Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 19 October 2012

भाग ~ ~ २३ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  २३

घटनेच्या पुढे.... 


अनघा त्याला तोंड आवासून बघायला लागते. तिला एवढं हैराण बघून राहुलने तिच्या दोन्ही खांद्यांना आपल्या दोन्ही हातांनी पकडून तिला बसण्याचा इशारा केला. अनघा आपल्या चेहऱ्यावर कोणतेच भाव न आणता रूममध्ये ठेवलेल्या एका सोफ्यावर बसते. राहुल काही वेळ तिची हैराणी बघतो आणि नंतर...

राहुल... "(गळा साफ करून... तीच गंभीरता कायम ठेवत)... मला माहिती आहे कि तुझ्या मनात खूप सारे प्रश्न एकसाथ येत आहेत... सगळ्यात मोठा प्रश्न... 'हा पागल आहे कि नाही'... 'हा जो आत्ता जे काही बोलत आहे ते ठीक आहे कि नाही किंवा ह्याच्या विषयी तिला जे काही सांगितलं गेलं आहे, ते ठीक आहे कि नाही'... 'हा अजून पर्यंत माझ्या भावनांशी खेळत होता का...!'... असेच कितीतरी प्रश्न तुझ्या मनात येत असतील आणि हे यायला पण पाहिजेत... नाही येणार तेव्हा मला जास्त हैराणी होणार..."


अनघाचे डोळे जे बस आत्ता काही वेळापूर्वीच अश्रूंनी खाली झाले होते, ते परत यायला लागले होते. तिचे अश्रू बघून राहुलने आपल्या खिश्यातून एक रुपाल काढला आणि तिच्या समोर केला पण तिने तो रागाने घेवून लांब फेकला, राहुलने परत तो रुमाल उचलून आणून तिला दिला परत तिने तेच केले, परत राहुल तो रुमाल उचलून आणतो आणि अनघाला देतो... अनघा ह्यावेळी पण तेच करते... राहुल खूप निराशेने तो रुमाल परत उचलून आणतो आणि अनघाला देतो...


अनघा... "(खूप रागाने पण हळू आवाजात)... माझ्या जीवनात पहिल्यापासूनच एवढे प्रसंग कमी नाहीत राहुल जे तू मला एवढा त्रास देतोयस... माझ्यावर मेहेरबानी कर आणि जा इथून... मला काहीच नाही ऐकायचंय तुझं... निघून जा माझ्या नजरेसमोरून... तू मला खूप मोठा धोका दिला आहेस... राहुल, धोका दिला आहेस..." आणि ती हमसून हमसून रडायला लागते. राहुल काही वेळ तसाच उभा राहून... नंतर...


राहुल... "तू एकदा माझी गोष्ट तरी ऐक अनघा... नंतर मी निघून जाईन तुझ्या जवळून..."


अनघा... "(रडत)... बोलून घे तुझा अजून एक खोटेपणा..."


राहुल... "मी माझ्या आईची शपथ खावून बोलतो कि तुझ्याशी खोटं नाही बोलणार... जर मला खोटंच बोलायचे असते तर मी तुला हे का सांगितले असते कि मला तुझा खरेपणा काय आहे तो माहिती आहे... का तुला सांगितलं असतं कि 'मला माहित आहे कि तू माझी प्रिया नाही आहेस'... असंच चालू दिलं असतं जसं चाललं आहे आणि तुझ्या भावनांशी खेळत राहिलो असतो."


हे सगळं ऐकून अनघा रडायची थांबली आणि आपल्या चेहऱ्यावर राहुलला आपली गोष्टी बोलण्याची मंजुरी दर्शवत होती... तिचे एक्स्प्रेशन बघून राहुलने आपली गोष्ट सुरु केली..


राहुल... "सगळ्यात पहिली गोष्ट...! मी आत्ता खरोखर तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे... तुझा भोळेपणा, तुझ्या डोळ्यांचा निरागस पणा... मला पहिल्यापासून तुझ्याकडे खेचत आहे... (हे ऐकून अनघाने तोंड वाकडं केलं)... मी हे नाही बोलत आहे कि तू माझ्या ह्या गोष्टीवर भरोसा ठेव पण आत्ता मी जे काही सांगणार आहे ती गोष्ट लक्ष पूर्वक ऐक आणि त्यावर भरोसा कर...! (रूममध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी पिऊन)... इथे ह्या घरात तुला किती तरी गोष्टी ऐकायला आणि बघायला भेटतील पण, एका गोष्टीवर विश्वास ठेवणं तुझ्यासाठी खूप खतरनाक असू शकतं... आपलं काम संपताच हे लोक तुला दुधात पडलेल्या माशिवानी काढून बाहेर फेकून देतील आणि तू फक्त बघत राहशील..."


अनघा... "(तोंड वाकडं करून)... कोणाविषयी बोलत आहेस तू आणि ते जे काही आहे त्यात माझा काय वापर होणार आहे... असं वाटतंय तू जरूर मला तुझ्या बकवास गोष्टींच्या भासामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेस... तुला लाज वाटली पाहिजे राहुल...! तुझे देवता समान भाऊ आणि वहिनी तुझ्यासाठी एवढे चिंतीत आहेत आणि तू आहेस कि माहिती नाही तुझ्या कोणत्या स्वार्थाच्या पूर्तीसाठी ह्या पागलपणाचं नाटक करत आहेस... आत्ता तर घृणा वाटत्ते तुझ्याशी... शीईइ..." एवढं बोलून अनघा आपला चेहरा दुसरीकडे करते...


राहुल... "(आपला रागाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत हळू आवाजात)... तुझ्या त्याच देवता तुल्य लोकांची वार्ता करत आहे मी अनघा...! त्याच लोकांनी पसरवलेला हा सगळा भास आहे, जे तू त्यांना देवता तुल्य मानत आहेस..."


अनघा... "(ओरडत) रा-हु-ल... आत्ता मला पूर्ण कळालं आहे कि तू खरोखर पागल आहेस... मला ओळखणारी गोष्ट एक वेगळी गोष्ट आहे पण हे जे काही तू आत्ता करत आहेस.. हे फक्त आणि फक्त तुझाच पागलपणा आहे..."


राहुल... "(एक स्मित हास्य देत व्यंगात्मक अंदाजमध्ये)... माझ्या देवता तुल्य भावाची गोष्टच अशी आहे कि तू माझी गोष्ट न ऐकून मला पागल समजत आहेस... उद्या पासून त्यांच्या एका नवीन नाटकाची सुरुवात होणार आहे... उद्या आमच्या वडिलांचं 'श्राद्ध-दिवस' आहे. आम्ही खूप नातेवाईक पण इथे येतील ज्यांच्या समोर तुझी प्रिया म्हणूनच करणार आहेत... आणि मजेची गोष्ट अशी कि तुला पण मोठ्या चतुराईने हे काम करण्यासाठी तैयार करण्यात येईल... पहिले तू एवढी गोष्ट होवून जाण्याची वाट बघ नंतर मी तुला अजून काही गोष्टी सांगेन... कारण आत्ता तर तू माझ्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवणार आहेस... पण एवढ्या गोष्टी होईपर्यंत तू अजून कोणालाच हि गोष्ट सांगू नकोस... (मग तिच्या
कानाजवळ आपला चेहरा घेवून जाऊन हळू आवाजात)... रम्याला पण नाही...

बस कदाचित हीच एक गोष्ट उरली होती अनघाला उरलेला सूरलेला झटका देण्यासाठी.


अनघा... "रम्या पण तुझ्या सोबत नाही आहे (व्यंग करत)... त्याला सांगून तू अर्ध्या रात्री घरातून बाहेर जाऊ शकतोस त्या माणसाला मारण्यासाठी... आणि त्याच्यावर एवढा भरोसा पण नाही आहे तुला कि मी त्याला काहीच नको बोलू... (राहुलच्या डोळ्यात बघत) मला अजून किती मूर्ख बनवायला बघतोयस राहुल...?"


राहुल... "मला तुला मूर्ख बनवण्याचा काहीच इरादा नाही आहे अनघा...! मी तर फक्त तुला मूर्ख बनण्यापासून वाचवत आहे... त्या रात्री मला बाहेर पाठवणं त्या रम्याला माझ्यापेक्षा जास्त जरुरी होतं, जर मी गेलो नसतो तर त्याच्या किती तरी स्वप्न अधुरे राहिले असते.... जे तो माझ्या थ्रु पूर्ण करायला पाहत आहे."


अनघा... "(चीढत)... शेवटी ह्या घरात चाललंय तरी काय...? एक तुझ्या शिवाय, सगळेच्या सगळे कोणत्या ना कोणत्या साजीशमध्ये शामिल आहेत काय... वा तू मला पागल समजत आहेस किंवा स्वतःला खूप हुशार समजतोस... पण दोन्ही गोष्टींमध्ये तू जे काही बोलत आहेस किंवा करणार आहेस ते चुकीचं आहे राहुल... (थोडं भावूक होत) मी तुला आपलं पाहिलं प्रेम मानून किती खुश होती पण तू तर सगळेच्या सगळे स्वप्न तोडून टाकलेस माझे..."


राहुल... "देवाने तुझ्या त्याच प्रेमामुळे तुझ्या सोबत होणाऱ्या कोणतंही चुकीचं काम थांबवण्यासाठी मला तुझ्या सोबत उभं केलं आहे अनघा... नाही तर मला काय पडली आहे, कि तुला ह्या चीखळात ज्यात तू फासायला जात आहेस, त्याच्यात पडण्यापासून वाचवायला बघतोय... आणि तू माझं काहीच ऐकत नाही आहेस... बोल अनघा...! तुझ्या प्रेमाशिवाय अजून कोणती दुसरी गोष्ट असू शकते का... बोल ना..."


अनघाजवळ ह्या विषयी काहीच उत्तर नव्हतं... अतः तिने शांत राहणेच पसंत केलं. तिच्या निरुत्तर चेहऱ्याला बघून राहुल पुढे बोलू लागला.


राहुल.. "ह्या घरात असे खूप गुपित आहेत जे मी तुला हळू हळू सांगत जाईन... बस तू हे लक्षात ठेव कि तुला 'कोणाच्याही' वर आणि 'कोणाच्याही' गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास करायचा नाही आहे..."


राहुलने 'कोणाच्याही' वर जास्त जोर देवून अनघाला आपला इशारा समजावण्याचा प्रयत्न केला, जे ऐकून ती अजूनच रागावून आपलं डोकं पकडून बसली. ह्यावेळी राहुल तिच्या जवळ येवून आपल्या पंज्यांवर तिच्या समोर बसला. आपल्या हातात अनघाचा चेहरा पकडून तिच्या डोळ्यात बघून तिला 'आय लव्ह यु' बोलतो ज्याला ऐकून अनघा काहीच नाही बोलत. तिच्या कडून कोणतंच प्रतिउत्तर न बघून राहुल उदास दिसायला लागला. त्याच्या उदास होण्यामुळे पण अनघाचं मन बदललं नाही, तरीपण थोड्या वेळा पूर्वी पासून आत्ता पर्यंत तिच्या सोबत जे काही होत आहे ते सगळं सांभाळणं अनाघासाठी एवढं काही सोप्प नव्हतं... हे सगळं कदाचित आत्ता अजून वेळ चाललं असतं पण मग राहुल उठत बोलला....


राहुल... "आत्ता जेव्हा पर्यंत तू हे सगळं तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तेव्हा पर्यंत तू माझ्या कुठल्याही गोष्टींवर भरोसा नाही करणार... तरी पण तुला जास्त वेळ वाट पहावी नाही लागणार... आज रात्रीच ते लोक आपल्या प्लान वर काम करायला सुरुवात करतील... तेव्हा तुला पण समजेल कि मी खोटारडा नाही आहे... आणि खरोखर तुझ्यावर प्रेम करतो..." शेवटची गोष्ट बोलता बोलता राहुलचा गळा भरून येतो आणि मग राहुल संध्याकाळ पर्यंत वाट पाहण्याचं बोलून रूम मधून बाहेर निघून जातो. राहुलचा उदास झालेला चेहरा पाहून एक वेळ तर अनघाचं मन पण पाघळायला लागलं होतं पण हालातीमुळे तिने आपल्या मनावर कंट्रोल ठेवला.


********************************************


राहुल गेल्यानंतर अनघा स्टडी रूममध्ये जाऊन आपलं पेंडिंग काम करायला लागते. मध्ये मध्ये ती आपल्या आईला फोन करून आपल्या वडिलांच्या विषयी पण विचारात होती. गुरव साहेबांनी पाठवलेला डॉक्टर तिच्या घरी पोहोचला होता आणि त्याने अनघाच्या वडिलांची उपचार लगेच सुरु केली होती आणि त्याचा असर पण लगेच दिसायला लागला होता. संध्याकाळ होता होता अनघाच्या वडिलांना पडणाऱ्या 'फिट्स' मध्ये पण कमी आली होती. जेव्हा हे सगळं अनघाच्या आईने तिला सांगितलं तेव्हा तिने गुरव साहेबांना धन्यवाद देण्यासाठी रूममधल्या इंटरकॉम मधून फोन करून त्यांच्या रूममध्ये येण्याची परवानगी मांगितली आणि त्यांच्या रूममध्ये गेली.


गुरव साहेबांसोबत सोनाली पण तिथे बसली होती... तिच्या हातात कोणती तरी लिस्ट होती आणि ती गुरव साहेबांसोबत डिस्कस करत होती. अनघाने रूमच्या दरवाजावर नॉक करून आत प्रवेश केला, तिला आत्ता येतांना पाहून दोघांनी हसत तिचं स्वागत केलं...


गुरव साहेब... "ये अनघा...! घरी वार्ता झाली काय... कसे आहेत आत्ता तुमचे वडील...?"


अनघा... "(थोडं खुश होत) तुमच्या मदतीमुळे आत्ता ते थोडे नॉर्मल झाले आहेत... त्यांच्या 'फिट्स' मध्ये आत्ता कमी आली आहे... हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे आली आहे... (गुरव साहेबांना दोन्ही हात जोडून)... तुमचे खूप खूप आभार..."


गुरव साहेब... "अरे अरे हे सगळं बोलायची काहीच गरज नाही आहे... तुम्ही पण आमच्यासाठी किती मोठं काम करत आहात... त्याच्या समोर तर हे काहीच नाही आहे अनघा...! आमच्या भावाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी तुमच्या निस्वार्थ प्रयत्नाला भलं आम्ही कसं नजरअंदाज करू शकतो..."


गुरव साहेबांचे बोलणे ऐकून अनघाच्या मनात राहुलने बोलली गोष्ट फिरायला लागली आणि तिच्या मनात राहुलप्रती अजून राग वाढत गेला...


सोनाली... "बरं झालं तू इथे आलीस.. आम्ही आत्ता स्वतःच तुला इथे बोलावणार होतो.."


अनघा... "कशासाठी...?"

सोनाली... "उद्या आमच्या वडिलांचा... म्हणजे गुरव साहेबांच्या आणि राहुलच्या वडिलांचा श्राद्ध-दिवस आहे... ज्यामध्ये होणाऱ्या पूजेत शामिल होण्यासाठी आमचे सगळे नातेवाईक इथे येणार आहेत... लांबच्या जवळच्या नातेवाईकांना मिळवून जवळ जवळ १५०-२०० लोकं इथे येणार आहेत..."

एवढं बोलून सोनाली गप्प होते आणि मग पुढचा मोर्चा गुरव साहेब सांभाळतात...


गुरव साहेब.. "(काही विचार करून)... अनघा...! आमचे काही नातेवाईक असे पण आहेत जे आज पर्यंत पुरातन काळातील मानसिकता घेवून जिवंत आहेत... ज्यांच्यासाठी लग्न केल्याशिवाय वा कोणत्याही नात्याशिवाय मुलीचं एका मुलाच्या घरात राहणं चांगलं नसतं..."


अनघा... "(हैराणीने) हम्म..! मी काही समजली नाही... तुम्ही एकदम स्पष्ट बोला मला काहीच समजत नाही आहे..."


गुरव साहेब... "बघ अनघा...! आम्ही तुला आमच्या नातेवाईकांशी राहुलची प्रिया ज्यांचा साखरपुडा आम्ही खूप पहिलेच करून टाकला आहे... हे बोलल्याशिवाय जर आम्ही तुम्हाला त्यांच्याशी भेटवणार तर राहुलच्या तबियतीला खतरा होणार आणि त्यांना सांगितल्यावर पण जर कोणी तुम्हाला अनघा म्हणून बोलावलं तेव्हा पण राहुलची तबियतीमध्ये सुधार नाही होणार..."


हे ऐकून अनघाच्या मनात आले कि ह्यांना सगळं सांगून टाकलं पाहिजे कि राहुलला जे हे लोकं आजारी समजत आहेत खरं म्हणजे तो नाटक करत आहे... पण एकाएक तिच्या मनात राहुलने सांगितलेली गोष्ट आली आणि तिच्या लक्षात आले कि गुरव साहेब तीच गोष्ट बोलत आहेत जी गोष्ट राहुल थोड्यावेळा पूर्वी बोलला होता. गुरव साहेब तिला फिरवून प्रियाच बनवण्याची गोष्ट बोलत आहेत. हि गोष्ट लक्ष्यात येताच अनघाचं डोकं परत दुखायला लागलं आणि ती परत आपल्याला खरं काय आहे आणि खोटं काय आहे ह्या भासामध्ये स्वतःला अडकतांना बघत होती.

 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment