Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 25 September 2012

भाग ~ ~ १७ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ १७

घटनेच्या पुढे.... 


गुरव साहेब… “(सोनालीच्या चेहऱ्यावर आनंद बघत...  मस्करीमध्ये )…  आत्ता तुम्हाला पण हे नाही वाटत कि जो आराम मला ह्या चाकांच्या खुर्चीवर भेटतो तो मला पुढे न मिळो हं...”

सोनाली… “(थोडा रागाने)…  कदाचित रम्या सारखी तुम्हाला पण बडबड करायची सवय झाली आहे… जास्त बडबड नका करू आणि पटापट जाऊन तैय्यार व्हा… ते लोकं कधी हि इथे येवू शकतात…”

गुरव साहेबांनी हसत आपली व्हील खुर्ची पुढे ढकलली आणि… जाता जाता त्यांनी अनघाला काही काम सांगितलं जे अनघाला जेवणाच्या टाईम पर्यंत करून द्यायचे होते…

अनघा स्टडीरूममध्ये जाऊन आपलं काम सुरु करते… जवळ जवळ 2-3 तासांच्या अथक परिश्रमानंतर तिने आपलं काम पूर्ण केलं… आणि गुरव साहेबांना स्टडीरूमच्या इंटरकॉम मधून काम पूर्ण झाल्याचं सांगितलं सुद्धा आणि आत्ता सध्या तिच्या जवळ काहीच काम नव्हतं आणि गुरव साहेबांनी पण तिला दुसरं काहीच काम दिल नव्हतं. ती अशीच स्टडी रूमच्या बुक शेल्वजमध्ये ठेवलेल्या पुस्तकांमधून आपलं आवडत पुस्तक घेवून वाचायला लागली... ती आत्ता पुस्तक वाचताच होती कि...

मरने  की भी ना हुयी मेरी उन्हें खबर,
साँसे चली जब तलक करी भला तुने कभी फिकर,
साँसे छोड़ बैठी हैं अब दामन उम्र का,
बैठा रहा वो यार मेरा, कुछ मसरूफ इस कदर...

हा राहुल होता जो जसं टोमणा मारायच्या स्टाईलमध्ये शेर मारत होता… अनघाला काहीच समजलं नाही तर तिने त्याला फक्त एक स्मित हास्य दिलं आणि बोलली…

अनघा… “हा टोमणा का मारत आहात तुम्ही...?”
राहुल… “वस्तुस्थितीला टोमणा मारणं बोलतात…”
अनघा… “हम्म तर तुम्ही आत्ता हि वस्तुस्थिती बोलत होता... मी समजली कि कुठून चोरून आणलेला शेर इथे मारत आहात…”

राहुल... “(नाराज होत)… माझ्या शेरला शिवी दे काही तरी चुकीच बोल पण ते दुसर्यांचे आहेत असं कधीच नको बोलूस… चांगला असो किंवा वाईट कसे हि असो पण मी शेर बोलतो फक्त मी स्वतः बनवलेलं… काय समजली…?”

अनघा… “मला ह्यात काहीच शौक नाही आहे… त्यामुळे मला काहीच आयडिया पण नाही कि हा तुमचाच आहे कि कोणा दुसऱ्याचा...  काय समजलात...?”

राहुल… “तू मला थोडी बदललेली वाटत आहेस… तू पहिल्या सारखी वार्ता नाही करत आहेस... काय गोष्ट आहे... माझ्याशी अजून पर्यंत नाराज आहेस काय… मी तर फक्त मस्करी केली होती...”

अनघा… “हे तुम्ही कोणत्या मस्करीची वार्ता करत आहात...? मी तर तुमच्याशी नाराज नाही आहे… आणि मी कशाला नाराज असणार”

राहुल… “जर असं आहे तर तू मला आहो जाहो का करतेस… पहिल्या सारखी अरे तुरे का नाही करत? अहो जाहो कसं विचित्र वाटतं…”

अनघा... “अरे ते तर मी तुमच्या घरात आहे ना त्यामुळे... आणि आत्ता भलं मी सगळ्यांसमोर तुम्हाला अरे तुरे करणार तर बरं वाटेल काय.. ऐकत जा यार… घडी घडी नाराज होतोस...”

राहुल... “(स्मित हास्य देत) मी भलं आपल्या प्रियाशी कसं नाराज राहणार… (मग काहीतरी आठवत)… तुला आठवतंय मी तुला बोललो होतो कि जेव्हा तू समता नगर मध्ये येशील तेव्हा इथल्या फेवरीट हॉटेलमध्ये जावेदची बिर्याणी खिलवणार… मी आजच तुला तिथे घेवून जाणार आहे...”

अनघा… “भलं आज मी कसं जावू शकते तुमच्या...  आय मीन तुझ्या सोबत… आज आत्ता मला खूप सारं काम आहे… हे सगळं संपवल्या शिवाय मी कुठेच जावू शकत नाही… आणि तुमची तबियत पण ठीक नाही आहे… पहिले डॉक्टरांशी परवानगी घ्यायला पाहिजे...”

अनघा कशी तरी आपला जीव सोडवायला बघत होती पण तो तर हट्टच करत होता... तेवढ्यात तिथे रम्या आला आणि त्याने जेवण जेवाचं आमंत्रण दिलं… सगळे जण दिनिंग तबले वरती पोहोचले तिथे राहुलने सगळ्यांशी प्रीयासोबत बाहेर जाण्याची इच्छा जाहीर केली... पण गुरव साहेब बोलले…  “छोटे.... पहिले डॉक्टरांना विचारायला पाहिजे…”

राहुल… “(चीढत) मी आज निश्चय केला आहे कि मी प्रियाला बाहेर घेवून जाणार म्हणजे जाणार… कोणी काही पण बोलो… (उत्तेजित स्वरमध्ये)

राहुलची उत्तेजना बघून सगळे जण घाबरले मग गुरव साहेबांनी त्याला शांत करून डॉक्टरांना फोन लावला डॉक्टरांनी पण राहुल बाहेर जावू शकतो ह्याची परवानगी दिली... हे समजल्यावर राहुल एकदम खुश झाला पण गुरव साहेब बोलले… “तुम्हाला आम्ही एकाच अटीवरती बाहेर सोडत आहोत तुमच्या सोबत रम्या पण येणार”

---------------------------

आज राहुल खूप खुश होता आणि बाहेर जाण्याची तैय्यारी करत होता... पूर्ण पणे तैय्यार होवून तो बाहेर आला आणि अनघाची वाट पाहायला लागला... जेव्हा ती तैय्यार होवून खाली आली तिच्या सुंदरतेने सगळ्यांचं मन जिंकलं. खूप सुंदर दिसत होती आज अनघा. रम्या पण तैय्यार झाला होता.

राहुल आपल्या प्रियाला घेवून घरातून बाहेर निघाला, घराच्या बाहेर त्याची लांब एकदम सुंदर कार ड्राइवर सोबत त्याचीच वाट पाहत होती. ते सगळेजण बसताच गाडी रस्त्यावर भरधाव धावायला लागली. गाडीत एक विचित्रच शांतता पसरली होती. तरीपण राहुलने अनघाला १-२ तासातच समता नगरचे काही सुंदर स्थळ दाखवलेत जे त्याचे आवडते स्थळ होते.

त्याच्यानंतर काही वेळाने ते लोकं एका हॉटेल समोर आले तिथे राहुलने गाडी थांबवायला सांगितली... राहुलने प्रियाचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला घेवून आतमध्ये गेला.

आतमध्ये खूप वर्दळ होती... हॉटेलच्या म्यानेजरने राहुलला बघताच त्याची फेवरीट टेबल बसायला दिली जी त्याने आगोदरच बुक केली होती. रम्या पण त्यांच्या सोबत न बसता दुसर्या टेबल वरती जाऊन बसला... हे एक राहुलला चांगला वाटलं कमीत कमी इथे तरी प्रिया सोबत प्रेमाचे दोन शब्द बोलू शकेल.. आपल्या प्रियासाठी...  तिथे बसल्यानंतर त्याने प्रियाच्या कॉलेज विषयी काही मजेदार घटना विचारले जे प्रियाने चांगल्या प्रकारे वर्णन करून सांगितलं.

अनघा खूप वेळेपासून आपल्याला कोणीतरी बघत आहे हे नोटीस करत होती... ती सारखी सारखी चारही बाजूने आपली नजर फिरवत होती... पण कोणीच तिला आपल्या ओळखीचा दिसत नव्हता... तरी पण ती अस्वसास्थ फील करत होती. तेवढ्यात ऑर्डर दिल्या प्रमाणे जावेदची बिर्याणी आणखीन काही पकवान तिथे सर्व झाले... जे दोघेही खूप प्रेमाने खात होते.

ते दोघे खातच होते कि अनघाला आपल्या खांद्यांवरती कोणाच्या तरी हातांचा स्पर्श जाणवला. पाठी वळून बघितल्या वरती एक ३५-४० वर्षाचा एक माणूस तिला ओळखणार्या नजरेने बघत स्मित हास्य देत बोलला, “अशी काय बघतेस प्रिया…? ओळखले नाही काय..?” स्वतःला प्रिया बोलावल्यावर अनघा हैराण झाली… तिने आपली मान नकारार्थी हलवली ज्याला बघून तो माणूस हैराण झाला. “कमाल आहे.. ! आत्ता ६ महिन्या पहिले तर तुम्ही आमच्या इथे काम करत होती, आणि आत्ता एवढ्या लवकर आम्हाला विसरून गेली... तुझी मुलगी आत्ता कशी आहे...?”

“मुलगी”ची गोष्ट ऐकून राहुल आपल्या खुर्ची वरून उभा राहिला… तो त्या माणसाला बोलला… “हे बघा...! तुम्हाला काही तरी गैरसमज झाला आहे कदाचित... हि प्रिया जरूर आहे पण हिची कोणीच मुलगी नाही आहे… तुम्ही हिला कोणाच्या तरी धोक्याने चुकीचा प्रश्न विचारात आहात... प्रिया तूच सांग ह्यांना कि तुझं अजून लग्न सुद्धा झालं नाही आहे…” अनघा एका विचित्र दुविधेमध्ये पडली होती, तिला तर काहीच समजत नव्हते... 

अनघा... “हे बघा....! तुम्हाला कदाचित काही तरी गैरसमज झालं आहे… माझं नाव तर प्रियाच आहे पण मी तुम्हाला ओळखत नाही... आणि माझी कोणीच मुलीगी नाही आहे… चल राहुल…! आत्ता आपल्यांना इथून निघालं पाहिजे… खूप वेळ झाली आहे घरातून निघून...”

पहिले राहुल आणि नंतर अनघाला उठलेला पाहून रम्या पण तिथेच आला... रम्या ने पण घरी जाण्याची गोष्ट बोलला... आणि त्याने राहुलचा हात पकडून बाहेर निघण्यासाठी निघाला... पण पाठून तोच माणूस परत बोलला… “मला काहीच गैरसमज झाला नाही आहे प्रिया आणि नाही मी धोका खाऊ शकत.... बोलायचे नाही तर नको बोलूस पण कमीत कमी खोटं तरी नको बोलूस..." राहुल रागाने पाठी वळला आणि त्याच्या कॉलरला पकडून बोलला, “तुला एकदा बोललेलं समजत नाही का..? हि ती प्रिया नाही आहे जी तू समजत आहेस… पळ इथून नाही तर माझ्या प्रियाला त्रास दिल्या बद्दल मी तुझं खून पण करू शकतो…”

रम्याने त्याचा हात कॉलर मधून सोडवला आणि त्याला आपल्या सोबत खेचत बाहेर निघून गेला... अनघा पण ह्या गोष्टींमुळे खूप घाबरली होती आणि लवकरात लवकर घरी जाण्याची घाई करत होती ती पण रम्या सोबत लगेच राहुलचा हात पकडून बाहेर आली... आणि सगळे जण परत गाडीत बसले. सगळ्यांच्या मनात वेग वेगळे गोष्ट चालली होती, वेगवेगळे प्रश्न येत होते.

घरी गुरव साहेब आणि सोनाली पण आपापलं जेवण जेवून त्यांचीच वाट पाहत होते. पण राहुलचा रागाने भरलेला चेहरा बघून ते पण चिंतीत झाले त्यांनी इशार्यानेच रम्याला काय झाले विचारले, पण त्याने आत्ता सध्या काहीच नका विचारू असा इशारा केला. आणि त्यांनी पण काहीच न विचारता सगळ्यांना आपापल्या घरी आराम करायला सांगितले. राहुल पण आत्ता थोडा शांत वाटत होता त्यामुळे तो पण आपल्या रूममध्ये गेला. तो जाताच रम्या आणि अनघाने पूर्ण गोष्ट त्यांना सांगितली जी ऐकून ते दोघेही खूप चिंतीत झाले. सकाळी ह्या विसायी विस्ताराने चर्चा करू हे बोलून गुरव साहेबांनी अनघा आणि रम्याला पण आपापल्या रूममध्ये जायला सांगितले.

थोड्या वेळातच राहुलच्या रूममधून गीटारची खूप चांगली धून सगळ्यांना ऐकायला आली. ज्याला ऐकताच सगळे जण आप आपल्या रूममध्ये कधी झोपले त्यांनाच कळलं नाही.

सकाळ परत आळस देत जागी व्हायला लागली. सकाळी सगळ्यात पहिले उठणारा रम्या पळत पळत आपल्या मालक म्हणजे गुरव साहेबंन्कडे पोहोचला आणि त्यांना पेपरमध्ये छापलेल्या एका हेडलाईन वरती बोट ठेवून दाखवायला लागला.

“पुण्याहून आलेल्या एका व्यापाराची त्याच्या हॉटेल रूममध्ये न्रीशंस, निर्देह हत्या. पोलिसांच्या मते त्याचा मृत देह (डेड बॉडी) हॉटेलच्या स्टाफच्या सुचणे वरून खूप उशिरा रात्री प्राप्त झाली…”

ह्या हेडलाईनच्या खाली त्याच माणसाचा एक फोटो पण चिपकवला होता, ज्याने काल रात्री अनघाला प्रियाच्या रूपात ओळखण्याचा दावा केला होता.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment