू बोलली, "खूप विचित्र कथा आहे... तूला विश्वास नाही होणार..."

"काय...? काय झाले...?" श्रुतीने विचारले...

रितूला जेवढी कहाणी माहित होती... तेवढी तिने श्रुतीला ऐकवली... आणि मग बोलली, "जरूर ती तुझी जुडवा असणार..."

नितीनच्या सोबत घालवलेली ती रात्र आठवून श्रुतीच्या डोळ्यातून पाणी आले, "हो... तो हलकट मला जबरदस्ती बटालाला घेवून जाणार होता, हेच सगळं करण्यासाठी... आणि माझी मजबुरी पण होती... मला जायचे पण होते... पण काय माहित काय झाले तो मला घेवू जावू शकला नाही... त्याने मला जिथे बोलावले होते... तिथे मी १ तास वाट पाहून परत आली होती.. तो नाही आला... मी तर ३-४ दिवस घाबरत घाबरत कॉलेजला जात होती... कि कुठे तो मेला, हलकट ना येवो...!" श्रुतीने आपले डोळे पुसले..

"तर... तर मग ती कोण होती...?" नीरु आणि रितुचे तोंड आश्चर्याने उघडे ते उघडे राहिले...

-------------------------

सकाळी उठून रोहनने रवीच्या विषयी श्रुतीचा हात काकांकडे मांगीताला आणि काकांनी तो हसी ख़ुशी स्वीकार पण केला आणि श्रुतीने पण रवीचा प्रपोसाल स्वीकार केला...

मग सगळे जण फटाफट गाडीत बसले आणि परतीचा प्रवास सुरु झाला


------------------------

मित्रांनो फायनली स्टोरी कम्प्लीट केली... खूप खूप मनापासून धन्यवाद... खास करून तेजाली, शरवरी, अर्पणा, तुषार आणि माझ्या काही साईलन्ट रीडर्सचे हि खूप खूप आभार... मित्रांनो काही चूक वैगेरे, किंवा व्याकरणामध्ये काही चूक झाली असेल तर, किंवा स्पेलिंगमध्ये काही चूक झाली असेल तर साष्टांग दंडवत देवून क्षमा मांगतो...


समाप्त...


Previous Chapter                                  

3 comments: