Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 12 September 2012

भाग ~ ~ १३ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????


भाग  ~ ~ १३

घटनेच्या पुढे.... 

गुरव साहेबांची गोष्ट ऐकून राहुल मुकाट्याने परत येवून बेडवर पहुडतो. मग नर्स पण त्याला एक गोळी खायला देते. त्या गोळीच्या प्रभावामुळे तो लगेच झोपी जातो.

गुरव साहेब... "माझ्या मते आपल्यांना आत्ता इथून निघाले पाहिजे... नाहीतर राहुलची झोप मोड होईल... नर्स पण आहेत इथे... अनघा तुम्ही पण आत्ता आराम करा..."


मग सगळेजण तिथून निघायला लागतात... तेवढ्यात गुरव साहेबांचा फोन वाजतो... त्यांनी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीची गोष्ट ऐकून फक्त  'हु - हा' करत होते... त्याच्यानंतर बोलले "मला त्यांच्याद्वारे काही असंच काम करण्याची आशा होती. आत्ता तुम्ही फटाफट ते काम करा जे मी तुम्हाला सांगितले आहे... आणि ते काम करून लगेच माझ्याकडे या.." एवढं बोलून त्यांनी फोन कट केला आणि सगळ्यांना स्मित हास्य देत ते रम्याला आपल्या रूममध्ये घेवून जाण्यासाठी सांगितले.


जवळ जवळ एक-सव्वा एक तासांच्या आत एक माणूस त्यांच्याजवळ येवून कोणतं तरी कागद देवून निघून जातो, तो कागद बघून गुरव साहेबांच्या चेहऱ्यावर एक आनंदमयी स्मित हास्य तरळून जातं.


अनघा आज स्वतःला मानसिक रूपाने खूप थकलेली वाटत होती. सकाळ पासून जे जे घडलं होतं ते एका फिल्मवानी तिच्या नजरे समोरून जात होतं... नाश्त्या नंतर डी.एस.पी. शर्वरीचं येणं, नंतर राहुल तिला प्रिया समजून उत्तेजित होणं आणि मग स्वतः ती प्रिया बनण्याची इच्छा जाहीर करणं... ती स्वतः आपल्या निर्णयाने हैराण होत होती... पण आत्ता जसं गुरव साहेब बोलले होते कि एकदा पुढे गेलो तर मागे वळता येणार नाही... हाच सगळा विचार करत ती आपल्या रूममध्ये आली... थोड्या वेळातच रात्रीच्या जेवणाची वेळ होणार होती, तोपर्यंत सोनालीने तिला आराम करण्यासाठी आणि आपल्या परिवाराशी वार्ता करण्यासाठी सांगितले... आपल्या परिवाराशी वार्ता करून आत्ता ती स्वतःला रेल्याक्स फील करत होती...


आपल्या परिवाराशी वार्ता केल्यानंतर ती आंघोळ करून फ्रेश होण्याचा निर्णय घेत ती बाथरूममध्ये घुसली. शावर घेतल्या नंतर ती बाहेर आली तेव्हा तिने रूमच्या खिडकीमध्ये कोणाची तरी सावली बघितली.... ज्याला बघताच ती खूप घाबरली... तिच्या डोक्यात परत तो काळे कपडेवाला माणूस फिरायला लागला... पण तिच्या बघता बघता ती सावळी खिडकी मधून गायब झाली. अनघा आत्ता ह्या गोष्टीचा विचारच करत असते कि तिच्या कानात कोणाची तरी किंकाळी ऐकायला येते...


सोनाली... "अरे हा आवाज तर..."


सोनाली चिंतेत धावत पळत गुरव साहेबांच्या स्टडी रूममध्ये येते आणि त्यांची खुशाली विचारते... गुरव साहेब आपले काही  गरजू पेपर्स चेक करत होते... हि किंकाळी ऐकून त्यांनी आपले पेपर्स खाली ठेवून बाहेर निघण्याची तैय्यारी करत होते कि सोनाली तिथे आली... रम्या जो काही वेळापूर्वी गुरव साहेबां जवळ होता... त्याला तिथे न बघून सोनाली त्याच्या विषयी त्यांना विचारते...


गुरव साहेब... "त्याला तर मी आपली एक फाईल आणायला पाठवलं होतं... कुठे हि किंकाळी... मला लवकर बाहेर घेवून चल... माहिती नाही आजकाल आपल्या घराला कोणाची नजर लागली आहे..."


स्टडी रूममधून बाहेर येताच घरातील काही नोकर पण तिथे आले होते... हे सगळे तीच किंकाळी ऐकून आले होते आणि चिंतीत दिसत होते... आणि विचारच करत होते कि हि किंकाळी कोणाची आहे... तेव्हा लगेच गुरव साहेबांना काहीतरी आठवले आणि त्यांनी फटाफट २-३ नोकरांना दुसऱ्या माळ्यावर अनघाच्या रूमकडे जायला सांगितले... आणि तिला आपल्या सोबतच खाली घेवून यायला सांगितले... सगळे नोकर तर दिसत होते पण रम्या कुठेच दिसत नव्हता... त्याची अनुपस्थिती बघून गुरव साहेबांनी आणि सोनालीने त्याला पण शोधण्यासाठी काही नोकरांना पाठवले.


गुरव साहेबांनी मेन गेटवर उभे असलेल्या शिपायांना बोलावून पूर्ण घराचं एक चक्कर लावायला सांगितली... जे नोकर वरती अनघाला घ्यायला गेले होते त्यांच्या सोबत आत्ता अनघा पण खाली आली होती... अनघाचं पूर्ण शरीर भीती मुळे घामाने भिजलं होतं... पहिले त्या सावलीला बघून नंतर ती किंकाळी ऐकून तिची हालत खूप विचित्र झाली होती... बाहेरून एक शिपाई पळत आला आणि तो गुरव साहेबांना बोलला कि घराच्या पाठी रम्या घयाळ अवस्थेत डोकं पकडून बसला होता... त्याच्या डोक्याला मार लागला होता आणि तिथून रक्तस्त्राव होत होतं... त्या शिपाया पाठो पाठ २-३ शिपाई रम्याला उचलून आणत होते, ज्याला बघतच गुरव साहेब आणि सोनाली एकदम चिंतेत दिसायला लागले... सोनालीने लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावले आणि स्वतःच डीटोल आणून त्याची जखम साफ करायला लागली.


रम्याच्या डोक्याला एक 'टेंभू' निघाला होता जिथून रक्त वाहत होतं... थोड्या वेळातच डॉक्टर तिथे पोहोचले आणि त्यांनी रम्याला तपासून जखम खूप मामुली आहे हे सांगून त्यांनी त्याची ड्रेसिंग केली आणि एक इजेक्शन देवून त्याला काही औषधं खायाला दिलीत आणि निघून गेले... थोड्या वेळेतच इजेक्शन आणि औषधांच्या प्रभावामुळे रम्याने आपले डोळे उघडले आणि चारही बाजूने बघत आपली स्थिती जाणण्याचा प्रयत्न करायला लागला... त्याला उठताना बघून सोनालीने त्याला झोपूनच सगळं काही सांगायला सांगितले.


सोनाली... "(चिंतेत) हे सगळं कोणी केलं रम्या.! कोणी मारलं तुम्हाला...?"


रम्या... "माहिती नाही मालकीणबाई..! मी तर गुरव साहेबांनी आणायला सांगितलेली फाईल घेवून जात असताना मला आठवले कि पाठच्या लॉनमध्ये मी पाण्याचा नळ चालू ठेवून आलो आहे... ते काय आहे आज माळीने सुट्टी मारली आहे, त्यामुळे मी तिथल्या झाडांना पाणी देण्यासाठी नळ चालू केला होता. तिथे गेल्यानंतर बघतो तर काय एक लांब शिढी जी आपण घराची पेंटिंग करण्यासाठी वापरतो... (परत काही आठवून) अरे ओ राजू जा जरा मी परत नळ तसाच सोडून आलो आहे... जा आणि नळ बंद करून ये..."


एवढ्या तणावाच्या वेळी पण त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून सगळे जण हसायला लागले.


सोनाली... "(स्मित हास्य देत) नळ नंतर पण बंद होवू शकतो... पहिले तुम्ही तुमचं बोलणं पूर्ण करा... आणि आम्हाला सांगा कि हे सगळं कोणी केलं..?"


रम्या... "हो तर मी काय सांगत होतो... शिढी बघून माझं डोकं
फिरलं... आणि विचार केला कि ह्या वेळी कोण इथे पेंटिंग करत आहे... जेव्हा जवळ गेल्यावरती बघितलं तर काय एक पूर्ण पणे काळे कपडे घातलेला माणूस फटाफट खाली येत आहे..."

काळे कपडेवाल्याची गोष्ट ऐकून सगळेजण दचकले आणि गेल्या रात्रीची गोष्ट आठवायला लागले. जेव्हा कोणीच अनघाची गोष्ट ऐकली नाही आणि तो तिचा भास आहे हे सांगितले होते... अनघा तर काळे कपडेवाल्याची गोष्ट ऐकून भूत बनून उभी होती.... 'तिच्या मनात फक्त एकंच गोष्ट येत होती कि तिच्या बंद खिडकीजवळ जी सावली दिसली होती कदाचित ती त्या काळे कपडेवाल्याचीच असणार...'

गुरव साहेब... "मग काय झालं रम्या..?"

रम्या... "मग काय साहेब...! मी पण तिथेच खाली उभा राहिलो, जेव्हा तो जवळ जवळ ५-६ शिड्यांजवळ आला तेव्हा मी त्याला खालून आवाहन देत बोललो 'ये साल्या...! मी पण तुझीच इथे खाली वाट बघत आहे...' तो मला खाली बघून दचकला... आणि लगेच माझ्या वरती उडी मारली... मी विचार पण नाही केला होता कि तो हलकट माझ्यावर उडी मारेल... आणि मी बिचकलोच... माहिती नाही त्याने माझ्या डोक्यावर काय मारले साहेब...! पूर्ण भूमंडळ माझ्या डोळ्या समोरून फिरायला लागलं.... आणि जेव्हा माझे डोळे उघडले तर मी इथे... तुमच्या समोर पडलो होतो..."

गुरव साहेबांनी सगळ्या शिपायांना परत बोलावून खूप सुनावले आणि पूर्ण घराची बारीकीने पडताळणी करायला सांगितली... रम्याला त्याच्या रूममध्ये आराम करण्यासाठी पाठवण्यात आले... रात्रीच्या जेवणाची पण वेळ झाली होती... तिघेही एकदम गप्प जेवण जेवत होते... सोनालीने बघितले कि अनघाने आपल्या प्लेट मधून थोडेसेच घास खाल्ले आहेत. अनघाचा चेहरा अजून पर्यंत चिंतेत दिसत होता... सोनाली तिला सांत्वना देत...

सोनाली... "तुम्ही आज रात्री पासून आमच्या रूमच्या बाजूच्याच रूममध्ये राहणार... वरती तुमचं राहणं मला ठीक नाही वाटत... माहिती नाही तो कोण आहे जो हात धुवून तुमच्या पाठी पडला आहे आणि आत्ता इथपर्यंत येवून पोहोचला आहे... त्या दिवशी तर आम्ही तुझ्या गोष्टीला तुझा भास समजला होता पण आत्ता रम्याची गोष्ट ऐकून आम्ही पूर्ण पणे अश्वस्त आहोत...  (गुरव साहेबांकडे बघत) मी ठीक करत आहे ना..?"

गुरव साहेब... "(स्मित हास्य देत) तुम्ही कधी चुकीचं केलं आहे का... आणि तसं पण... माझी काय हिम्मत जी तुमची गोष्ट मान्य नाही करणार..."

सोनाली... "(लाजत) तुम्ही पण ना ! कुठे बोलत आहात ते तरी लक्षात घ्या...बस...!"

त्या दोघांचं प्रेम बघून अनघा पण हसायला लागली...

सोनाली... "आत्ता आपल्यांना हि गोष्ट पोलिसांना सांगितली पाहिजे... जर पहिलेच पोलिसांना बोलावले असते तर कदाचित रम्या जखमी होण्यापासून वाचला असता..."

गुरव साहेब... "तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात... मी उद्याच एसपी साहेबांशी वार्ता करतो... आत्ता तर झोपायची वेळ झाली आहे... त्यांना त्रास देणे ठीक नाही राहणार.."

सोनालीने त्यांची गोष्ट मान्य केली आणि अनघाला तिचा नवीन कमरा दाखवण्यात आला... हा वाला कमरा पहिल्यावाल्या रूमपेक्षा मोठा होता... आणि खूप चांगल्या प्रकारे सजलेला होता... अनघा एवढी थकलेली होती कि नरम अंथरून भेटताच लगेच झोपी गेली...

-------------------------

बाहेरून येणारी सूर्याची किरणं अनघाच्या चेहर्यावरती पडून तिला जागवण्याचा प्रयत्न करत होती... अनघा पण सूर्याची किरणं आपल्या चेहर्यावरती जाणून आपली कुशी दुसरी कडे करून झोपण्याचा प्रयत्न केला... अचानक तिला जाणीव झाली कि सूर्याच्या किरणामध्ये आणि तिच्यामध्ये कोणीतरी आलं आहे... तिने आपले डोळे उघडून पाहिलं तर तिला राहुलचा हसता चेहरा तिला दिसला, जो आपल्या प्रेमिकाला सूर्याच्या किरणा पासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment