Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 17 October 2012

भाग ~ ~ २२ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  २२

घटनेच्या पुढे.... 


रम्याने सांगितलेली गोष्ट अनघाला खूप हैराण करणारी होती. जे काही रम्या बोलला आहे त्यावर तिला पण विश्वास बसत नव्हता, पण गेल्या काही दिवसात तिच्या जीवनात जो पण खेळ सुरु झाला आहे त्याने तर तिला आज काल काही पण असंभव वाटत नाही. ती एकटक आपली पापणी न हलवता रम्याला बघत होती. तिला अश्या प्रकारे आपल्याकडे पाहताना बघून रम्याने आपला हात तिच्या समोर फिरवला.

रम्या... "अरे काय झालं ताई...! मी तुमच्या प्रत्येक शंकेचं निवारण करेन पण आत्ता उचित वेळ नाही आली आहे... बस तुम्ही हि गोष्ट आपल्या जवळच सांभाळून ठेवा... दुसऱ्या कोणत्याही माणसाला हि गोष्ट सांगायची नाही... बस एवढं समजून घ्या कि आमच्या छोट्या मालकाचा जीव धोक्यात आहे... आणि काल जर रात्री ते बाहेर गेले नसते तर पक्का त्यांचा जीव गेला असता... मला पण त्याच्या सोबत गेलं पाहिजे होतं, पण इथे पण राहणं गरजेचं होतं..."


हे ऐकून परत अनघाला वाटले कि ह्या मध्ये ह्या माणसाचा काही गैरसमज तर नाही आहे. पण मग तेच 'always expect the unexpected' वाली गोष्ट तिच्या मनात आली आणि त्याने ह्या गोष्टीला दुर्लक्ष करणे जरुरी नाही समजले. पण तिच्या डोक्यात परत काहीतरी खटकले...


अनघा... "पण रम्या दा...! तुम्ही हे कसं बोलू शकता कि ह्यांची... म्हणजे राहुलच्या जीवाला धोका आहे...?"


रम्या.. "अरे ताई...! मी तुम्हाला सांगितलं ना कि मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगेन पण वेळ आल्यावर... बस तुम्ही जारा 'ह्यांच्या' जीवाला वाचवण्यासाठी माझी मदत करा बस..." 'ह्यांच्या' शब्दावर रम्याने पण चावट अंदाजमध्ये जोर दिला होता. ज्याला ऐकून अनघा लाजली होती. रम्या आत्ता अजून काही बोलणार तोच खालून सोनाली त्याला खाली कोणत्या तरी कामासाठी बोलावले. रम्या लगेच गेला पण जाता जाता आपल्या गोष्टीं वरती लक्ष ठेवण्यासाठी सांगून गेला. तो तर निघून गेला पण अनघाला काही विचार करतांना आणि हसतांना त्याने नाही बघितलं...


********************


जवळ जवळ ३-४ तसा नंतर...


गुरव साहेब ह्या वेळी आपल्या स्टडी रूममध्ये एकटे बसले होते आणि आपल्या ह्या काही दिवसांच्या घटीत घटनांच्या विषयी विचार मंत्रणा करत होते. अनघाचं ह्या घरात आल्यामुळे ते एकप्रकारे खुश होते जेणेकरून त्याचा भाऊ परत बरा होईल, पण तिचं ह्या घरात आल्यानंतर एक रहस्यमयी वातावरणाने पूर्ण घराला जकडून ठेवलं होतं. रम्यावरती झालेल्या हल्यामुळे ते खूप विचलित होते आणि वरून आज राहुलच्या कपड्यांवरती लागलेल्या रक्तांच्या डागामुळे ते अजूनच हैराण आणि चिंतीत झाले होते. ते आत्ता हाच सगळा विचार करत होते कि त्यांची विचार मंत्रणा सोनालीने त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून भंग केली.


सोनाली... "काय विचार करत आहात...! सकाळच्या गोष्टींमुळे चिंतीत आहात का...?"

गुरव साहेब... "तुम्ही सांगा...! (स्मित हास्य देत) तुम्ही तर मला चांगलं जाणता.."

सोनाली... "काय माहित कि हा माझा भास असेल कि मी तुम्हाला जाणते... बायका तर ह्याच भासामध्ये राहतात कि त्या आपल्या नवरोबाला चांगल्या प्रकारे समजतात, पण बेचार्यांच असं विचार करणंच त्यांचा भासच सिद्ध होतं..." एवढं बोलून सोनाली गुरव साहेबांना चावटपणे पहायला लागते.


गुरव साहेब... "(थोडं नाटकीय अंदाजमध्ये...) तर आज पर्यंत माझ्या बायकोला ह्या गोष्टीचं विश्वासच नाही बसलं कि तुम्ही मला ठीक समजले नाही आहेत.. आणि एक बेचारे आम्ही आहोत कि ह्या आनंदात जिवंत आहोत कि ह्या दुनियेत मला कोणी समजो वा ना समजो माझी बायको मला जरूर समजेल..."


आणि हे ऐकताच दोघेही हसायला लागतात... गुरव साहेबांनी सोनालीला खेचून आपल्या मांडीवरती बसवलं आपले ओठ तिच्या ओठांवरती टेकवले... सोनाली पण आपल्या नवऱ्याला ह्या चुंबनामध्ये साथ देत होती. काही वेळ दोघांचा चुंबन वर्षाव असाच सुरु राहिला.. मग सोनालीला कसली तरी जाणीव झाली तर ती लगेच गुरव साहेबांच्या मांडीवरून उठली...


गुरव साहेब... "(थोडं नाराजगीचं प्रदर्शन करत)... हे भलं काय गोष्ट झाली... तुम्ही माझ्या पासून असे दूर कसे होवू शकता... (मग नाटकीय अंदाजमध्ये सेंटीमेंटल होत)... खरी गोष्ट आहे... तुम्हाला पण माहिती आहे कि मी खुर्चीवरून उठून तुम्हाला पकडू शकत नाही... तर तुमचीच मन मर्जी चालणार.."


हे ऐकून सोनाली तडपली... ती एकदम गुरव साहेबांच्या मांडीवर येवून बसली... गुरव साहेबांनी आपला चुंबन कार्यक्रम पुन्हा सुरु केला... पण त्यांना ह्यावेळी जाणीव झाली कि सोनाली आत्ता त्या प्रकारे साथ देत नाही आहे, जी आत्ता थोड्या वेळा पूर्वी देत होती. गुरव साहेबांनी कीस तोडत सोनालीच्या चेहऱ्याला आपल्या हातात घेतलं तर त्यांना सोनालीचे डोळे पाणावलेले दिसले...


गुरव साहेब... "तुम्हाला काय झालं...! मी तर फक्त थट्टा केली होती बाबा...!"


सोनाली... "(रडत)... हि काय थट्टा करायची पद्धत झाली... उलट तुम्हाला माहिती आहे कि तुमच्या ह्या दुर्घटनेची जवाबदार फक्त आणि फक्त मीच आहे... न मी..."


गुरव साहेबांनी तिच्या तोंडावर आपलं बोट ठेवून तिला मध्येच थांबवले...


गुरव साहेब... "मी किती वेळा सांगितले आहे कि त्या गोष्टींना पुन्हा बोलून काहीच नाही होणार... जे पण आहे आणि जे काही आहे हे जीवन खूप सुंदर आहे... जेव्हा मला माझे पाय गेले ह्याच मला काहीच वाटत नाही.. तर भला तुम्ही का ह्याच्यासाठी स्वतःला कोसत असता.. त्याला आत्ता आपल्या कर्माची शिक्षा भेटली आहे... आत्ता पण तुम्हाला देवाच्या न्याया वर शंका आहे.."


सोनाली... "तुम्हाला काय वाटत कि मी त्याला क्षमा केलं आहे... मी मरे पर्यंत कधीच त्याला क्षमा नाही करू शकत... माझा प्रत्येक श्वास त्याला कोसत राहणार... त्याने माझं जे नुकसान केलं आहे ते तर मी मरून पण नाही विसरणार... उलट त्याने मला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं, पण जे काही त्या दिवशी झालं होतं ते..."


एकदा परत गुरव साहेबांनी सोनालीचं तोंड बंद केलं पण ह्यावेळी त्यांनी आपल्या हाताच्या जागी आपल्या ओठांचा सहारा घेतला. सोनाली...! जिचा राग प्रत्येक जुनी गोष्ट आठवून वाढत जात होता ती ह्या प्रगध चुंबनाच्या प्रभावात हळू हळू शांत होत होती... थोड्या वेळानंतर जेव्हा दोघांना श्वास घेण्याची गरज जाणवली तेव्हा कुठे जाऊन त्यांचं चुंबन प्रकरण संपलं. गुरव साहेब तर श्वास घेवून पुन्हा सुरु होत होते पण सोनालीने त्यांना थांबवले...


सोनाली... "आत्ता बस तरी करा... प्रत्येक वेळी तर तुम्हाला एकच गोष्ट सुचते..." आणि तोंड वाकडं करून आपल्या ओठांवरती लागलेल्या गुरव साहेबांच्या प्रेम रसाला आपल्या साडीच्या पदराने पुसते.


गुरव साहेब... "आत्ता ज्याची बायको तुमच्या सारखी एवढी सुंदर असेल तर तो भलं दुसरी कोणती गोष्ट विचार करू शकतो..."


गुरव साहेब... "चला राहू द्या आत्ता जास्त बोलू नका..! आणि हे सांगा कि काय विचार करत होता... कुठली गोष्ट आणि कुठे पोहोचवली तुम्ही..." आणि हे बोलून ती परत हसली.


गुरव साहेब... "(काही गंभीर मुद्रेत) मी अनघा विषयी विचार करत होतो... (सोनालीच्या प्रश्नात्मक इशाऱ्याने विचारल्या वर)... हेच कि ती खाली फुकट ह्या गोष्टींमध्ये फसली आहे..."


सोनाली... "(स्मित हास्य देत) आपल्यांना तिच्या विषयी अजून काही तरी विचार करायला लागणार... आणि ते पण आजच्या आजच.."


गुराव साहेब... "आम्हाला लक्षात आहे तुमची गोष्ट... मी आजच त्याचा बंदोबस्त करतो... उद्या सकाळ पर्यंत तुम्हाला सगळं माहिती पडेल... तुम्ही चिंतामुक्त रहा..."


सोनाली.. "जेव्हा तुम्ही आहात तर भलं मला कोणत्या गोष्टीची चिंता असणार..." आणि एक खट्याळ स्मित हास्य देवून आणि गुरव साहेबांना चीढवण्याच्या अंदाजमध्ये जीभ दाखवून रूममधून बाहेर निघून गेली...


ती गेल्या नंतर गुरव साहेबांनी फोनवरती कोणा बरोबर तरी काही वार्ता केली आणि त्याला किती तरी गोष्टी समजावल्या मग फोन कट करून परत काहीतरी चिंतन करायला लागले...


***************


सोनालीने राहुलची रक्ताच्या डागाने माखलेला शर्ट आपल्या जवळ ठेवला होता आणि शर्टला तिने आपल्या रूममध्ये बनलेल्या लॉकर मध्ये ठेवलं. गुरव साहेबांचा कोणीतरी ओळखीचा फोरेंसिक एक्स्पर्ट होता ज्याच्या जवळ ते तो शर्ट चेक करण्यासाठी पाठवणार होते पण तो पर्यंत त्या शर्टाच्या सुरक्षेची जवाबदारी सोनाली वरती होती.


दुपारी जेव्हा जेवणाच्या टेबलवरती सगळे जण एकत्र बसले होते तेव्हा तिथे एक विचित्र शांतता पसरली होती. जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पून्सचा आवाजच ती शांतता भंग करत होती. पण आज गुरव साहेब अनघाच्या डोळ्यात एक वेगळीच गोष्ट नोटीस करत होते. अनघा आज राहून राहून राहुलकडे बघून आपली नजर पुन्हा खाली करून स्मित हास्य देत होती... तिचं स्मित हास्य सोनालीने पण पाहिलं... कदाचित अनघाला आपलं हसणं लपवताच येत नव्हतं.... पण तिचं हसणं जास्त वेळ पर्यंत टिकलं नाही आणि तिचा फोन वाजायला लागला.


नंबर बघितल्यावर स्क्रीन वरती तिच्या घरचा नंबर दिसला. फोन उचलल्या वरती दुसरी कडून तिच्या आईचा घाबरलेला आवाज तिला ऐकायला आला, जो तिला तिच्या वडिलांच्या अचानक तबियत खराब होण्याची सूचना देत होता. हे ऐकताच अनघा पण घाबरली, पण आपलं घाबरणं लपवत ती आपल्या आईला सांत्वना द्यायला लागली. गुरव साहेब पण हे सगळं ऐकत आणि समजत होते कि अनाच्या वडिलांची तबियत अजूनच जास्त खराब झाली आहे. थोड्या वेळाने अनघा फोन वर बोलणं संपवून दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं आणि डायनिंग टेबल वरून उठली. ती उठली तसाच राहुल पण आपल्या खुर्ची वरून उठला आणि तिच्या जवळ गेला. तिने घाबरलेल्या 'प्रियाला' दिलासा देत आपल्या मिठीत सामावले. गुरव साहेबांच्या आणि सोनालीच्या उपस्थितीमध्ये अनघाला थोडं विचित्र वाटलं. तिने हळूच राहुलला स्वतः पासून वेगळं केलं.


अनघाला असल्या क्षणी आपल्या घरातून लांब राहणं विचित्र वाटत होतं पण जॉबच्या कंत्राटीमुळे ती घरी जाण्याची वार्ता करू शकत नव्हती. जेव्हा तिला जास्त वेळ तिथे थांबणं नाही झालं तेव्हा ती लगेच तिथून आपल्या रूमकडे निघाली. रूममध्ये येताच तिने एवढ्या वेळे पासून थांबवून ठेवलेल्या अश्रूंना वाहवण सुरु केलं. थोडा वेळ ती अशीच रडत राहिली आणि मग आपल्या पाठी वरती कोणाच्या तरी हातांचा स्पर्श जाणवून शांत झाली. तिच्या पाठी सोनाली उभी होती आणि डोळ्यांनी तिला दिलासा देत होती.


सोनाली... "घाबरू नकोस अनघा...! सगळं ठीक होईल... ह्यांनी तुमच्या शहरातल्या एका चांगल्या डॉक्टरांशी वार्ता केली आहे आणि त्याला तुझ्या घरी पण पाठवले आहे... गरज वाटल्यास तुझ्या वडिलांना admit पण करून घेतील... तु बस आपल्या आईशी बरोबर संपर्कात राह... जास्त गरज भासल्यास तुम्ही तुमच्या घरी पण जाऊ शकता..."


अनघा... "(रडणाऱ्या आवाजात)... माझ्या बसची गोष्ट असती तर मी ह्या वेळी आपल्या घरातून एका क्षणासाठी पण लांब राहिली नसती, पण मी आपल्या कमीटमेंटच्या विषयी पण तेवढीच निष्ठावंत आहे... जेवढी आपल्या परिवारासाठी..."


सोनाली... "कमीटमेंटच्या विषयी तु चिंता नको करू...! जेव्हा पण तुम्हाला वाटलं कि आत्ता जाणं गरजेचं आहे तर तुम्ही आम्हाला सांगून जावू शकता... पण आत्ता तर ह्यांनी डॉक्टरांना तुमच्या घरी पाठवलेच आहे.. एकदा त्याची रिपोर्ट ऐकून घेवून तेव्हा तुम्ही जाण्याचा विचार करू शकता..."


हे ऐकून अनघाने आपली मान होकारार्थी हलवली आणि आपल्या अश्रुना पुसलं. आत्ता तिची चिंता थोडी कमी वाटत होती. तेव्हा तिची नजर रूमच्या बाहेर उभा असणार्या राहुल वर पडली जो एक टक तिलाच बघत होता. तिच्या नजरांचा पाठलाग करत सोनालीची पण नजर राहुलवर पडली आणि तिने त्याला आत येण्याचा इशारा केला....


सोनाली... "असं रूमच्या बाहेर का उभा आहेस... आणि चेहऱ्यावर असं बारा का वाजवून ठेवलं आहे...?"


राहुल... "(थोड्या हळू आवाजात).. वहिनी...! तुम्ही प्रियाला कुठेच नका पाठवू, तिचे वडील चांगले माणूस नाही आहेत... त्यांनी पहिले पण खोटं बोलून मला आणि हिला वेगळं केलं होतं... ते परत ह्यावेळी असेच करत आहेत... ते चांगले माणूस नाही आहेत..."


आपल्या वडिलां विषयी अशी गोष्ट ऐकून अनघा एकदम चीढली, पण जसेच तिच्या लक्ष्यात आले कि हि गोष्ट तर राहुलने आपल्या प्रियासाठी केली आहे... तिचा पारा थोडा खाली आला... सोनालीने तर राहुलच्या गोष्टींना दुर्लक्ष केलं. तिच्यासाठी तर राहुलची हि गोष्ट त्याच्या आजाराची देन आहेत. सोनालीने अनघाला थोड्या वेळाने गुरव साहेबांच्या ऑफिस कम स्टडी रूममध्ये येण्याचं बोलून निघून गेली आणि आपल्या पाठी त्या दोघांना एकट सोडून गेली...


सोनाली जाताच राहुलने आपला दुरावा अनघा पासून कमी केला आणि तिच्या जवळ जावून उभा राहिला....


राहुल... "(गंभीर मुद्रेत) मला माहिती आहे कि 'तू माझी प्रिया नाही आहेस'..."

क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment