Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 18 September 2012

भाग ~ ~ १५ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ १५

घटनेच्या पुढे.... 

शर्वरी... "(रम्याकडे बघत).... इथे या साहेब... जरा तुमचं फुटलेलं डोकं तरी दाखवा... (रम्या आपल्या जागेवरून हललाच नाही..) अरे या तरी... ! मी मारणार किंवा खाणार नाही तुम्हाला..."

गुरव साहेबांचा इशारा भेटताच रम्या शर्वरीच्या जवळ गेला आणि आपल्या डोक्यावरील जखम तिला दाखवायला लागला ...


शर्वरी... "वाह वाह...!
क्या बात है... मालक जो पर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही जागचे हलणार पण नाही... हम्म तर काय मारलं होतं त्या काळे कपडेवाल्याने तुम्हाला...?"

रम्या... "मला माहिती नाय पडलं कि त्यानं मला कोणत्या वस्तूने मारलं ते... पण ज्या वस्तूने मारलं होतं... (आपल्या जखमे वर हात फिरवत) खूप जोरात लागलं होतं..."


शर्वरी... "ह्म्म्म... (रम्याची नकल करत)... खूप जोरात लागलं... कोणत्या शहरातून उगवून आला आहात तुम्ही...? इथले तर नाही वाटत आहात तुम्ही...?"


रम्या... "(चीढ्लेल्या स्वरात..) मी काय कोणी गाजर-मुळा आहे जो तुम्ही मला उगवून आला आहे बोलत आहात... अरे विचारायचं कसं असतं कोणत्या जिल्ह्यातून आला आहात...? समजलात कि नाही..."


शर्वरी... "ओह्ह ठीक आहे मग मी तसंच
विचारते... कोणत्या जिल्ह्यातून आला आहात..?"

गुरव साहेब... "डि.एस.पी. म्याडम तुम्ही खालीफुकट तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात... फक्त कामाची गोष्ट करा... हे पण लक्षात ठेवा जर तुम्ही सरकारी कामगार नसता तर मी तुम्हाला कधीचंच बाहेर काढलं असतं... तुम्हाला जो पण निर्णय घ्यायचा आहे... तो लवकरात लवकर घ्या आणि निघा इथून..."


शर्वरी... "(चीढत) तुम्ही तुमच्या इथे काम करणाऱ्या प्रेत्येक व्यक्तीशी असेच निष्टावंत आहात कि फक्त हेच दोघेच तुमच्यासाठी खास आहेत... आणि राहिला प्रश्न कि कुठल्या निर्णयावर पोहोचण्याचा तर ऐका... आत्ता तुमच्या ह्या नोकराची मेडिकल तपासणी होणार... आणि ती पण सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी डॉक्टरांच्या देख-रेखमध्ये... तुमच्या कोणत्याही प्राईवेट डॉक्टर्सला अजून पर्यंत आमची मान्यता मिळाली नाही आहे... आणि जर तुमच्या घरात तो काळे कपडेवाला दोन वेळा येवून गेला होता तर तुम्ही अजून पर्यंत त्याची कम्प्लेंट का नाही केली... किंवा माझ्या येण्याची प्रतीक्षा करत होता...?"


गुरव साहेब... "काल रात्रीच तुमच्या एस.पी सिटीला आमचा ई-मेल गेला आहे डि.एस.पी. म्याडम... राहिला प्रश्न तुमची वाट पाहण्याचा... तो तर आम्ही काल पासूनच सुरु केला होता... ज्या प्रकारे तुम्ही अचानक उठून गेला होता, त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास होता कि तुमचं परत येण्याचा अंदाज काही अश्या प्रकारेच असणार... एवढ्या वर्षांपासून आम्ही काय वकिलीमध्ये झक नाही मारली आहे म्याडमजी..."


शर्वरी... "तुम्ही काय मारलं आहे आणि काय नाही... ते तर मी नंतर बघेनच... माझ्या हातातून कोणीही अपराधी सुटून पळेल, हे माझ्यासाठी डुबून मारण्यासारखी गोष्ट आहे... आणि माझ्या हातून कोणाही बे-गुनेह्गारला शिक्षा भेटणार हि पण माझ्यासाठी गर्वाची गोष्ट नाही आहे... मला माझी चौकशी करू द्या... खालीफुकट मध्ये मध्ये बोलू नका... (रम्याकडे बघत)... हम्म तर...! तुम्ही काही तरी सांगणार होता तुमच्या बद्दल..."


रम्या... "मी कुठे सांगणार होतो... तुम्ही स्वतःच माझ्या विषयी विचारत होता... मला पण काही शौक नाही आहे खालीफुकट कोणासमोर बक बक करायला... तुम्ही विचारत आहात तर मी सांगतो... माझा जिल्हा सोलापूर आहे... भीमा नदीच्या काठी वसलेलं आहे... तिथे उसाची शेती खूप होते... तिथले लोकं खूप चांगले आहेत... इथल्या सारखे नाही आपापसात मारामार करणारे... (गर्वाने आपली छाती फुगवत)... आत्ता माहिती पडले कि मी कोणत्या जिल्ह्यतला आहे.. "


शर्वरी... "खूप मेहरबानी तुमची जे तुम्ही एवढ्या संक्षेपमध्ये तुमच्या जिल्ह्याची माहिती दिलीत. मी तर एकदम भावूक झाले... चला आत्ता एकदम खरं खरं सांगा कि तुम्हाला हि जखम कशी झाली...?"


रम्या... "(चिंतीत होत)... आत्ता तर तुम्हाला सांगितलं कि आम्हाला तो काळे कपडेवाला माणूस मारून गेला तो... आत्ता ह्याच्यामध्ये नवीन गोष्ट काय सांगू म्याडम..."


शर्वरी... "मी खरं सांगायला सांगितलं आहे रम्या... एकदम खरं बोला..."


गुरव साहेब... "तुम्ही आमच्या माणसावर खालीफुकट दबाव टाकत आहात... तो बोलला आहे, जे बोलायचे आहे ते... आत्ता काय त्याच्या तोंडातून तुमची गोष्ट बोलवणार..."


शर्वरी... "बोलवायचे असेल ना तर आम्ही काही पण बोलवू शकतो... (दात खात) पण आत्ता पर्यंत मी फक्त खरं आणि खरंच ऐकणार आहे... आणि हा आहे कि खरं बोलत नाही आहे..."


रम्या... "अरे देवाची शपथ...! मी आत्ता अजून काय खरं बोलू म्याडम...! चला तुम्ही जे बोलाल तेच मी बोलतो..."


रम्या आत्ता आपल्या गुरव साहेबांच्या दमावर्ती डि.एस.पी शी सरळ सरळ पंगा घेण्याच्या मूडमध्ये होता...


शर्वरी... "(गुरव साहेबांशी...) खरं तर हे आहे कि काळे कपडेवाल्याचं काही अस्तित्वच नाही आहे... आणि पहिले तर हि म्याडम आणि आत्ता हा नोकर... दोघेही खोटं बोलत आहेत... असं कसं असू शकतं कि ज्या काळे कपडेवाल्याची हे गोष्ट करत आहेत ह्यांच्या शिवाय दुसरं कोणीच त्याला बघितलं नाही आहे... ना ट्रेन मध्ये ना ट्रेन मधून उतरते वेळी... पूर्ण कॅबीनमध्ये कुठेही त्याचं कोणतंही निशाण सापडलं नाही आहे... (मग काही विचार करत... अनघाकडे इशारा करत)... मला ह्यांच्या सामानाची झडती घ्यायची आहे... तुम्ही मला परवानगी देत असाल तर ठीक आहे नाही तर मी सर्च वॉंरंट घेवून येते..."


गुरव साहेब... "सरकारची सहयत्ता करणे माझा पण धर्म आहे डि.एस.पी. म्याडम...! तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ह्या घराची झडती घेवू शकता..."


शर्वरी... "आभार...! मला फक्त अनघाच्या सामानाची झडती घ्यायची आहे... बाकी दुसऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे..."


गुरव साहेब... "ठीक आहे...! (अनघाकडे इशारा करत) ह्यांना आपल्या रूममध्ये घेवून जावा आणि ह्यांची मदत करा..."


क्रमशः


------------------------------------

गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा... गणपती तुमच्या सर्वांच्या कामना पूर्ण करो... आणि तुमच्या घारात आनंद सदैव खेळत राहो...

क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment