Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 10 October 2012

भाग ~ ~ २१ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ २१

घटनेच्या पुढे.... 


शर्वरी…. “जसं कि प्रत्येक बिल्डरांच्या काहीना काही वाईट आणि चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात तसेच आमचे कुलकर्णी साहेब पण त्याला काही अपवाद नाही आहेत… जर त्यांनी किती तरी धार्मिक वा सामाजिक कार्यांमध्ये मदत केल्या असतील, तर असे किती तरी असामाजिक कार्य जे त्यांनी सरकारला अंधारात ठेवून केल्या आहेत, ह्याची पण कम्प्लेंट  भेटली होती… जसे काही केसेस तर तुमच्याच हाताखाली चालणार्या एन.जी.ओज ने केली आहे… धमकी देवून, घाबरवून, भीती दाखवून जमिनी स्वतःच्या मालीकीची करायचा आणि किती तरी जंगलांच्या जमिनी त्याने आपल्या कंसट्रक्षन (construction) प्रोजेक्टमध्ये वापरले आहेत… ज्यांच्यावर अजूनही कोर्टात केसेस चालू आहेत…”

सोनाली… “तुमचं म्हणणं हेच आहे ना कि कमीत कमी तो एक सभ्य माणूस तर नव्हता हो ना..”

शर्वरी… “हो…! सभ्य तर नव्हता पण त्याचा असा कोणता पेशा पण नव्हता आपल्या खिशात चाकू ठेवून फिरण्याचा… जर त्याच्या खिश्यात चाकू ऐवजी रीवोल्वर किंवा बंदूक निघाली असती तर मी हि गोष्ट पचवू शकले असते, पण हे ‘चाकू’ प्रत्येकवेळी माझ्या पचवण्याच्या वेळी मध्येच अटकतो…”

गुरव साहेब… “तो चाकू त्याने असंच आपल्या खिश्यात ठेवला असेल… जसं कि कदाचित त्या काळे कपडेवाल्या माणसाच्या भीती पायी ‘काही नाही तर हेच ठीक’ असं विचार करून कुलकर्णीने आपल्या खिश्यात ठेवला असेल… कारण अनघाच्या गोष्टींवरून तर हे पण माहिती पडतं कि, काळे कपडेवाल्याने आपल्या पूर्ण चेहर्याला झाकून ठेवला होता, पण कुलकर्णीने तर त्याला बघताच ओळखले होतं…”

शर्वरी… “हुंह…! मध्येच बोलण्यासाठी क्षमा मांगते पण, मला तुमच्या अनघाच्या आणि तिच्या कोणत्याही गोष्टीं वरती अजून पर्यंत विश्वास बसला नाही आहे… तर भलं मी ह्या गोष्टीं वरती का विश्वास करणार कि काळे कपडेवाल्याला कुलकर्णीने ओळखलं होतं…”

सोनाली.. “(थोडं रागात) जर तुम्ही विचारच करून ठेवला आहे कि त्या बेचाऱ्या निर्दोषला फसवूनच ऐकणार तर कोणी पण तुम्हाला काही हि समजावले तर तुम्ही ते नाही समजणार… देव तुम्हाला सद-बुद्धी देवो हि प्रार्थना अवश्य करेन…”

रूममध्ये चहा घेवून येणाऱ्या रम्याने हि गोष्ट ऐकली होती…

रम्या… “चहा प्या हवालदारीण बाई…! आणि आपलं डोकं थोडं तरतरीत करून आमच्या बहिणीच्या विषयी साफ डोक्याने विचार करा… आणि एक गोष्ट साफ साफ ऐका हवाल-दारीण-बाई…. अनघा आमचे छोटे मालक बरे होण्यासाठी खूप मेहनत करत आहे… तिच्या सोबत जर काही वाईट करण्याचा प्रयत्न केलात तर मी खूप गडबड करू शकतो…”

रम्याचं हे असलं रूप बघून शर्वरी तर शर्वरी, गुरव दम्पत्ती पण तोंड उघडं ठेवून त्याला बघायला लागले. ह्या वेळी रम्याच्या चेहर्यावरती कोणतेच भाव नजर येत नव्हते... बस रागाने त्याचा चेहरा लाल लाल झाला होतं... पण शर्वरी पण कोणी एरी-गैरी तर नव्हती… डी.एस.पी च्या पोस्टला शुशोभित करणारी एक काबील आणि कडक ऑफिसर होती. तिला एका मामुली नोकरा कडून भेटलेली हि लपलेली धमकीने एकदम अपसेट केलं होतं.

गुरव साहेब… “(शर्वरीशी)… क्षमा करा डी.एस.पी म्याडम…! हा माझ्या छोट्या भावासाठी खूप पजेसीव (possessive) आहे आणि अनघाच्या रूपात आम्हाला खूप मोठी आशा दिसत आहे माझ्या छोट्या भावासाठी… ह्याच्या मुले तुम्हाला ठेस पोहोचली आहे त्यामुळे मी क्षमा प्रार्थी आहे… (रम्या कडे बघत रागाने)… तुम्हाला आत्ता ह्यांच्याशी क्षमा मांगायची आहे रम्या..! मी काय बोललोय ते लवकरात लवकर अमलात आणा…!”

रम्या... “(चेहऱ्यावर कोणतेच भाव न आणता)… मला क्षमा करा डी.एस.पी. म्याडम…! तुम्हाला ठेस पोहोचवण्यामध्ये माझा इरादा नव्हता पण तुम्ही अनघा ताईला ‘शंकेच्या’ घेऱ्यातून बाहेर काढा…”

शर्वरी… “मला तुझ्याकडून नाही शिकायचे आहे कि कोणावर शंका करायची आहे आणि कोणावर नाही ते… माझा विश्वास फक्त गुरव साहेबांवरती आहे कारण त्यांच्या द्वारे झालेल्या सोसीअल सर्विसेस मला प्रत्येक वेळी प्रभावित करतात… पण ह्याचा अर्थ हा नाही कि मी ह्या घरात प्रत्येक पाळून ठेवलेल्या जनावरांना त्याच संम्मानाच्या नजरेने बघेन… ह्या पुढे हि गोष्ट लक्ष्यात ठेवा…”

आणि दुखी झालेली शर्वरी त्या रूममधून अजून काहीही न बोलता निघून जाते…

----------------------------

इथे अनघा आणि राहुलचं चुंबन समारोह आपल्या अंतिम चरणात होतं. त्याच वेळी राहुलच्या तोंडून ‘प्रिया आय लव्ह यु', हे ऐकताच अनघाला एक झटका लागला आणि ती लगेच स्वप्नांच्या दुनियेतून खाली धर्तीवर आली. तिला समजलं कि हा जो आत्ता तिच्या बरोबर आहे तो कोणा अनघासाठी नाही उलट आपल्या प्रियाच्या सोबत हे प्रेम-लाप करत आहे. ती लगेच आपल्याला दुरुस्त करून आणि राहुलच्या मिठीतून आपली सुटका करून, आपल्या तोंडाला दोन्ही हाताने पुसून आपल्या रूमकडे पळत सुटते…

अनघाचे जाणे होतेच कि रम्या त्या रूममध्ये राहुलच्या जवळ त्याच्या औषधांसोबत पोहोचला. त्याने अनघाला जातांना पाहिले आणि मग आपल्या सोबत आणलेली औषधं राहुलला द्यायला लागला.

रम्या… “(गंभीर होत) हिला काल रात्री विषयी काही सांगितलं नाही ना…! आज काळ तुम्ही ह्यांच्या पाठी खूप जास्तच पद्डले आहात…”

राहुल.. “(स्मित हास्य देत) नाही नाही…! मी तिला काहीच सांगितले नाही… (मग चावत पणे) बस थोडंसं सांगितलं आहे बस… बाकी काहीच नाही सांगितलं…”

रम्या… “(हैराण होत)… सगळं काही सांगितलं काय…?”

राहुल… “नाही बाबा…! बस त्याला मारहाण केलं तेवढंच सांगितलं… बाकीचं सांगून मला फसायचे थोडी आहे…”

रम्या… “(थोडा चिंतीत होत) तरी पण यार… पण तिला तुम्ही हि गोष्ट नाही सांगायला पाहिजे होती…”

एकांतात असेच होते दोघे… नोकर किंवा मालक नाही… फक्त मित्र अजून काहीच नाही. दोघांमध्ये अजूनही काही बोलणं झालं, ज्याच्या नंतर रम्या तोंड वाकडं करून रूममधून बाहेर निघून गेला. बाहेर येवून तो सरळ अनघाच्या रूममध्ये गेला, दरवाजा आतमधून बंद होता. काही वेळ दरवाजा ठोकवल्या नंतर अनघाने दरवाजा उघडला. तिचे डोळे अजूनही पाणावलेले होते. आपल्या अश्रूंना लपवण्याचा अथक प्रयत्न करत अनघाने रम्याला त्याच्या येण्याचे कारण विचारले.

रम्या… “आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जे काही सांगितले आहे.. (अनघाची हैराणी बघितल्यावर)… अरे तुम्हाला छोटे मालकाने काल रात्रीच्या विषयी काही तरी सांगितलं होतं ना आत्ता…?”

अनघा… “(हैराणी ने) काल रात्री विषयी तुम्हाला पण माहिती आहे का… पण तुम्हाला कसं माहित पडलं…?”

रम्या… “मला कसं माहित पडलं ते सगळं तर जाऊ द्या… फक्त हे समजून घ्या कि छोट्या मालकाची कोणतीही गोष्ट माझ्या पासून लपलेली नाही आहे… भले ती कोणती पण असो…”

अनघा... “तुम्ह्च्या बोलण्याचा अर्थ काय आहे..?” ती थोडी दचकून जाते हि गोष्ट ऐकून.

रम्या.. “तुम्ही का एवढे दचकत आहात ताई…? मी तर बस काल रात्रीची गोष्ट करत आहे… काल रात्री छोटे मालक बाहेर गेले होते… हि गोष्ट बस तुम्ही तुमच्या पर्यंतच सीमित ठेवा… कोणाला पण सांगायची गरज नाही आहे… मालकीणबाई आणि साहेबांना पण नाही…”

अनघा… “पण का…! हि गोष्ट खूप जरुरी आहे… आणि त्यांना सांगितलीच पाहिजे… खास करून गुरव साहेबांना तर जरूर सांगितली पाहिजे… उद्या जर गरज पडली तर कमीत कमी ते तरी आपली तैय्यारी पूर्ण करून ठेवतील ना… असे पण ते दोघे शर्टा वरती लागलेल्या डागांमुळे किती चिंतीत होते… कमीत कमी त्यांना हि गोष्ट तर माहितीच पडली पाहिजे कि राहुल काल रात्री बाहेर गेला होता…”

रम्या… “अरे तुम्ही समजत का नाही आहात…! (चीढत)... त्यांच्या जीवाला धोका आहे… तुम्हाला मी हि गुप्त गोष्ट सांगत आहे, कारण तुम्ही मला भाऊ माणला आहे… तर मी तुमच्यावर विश्वास ठेवून हे सगळं सांगत आहे…  पण आत्ता मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही… पण तुम्ही माझी गोष्ट ऐका आणि ती गोष्ट कोणालाच सांगू नका..”

रम्याचं तर प्रत्येक बोलणं अनघा वरती ‘बॉम्ब’ फुटण्यासारखा प्रभाव करत होते. ती काही पण समजण्याच्या हालातीमध्ये नव्हती. प्रत्येक गोष्ट कधी भासित तर कधी खरं काय आहे ह्यांच्या मध्येच ती फसली होती.

क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment