Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 30 September 2012

भाग ~ ~ १८ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ १८

घटनेच्या पुढे.... 


गुरव साहेब… “(राम्याकडे आश्चर्याने बघत)…. हा तोच माणूस आहे काय जो…”

रम्या… “(त्यांचा इशारा समजत) …  होय साहेब…! हा तोच आहे.... काल रात्री हाच तर तो होता ज्याने अनघाला प्रिया प्रिया बोलत होता…”

गुरव साहेब...  “(चिंतीत होत)काल रात्री राहुलने त्या माणसाबरोबर जास्त तर केलं नाही ना…?”

रम्या… “भांडले तर होते साहेब…! पण ती तर कोणती मोठी गोष्ट नव्हती... दुसरा कोणी पण त्यांच्या जागी असतं तर हेच केलं असतं जे छोटे मालकाने केलं

गुरव साहेब… “(दीर्घ श्वास सोडत)तरी पण…! आत्ता राहुलला कोर्टाचा सामना तर करायलाच लागणारमी चुकी केली जे त्याच्या हट्टा पायी त्याला बाहेर जावू दिलं तेत्याला आत्ता बाहेरच जावू द्यायला नाही पाहिजे होतंअसो आत्ता काय करू शकतो… (काही विचार करत)…. लवकर जाऊन सोनालीला हि गोष्ट सांग आणि तिला इथे बोलावून आण लवकरराहुल आणि अनघा कुठे आहेत…?”

रम्या… “ते दोघे तर आत्ता आपापल्या रूममध्येच असतील…!”
एवढं बोलून रम्या सोनालीला बोलवायला निघून जातो आणि थोड्या वेळातच सोनाली गुरव साहेबांकडे येते. तिच्या चेहऱ्यावर चिंता साफ दिसत होती. कदाचित तिला रम्याने सगळी घटना सांगितली असावी

सोनाली… “(चिंतीत स्वर मध्ये) हे काय झालंराहुलला काही त्रास तर नाही होणार ना…”

गुरव साहेब… “त्याच कामासाठी तर आम्ही तुम्हाला इथे बोलावले आहे... लवकर डॉक्टर साहेबांना इथे बोलवाआणि त्यांना त्यांचा लेटरप्याड पण सोबत आणायला सांगा. पोलिसांच्या पडताळणीमध्ये राहुलचं नाव येण्यामध्ये जास्त वेळ नाही लागणार…”

सोनालीने फटाफट डॉक्टरांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी फोन केला. रम्या पण राहुल आणि अनघा आपापल्या रूममध्ये आहेत कि नाहीत ह्याची पुष्टी करून परत आला होता. त्याच्या मते राहुल तर झोपला होता आणि अनघा आपल्या घरी फोन वरती वार्ता करत होती तथा आंघोळ करून खाली येण्याचं बोलत होती. रम्याने पण तिला ह्या खुनाबद्दल नाही सांगितलं होतं.

थोड्या वेळातच डॉक्टर साहेब तिथे पोहोचले, गुरव साहेबांनी त्यांना पूर्ण दृस्थांत समजावून सांगितला. कालची पूर्ण घटना ऐकल्या नंतर डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेत बोलले, “राहुलची मेंटल कंडीशन आत्ता आणि ह्या आधी एवढी अस्थिर कधीच राहिली नाही कि तो काही असं करेलहि प्रिया नावाची मुलगी जरूर त्याची एकदम खास राहिली आहेआणि प्रियाचा चेहरा खरोखर तिच्याशी मेल खात असेलराहुल may be a unwell minded personality but he cant be disguised by a well known face ever…. (नंतर आपल्या लेटरप्याड मधून एक कागद फाडून)राहुलला पोलिसांच्या पडताळणी मध्ये वाचवण्यासाठी मी त्याचा एक मेंटल कंडीशनचं सरटीफिकेट इश्यू करतो… (गुरव साहेबांकडे स्मित हास्य देत)कोर्टात ह्याचा वापर कसा करायचा आहेहे तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जाणता…”

गुरव साहेब… “ह्याच सरटीफिकेट साठी तर खास करून मी तुम्हाला इथे बोलावले आहे…  आत्ता मी बाकीची कार्यवाही लवकरच कोर्ट चालू होताच करून टाकतोफक्त भीती ह्याच गोष्टीची आहे कि आमच्या हातात कोर्टाचा स्टे-ऑर्डर येण्याच्या आगोदर पोलीस ईथे यायला नाही पाहिजेत…”

डॉक्टर… “जर तुम्ही बोलत असाल तरस्टे-ऑर्डर भेटायच्या आगोदर मी राहुलला आपल्या सोबत पागल खाण्यात घेवून जाऊजसंच तुम्हाला तो ऑर्डर भेटेल, तुम्ही राहुलला परत बोलावून घ्या…”

गुरव साहेब… “नाही डॉक्टर साहेब...! मी आपल्या भावाला पागल खाण्यात पाठवण्याचा विचार सुद्धा नाही करू शकततुमचे खूप खूप आभार जे तुम्ही एवढ्या लवकर ईथे आलात…”

डॉक्टर समजला कि आत्ता गुरव साहेब आपल्या सभ्य अंदाज मध्ये त्याला इथून निघायला सांगत आहेत, इशाऱ्याला समजून तो तिथून जाण्यासाठी परवानगी घेतो.

इथे डॉक्टर तिथून निघतात आणि तिथे अनघा आपल्या रूममधून खाली येते, तिला पण हि गोष्ट सांगण्यात येते…. हे ऐकताच आशानुरूप तिचे हात पाय फुगायला लागतात. मुश्कील ने तिला एक हफ्ता पण नाही झाला होता आपल्या घरातून निघून आणि प्रत्येक दिवशी काही ना काही तरी नवीन आणि खतरनाक घटनातिच्या सोबत घडत होत्या. बेचारी फक्त आपल्या पारिवारिक अडचणीमुळे एवढं सगळं सहन करतेय, नाही तर नॉर्मल कंडीशनमध्ये तर ती केंव्हाचीच इथून आपल्या घरी पाळली असती. आत्ता गुरव साहेब अनघाला काही बोलणार, तेवढ्यात  त्यांचा एक नोकर त्यांना पोलीस आल्याची सूचना देतो

गुरव साहेब… “हि तर अजूनच गडबड झाली… (नोकराशी) त्या सगळ्यांना पूर्ण आदराने बसायला सांगा आणि काही तरी खायला प्यायला द्यामी आत्ता येतोच…”

निराशेने सोनालीकडे बघतातसोनाली त्यांच्या जवळ येवून त्यांच्या खांद्यावरती आपला हात ठेवून त्यांना दिलासा देते आणि त्यांची व्हील खुर्ची घेवून लिविंग रूममध्ये जाते. लिविंग रूममध्ये पोलिसांचा एक थ्री स्टार इन्स्पेक्टर आपल्या सोबत दोन कॉन्स्टेबलला घेवून बसला होता... खरंम्हणजे खूप मामुली चौकशीसाठी मामुली सब-इन्स्पेक्टर पण येवू शकतो पण ईथे गोष्ट तर शहरातल्या प्रसिध्ध घराण्याची म्हणजे गुरव घराण्याची आहे. गुरव साहेबांना येतांना बघून ते सगळे आपल्या जागेवरून उठतात.

गुरव साहेब… “अरे बसा बसा…! (सिनिअर इन्स्पेक्टर कडे बघत)आज सकाळी सकाळी का त्रास घेतला… ? काही खास कारण आहे काय…?”

सिनिअर इन्स्पेक्टर… “होय गुरव साहेब..! कारण तर खासच आहे त्यामुळे सकाळी सकाळी तुम्हाला त्रास देतोयकाल रात्री शहरात एक खून झाला आहेज्याच्या विषयी चौकशी करून हे माहिती पडलं आहे कि तुमच्या छोट्या भावाचं त्या माणसाशी भांडण झालं होतं आणि त्यांनी त्या माणसाचा जीव घेण्याची वार्ता पण केली होतीआम्ही त्याच विषयी त्यांची चौकशी करायला आलो आहोत. तुम्ही जरा त्यांना आमच्या समोर बोलवा…”

गुरव साहेब… “जर तुम्हाला माहिती आहे कि तो आमचा भाऊ आहे तर तुम्हाला त्याच्या विषयी पण जाणीव असेल इन्स्पेक्टर साहेब…”

सिनिअर इन्स्पेक्टर… “जर तुमचा इशारा त्यांच्या डोक्याच्या परिणामाच्या ईथे आहे तर आम्हाला जाणीव आहे, (मग काही विचार करून) ठीक आहे तर चला त्यांच्या सोबत जी मुलगी होती त्यांनाच बोलवाजरा त्यांच्याशीच काहीतरी चौकशी करतोह्या मध्ये तर काही त्रास नाही आहे ना तुम्हाला…”

गुरव साहेब… “त्यांच्याशी चौकशी केली तर मला काहीच हरकत नाही आहेआणि खरं सांगू तर आमचा भाऊ जर नॉर्मल डोक्याचा माणूस असला असता तर आम्ही त्याला पण ईथे बोलावले असतेपण आत्ता तर डॉक्टरांच्या परवानगी शिवाय आम्ही त्याला तुमच्याशी भेटवू शकत नाही…. (सोनालीशी)तुम्ही जरा अनघाला ईथे बोलावून आणा…”
 
 


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment