Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 6 October 2012

भाग ~ ~ १९ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ १९

घटनेच्या पुढे.... 


नंतर गुरव साहेबांनी सोनालीला काही तरी इशारा केला, जो सोनाली खूप चांगल्या प्रकारे समजली होती आणि अनघाला बोलवायला निघून गेली. थोड्या वेळातच अनघा तिथे हजर होती पण सोनाली तिच्या सोबत नव्हती… अनघा सिनिअर इन्स्पेक्टरच्या समोरच्या सोफ्यावर बसते….
अनघा… “हम्म बोला इन्स्पेक्टर साहेब..! विचारा, तुम्हाला काय विचारायचे आहे ते…?”

सिनिअर इन्स्पेक्टर… “काल जे काही झाले होते ती घटना पूर्ण आम्हाला सांगा प्लीज..”
अनघा… “हम्म..! काल रात्री आम्ही… माझं म्हणणं आहे कि मी, राहुल आणि रम्या काही वेळ बाहेर फिरल्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होतो तेव्हा अचानक एक माणूस येवून मला धोख्यात दुसरी मुलगी समजून त्रास द्यायला लागला… मी आणि राहुलने त्याला सारखं सारखं समजावून पण तो ऐकत नव्हता आणि आपल्या गोष्टींवर्ती अडीग होता… त्याचं बोलणं असं होतं जे राहुलला खूप वाईट वाटणं साहजिकच आहे, आणि त्याच मुळे रागात राहुलने त्या माणसाची कॉलर पकडून फक्त धमकावले होते… पण ती तर फक्त एकाच वेळेची रियाक्षन (reaction) होती… nothing else…”
 
गुरव साहेब अनघाला एवढं आरामात बोलताना बघून खूप प्रभावित झाले. ती आत्ता कोणत्या सक्षम वकीला सारखी आपल्या क्लायन्टच्या भल्याच्या गोष्टी विचार करून पूर्ण स्टेटमेंट देत होती आणि बोलत होती…. राहुलची पण गोष्ट सांगितली आणि त्याच्या हरकतीला एक जीनियन रियाक्षन पण सांगितलं तिने.  सिनिअर इन्स्पेक्टरने आपली चहा संपवली होती आणि त्याला आत्ता काही सुचत पण नव्हते, पण तरीही चलानच्या पहिले त्याने राहुलच्या रात्रभराची अकटीविटी (activity) विषयी विचारलेच. ज्याच्या उत्तरामध्ये गुरव साहेबांनी पूर्ण घराच्या नोकरांना तुम्ही विचारू शकता एवढं बोलून त्यांना गप्प केलं. सिनिअर इन्स्पेक्टरला आत्ता त्या घरात थांबण्याचा काहीच फायदा दिसत नव्हता, त्याने गरज पडल्यावर परत येण्याची वार्ता करून आपल्या सोबत आणलेल्या कॉन्स्टेबलस्ना घेवून परत निघून गेला.
 
गुरव साहेबांनी आपली व्हील चेयर फिरवून राहुलच्या रूमच्या दिशीने जायला लागले, आत्ता ते आपल्या भावाला स्वतःच बघणार होते. राहुल आपल्या रूममध्ये झोपला होता. राहुल आपल्या बेडवरती उलटा म्हणजे पोटावरती झोपला होता. गुरव साहेबांच्या उठवन्यामुळे तो आपले डोळे चोळत उठला. त्याला बघून गुरव साहेब हैराण झाले. राहुलचा शर्ट जो त्याने काल रात्री बाहेर जाण्यासाठी घातला होता त्याचा वर लाल लाल डाग लागले होते, त्यामुळे साफ साफ माहिती पडतं कि ते रक्ताच्या डागाशिवाय काहीच असू शकत नाही. विचलित झालेले गुरव साहेब लगेच स्वतःला सांभाळून आपली व्हील चेयर दरवाजा जवळ घेवून जातात आणि दार लावून त्याला आतून कडी लावतात. रूममध्ये लागलेल्या इंटरकॉमवरून त्यांनी सोनालीला फोन करून लवकरात लवकर तिथे येण्यासाठी सांगितले. फोनवरती गुरव साहेबांचा चिंतीत स्वर ऐकून सोनाली पण तिथे लगेच येते. राहुलला बघून तिची पण हालत गुरव साहेबांसारखीच झाली. तिला काहीच समजत नव्हते कि हे काय आहे आणि का आहे…?
 
राहुल जो अजून पर्यंत आपले डोळे चोळत होता… तो पण आपल्या भावाला आणि वहिनीला असं विचलित झालेलं बघून भासित झाला होता. त्याला काहीच समजत नव्हते कि त्या दोघांना झाले तरी काय होते… एकदम निरागस मुलासारखा तो डोळे मोठे करून आपल्या भावाला आणि वहिनीला बघत होता…. गुरव साहेबांनी आपली व्हील चेयर पुढे करून आपल्या भावाचे हात पकडले. राहुलला आपल्या भावाच्या हातामध्ये एक प्रकारच्या कंपनाची जाणीव होत होती.
 
राहुल… “काय झालं दादा…! तुम्ही दोघे एवढे चिंतीत का दिसत आहात… (मग काही तरी विचार करून)… माझी प्रिया कुठे आहे… ती ठीक तर आहे ना …?... (मग सोनालीकडे बघत)… वहिनी…! तुम्ही सांगा काय झाले ... सगळं ठीक आहे   ना … (मग आपल्या बेडवरून उठत )… मी प्रियाला बघायला जात आहे … ती ठीक तर आहे ना …!”
 
त्याला उठतांना बघून सोनालीने पुढे येवून त्याला थांबवले आणि त्याला रूममध्ये लागलेल्या आरश्याकडे घेवून गेली आणि त्याला त्याच्या शर्टावरती लागलेला डाग दाखवते. राहुल पण त्या डागांना बघून हैराण झाला … त्याला काहीच समजत नव्हते .
 
राहुल .. “(निरागसपणे)  काल रात्री जेवण जेवतेवेळी माझ्या शर्टावरती  काहीच लागले नव्हते… रात्री मी गिटार वाजवत  कधी झोपलो मला समजलेच नाही… मग हा सौस (saus) कुठून लागला…. मी आत्ता ह्याला चेंज करून येतो…”
 
आणि आपला तो शर्ट काढून एक टी-शर्ट  घालतो… रक्तांचे डाग लागलेला तो शर्ट ज्याला तो सौस समजत होता त्याला साफ करण्यासाठी तो त्या शर्टला बाथरूममध्ये धुण्यासाठी ठेवायला लागतो तेव्हा लगेच सोनालीने तो शर्ट आपल्या हातात घेतला. राहुलच्या विचारण्यावर तिने तो शर्ट आपल्या निगराणीमध्ये धुवण्याची गोष्ट बोलून त्याला समजवले राहुल आत्ता रूममधून बाहेर निघून आपल्या प्रियाला भेटायला बघत होता, पण गुरव साहेबांनी तिला बोलावून आणायची गोष्ट बोलून त्याला शांत केलं.... थोड्यावेळातच अनघाला पण त्याच रूममध्ये बोलावण्यात आले आणि तिला बोलावण्यासाठी भलं रम्यापेक्षा चांगला माणूस  ह्या घरात अजून कोण असू शकतं. थोड्या वेळातच रूममध्ये रम्या आणि अनघा पण हजर होते. गुरव साहेब आणि सोनालीला काहीच समजत नव्हते कि रक्तांच्या डागावाली गोष्टीची सुरुवात कशी करावी ते…
 
त्या दोघांची चिंता बघून अनघा आणि रम्याने एकमेकांना पाहिले आणि काहीच न समजल्यामुळे त्यांनी आपआपले  खांदे  उचकावले. मग सोनालीने राहुलला त्या रूममधून बाहेर नेण्याचा विचार करून त्याला आपल्या सोबत यायला सांगितले. राहुलने कारण विचारल्यावर “काही तरी वस्तू दाखवायची आहे ” असं बोलून त्याला आपल्या सोबत बाहेर घेवून आली वस्तू दाखवण्याचा तर एक बहाणा होता पण खरं कारण हे होतं कि ति गुरव साहेबांना एक संधी देत होती जेणे करून शर्ट वरती लागलेल्या डागांची गोष्ट ते रम्या आणि अनघाला सांगतील.
 
सोनाली आणि राहुल रूममधून बाहेर गेल्यानंतर …
गुरव साहेब … “(एक दीर्घ श्वास सोडत) … माहिती नाही हे का आणि  काय होत आहे आमच्या घरात … (नंतर  शर्टवरती रक्ताचे डाग लागलेली गोष्ट सांगून)… हे डाग जरूर रक्ताचेच आहेत… आम्हाला पूर्ण  विश्वास आहे … पण ते आले कुठून हे  समजत नाही आहे मला …” शर्टाची गोष्ट ऐकून अनघा आणि रम्याची शुद्धच हरवली  होती.
 
रम्या …  “काल पूर्ण रात्र तर छोटे मालक आपला तुनतुणा वाजवत बसले होते … जवळ जवळ दीड दोन वाजेपर्यंत मी इथे त्यांच्या रूममध्ये बसून ते ऐकत होतो, मग सकाळी लवकर उठण्यासाठी मी आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो …  तुनतुणा वाजवतेवेली छोटे मालक एकदम शांत मुद्रेत बसले होते …. मग कसं आणि कधी त्यांच्या कपड्यांवर्ती हे डाग लागू शकतात ..!”
 
गुरव साहेब  “हेच तर मला समजत नाही आहे रम्या ..! कि त्याच्या कपड्यांवर्ती हे डाग आले कुठून … तो रूममधून गेला नाही  त्याच्या रूममध्ये  कोणी आले नाही … मग कुठून तो डाग लागला …?”
 
हि गोष्ट होतंच होती कि सोनाली तिथे पोहोचली … तिच्या चेहऱ्यावर भीती साफ दिसत होती … तिला बघून गुरव साहेबांनी तिच्या भीतीचे कारण विचारले …
 
सोनाली … “ति डी. एस. पी. शर्वरी आली आहे … आणि तुमच्याशी भेटायला बघते आहे … काय माहित का पण मला ह्या वेळी कोणत्या तरी अनहोनीची आशंका होत आहे …”
 
गुरव साहेबांनी आपली व्हील चेयर सोनाली जवळ घेवून गेले आणि  तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला चिंता न   करण्यासाठी बोलले  आणि रम्याला आपली व्हील चेयर लिविंग रूममध्ये डी.एस.पी.च्या जवळ घेवून जायला सांगितले … अनघा पण त्यांच्या पाठी पाठी लिविंग रूमच्या दिशेने जातच होती कि  गुरव साहेबांना एकदम राहुल लक्षात आला …  सोनालीला जेव्हा ह्या विषयी विचारल्यावर तिने एक मधुर स्मित हास्य देवून सांगितले कि राहुलला काही दागिने दाखवले आहेत ज्या मधून तो आपल्या प्रियासाठी काही दागिने पसंत करत आहे … हि  गोष्ट  ऐकून गुरव  साहेब हस्ल्यावाचून राहिले  नाही आणि अनघाच्या गालांवरती लाली पण बघण्यालायक  होती . मग सगळे जण लिविंग रूमच्या इथे निघाले .
 
लिविंग रूममध्ये शर्वरी एका सोफ्यावर बसून कोणतं तरी पुस्तक वाचत होती, आज ति एकटी आणि साध्या वर्दीमध्ये आली होती. गुरव साहेबांना बघून ति आपल्या जागेवरून उठून उभी राहिली. गुरव साहेबांशी हात मिळवून तिने अनघा आणि रम्या वर एक कटाक्ष टाकला .
 
शर्वरी … “(रम्या  आणि अनघाकडे बघत) काल तुम्ही लोकं खूप फिरले होता शहरात .. आणि नंतर त्या बेचाऱ्याला असा श्राप देवून आलात कि तो बेचारा आजचा सूर्यच नाही बघितला त्याने…”
 
रम्या … “आम्ही कोणताच श्राप दिला नव्हता… तो स्वतः येवून आम्हाला त्रास देत  होता… बस मग काय झाले छोट्या मालकांनी त्याला झाडलं आणि नंतर तो मेला किंवा कोणी मारून गेलं ह्यामध्ये… आमच्या छोटे मालकाचा किंवा आमच्या सर्वांचा ह्यात काहीच दोष नाही आहे  ‘हवालदारीण म्याडम'…”
 
शर्वरी … “(हवालदारीण म्याडम ऐकून चीढत गुरव साहेबांना …)… असं वाटतंय तुमच्या इथे सगळेच्या सगळे वकील आहेत  घरातला नोकर पण लॉंजिकल गोष्ट करतो… असो तुमच्या माहितीसाठी सांगते  मी प्रत्येक खुनाची पडताळणी नाही करत पण आमच्या एक्स्पर्ट नुसार मला हि माहिती माहित पडली आहे कि हा खून पण त्याच अंदाजामध्ये झाला आहे ज्या अंदाजामध्ये कुलकर्णीचा झाला होता... जवळ जवळ शे सव्वाशे (१००-१२५) वार चाकूने केले होते त्या माणसावरती पण… आणखीन एक गोष्ट… हा  माणूस  कुलकर्णीचा प्रोपर्टी डीलर होता. कुलकर्णी ज्या पण बिल्डींग्स बनवत होता त्यांच्या मार्केटिंगसाठी ह्याच माणसाची फर्म चालवत होती … (मग अनघाकडे बघत)… काय प्रिया म्याडम …! तुमचं काय बोलणं आहे ह्या विषयी…?”
 
शर्वरीच्या तोंडून स्वतः साठी ‘प्रिया’ ऐकून अनघा सोबत तिथे उपस्थित बाकीचे सगळे पण दचकले …. त्या सगळ्यांची प्रतिक्रिया बघून शर्वरी स्मित हास्य देत बोलली ..
 
शर्वरी...  “काय झालं…! मी कोणती चुकीची गोष्ट बोलली काय …? ह्या घरात तुम्हाला ह्याच नावाने संबोधलं जातं ना अ-न -घा  म्याडम ..”
ती एक एक अक्षरांना वेगळं वेगळं करून त्यावरती जोर देत बोलली ..
 
गुरव साहेब  “तुम्हाला बोलायचे काय आहे डी .एस .पी. म्याडम …? आम्हाला काहीच समजत नाही आहे… साफ साफ  एकदम सरळ भाषेत बोला …”
 
शर्वरी … “मला पण काहीच समजत नाही आहे गुरव साहेब … ! एक खून ट्रेन मध्ये झाला … जिथे खुनी खूप क्रूरतेने ह्यांच्या  समोर (अनघाकडे इशारा करत )… कोणत्या तरी एका सभ्य माणसाचा खून करून निघून जातो … आणि हिला काहीच नाही करत … आणि  नंतर ह्यांची विचारपूस करण्यासाठी ह्या घराचे चक्कर मारायला लागतो… तुमचा डोक्याने आजारी भाऊ हिला प्रियाच्या नावाने ओळखतो (गुरव साहेबांची हैराणी बघून)… आत्ता असे हैराण नका होवू गुरव साहेब …! आम्ही पोलीस वाले एवढे पागल नसतो जेवढे तुम्ही आम्हाला समजत आहात आमचे पण आपले आपले काही सोर्स असतात प्रत्येक गोष्टीची जानकारी आम्हाला भेटत असते… (मग ति काही तरी विचार करत)… हा! तर मी काय बोलत होते कि तुमचा भाऊ जो आजारी आहे तो ह्यांना प्रियाच्या रूपाने ओळखतो… आणि काल रात्री तो माणूस आत्ता ज्याची बॉडी मुर्दाघरात पडली आहे, ते महाशय पण ह्यांना प्रियाच्या रूपात ओळखत होते, तर बिचाऱ्याने आजचा सूर्यच नाही बघितला … आणि ठीक त्याच प्रमाणे क्रूरतेने त्याला पण मारलं गेलं ज्या प्रकारे ट्रेनमध्ये कुलकर्णीला मारलं होतं. आत्ता तुम्हीच सांगा कि मी काय समजू ह्या सगळ्या गोष्टींना… प्रिया आणि अनघामध्ये काहीतरी गडबडीवाला संबंध आहे …”
 
आपली गोष्ट पूर्ण करून ति सगळ्यांना बघायला लागली पण जवळ जवळ सगळ्यांच्याच चेहऱ्यावर भीती आणि चिंते शिवाय काहीच दिसत नव्हता. मग अनघाने आपली खामोशी तोडत …
 
अनघा… “डी.एस.पी म्याडम…! तुम्हाला वाटतंय का मी प्रिया आहे… जर असं आहे तर तुम्ही माझ्या शहरात किंवा माझ्या घरी जाऊन माझ्या विषयी विचारू शकता… तुम्हाला पूर्ण खरं काय आहे ते माहिती पडेल…”
 
शर्वरी … “तुमच्या विषयी तर आम्ही तुम्हाला न विचारताच तुमच्या विषयी माहिती काढली आहे महाराणी… तुमच्या आजुबाजूच्यांकडून आणि तुमच्या घरातून तरी आम्हाला काहीच चुकीची गोष्ट ऐकायला मिळाली नाही आहे…”
 
अनघा … “(चिंतीत होत)… तुम्ही लोक माझ्या घरी केंव्हा गेला होता… आणि माझ्या घरी काय सांगितलं तुम्ही… (रागाने)… लाज नाही वाटली तुम्हाला… पहिल्या पासून त्रासित असणाऱ्या त्या लोकांना अजून त्रास द्यायला गेले… (रडत)… बिचारी माझी आई , हि सगळी गोष्ट ऐकून किती चिंतीत झाली असेल… (मग काही तरी आठवत) पण माझ्या आईने मला काहीच नाही सांगितले तुमच्या लोकांच्या पडताळणी विषयी… मला हि सगळी बातमी न सांगायला तुम्ही त्या लोकांना कुठे धमकी तर दिली नाही आहे ना...”
 
आपली गोष्ट संपता संपता ति रागाने आणि चिंतेने धापा टाकायला लागली होती.
शर्वरी… “तुम्ही जेवढं आम्हा पोलिसांना हरामी आणि बेपर्वा समजून ठेवलं आहे ना... तेवढे आम्ही नाही आहोत… ‘हि पूर्ण पडताळणी तुमच्या इम्प्लोयर कढून तुमचं good character certificate भेटण्यासाठी घेतली होती’ असं आम्ही तुमच्या आईला आणि आजू बाजूच्या लोकांना सांगितलं होतं… तर तुम्ही तुमच्या आईची काळजी घेणे सोडा अजूनपर्यंत आम्ही किंवा आमच्या कोणत्याही माणसाने त्यांना ठेस नाही पोहोचवली आहे… पण ज्या दिवशी मला तुमच्या विरुद्ध काही ठोस पुरावे भेटतील, तेव्हासाठी मी आत्ताच तुमच्याशी क्षमा मांगते... कारण तेव्हा तर कदाचित ह्यासाठी पण वेळ भेटणार नाही…”
 
एवढं बोलून ति परत गप्पा बसते, २ मिनिटं शांत बसून ति परत बोलायला सुरु करते…
 
शर्वरी… “मला तुमच्या भावाशी भेटायचे आहे ... जर तुम्ही मला भेटायला नाही दिले तर मी कोर्टातून आदेश घेवून येईल आणि त्याला थोडा वेळ लागेल… तर प्लीज तुम्ही मला  आपल्या भावाशी भेटवू शकता काय...  मी त्यांना कोणतेच जोर जबरदस्तीवाले प्रश्न विचारून त्यांच्या स्वास्थ्याला हानी नाही पोहोचवणार… माझ्यावर विश्वास करा … आणि  हे पण माहिती करून घ्या कि माझं तुमच्या भावाबरोबर बोलणं तुमच्याचसाठी चांगलं आहे.. तर तुम्ही प्लीज …”
 
आपली गोष्ट अर्धवट सोडून शर्वरी, गुरव साहेबांना बघायला लागते…
 
गुरव साहेबांनी एकदा सोनालीकडे बघितले, त्यांनी पण गुरव साहेबांना मौन स्वीकृती दिली आणि मग स्वतःच राहुलला आणायला गेली… रूममध्ये एकदम शांतता पसरली होती. थोड्यावेळातच सोनाली राहुल सोबत तिथे पोहोचली होती. राहुलच्या चेहऱ्यावर काही चिंतेचे भाव होते… तो रूममध्ये येवून पहिले गुरव साहेब आणि मग सरळ आपल्या प्रियाच्या जवळ जावून उभा  राहतो. रूममधील शांतता गुरव साहेबांनी तोडली .........
 
गुरव साहेब… “छोटे …! हि आमची खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिला तुमच्याशी काही तरी विचारायचे आहे… जे पण ह्या काही विचारतील त्यांचे उत्तर एकदम खरं खरं त्यांना द्या ”
 
राहुलने कोणत्या निरागस मुलावानी आपली मान होकारार्थी हलवली आणि शर्वरीकडे बघायला लागला …
 
शर्वरी… “(आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य देत राहुलशी) हेल्लो राहुल ! माझं नाव शर्वरी आहे… मी पोलीसमध्ये काम करते आणि तुमच्या मोठ्या भावाची मैत्रीण आहे … (मग आपला गळा साफ  करून)… काल ज्या माणसाला तुम्ही मारलं होतं तो माझ्या जवळ रडत रडत आला होता आणि तुमची कम्प्लेंट करत होता… तुम्ही का मारलं होतं त्याला …?”
 
गुरव साहेब आणि बाकी सगळे पण शर्वरीचा दोस्ताना नेचर बघून थोडे खुश झाले  होते…
 
राहुल   … “(तिच्याकडे आश्चर्याने बघत).. मी कधी मारले त्याला… फक्त त्याला धक्का देवून लांब केलं होतं… तो सारखा सारखा माझ्या प्रियाला त्रास देत होता… तर मी पहिले तर असं करण्यापासून बजावले होते, तरी पण तो ऐकला नाही आणि त्यामुळे मी बस त्याची कॉलर पकडली आणि धक्का दिला … (तोंड वाकडं करून) एवढ्याश्या गोष्टीसाठी तो तुमच्या जवळ आला… छोट्या मुलावानी कम्प्लेंट घेवून  हुंह …”
 
शर्वरी  “अरे तेच तर .! मी पण जेव्हा तुझं नाव ऐकला तेव्हा मी पण त्याला चांगलंच सुनावलं, चल खोटारड्या .! आमचा राहुल असं नाही करू शकत… खरं म्हणजे त्याला धक्का दिल्या नंतर काय केलं होतं तुम्ही… तो जिथे थांबला होता तिथे पण गेला होतास का …?”
 
गुरव साहेब...! शर्वरीची चतुराई बघत तर होते पण आत्ता त्यांनी बोलणं उचित नाही समजलं… कारण शर्वरी आपल्या दोस्ताना नेचरने राहुलला काहीच त्रास न देता प्रश्न विचार होती.


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment