Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 13 September 2012

भाग ~ ~ १४ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ १४

घटनेच्या पुढे.... 

राहुलला बघताच अनघा लगेच उठून बसली... त्याच्या हातात रजनीगंधाच्या फुलांचा एक गुलदस्ता होता... जो कदाचित त्याने घरातील बागे मधून बनवून आणलं होता...

राहुल... "हे घे...! तुझे आवडते फुल... एक दम ताजे ताजे आणि सुगंध देणारे... जसे तुला आवडतात... (आणि खूप प्रेमाने त्याने तो गुलदस्ता तिच्या हातात दिला...)"..


त्या फुलांना हातात घेताच अनघाला शिंका सुरु झाल्या... एकदा, दोनदा, तीनदा आणि जेव्हा चार-पाच वेळ पण तिच्या शिंका थांबल्या नाहीत तसा त्याने तो गुलदस्ता तिच्या हातातून परत घेतला... अनघाला कदाचित रजनीगंधाच्या फुलांची अलर्जी होती, पण बिचाऱ्या राहुलला काय माहिती होते कि तिच्या समोर प्रिया नाही अनघा बसली आहे...


राहुल... "(फुलांना बघत)... माहित नाही काय आहे ह्या फुलांमध्ये, जे तुम्हाला ह्याचा सुगंध आवडला नाही.. पहिले तर तुम्हाला हेच फुल जास्त आवडायचे... आणि आत्ता काय झाले.."


अनघा... "(राहुलची निराशा बघत)... मला काही दिवसांपूर्वी फ्लू झाला होता... जो किती तरी दिवस राहिला... कदाचित त्याच्या नंतरच असं झालं आहे... तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी कसे आलात... (खरं म्हणजे ती राहुल असं एकटा आपल्या रूममध्ये बघून घाबरत पण होती...) झोपला नाहीत का तुम्ही...?"


राहुल... "(आपली मान होकार्थी हलवत)... रात्रभर माझ्या डोळ्यात फक्त तुझेच स्वप्न येत होते... काही काही स्वप्नात तर तू परत जात होती.. बस...! माझी झोप उडताच मी तुम्हाला पूर्ण घरात शोधत शोधत इथ पर्यंत पोहोचलो... जेव्हा पाहिल्यावेळेस आलो तेव्हा तुम्ही एकदम गाढ झोपेत होता... तेव्हा विचार केला कि बागेतून तुमच्यासाठी तुमचे आवडते फुल आणू... पण काय फायदा (निराश होत)... तुम्हाला तर आवडलेच नाहीत..."


अनघा... "कोण बोललं कि मला आवडले नाहीत... ते तर बस मला त्यांच्या सुगंधाचा थोडा त्रास जाणवतोय... पण मला अजून पर्यंत हीच फुलं आवडतात.."


राहुल... "(एकदम खुश होत)... खरोखर...!"


अनघा... "हो हो खरोखर.."


रम्या... "(तेवढ्यात रम्या तिथे येतो) हे घ्या...! तुम्ही इथे आहात... आणि मी तुमच्या चक्करमध्ये पूर्ण घर शोधत बसलो..."


राहुल... "(त्याच्या डोक्यावरची पट्टी बघून... हैराणीने)... अरे रम्या..!.. हे काय झाले... तुझ्या डोक्यावर हि जखम कसली..?"


रम्या... "अरे काय सांगू छोटे मालक...! (तेव्हा अनघा इशार्याने आपली मान नकारार्थी हलवते)... पाय सिलीप झाला माझा... आणि मी धडाम खाली पडलो... बस माझं डोकं फुटलं..."


राहुल.. "किती वेळा सांगितलं आहे तुला... कि आरामात चालत जा... पण तुम्ही आहात कि दिवस भर हवेत उडत असता... आत्ता बघतोयस काय लवकर माझ्यासाठी आणि प्रियासाठी काहीतरी नाश्ता घेवून ये... मला खूप जोराची भूक लागली आहे..."


हे ऐकून रम्या खूप खुश होतो... किती दिवसा नंतर आज राहुलने स्वतः काहीतरी मांगीतल होतं...


रम्या... "काय खाणार... छोटे मालक... मी आत्ता लगेच बनवून आणतो..."


राहुल... "माझ्यासाठी आणि प्रियासाठी फटाफट एक चीज ऑम्लेट बनवून आण.."


अनघा... "नाही नाही मी अंडी नाही खात... माझ्यासाठी दुसरं काहीतरी... ह्म्म्म पराठे बनवून आणा..."


राहुल... "(हैराणीने)... तुम्ही अंडी नाही खात... तुला तर खूप आवडायची अंडी... हे भलं कसं शक्य आहे...?"


अनघा आपल्या ह्या गोष्टीमुळे एकदम फसली होती... तिला काहीच सुचत नव्हते तेव्हा रम्या आपली बुद्धी लावत..


रम्या... "(अनघाशी).. अरे तुम्ही अजून ह्यांना सांगितलं नाही का.. ! (मग राहुलकडे बघत) अरे छोटे मालक ते काय आहे, ह्यांनी त्या दिवशी प्रार्थना केली होती कि तुम्ही जो पर्यंत ठीक नाही होत... तेव्हा पर्यंत ह्या एकदम शुद्ध शाकाहारी जेवण जेवणार... काय समजलात.."


मग रम्या नाश्ता तैयार करण्यासाठी जायला लागला तेव्हा अनघा पण उठून उभी राहिली... राहुलने तिचा हात पकडला...


राहुल... "तू कुठे चाललीस...? जरा माझ्याजवळ बस ना... जेव्हा पासून भेटली आहेस तेव्हा पासून कोणी ना कोणी तरी मध्ये येतंच... आत्ता इथे कोणीच नाही आहे... काही वेळ तरी माझ्या सोबत बस ना..."


अनघा... "(आपला हात सोडवत)... आत्ता थोड्या वेळातच खाली सोनालीजी आणि गुरव साहेब नाश्ता करण्यासाठी आपली वाट बघत बसतील... मला वरती जाऊन फ्रेश पण व्हायचे आहे... आपण नंतर बोलूया..." एवढं बोलून ती वरती गेली... अनघाचं असा निघून जाणं राहुलला आवडलं नाही पण ह्यावेळी त्याने तिला अडवलं नाही... अनघा वरती पोहचून आपली दैनिक क्रिया संपवून... आपले सगळे कपडे वैगेरे जे तिने कपाटामध्ये लावले होते... त्यांना परत ब्याग्समध्ये भरायला लागली... ब्याग्स भरतेवेळी अपेक्षा नुसार खालून नाश्ता करण्यासाठी तिला बोलावले गेले.. ती थोड्या वेळाने येते सांगून राहिलेलं सामान पण प्याक करायला लागली आणि मग ती त्यांना सोबतच घेवून खाली यायला निघते... तिला जिन्यांवरून आपली ब्याग सोबत उतरताना पाहून, लगेच रम्या तिच्या हातातून ती ब्याग घेतो आणि तिला नाश्त्याच्या टेबलवरती जायला सांगतो... आणि स्वतः तिचा सामान घेवून तो तिच्या रूममध्ये ठेवून परत येतो..


नाश्त्याच्या टेबलवरती सोनाली, गुरव साहेब बरोबर राहुल पण बसला होता, तो अनघाला बघून खुश होवून तिला इशाऱ्याने आपल्या बाजूच्या ख्रुची वर बसायला सांगतो... पण त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत अनघा सोनालीच्या शेजारी जावून बसते... ज्याला बघून राहुल निराश होतो... रम्या सगळ्यांना नाश्ता सर्व करतो... सगळे आपला आपला नाश्ता करायला लागतात... कुणास ठावूक का गुरव साहेब सारखे सारखे घड्याळात बघत होते... तेव्हा त्यांच्या एका गार्डने डी.एस.पी. शर्वरी आल्याची सूचना दिली.


------------------------------


ज्याला ऐकून जिथे अनघाच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत होती... त्या उलट गुरव साहेबांच्या चेहऱ्यावर तेच चीत-परिचित स्मित हास्य खेळायला लागलं, जो प्रत्येक वेळी त्याच्या विश्वासाची प्रतिक होत... गुरव साहेब आपल्या गार्डला बोलले कि डी.एस.पी. म्याडमना लिविंग रूममध्ये बसवा, पण त्यांचा गार्ड बोलला कि तिने आपल्या सोबत आणखीन २ लेडी पोलीस पण आणल्या आहेत आणि अनघाला लवकरात लवकर त्यांच्या जवळ बोलावत आहेत... गुरव साहेबांनी एकदा सोनालीकडे बघत राहुलला आतमध्ये घेवून जाण्याचा इशारा केला..


राहुल.. "(स्मित हास्य देत गार्ड ला )... त्यांना सांगा इथे कोणीच अनघा नाही राहत... हि माझी प्रिया आहे जी माझ्याशी रागावून स्वतःला अनघा सांगत आहे... पण आत्ता हि माझ्या वर रागावली नाही आहे... त्यामुळे तो अनाघावाला नाटक संपला आहे... त्यांना सांगा जावा इथून आत्ता.."


गुरव साहेब... "राहुल...! तुम्ही आपल्या वहिनी सोबत आत जा, आम्ही लगेच डी.एस.पी. म्याडमला समजावून येतो... या.. 'अन' प्रिया... तुम्ही माझ्या सोबत चला... बघूया तरी आज परत डी.एस.पी म्याडम नाश्त्याच्या वेळी काय घ्यायला आल्या आहेत..."


आज परत गुरव साहेब प्रियाच्या बदली अनघा बोलता बोलता वाचले... अनघा त्यांची व्हील चेयर ढकलत त्यांना लिविंग रूमकडे घेवून गेली... राहुल पण उठायला लागला, पण सोनालीने त्याला तिथेच बसवले... लिविंग रूममध्ये डी.एस.पी. शर्वरी आपल्या सोबत २ लेडी पोलिसांच्या (ज्या कदाचित इन्स्पेक्टर रयांकच्या असतील) बरोबर, त्या लोकांचा उभ्या उभ्यानेच वाट बघत होती... तिला उभी असलेलं पाहून...


गुरव साहेब... "काय गोष्ट आहे डी.एस.पी. म्याडम आज आमच्या इथे बसत पण नाही आहात... आमच्याकडून काही चूक झाली आहे काय... वा आमच्या कोणत्याही माणसांनी तुम्हाला बसायला नाही सांगितले...?"


शर्वरी... "तुमच्या माणसांनी पण विचारलं होतं आणि तुमच्याकडून कोणतीच चूक झाली नाही गुरव साहेब... (गुरव साहेबांशी आपला हात मिळवण्यासाठी पुढे झाली)... पण काय आहे आज मला थोडी घाई आहे... (मग अनघाकडे बघत)... माझ्या जवळ तुम्हाला पकडण्याच वारंट आहे.. (आपल्या खिशातून वारंट काढून दाखवत) मी तुम्हाला कुलकर्ण्यांच्या हत्ये प्रकरणी अटक करत आहे..."


हे ऐकून अनघाच्या पाया खालची जमीनच निघते.... ती लगेच गुरव साहेबांकडे बघते...


अनघा... "हे खोटं आहे, मी कोणाचीही हत्या केली नाही... डी.एस.पी. म्याडम..! तुम्ही माझ्याशी असं नाही करू शकत... कुलकर्णीची हत्या त्या काळे कपडेवाल्या माणसानेच केली आहे.... तुम्ही जाऊन त्याला अटक करा... मला का ह्या सगळ्यामध्ये फसवत आहात... मी निर्दोष आहे... (तिचे डोळे पाणावले होते..)"


गुरव साहेब... "(क्रोधीत होत) डी.एस.पी म्याडम तुम्ही कोणत्या आधारावर असं बोलत आहात... असं वाटतंय कि तुमच्यावर जास्तच दबाव पडत आहे हा केस संपवण्यासाठी.... जे तुम्ही कुठलाही पुरावा न घेता इथे येवून पोहोचलात... शेवटी पुरावा काय आहे तुमच्याकडे..."


शर्वरी... "मी कधीच कुठल्या दबावाखाली काम नाही करत गुरव साहेब..! (गुरव साहेबांनी हात न मिळवल्यामुळे आपला हात परत मागे घेत ती बोलली) आमच्या पूर्ण शोधात कुठेही त्या काळे कपडेवाल्याचा अस्तित्वच आमच्या समोर नाही आला... ज्याचा हवाला हि आपल्या साक्षीत देत आहे... ट्रेनमध्ये चढतांना किंवा उतरतांना कोणीही कोणत्या काळे कपडेवाल्या माणसाला नाही बघितले, ज्याच्यावर हि म्याडम कुलकर्णीच्या हत्येचा आरोप लावत आहे... उलट त्या ट्रेनमध्ये कुठे हि कोणतंच निशाण नाही सापडलं, जो ह्यांच्या आणि कुलकर्णीच्या शिवाय तिथे उपस्थित असण्याचा पुरावा देवू शकेल.... मग भलं आम्ही कोणत्या आधारावर हे मानू कि त्या रात्री खरोखर कोणी काळे कपडेवाला माणूस हे काम करून निघून गेला... आणि मजेची गोष्ट अशी कि एवढ्या क्रूरतेने कुलकर्णीला मारणारा हिला काहीच न करता कसा निघून गेला... (अनाघावर व्यंगात्मक नजर टाकत) कमाल आहे..."


गुरव साहेब... "कमाल तर तुम्ही करत आहात डी.एस.पी. म्याडम...! इन्वेस्टीगेशनच्या नावावर तुम्ही पण फक्त टाळाटाळ करता नजर येत आहात... तुमचं खूप नाव ऐकलं आहे पण क्षमा करा... तुम्ही तर मला निराश केलं..."


शर्वरी... "तुमच्या निराशा प्रती मी पण खेद प्रगट करते, पण आत्ता तर ह्यांना घेवून जाते..." एवढं बोलून तिने आपल्या सोबत उभ्या असलेल्या २ लेडी पोलिसांना अनघाला आपल्या कस्टडीमध्ये घ्यायला सांगितले... त्या दोघी अनघाच्या दिशेने जायला लागतात त्यांना आपल्याकडे येतांना बघून अनघा मागे सरकत परत आपली निर्दोषवाली गोष्ट बोलते... तिच्या गोष्टींवरती दुर्लक्ष करत त्या दोघी अनघाला दोन्ही बाजूने पकडून तिला आपल्या सोबत जबरदस्ती घेवून जात असतात, पण अनघा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते...


शर्वरी... "(गुरव साहेबांना) ह्यांना बोला कि आमच्या सोबत कॉ-ऑपरेट करायला... आम्हाला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायला विवश नका करू..."


गुरव साहेब... "त्यांना जे बोलायचे आहे ते आम्ही नंतर बोलतो पण तुम्ही जरा आमची गोष्ट ऐका... " एवढं बोलून गुरव साहेब रम्याला आवाज देतात ज्याला ऐकून रम्या सोबतच सोनाली पण तिथे येते...


गुरव साहेब.. "(सोनालीशी)... बरं झालं तुम्ही पण इथे आलात... राहुलकडे कोण आहे...?"


सोनाली.. "सध्या तर त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट अनुसार सांगितलेली मालिश होते... (मग अनघाची हालत बघून) हा काय तमाशा लावून ठेवला आहे ह्या लोकांनी... अनघाला का पकडून ठेवलं आहे ह्या लोकांनी...?"


गुरव साहेब... "ते तर मी तुम्हाला नंतर सांगतो... सध्या तुम्ही जरा आमच्या स्टडीरूम मधून ते पेपर्स घेवून या ज्यांच्या विषयी आम्ही तुम्हाला काल बोललो होतो..."


आत्ता आणते बोलून सोनाली २ मिनिटांत ते पेपर्स घेवून आली... एकदा परत त्या पेपर्स वरती नजर मारून गुरव साहेबांनी ते पेपर्स शर्वरीच्या हातात दिले...


गुरव साहेब... "हे घ्या... हि अनघाची अग्रिम जमानत (anticipatory bell) चे पेपर्स, ह्या पेपर्सना बघा आणि अनघाला अटक करण्याचा निर्णय आपल्या डोक्यातून काढून टाका... "


शर्वरी... "(पेपर्स बघत) तर तुमची तैयारी आगोदरच झाली होती... (स्मित हास्य देत) तुमच्या सोबत तर मजा येणार गुरव साहेब... मला पण सोप्पे केसेस सोल्व करण्यामध्ये मजा नाही येत... तुम्ही माझी कॉम्प्लिकेशन वाढवली... ह्या कॉम्प्लिकेशनसाठी धन्यवाद..."


गुरव साहेब... "ज्याला तुम्ही कॉम्प्लिकेशन बोलत आहात... ती एक खरी घटना आहे म्याडम...! तुमच्या माहितीसाठी एक सांगतो ज्या काळे कपडेवाल्याला तुम्ही अनघाचा भास बोलत आहात... तो माणूस ह्या घरात दोन वेळा येवून गेला आहे... काल रात्री तर त्या माणसाने आमच्या एका माणसावर हमला पण केला (रम्याकडे इशारा करत) ह्याच्या डोक्याला झालेली जखम बघा... हा तुम्हाला भास नाही वाटणार.."क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment