Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 11 September 2012

भाग ~ ~ १२ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ १२

घटनेच्या पुढे.... 

अनघा रागाने उठून उभी राहिल्यामुळे रम्या पण उठून उभा राहिला आणि तिच्याकडे बघायला लागला. जेव्हा अनघा स्टडी रूममध्ये चलण्यासाठी बोलली तेव्हा रम्या समजला 'कदाचित' तो परत बडबड करायला लागला आहे... त्याने अनघा समोर हात जोडले आणि परत तिला खाली बसायला सांगितले.

रम्या... "अरे हे काय करत आहात तुम्ही...! तुम्हाला तर माहिती आहे कि मालकीणबाई माझ्यावर किती चिढतात... खरं म्हणजे त्या पण काही चुकीचं नाही करत... मीच मुर्खासारखा निस्ता बडबड करत असतो... असो आत्ता मी एकदम सिरीअसली बोलणार जे पण बोलणार... तुम्ही विचारा जे विचारायचे आहे..."


अनघा... "बघा रम्या दादा...! मला असं काहीच नाही समजत कि तुम्हाला काय विचारू आणि काय न विचारू... जे पण तुम्हाला समजतंय कि तुम्ही मला सांगू शकता ते मला सांगा... मध्ये मध्ये जर मला काही लक्षात आलं तर मी तुम्हाला विचारात जाईन..."


रम्या... "ह्म्म्म हे एकदम बरोबर आहे... (आपल्या डोक्याला खाजवत... आणि एकदम जसं काही आठवल्यागत..) अरे हो...! छोटे मालक तुण-तुणा खूप चांगला वाजवतात..."


अनघा... "तुमचं म्हणण गिटार आहे ना..."


रम्या... " हो हो तोच तारवाला तुण-तुणा... मी त्याला तुण-तुणा बोलतो... पण एक गोष्ट आहे... छोटे मालक खूपच चांगले वाजवायचे... मन एकदम प्रसंनीत व्हायचं ते ऐकून... ते कोणालाच कधी त्रास नाही द्यायचे.. एकदम देव माणूस आहे... जसे मोठे मालक तसेच छोटे मालक सुद्धा आहेत... एकमेकांना खूप प्रेम करतात दोघेही... आमची मालकीणबाई पण देवी सारखी आहे... "


अनघा... "अच्छा त्यांच्या स्वभावाची काही तरी कमी सांगा.. खास करून कोणत्या गोष्टींवर राहुल जास्त चिढतो ..."


रम्या... "हि गोष्ट जाणून तुम्ही काय करणार... कुठे तुम्ही त्यांना चिढवायच पिलान तर नाही बनवत ना... जर बनवत असाल तर साफ साफ ऐका... मला ते कदापि चालणार नाही... आत्ताच बोलतोय हा..."


अनघा परत जाण्यासाठी उभी राहते... तिला उठताना बघून रम्या तिच्यासमोर साष्टांग दंडवत घालतो आणि तिला परत बसायला लावतो...


रम्या.. "अरे काय सांगू तुम्हाला... मीच साला एक नंबरचा गाढव आहे... प्रत्येक वेळी काही ना काही बोलत असतो.. आत्ता विचार करण्याची गोष्ट अशी आहे कि भलं तुम्ही राहुलला का चीढवणार... तुम्ही तर त्याला बरं करण्यासाठी हे सगळं विचारत आहात... मी सांगतो ना त्यांना कुठल्या गोष्टीशी चीढ येते... बघा हि गोष्ट तर खूप मामुली आहे पण छोटे मालक ह्याला खूप मोठी मानतात... त्यांना खोटं आवडत नाही... आत्ता बघा देव काय खेळ खेळतो... त्यांना बरं करण्यासाठी एक खोटं बोलायला लागत आहे..."


मग काही अशीच गोष्ट तिने राहुलच्या बद्दल रम्याला विचारलीत... असो...! ह्याच सगळ्या गोष्टींमध्ये किती तरी वेळ निघून गेला होता आणि अनघा जवळ सोनालीचं बोलावणं घेवून मोलकरीण तिच्या जवळ आली जी तिला खाली जेवणासाठी बोलवत होती.


डायनिंग टेबल वर गुरव साहेब आणि सोनाली तिचीच वाट बघत होते... अनघाला बघून गुरव साहेबांनी लगेच तिला बसण्याचा इशारा केला.. आणि सगळे जण जेवायला लागले... जसंच सगळ्यांचं जेवण झालं तेव्हा गुरव साहेब बोलले...


गुरव साहेब... "(मोठ्या उत्सुकतेने) आम्हाला आशा आहे कि तुम्ही आत्ता राहुलच्या विषयी खूप काही समजला असाल... "


अनघा... "खरोखर रम्याशी वार्ता करणे खूप कठीण आहे..."


सोनाली... "कामाची गोष्ट करणे त्या पेक्षा कठीण आहे..."


गुरव साहेब... "तुम्ही मला अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अनघा...? तुम्ही आत्ता पूर्ण पणे तैय्यार आहात ना हे काम करण्यासाठी... आपण पुढे गेलो तर मागे नाही वळू शकत हे तुम्हाला माहिती आहे ना..."


अनघा.. "हो सर...! मी सगळं काही विचार केला आहे... आणि जसं कि मी पहिलेच बोललो आहे तुम्हाला, जो पर्यंत माझे संस्कार मला परवानगी देतील त्या हद्दी पर्यंत मी ते काम करेन... बाकी..."


गुरव साहेब... "(तिला मध्येच टोकत) संस्काराच्या हद्दी पलीकडे जायला आमचं पण तुमच्या वर काहीच दबाव नाही आहे... अनघा.."


अनघा ऐकताच रम्या लगेच बोलला...


रम्या... "आत्ता तुम्हाला कोण टोकणार... कि आत्ता हि अनघा नाही प्रिया आहे... (आणि आपली बत्तीसी दाखवायला लागला..)"


गुरव साहेब... "अरे हो भाऊ... खरोखर माझ्याने पण चूक झाली... धन्यवाद सचिन रामू शिन्देजी... (आणि त्यांनी स्मित हास्य दिलं)"


रम्या... "बस सोलापूरवाला अजून पुढे बोलले असते तर मनाला शांती भेटली असती..."


सोनाली... "(रागात) पिन कोड पण सांग... ते पण तुझ्या नावापुढे लावतील साहेब..."


कदाचित रम्याने ते पण सांगितलं असतं पण तेव्हा एक नर्स जी तिथे राहुलची देख रेख करत होती तिने येवून सांगितले कि राहुल शुद्धीवर आला आहे... अनघा...! जी आत्ता पर्यंत सगळं काही करायचं बोलत होती आत्ता तिचे हात पाय सुन्न पडले... ती खूप नर्वस दिसत होती... गुरव साहेबांनी तिला घाबरतांना बघून तिला दिलासा देत बोलले...


गुरव साहेब.. "तुम्ही चिंता नका करू 'प्रिया'... आमच्या मधला कोणी ना कोणी प्रत्येकवेळी तुमच्या सोबत असणार... तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता करायची काहीच गरज नाही आहे... (सोनालीला इशारा करत) तुम्ही ह्यांना घेवून चला मला लिफ्ट मधून रम्या घेवून येईल.."


राहुलच्या रूमपर्यंत जाईपर्यंत अनघा खूप नर्वस झाली होती... तिच्या पाय थरथर कापत होते, तिची हि हालत बघून सोनालीने तिच्या खांद्यावरती हात ठेवला आणि तिला दिलासा तिला... अनघाने पण मनातल्या मनात आपल्या आराध्य देवताला वंदन केलं.... आणि मग आपल्या मनाला पक्कं करून पुढे गेली..


राहुलच्या रूमच्या बाहेर पोहोचताच सोनालीने अनघाला तिथेच थांबवले आणि जोपर्यंत मी नाही बोलवत तोपर्यंत आत नको येवूस एवढं सांगून त्या रूममध्ये शिरल्या... राहुलला हळू हळू शुद्ध येत होती... डोळे उघडल्यावर त्याने सोनालीला आपल्या समोर बघितले... सोनाली खूप प्रेमाने त्याच्या जवळ बसत...


सोनाली... "आत्ता तुमची तबियत कशी आहे...! डोकं वैगेरे दुखत नाही आहे ना...?" मग राहुल हळू आवाजात बोलला...


राहुल... "मला काय झालं होतं वहिनी... मी तर बस प्रिया सोबत उभा होतो... ती कुठे तरी जात होती आणि मी तिला थांबवत होतो... नंतर माहित नाही काय झालं... मला काहीच शुद्ध नाही राहिली.. आत्ता प्रिया कुठे आहे वहिनी...? (घाबरलेल्या आवाजात) ती गेली तर नाही ना.. प्लीज वहिनी...! सांगा ना... ती कुठे आहे आत्ता..?"


सोनाली... "(जी आत्ता पर्यंत गुरव साहेबांची वाट बघत होती... त्यांना रूममध्ये रम्या सोबत येतांना बघून...) अरे घाबरू नको राहुल...! ती इथेच आहे.. तुम्ही बेशुद्ध झाला होता ना... त्यामुळे ती देवासमोर बसून तुमच्यासाठी प्रार्थना करते... रम्या..! जा आणि प्रियाला सांग कि राहुल शुद्धीवर आला आहे.."


रम्या काहीच न बोलता बाहेर येतो... रूमच्या बाहेर उभी असलेली अनघा हे सगळं ऐकत होती... एवढ्या वेळेत तिने स्वतःला संयमित केलं होतं आणि आत्ता तिच्यात थोडं आत्मविश्वास दिसत होता... रम्या तिच्याजवळ येवून तिला आतमध्ये येण्याचा इशारा केला आणि थोडावेळ थांबून २-४ लांब लांब दीर्घ श्वास घेवून अनघा रूममध्ये आली...


--------------------------------------


राहूलसाठी जसं वेळच थांबली होती... तो एकटक अनघाला बघत होता... त्याचं हरवलेलं प्रेम आत्ता त्याच्यासमोर होतं... जिने त्याची रात्रीची झोप आणि दिवसाचं चैन आणि सुकून, सगळं काही हिसकावलं होतं... आज तीच वेळ त्याच्यासमोर आली होती... तो पहुडलेला होता पण अनघाला बघताच त्याच्यात उठण्याची एक स्फूर्ती आली... त्याचं डोकं पण आत्ता हेच बोलत होतं हि जी त्याच्या समोर उभी आहे तीच प्रिया आहे... राहुल आपल्या डोळ्यात पाणी घेवून... अनाघाजवळ जाण्यासाठी उठला... सोनालीने त्याला एकदा थांबवण्याचा प्रयत्न केला पण गुरव साहेबांनी तिचा हात पकडून काहीच न बोलता तिला गप्प राहण्याचा इशारा केला... राहुल आत्ता आपल्या बेडवर उठून अनघा जवळ जायला लागला... तो खूप हळू हळू आपल्या प्रेमाकडे वळत असतो कि अचानक शारीरिक कमजोरी मुळे त्याला चक्कर येते... त्याला चक्कर येतांना बघून अनघा पुढे येवून त्याला पकडते...


बस...! वेळ जसं तिथेच थांबली गेली... खासकरून राहूलसाठी... कारण बाकी सगळे तर नाटक करत होते पण त्याच्यासाठी तर ह्या पेक्षा कुठलीच मोठी गोष्ट नव्हती कि प्रिया त्याच्या समोर उभी होती. तो खूप प्रेमाने प्रियाच्या चेहऱ्यावरून आपले हात फिरवतो... अनघाच्या पूर्ण शरीरात शहारे येतात... ती खूप विचलित होते... तिची हि अवस्था बघून सोनाली पुढे येवून राहुलच्या खांद्यावरती आपला हात ठेवून त्याला बोलते...


सोनाली... "आत्ता तुम्हाला विश्वास झाला ना कि 'तुमची प्रिया' इथेच आहे कुठे गेली नाही.. आत्ता तुम्ही डॉक्टरांची गोष्ट ऐकून फक्त आणि फक्त आराम करा.. चला...! आपल्या बेडवर झोपून जावा..."


राहुल... "वहिनी प्लीज...! मला माझ्या प्रिया पासून वेगळं नका करू... हि किती दिवसांनी आली आहे माझ्याकडे... जेव्हा पासून हिच्या वडिलांनी हिला घेवून गेले होते तेव्हा कुठे जावून मला हि मला भेटली आहे... आत्ता तर तुम्ही मला हिला भेटू द्या ना... प्लीज आई (हे वहिनी सोबत आई बोलणं राहूलच 'ट्रंप कार्ड' होतं जे तो कोणत्या तरी खास काम पूर्ण करण्यासाठी सोनालीला बोलायचा...) ऐका ना आई..!"


गुरव साहेब... "तुझी वहिनी आई ने 'अन'... प्रियाला तुझ्या वेगळे थोडी करते छोट्या...! ती तर बस तुला आराम करण्यासाठी बोलत आहे... तुम्ही चिंता नका करू, प्रिया कुठेच नाही जाणार... ती इथेच राहणार आहे.. "


स्वतः गुरव साहेबांच्या तोंडून प्रिया बदली 'अनघा' येता येता राहिलं पण राहुल भलं त्या गोष्टीकडे लक्ष का देणार... तो तर अनघा आणि प्रिया मधील खरं जाणतच नव्हता... तो तर बस गुरव साहेबांची गोष्ट ऐकून खुश झाला होता...  खूप खुश... पण पुढे येणारं वादळ अजून त्याला माहिती नव्हतं.... 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment