Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 22 September 2012

भाग ~ ~ १६ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ १६

घटनेच्या पुढे.... 

अनघा काहीच न बोलता आपल्या रूमच्या दिशेने जायला निघाली... तिच्या सोबत त्या दोन लेडी पोलीस पण जातात... अनघाच्या रूममध्ये शर्वरी, गुरव साहेब आणि सोनाली पण गेले होते... तिथे जाऊन शर्वरीच्या इशाऱ्या वरती त्या दोन लेडी पोलिसांनी सगळं सामान जे आत्ता आत्ता ब्याग्समध्ये होतं त्याला उलटून पालटून बघितलं पण त्यात काहीच आपत्तीजनक वस्तू सापडली नाही... जेव्हा त्या दोन लेडी पोलिसांनी आपले दोन्ही हात वरती केले तेव्हा अनघाच्या चेहर्यावरती एक विजयी स्मित हास्य तरळायला लागलं.

शर्वरी... "(चीढत बोलली) 'Well evary DOG has a Day'... माझावाला दिवस आज नाही वाटतं..."


तेव्हा अचानक मध्येच रम्या बोलला...


रम्या... "जर ह्या रूमची झडती घेवून आपलं मन नाही भरलं असेल तर वरच्या रूममध्ये पण जावून बघा... अजून पर्यंत जसंच्या तसं आहे तिथे..." ज्याची हि गोष्ट ऐकून गुरव साहेब, अनघा आणि सोनाली खूप चीढल्या... तिथेच शर्वरी काही तरी विचार करत...


शर्वरी... "(गुरव साहेबांकडे बघत)... हि रूम अनघाची नाही आहे काय...?"


सोनाली... "खरं म्हणजे... काल झालेल्या घटनेमुळे... अनघाचं वरती थांबणं गरजेचं नाही समजलं आम्हाला... त्यामुळे आम्ही तिला आमच्या जवळची रूम देण्याचा निर्णय घेतला... काल रात्रीच्या पूर्वी हि वरच्याच रूममध्ये राहायची... पण तिथलं सगळं सामान तर इथेच आहे... माझा अर्थ असा आहे कि अनघाचं सामान.."


शर्वरी... "तरीपण मी तो रूम बघणार म्याडम..."


गुरव साहेब... "तुम्ही तुमचे सगळी कार्यवाही पूर्ण करा म्याडम... नंतर नका बोलू कि तो रूम राहिला म्हणून... कोणी बेकसूरला फसवण्यासाठी..." शर्वरी काहीच नाही बोलत फक्त आपले खांदे उचकावते... सोनाली रम्याला पोलिसांना वरती घेवून जाण्याचा इशारा करते... रम्या आपल्या पाठी पाठी यायला सांगतो आणि पुढे निघतो... परत पूर्ण मंडळी वरच्या रूममध्ये जाते... वरचे कपाट पहिल्या पासूनच खाली होते... तर त्यांच्या वरती एक नजर मारूनच कळतं कि त्यात काहीच नाही आहे... बाकी बेडचे गादले पण उलटून पालटून बघतात... तिथे पण काहीच नाही सापडलं... शर्वरीने एक शेवटचा प्रयत्न म्हणून बाथरूम स्वतः चेक करण्याचा निर्णय घेतला... तिने पहिले तर बाथरूममध्ये एक नजर मारली मग काही विचार करून तिने फ्लश ट्यांकचं झाकण उघडून बघितलं... झाकण उघडताच तिच्या डोळ्यात एक वेगळ्या प्रकारची चमक दिसायला लागली... फ्लश ट्यांकमध्ये एक चाकू पडलेला होता... तिने आपल्या हातात ग्लोव्ज घातले आणि त्या चाकुला उचलले आणि बाहेर येवून सगळ्यांना दाखवत.


शर्वरी... "बस..! काही अश्याच प्रकारची वस्तू सापडण्याची मला आशंका होती... काय चांगलं भेटलं आहे हे पण..." जिथे सगळे जण त्या चाकुला बघून चिंतीत होतात... तिथेच गुरव साहेबांच्या चेहऱ्यावर तेच चीत परिचित स्मित हास्य दिसायला लागतं....


शर्वरी... "(गुरव साहेबांचं स्मित हास्य बघून काही अंदाज लावत)... आत्ता तुमचं...! ह्या विषयी काय बोलणं आहे गुरव साहेब.."

गुरव साहेब.. "हि काही खास वस्तू नाही आहे माझ्यासाठी... खास करून तेव्हा, जेव्हा तो काळे कपडेवाला माणूस इथे दोन वेळा येवून गेला आहे... आणि 'नशिबाने' (व्यंगात्मक अंदाजमध्ये )... तुमच्या नाही अनघाच्या नशिबाने... तुम्ही हा चाकू आमच्या एफ.आई.आर नंतर बरामद केला आहे... अतः हा चाकू आमच्यासाठी काहीच मायने नाही ठेवत... कोणतंही कोर्ट ह्याला अनघाच्या विरुद्ध कोणत्याहि पुराव्याला कबूल नाही करणार..."

शर्वरी... "(प्रभावित नजराने गुरव साहेबांना बघत)... तुमच्या बोलण्यामध्ये दम आहे गुरव साहेब... पण हा चाकू माझ्यासाठी खूप गरजू पुरावा ठरू शकतो... हा तोच चाकू आहे कि ज्याने कुलकर्णीची हत्या झाली होती... हे तर फक्त लेबोरीटीमध्ये जावूनच माहिती पडणार... आत्ता तर फक्त मी ह्यालाच घेवून जाते... राहिला प्रश्न त्या काळे कपडेवाल्याचा... तर मी अजूनहि आपल्या त्याच थिअरी वरती कायम आहे कि काळे कपडेवाल्याचं अस्तित्व तर कमीत कमी त्या रात्री तरी नव्हतं... ज्या रात्री कुलकर्णीची हत्या झाली होती..."


गुरव साहेब... "तुम्हाला तुमच्या थिअरीवरती कायम राहण्याचा संपूर्ण हक्क आहे... पण कृपया आम्हाला तुमच्या थिअरीवरती चालायला मजबूर करू नका..."


शर्वरी... "मजबूर मी नाही माझे पुरावे करणार तुम्हाला... हम्म... ठीक आहे आजच्या भेटीमध्ये तर तुम्हीच परत सरस निघालात... (स्मित हास्य देत) next may be mine... आत्ता तरी हात मिळवा.." आणि स्मित हास्य देत ती आपला हात गुरव साहेबांच्या पुढे करते... ज्याला गुरव साहेब पण आपल्या हातात मिळवत...


गुरव साहेब... "केसला लवकरात लवकर संपवून आपल्या रेकॉर्डला अजून चांगलं राखण्यासाठी विचार करून जर तुम्ही थंड डोक्याने दुसया गोष्टींवर्ती लक्ष द्याल तर हा केस तुम्हाला एवढा कठीण नाही वाटणार..."


शर्वरी... "हे सगळं आपण येणाऱ्या वेळेवर्ती सोडू... परत त्रास देण्यासाठी मी येणार... आत्ता तर जाते... (रम्याला बघत) हे सोलापूरवाले महापुरुष! आम्हाला तुम्ही समर्पित करा कारण आम्ही तुमची मेडिकल चेकअप करू शकू, त्यामुळे तुमच्या जखमेची सत्यता काय आहे ते माहिती पडणार..."


रम्या तिची गोष्ट ऐकून गुरव साहेबांकडे बघतो...

गुरव साहेब... "घाबरू नको रम्या...! तुम्ही न घाबरता ह्यांच्या सोबत जा... ह्या जे काही तुम्हाला विचारणार ते सगळं खरं खरं सांगा... (मग शर्वरीकडे बघत)... तुमच्यावर भरोसा करून आपल्या कोणत्याही असीस्टंटच्या शिवाय मी ह्याला तुमच्या सोबत पाठवत आहे... कुठलीही जबरदस्ती झाली नाही पाहिजे ह्याच्यावर..."

शर्वरीने स्मित हास्य देत आपली मान होकारार्थी हलवली आणि रम्याला आपल्या सोबत घेवून निघाली... शर्वरी गेल्यानंतर जवळ जवळ सगळ्यांनीच दीर्घ श्वास सोडला...


सोनाली... "(गुरव साहेबांना)... तुम्ही चाकू सापडल्या नंतर पण एवढे आरामात कसे बसून राहिले होते... तो चाकू सापडणे कोणती मोठी गोष्ट नव्हती...?"


गुरव साहेब... "(स्मित हास्य देत)... असं वाटतंय आमच्या धर्म पत्नीलाच आमच्या काबिलीयत वरती आशंका आहे... (सोनालीच्या चेहऱ्यावर राग बघून)... अरे यार...! आम्ही ई-मेल मध्ये एस.पी. साहेबांना तेच तर कळवलं होतं कि तो काळे कपडेवाला माणूस आमच्या घरात दोन वेळा येवून गेला आहे... (प्रश्नात्मक मुद्रेत) आणि हा चाकू सापडला कधी आपल्या घरात...? (स्वतःच उत्तर देत)... त्या काळे कपडेवाल्याला आपल्या रूममध्ये किंवा घरात बघितल्या नंतर... खरोखरच हा 'चाकू' जर तोच 'चाकू' आहे... ज्याचं आम्हाला पण पूर्ण विश्वास आहे... तर हा स्वतःच एक मोठा पुरावा असणार गुनेह्गार विरुद्ध पण... आत्ता तर आपण इथे आरामात सिद्ध करू शकतो कि हा चाकू त्या काळे कपडेवाल्या माणसानेच आपल्या घरात किंवा ह्या रूममध्ये ठेवला आहे... डी.एस.पी. शर्वरी पण हि गोष्ट समजली होती... (परत स्मित हास्य देत सोनालीशी) आत्ता तर तुम्ही समजला असाल कि तो चाकू सापडून सुद्धा मी एवढ्या आरामात कसा काय बसलो ते..."


गुरव साहेबांची गोष्ट ऐकून अनघा पण संतुष्ट झाली होती तरी पण...


गुरव साहेब... "अनघा...! तुम्ही पहिले कधी हा चाकू पाहिला होता का... माझा अर्थ असा आहे कि ह्या घरात किंवा ह्या रूममध्ये...?"


अनघा... "नाही सर..! मी आज पहिल्यांदा ह्या चाकुला बघत होती... मला तर माहिती पण नाही पडले कि कधी हा चाकू इथे पोहोचला... काल रात्री पण मी एक सावली माझ्या रूमच्या बाहेर बघितली होती... मग त्याच्या थोड्या वेळा नंतर... मला रम्या दादाची किंकाळी ऐकायला आली होती... घटनेच्या दहशतीमुळे मी तुम्हाला हि गोष्ट सांगितली नाही... खरं सांगू तर तो काळे कपडेवाला माणूस मला कुलकर्णी पेक्षा सेफ वाटत होता...  पण आत्ता त्याचं सारखं सारखं इथे येणे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे..."


गुरव साहेब.. "एकदम बरोबर...!.. हीच तर गोष्ट आहे जी आमच्या डोक्यात सारखी सारखी खटकते.. जर त्याला काही करायचे होते तर त्याने ट्रेन मध्येच तुमच्या सोबत काही पण करू शकला असता पण तिथे त्याने काहीच नाही केले आणि सारखं सारखं ह्या घरात येणे... (गंभीर होत) कोण जाणे त्याचा इरादा काय आहे... त्याच्या विषयी आम्ही जेवढं काही ऐकलं आहे त्यावरून आम्हाला हेच वाटायचं कि कदाचित त्याची कुलकर्ण्याशी काहीतरी दुष्मनी आहे... किंवा कुलकर्णीने काही तरी चुकीचं काम केलं असेल... ज्यामुळे त्याने एवढ्या क्रूरतेने त्याची हत्या केली... पण आत्ता त्याचं असं सारखं सारखं इथे येणे..."


सोनाली... "कदाचित त्याला आत्ता अनघाशी खतरा वाटत असणार... (अनघाला आणि गुरव साहेबांना चिंतीत बघून) तुम्ही दोघे असं चिंता नका करत बसू नका..! सेक्युरिटी खूप टाईट केली आहे... तो आत्ता इथे नाही येवू शकणार... (काही आठवत मग)... चला आत्ता ह्या गोष्टींवरून लक्ष बाजूला करुया... आज तुम्हाला 'पुणे फूट सेंटर'चे एक्स्पर्ट बघायला येणार आहेत... त्यांची येण्याची पण वेळ झाली आहे... गेल्या वेळी ते तुमच्या पायांचे नाप घेवून गेले होते... (खुश होत) देव करो लवकरच तुम्ही ह्या व्हील चेयर शिवाय फिरू शकाल..."


अनघाला काहीच समजत नव्हते तिला सांगत...

सोनाली.. "पुणे फूट सेंटर ती जागा आहे जिथे लोकं लांबून लांबून आपल्या त्या अंगांना, खास करून हाता-पायांना परत मिळवण्यासाठी येतात ज्याला ते लोकं कुठल्या ना कुठल्या तरी अपघातात हरवून बसतात... त्या अंगांना कृत्रिमरूप प्राप्त होतं... खूप साऱ्या लोकांनी ह्याला पसंती दिली आहे... खरं म्हणजे हे काम शल्य-चिकित्सक एका ऑपरेशनमध्ये त्या कृत्रिम अंगांना... शरीरात फिट करतात... पण ते लोकं बोलतात गुरव साहेबांना पहिले त्या पायांची सवय झाली पाहिजे... पुढे जावून जर ते कृत्रिम अंग ह्यांच्या शरीराला बसवणार तेव्हा ह्यांना व्यवस्थित चाललं पाहिजे.. त्यामुळे ती लोकं इथे येत आहेत..."

क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment