Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 23 October 2012

भाग ~ ~ २४ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  २४

घटनेच्या पुढे.... 


अनघा एका झटक्यात उठून उभी राहिली...

अनघा... "(थोडं रागात)... हे तुम्ही लोकांनी काय लावून ठेवलं आहे... मी काय पागल आहे जे तुम्ही माझ्याबरोबर अशी वागणूक करत आहात... माझ्या काही प्रोब्लेम्स आहेस ज्यांच्यामुळे मी इथे काम करायला आली आहे, पण तुम्ही लोकं तर माहिती नाही काय समजत आहात जे ह्या सगळ्या हरकती माझ्या सोबत करत आहात..."


गुरव दम्पत्ती अनघाची हि रिअक्शन बघून बिचकलेच... त्यांना तर काहीच समजत नाही आहे...


सोनाली... "(हैराणी प्रकट करत)... हे तुला काय झालं आहे अनघा...! अचानक अशी का बोलायला लागलीस तू... आणि आम्ही तुझ्या सोबत काय केलं आहे जे तू आमच्यावर एवढं रागवत आहेस..."


गुरव साहेब... "काय झालं अनघा...! मी काही चुकीचं बोललोय काय... वा माझी कोणती गोष्ट चुकीची वाटली जे तुम्ही असं वागत आहात..? जर तुला काही वाईट वाटलं आहे तर ते आम्हाला पण सांगा... आम्ही जरूर तुमच्याशी क्षमा मांगू... पण आमची चूक तर सांगा..."


अनघा अजूनही रागाच्या आवेशमध्ये कापत होती.... गुरव साहेबांच्या इशाऱ्यावर सोनालीने पुढे येवून तिला खाली बसवत आपल्या रागाचे कारण विचारले, हे विचारत सोनाली तिच्या जवळ बसते... अनघा तरीही गप्पच राहिली... तेव्हा सोनालीला काही तरी आठवले आणि ती दचकून उभी राहते...


सोनाली... "अरे देवा...! (आपल्या कपाळावर आपले दोन्ही हात ठेवून...) कुठे राहुलne तुला काही असं तसं तर नाही सांगितलं ना... (गुरव साहेब पण आत्ता लक्षपूर्वक ऐकायला लागले)... सांग अनघा...! मी एकदम ठीक बोलत आहे कि नाही... राहुलने तुला काय सांगितलं आहे आमच्या विषयी..."


आत्ता दचकायची पाळी अनघाची होती ... ती समजत नव्हती कि कशी हि ह्या निष्कर्षावरती पोहोचली कि मला राहुलनेच काहीतरी सांगितले असेल, दुसऱ्या कोणीच नाही.... परत तिच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले... आणि ती चिंतीत होवून इथे तिथे बघायला लागली...


सोनाली... "(अनघाच्या खांद्यावर प्रेमाने थाप मारत तिला सांत्वना देत) घाबरू नकोस अनघा...! जे पण तुझ्या मनात आहे ते एकदम खुलून बोल... तुला आमच्याशी घाबरायची काहीच आवश्यकता नाही आहे..."


गुरव साहेब... "(ज्यांच्या चेहऱ्यावर हासू दरवळत होतं)... कुठे राहुलने तुम्हाला हे तर नाही सांगितले कि आम्ही तुम्हाला आपल्या कोणत्या स्वतःच्या कामासाठी प्रिया बनण्यासाठी बोलणार आणि आमचा चांगलेपणा, चांगलेपणा नसून एक नाटक आहे..."


गुरव साहेब एवढे बोललेच होते कि अनघाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.


अनघाची हैराणी बघून गुरव दम्पत्ती समजले कि त्यांचे विचार बरोबर दिशेने जात आहेत... आत्ता दोघेही शांत अवस्थेत आले होते आणि दोघेही हसत होते... त्यांचे हसणे बघून अनघा आत्ता खरोखर स्वतःला पागल समजत होती आणि तिला आपल्या असल्या अवस्थेवर जेवढी होवू शकते तेवढी घृणा वाटत होती... तिची हैराणी बघून गुराव साहेबांनी बोलणं सुरु केलं...


गुरव साहेब... "माझा छोटा आणि सर्वात लाडका भाऊ डोक्याने आजारी आहे...
he is a suffering from a mental disorder called ‘Schizophrenia' ज्याला मराठीत बुद्धी भासित किंवा भ्रमित बोलू शकतो... खरं म्हणजे अश्या लोकांना पागलच बोललं जातं पण सामान्य पागलपेक्षा हे लोकं थोडे वेगळे असतात..."

अनघाला अजूनही समजत नव्हते कि तिने काय करायला पाहिजे. जे पण काही तिच्या सभोवताली होत होतं... ते सगळं तिच्या डोक्याच्या समजण्याच्या हद्दी पलीकडे होतं. तिला अजूनही हैराण बघून गुरव साहेब बोलले...


गुरव साहेब... "जर तुम्हाला आमच्यावर भरोसा नाही आहे तर तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता... ते तुम्हाला राहुलच्या मेंटल कंडीशन विषयी चांगल्या प्रकारे समजावतील..."


अनघा... "जर तो
Schizophrenia (बुद्धी भ्रमित / भासित 'पागल') आहे तर त्याला हे कसं माहिती कि मी प्रिया नाही उलट अनघा आहे... तो पूर्ण दाव्याने मला अनघा बोलून ओळखत आहे... काल पर्यंत तर तो... काल पर्यंत काय उलट आत्ता थोड्या वेळा पर्यंत तो मला प्रिया बोलत होता आणि मग न जाणो कोणता गिल्ट कॉनशिअसने त्याला असं करण्यापासून मनाई केली आहे जो आत्ता मला अनघा बोलत आहे... (आपल्या चिंतेला आपल्या चेहऱ्याच्या भावात सामील करत)... मी खरोखर पागल होईन सर...! जर असंच चालत राहिलं तर..."

गुरव साहेब... "तुमची हि चिंता पाहून आम्ही स्वतः खेदी आहोत पण काय करणार...! हालातच असे बनले आहेत कि हे सगळं आपोआपच होत आहे... जर तुम्हाला ह्याच्यात काही चूक वाटत असेल तर तुम्ही आत्ता इथून मागे हटू शकता (सोनाली काही बोलणार होती)... नाही सोनाली...! कोणतंही काम भलं ते राहुलला बरं किंवा राहुलच्या भलाईसाठी का होईना पण आम्ही त्या कामाला पण अनघाच्या आत्मसम्मान आणि सुकूनच्या किंमती वर तर नाही करू शकत..."


अनघा आत्ता थोडी शांत झाली होती.. तिला परत गुरव साहेबांवरती आणि सोनालीवरती विश्वास व्हायला लागला होता.... कदाचित पूर्ण पणे नाही पण राहुलवर विश्वास ठेवण्यापेक्षा जास्तच होता... तिने आत्ता मन बनवलं होतं कि तिची मदत करणाऱ्या गुरव साहेबांची मदत ती सर्वोत्तोपरी करणार... राहुलची पूर्ण गोष्ट तिने आता आपल्या डोक्यातून काढून टाकली होती...

अनघा... "(हळू आवाजात)... मला क्षमा करा...! मी आपल्या चिंतेमध्ये तुमची गोष्ट न ऐकताच तुमच्यावर शंका घेतली. मी तैय्यार आहे उद्या तुमच्यासमोर प्रिया बनण्यासाठी..."

गुरव साहेब... "(स्मित हास्य देत)... पहिले हे समजून घ्या कि राहुल ने तुम्हाला प्रियाच्या बदली अनघा म्हणून कसा आवाज दिला आणि त्याच्या डोक्यात तुझ्याशी हि गोष्ट सांगण्यासाठी त्याचं मन कसं झालं...?"
अनघाला आपल्याकडे लक्ष पूर्वक ऐकताना पाहून गुरव साहेबांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली..

गुरव साहेब... "खरं म्हणजे जसं कि आत्ता मला आठवतंय झालं असं असेल कि आज सकाळी जेव्हा तुम्ही डायनिंग टेबलवरून उठून गेला होता तेव्हा पहिले तर राहुल पण तुझ्या पाठी पाठी गेला होता पण कदाचित तुम्हाला रडतांना पाहून तो परत आला... त्याच्या जाण्या आणि परत येण्याच्या छोट्याश्या कालावधीत आम्ही सोनालीला हेच बोलत होतो कि अनघाला असल्या तणाव पूर्ण वातावरणात तिला प्रिया बनण्याची गोष्ट बोलणं उचित असेल काय... कदाचित त्याच वेळी राहुलने आमचं बोलणं ऐकलं असेल... जर तुम्ही हि गोष्ट नाही मानली असती कि तुम्ही अनघा आहात तर कदाचित तो पुढे तुम्हाला काहीच बोलला नसता. आम्हाला हे सगळं ऐकून खूप दुखः होतं पण काय करणार... (दीर्घ श्वास सोडत)... कदाचित देवाला हेच मंजूर आहे..."

अनघा पण आत्ता गुरव साहेबांना बोलल्या गेलेल्या गोष्टींवरती शरमिंदा होती. कदाचित सोनालीला हि गोष्ट समजली आणि तिने मोठ्या प्रेमाने तिच्या केसांवरती हात फिरवून तिला शांत राहायला सांगितलं..

सोनाली... "तुला गिल्टी फील करण्याची काहीच गरज नाही आहे अनघा...! आम्ही समजू शकतो हि गोष्ट (हसत..) आमचे दीर आहेच एवढे कलाकार कि कोणी पण त्यांच्या हरकतींचा शिकार होईल... (मग थोडं थट्टा करत)... खास करून जर तुझ्यासारखी जी असेल जी त्याच्यावर प्रेम करत असेल..."

अनघा... "(आपली लाज लपवण्याचा प्रयत्न करत)... नाही नाही अशी कोणतीच गोष्ट नाही आहे... तुम्हाला जरूर काहीतर गैरसमज होत आहे... माझ्या मनात त्यांच्या प्रती असं काहीच नाही आहे..." एवढं बोलून तिने आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांनी लपवला.

सोनाली... "(जी आत्ता पूर्ण मूडमध्ये होती अनघाची फिरकी घेण्यासाठी)... आम्ही केंव्हा बोललो कि तुझ्या मनात 'त्याच्या' प्रती काय आहे आणि काय नाही... आम्ही तर फक्त प्रेमाची गोष्ट बोललो होतो..."

गुरव साहेब पण हे सगळं ऐकून आणि बघून मंद मंद हसत होते...

सोनाली... "खरं सांगू अनघा...! जेव्हा आम्ही दोघांनी तुम्हा दोघांना एकत्र डिनरसाठी जातांना बघितलं तेव्हा आमच्या मनात एकंच गोष्ट आली होती कि काश आमचा राहुल बरा असता आणि तुझ्यासारखी कोणी सुंदर जीवन संगीणी त्याच्या सोबत असती..."

आत्ता अनघाची हालत एकदम बघण्या लायक होती... तिच्या लाजेची लाली प्रत्येक गोष्टीवर बदलत जात होती... सोनाली तिला अजून किती तरी वेळ छेडत राहिली तेव्हा अनघा उठून आपल्या रूमकडे जायला लागली. तिला जातांना बघून गुरव साहेबांनी आपल्या नातेवाईकांसमोर तिला प्रिया म्हणून इंट्रोड्यूस करण्याची गोष्ट परत बोलले ज्यावर अनघाने परत लाजेने हामि भरली आणि जवळ जवळ पळत पळत आपल्या रूमकडे निघाली. ती खूप आनंदी होती पण गेल्या काही दिवसांसारखं तिचा आनंद किती वेळ तिच्या सोबत राहणार होता हे भलं कोण सांगू शकतं...

*****************************************

काही वेळा नंतर...

अनघा आपल्या रूममध्ये आपल्या बेडवर पडून कधी गुरव साहेब आणि सोनालीची गोष्ट आठवत होती तर कधी रम्याची गोष्ट आठवत होती... आणि मग तिला राहून राहून राहुलची पण गोष्ट आठवणीत येत होती. ह्या सगळ्यांच्यामध्ये तिला आपल्या आणि राहुलच्यामध्ये येणाऱ्या जवळीकचा पण आभास व्हायचा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला राहुलची पूर्ण गोष्ट पण आठवणीत येत होती. मन आणि डोक्यामध्ये लडाई सुरु होती. कोणी गुरव साहेबांची बाजू घेत होतं तर कोणी राहुलची... पण ह्या सगळ्यांमध्ये तिचं स्वतःचं समजण्याची आणि विचार करण्याची ताकत कमी होत होती. ती हा सगळा विचारच करत होती कि तिच्या दरवाज्यावर थाप पडली... ज्याला ऐकून ती आपल्या बेडवरून उठून दरवाज्याजवळ गेली. दरवाज्याला खोलल्यावर समोर रम्या आपली चीत परिचित हसणं घेवून उभा होता.... त्याला बघून अनघाला काहीच समजत नव्हतं कि काय बोलावं... ह्या घराच्या वातावरणाने खरोखर तिच्या विचार करण्याची शक्ती संपवली होती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव बघून...

रम्या..."काय गोष्ट आहे ताई...! आज असं कसं तोंड करताय...? माझ्यावर रागावलात काय... अच्छा हो...! आज मी सकाळी तुमच्या पासून वेगळा झालोय ते आत्ता आपण भेटतोय... अरे हे काय ताई..! मी इथे नोकर आहे... त्यामुळे मालक लोक दिवस भर मला इथे तिथे पळवत असतात... आत्ता आजचंच बघा... सकाळपासूनच गुरव साहेब आम्हाला... आपलं ... ते काय बोलतात त्याला (काही तरी आठवत)... हो..! आठवलं.. आर्टीफेशिअल लेगच्या बनवणाऱ्यासोबत पाठवलं होतं... त्या लोकांना खूप ठिकाणी जायचे होते मी फक्त त्यांचा गायिड बनून फिरत होतो... एकदम थकलोय आत्ता मी... बस गुरव साहेबांचे एकदा पाय लागले पाहिजे तर मी लगेच प्रसाद चढवून येईल सोलापूरच्या हनुमान मंदिरमध्ये..." अनघा पुतळा बनून त्याची गोष्ट ऐकत होती, जेव्हा अनघाने कोणतंच एक्प्रेशन नाही दिलं तेव्हा जाऊन तो बोलायचा थांबला आणि मामल्याच्या गंभीरतेला समजण्याचा प्रयत्न करत होता पण अनघा काही नाही बोलली आणि जास्त जोर टाकल्यावर तिने आपल्या डोक्यात दुखत आहे एवढं बोलून रम्याच्या तोंडावर दरवाजा आपटला... तिने असा दरवाजा बंद केल्यामुळे रम्याला पण खूप वाईट वाटले. त्याने परत दरवाजा ठोकून अनघाला आवाज दिला... अनघाने परत रागाने दरवाजा खोलून कारण विचारलं... ह्या वेळी रम्या पण नाराजीनेच बोलला... खाली जेवणासाठी बोलावलं गेलं आहे... एवढं बोलून तो जायला लागला...

पण जाता जाता तो फक्त एकंच गोष्ट बोलून गेला ज्यामुळे परत अनघाच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले...

रम्या... "इथे सगळे एका पेक्षा एक वरचढ खेळाडू आहेत... ह्यांच्या गोष्टींमध्ये येशील तर आपलं सुकून आणि चैन सगळं हरवून बसशील..."

 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment