Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 27 October 2012

भाग ~ ~ २५ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  २५

घटनेच्या पुढे.... 


रम्या तर निघून गेला पण अनघाला पुन्हा त्याने भासेच्या जाळेत अडकवून गेला, अनघाने कोणाला खरं समजलं पाहिजे आणि कोणाला चुकीचं... हे सगळं तिच्या विचार करण्याच्या पलीकडे गेलं होतं. जेव्हा पण जो पण तिच्या सोबत असायचा तोच तिला ठीक लागायचा पण त्याच्या नंतर जेव्हा कोणी दुसरा यायचा तेव्हा परत पहिल्यावाल्यासाठी तेच कॉम्प्लीकेशंस. राहुल जिथे तिच्या बरोबर प्रेम करण्याचा दम भरत होता तिथेच गुरव दम्पत्ती तिला निसंकोच पणे कुठलाही स्वार्थ मनात न घेवून तिची मदत करत होते, त्यांच्यावर संशय घेणे पण तिच्यासाठी पाप वाटत होते आणि राहिला प्रश्न रम्याचा, तर त्याचा सभ्यपणा तिला कुठूनही चुकीचं नाही वाटत होता. मग हे सगळं काय आहे जो तिला पागल बनवत आहे... शेवटी हे सगळे लोकं एकमेकांवर एवढा संशय का घेत आहेत... जेव्हा हा सगळा विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं तेव्हा ती बाथरूममध्ये शॉवरच्या खाली उभी राहून आपल्या डोक्याला ताजेपणा प्रदान करत होती.

आंघोळ वैगेरे करून कपडे बदलून ती खाली डिनर करण्यासाठी निघून गेली. आत्ता टेबलवरती फक्त गुरव साहेब बसले होते, सोनाली किचनमध्ये नोकरांना काहीतरी सूचना देत होती. राहुल अजून पर्यंत नाही आला होता... त्याला तिथे न बघून अनघाने आपली नजर इथे तिथे फिरवली. तिच्या नजरेला इथे तिथे भटकतांना पाहून गुरव साहेबांनी स्मित हास्य देवून तिला बसायला सांगितले आणि बोलले कि, "राहुल आत्ता कोणती 'होमियोप्याथी'चं औषध खाऊन बसला आहे ज्यामुळे तो १५-२० मिनट तरी काही खाऊ शकत नाही, पण जो पर्यंत सोनाली टेबलवर जेवण सर्व करेल तो पर्यंत तो येईल..." हे ऐकून अनघा आत्ता राहुलची वाट पाहत राहिली आणि टेबलावर ठेवलेल्या चमचा बरोबर खेळायला लागली...


थोड्या वेळाने जेवण टेबलवर लावायला सुरुवात झाली आणि राहुल पण आला होता. रम्या जेवण सर्व करण्यामध्ये व्यस्त होता, पूर्ण जेवण टेबलावर ठेवल्यावर सोनाली पण आली होती. राहुलने अनघाला बघूनही नजरांदाज केलं होतं, तिला असं नजरांदाज केलेलं पाहून थोडं दुखः झालं पण तिने हे आपल्या प्रेमिचा नखरा समजून हसली. जेवण वाढून झालं होतं आणि सगळ्यांनी आपआपलं जेवण सुरु केलं होतं.


जेवणा वेळी जिथे अनघा आणि गुरव दम्पत्तीचं एकमेकांना बघून गुपित हसणं चालू होतं तिथेच एकीकडे राहुल आणि रम्या दोघेही तिला जास्तच गंभीर वाटत होते. अनघा जेवणाच्या वेळी ह्या गोष्टींवर आपलं डोकं खपवणार नव्हती म्हणून ती चुपचाप आपलं खाणं सुरु ठेवून त्याचा आनंद घेत होती. अचानक राहुलला खोकला आला, सुरुवातीला एक दोन वेळा छोट्या छोट्या खोकल्या नंतर तो थांबला. मामुली खोकला समजून सगळ्यांनी तो नजरांदाज केला पण मग एकाएक राहुल आपला गळा दोन्ही हातांनी पकडून टेबलवरून उठला, खोकला थांबवण्याच्या चक्करमध्ये त्याचा पूर्ण चेहरा लाल झाला होता. पण खोकला कधी थांबतो काय जो राहुलच्या थांबवण्याने थांबेल.... एक लांब खोकल्याचा दौरा सुरु झाला. खोकून खोकून राहुलची हालत खराब झाली होती. त्याचा खोकला बघून अनघा पण उठून त्याच्या जवळ येवून उभी राहिली, रम्या पहिल्या पासून त्याच्या पाठीवर हात फिरवत होता. सोनाली पण काही ना काही तरी त्याला समजावत होती पण अचानक आणि अचानक राहुलने रक्ताची उलटी केली. त्याच्या तोंडातून रक्ताचा एक फौवारा निघाला ज्यामुळे पूर्ण डायनिंग टेबल आणि त्यावर ठेवलेलं जेवण भिजून गेलं.


रक्ताची उलटी बघून तर अनघाची किंकाळीच निघाली, गुरव साहेबांनी ओरडून डॉक्टरांना फोन करण्यासाठी बोलले आणि तो पर्यंत सगळे नोकर पण तिथे आले होते ज्याच्यामधून कोणा एकाला गुरव साहेबांनी ड्राइवरला गाडी काढायला सांगितली. फटाफट सगळ्या नोकरांनी मिळून राहुलला गाडीमध्ये झोपवले. राहुल रक्ताची उलटी केल्यानंतर बेशुद्ध झाला होता. त्या गाडीमध्ये अनघा पण बसली होती आणि तिने राहुलचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं होतं. सोनाली आणि गुरव साहेब दुसऱ्या गाडीमध्ये बसले होते. गाड्या खूप वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने धावत होत्या. रम्या पण अनघावाल्या गाडीमध्ये बसला होता आणि राहून राहून अनघाच्या मांडीवर पडलेल्या राहुलच्या चेहर्याला बघत होता. त्याची अशी दशा बघून अनघाला राहुलची ती गोष्ट परत आठवली जी त्याने रम्यासाठी बोलला होता.


थोड्यावेळातच गाड्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. सोनालीने डॉक्टरांना सगळं काही फोनवर सांगितलं होतं, ज्यामुळे डॉक्टर्सची पूर्ण टीम तिथे तैयार उभी होती. गाडीमधून राहुलला काढून स्ट्रेचरवर झोपून त्याला ऑपरेशन थियेटरमध्ये नेण्यात आलं होतं. डॉक्टर्सची टीमने त्याची तपासणी सुरु केली होती. एका नळीच्या सहाय्याने पोटामधून पूर्ण जेवण बाहेर काढत होते. जवळ जवळ १-२ तासांच्या मेहनती नंतर राहुल डेंजर मधून बाहेर आहे सांगण्यात आलं. एका सिनिअर डॉक्टरांनी गुरव साहेबांना हि सूचना दिली. ह्या सगळ्यांच्या पाठी त्यांनी 'क्लीअर केस ऑफ पॉईझनिंग' सांगितलं.


गुरव साहेब... "हा फूड पॉईझनिंगचा केस होता काय...?"सिनिअर डॉक्टर... "नाही...! माझं म्हणणं असं आहे कि ह्यांना कुणीतरी विष दिलं होतं पण ह्यांच्या बॉडीच्या ओवर सेन्सिटिवने ह्यांना वाचवले आहे...
infact I suggest you to file a report in police too because its Police case. Someone must attempt to murder him…… ”
पण गुरव साहेबांनी ह्या गोष्टीसाठी नकार दिला, त्यांनी डॉक्टरांना राहुलच्या डोक्याच्या आजाराचा हवाला देत त्याचंच काही तरी कारस्थान असेल म्हणून हि गोष्ट रफादफा करायला सांगितली. ज्याच्या विरुद्ध त्या डॉक्टरला खूप मोठी रक्कम पण देण्याचा भरोसा दिला. आत्ता भलं डॉक्टरांना काय आपत्ती असणार. त्यांनी राहुलला रात्रभर देखरेख करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबून उद्या सकाळी डिस्चार्ज करण्याचं पण परमिशन दिली. थोड्या वेळाने हा निर्णय झाला कि हॉस्पिटलमध्ये अनघा आणि रम्या थांबणार आणि गुरव दाम्पत्ती सकाळी सकाळी राहुलला डिस्चार्ज करण्यासाठी येणार. अनघाची तिथे थांबण्याची इच्छा आणि राहुल प्रती प्रेम बघून गुरव साहेबांनी ह्या गोष्टीसाठी मंजुरी दिली होती.


राहुलला आत्ता एका प्राईवेट वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं, जो कोणत्या तरी फाईव स्टार हॉटेलच्या रूम सारखाच होता. थोड्यावेळाने राहुलच्या साठी रात्र भराची ग्लुकोजची बॉटल्स आणि जेवढी पण औषध डॉक्टरांनी सांगितली होती त्यांचा स्टोक तिथे ठेवून गुरव दम्पत्ती घरी निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर तिथे फक्त बेशुद्ध राहुल आणि रम्या सोबत अनघाच राहिली. रम्याची स्वाभाविक चिंता बघून अनघाला राहून राहून राहुलने सांगितलेली गोष्ट आठवणीत येत होती आणि प्रत्येक वेळी राहुलच्या त्या गोष्टींशिवाय त्या भासितच वाटत होत्या. पण आत्ता तिच्या डोक्यात नवीन प्रश्न यायला लागला कि शेवटी राहुलला विष दिलं तरी कोणी. थोड्या वेळाने अनघाला बाथरूमला लागली म्हणून ती रूममधल्या
अट्याच्ड बाथरूममध्ये गेली. बाथरूम मधून जेव्हा ती फ्रेश होवून बाहेर यायला लागली तेव्हा तिने बघितले कि रम्या आपल्या खिशात एका चाकुला फोल्ड करून ठेवत होता. हे बघून अनघाचे डोळे भयमुळे विस्फारले गेले... आत्ता परत तिच्या डोक्यात राहुलची गोष्ट यायला लागली.

तिला बाहेर येतांना पाहून रम्या रूममध्ये ठेवलेल्या एका स्टुलावर जावून बसला. तो आज आपल्या स्वभावाच्या विपरीत खूप शांत होता. अनघाने आत्ता जे काही पाहिलं होतं, त्यामुळे तिला रम्याशी थोडं भीती वाटत होती. ती रूममध्ये सगळी कडे नजर फिरवून आपल्यासाठी काहीतरी हत्यार सापडतंय का ते शोधत होती, ज्यामुळे ती आपला आणि राहुलचा जीव वाचवू शकेल. रम्या तिच्या विचारांच्या उलट आपल्या मालकाला लक्षपूर्वक बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव प्रत्येकवेळी बदलत होते. कधी कठोर तर कधी नरम, पण काही ना काहीतरी होतं जे त्याच्या मनात चाललं होतं. अनघा लगातार त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती.


अनघा ह्यावेळी रूममध्ये ठेवलेल्या एका सोफा-कम-बेडवर बसली होती. तिला राहून राहून झपकी येत होती ती आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवून जागण्याचा प्रयत्न करत होती. तिला असं पाहून रम्या उठून तिच्या जवळ येवून उभा राहिला...


रम्या... "तुला जागरण नाही होत तर कशाला डोळ्यांना त्रास देते ताई...? तुम्ही आरामात इथे झोपून जा... मी आहे इथे जागरण करण्यासाठी... (अनघाने काहीच प्रतिक्रिया न दिल्यानंतर)... मला माहित आहे कि आत्ता तुम्ही माझ्या प्रती भासित आहात... पण वेळ आल्यावर तुम्ही सगळं काही समजाल कि मी कोण आहे ते..."


अनघा... "(चीढ्लेल्या अंदाजात)... ज्यांचं मन साफ असतं ते आपल्या खिशात चाकू नाही ठेवत..."


रम्या... "(गोष्ट समजून) च्यामायला...! तर हि गोष्ट आहे, जे तुम्ही एवढं घाबरत आहात.. (मग खिशात हात टाकून चाकू काढतो आणि अनघाकडे करतो..) पहिलेच बोलल्या असत्या तर मी हा चाकू तुमच्याच हातात दिला असता. अरे आपल्या डोक्यावर जोर देवून एक गोष्ट मला सांगा... जर इथे कोणी आलं... आमच्या छोटे मालकाच्यावर हमला करण्यासाठी तेव्हा तुम्ही काय करणार.... काही तरी हातात असलं पाहिजे ना... बस हि गोष्ट लक्ष्यात ठेवून हा चाकू मी आपल्या सोबत ठेवला आहे.. समजली कि नाही..."


अनघा... "(त्याच चीडचीड्या अंदाजमध्ये) काय समजली कि नाही समजली कि नाही लावून ठेवलं आहे... जेव्हा पासून ह्या घरात आली आहे डोकं खराब झालं आहे. ह्या घरात घुसण्या आगोदरच असं सगळं सुरु झालं होतं माझ्या सोबत, नंतर ह्या घरात काही ना काही तरी होतंच आहे.... कधी तुम्ही काही तरी बोलता तर कधी दुसरं कोणी वेगळं बोलतो... सगळेच्या सगळे खरे पण आहेत आणि सगळेच्या सगळे खोटे पण... काय करू आणि काय नको करू... बस ह्याच मुळे लवकरच माझं डोकं पूर्ण खराब होईल..."


रम्या... "मी तर तुम्हाला पहिलेच बोललो होतो ना कि सगळेच्या सगळे एकापेक्षा एक वरचढ आहेत... तुम्ही फक्त तुमच्या डोक्याचं आणि मनाचं ऐका... नाही तर बुद्धी एकदम चक्रावून जाईल आणि भासेच्या जाळेत असे फसाल कि कोणी पण त्यातून तुम्हाला सोडवणार नाही..."


अनघा... "मला फक्त माझ्या हालातीवर सोडा...! मी बघून घेईन स्वतः कि कसं आणि कुठून बाहेर पडायचे आहे... तरीपण तुम्ही तरी कुठे पाठी आहात मला भासेच्या जाळेत अडकवण्यामध्ये... काही ना काही तरी धमाके तर तुम्ही पण करत असता ना..."


ती हे बोलतच होती कि राहुलच्या आवाजाने त्यांचं लक्ष तिकडे खेचलं गेलं... दोघेही राहुल जवळ उभे राहून त्याचा हाल बघत राहिले... अनघाने नर्सला बोलावण्यासाठी राहुलच्या बेडला लागलेली कॉलबेल वाजवली. राहुलची नजर शून्यात पाहून काही तरी विचार करत होती, जशीच त्याची नजर अनाघावर पडली तर त्याने आपला चेहरा दुसरीकडे वळवला.... हे बघून अनघाला पण वाईट वाटते पण ती काहीच नाही बोलत. बेलची आवाज ऐकून नर्स पण तिथे लगेच हजर झाली. तिने राहुलची नस वैगेरे चेक केली आणि त्याला आराम करण्यास सांगितले आणि अनघा आणि रम्याला त्याच्या सोबत जास्त बोलण्यास मनाई करून निघून गेली.


राहुलला आपल्याशी रागावलेला पाहून अनघाच्या मनात राहून राहून हि गोष्ट येत होती कि तो डोक्याने आजारी आहे कि नाही पण गुरव साहेबांवर्ती संशय करणं म्हणजे पाप करणं असं तिला वाटत होतं. ती राहुलच्या बाजूला बसून प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली. ह्यावेळी राहुल तिला बघून हळू आवाजात काही तरी बोलला पण अनघाला ते काहीच नाही समजलं त्यामुळे तिने आपला कान राहुलच्या तोंडाकडे आणून त्याला पुन्हा बोलायला सांगितले. राहुलने थोडंसं उठून तिच्या गालावर चुंबन दिलं, ह्या अप्रत्याशित चुंबनाने अनघाला सुखद अनुभूती तर झाली पण रम्याची आठवण येताच तिच्या गालावर लाजेची लाली आली, रम्या हे सगळं बघून हसत रूममधून बाहेर निघून गेला, जसं तो त्या दोघांना जास्तीत जास्त वेळ द्यायला बघत होता.


पण रम्या जाताच राहुल लगेच उठून बसला, त्याला उठून बसतांना बघून अनघा हैराण झाली. तिने ह्याला राहुलची आपल्या प्रती झालेली एक्साईटमेंट समजून त्याला आराम करण्यासाठी त्याच्या छातीवर आपला हात ठेवून त्याला पाठी ढकलत त्याला झोपवण्याचा प्रयत्न करायला लागली पण राहुलने तिचा हात पकडून तिला अजूनच आपल्या जवळ खेचले आणि अनघाच्या समजण्याच्या पलीकडे तिच्या कानाजवळ आपलं तोंड घेवून जात...


राहुल... "मला हेच पाहिजे होते कि तो रूम मधून बाहेर गेला पाहिजे त्यामुळे मी तुला त्याच्या समोर कीस केलं... तू रागावली तर नाही ना..." आणि स्मित हास्य देत तिला बघायला लागला... अनघा तर पहिले हि गोष्ट ऐकून दचकली पण नंतर शेवटी विचारलेल्या प्रश्नावर लक्ष जाताच तिने आपली नजर खाली करत नकारार्थी आपली मान हलवली. तिचं असं लाजून खाली मान करून उत्तर देणे राहुलचं हृदय धडधड करायला लागला पण आपल्या जवळ असलेल्या कमी वेळेमुळे राहुलने आपली गोष्ट पुन्हा सुरु केली...


राहुल... "तुझ्याशी त्या लोकांनी उद्यासाठी काय वार्ता केली...? तुला 'प्रिया'च्या रूपात इंट्रोड्यूस करण्याची गोष्ट खरी निघाली ना... आत्ता तर तुला माझ्या गोष्टींवर्ती विश्वास बसला असेल ना.."


अनघा... "हे एकदम खरं आहे कि ते लोकं मला तुमच्या नातेवाईकांसमोर 'प्रिया' म्हणून इंट्रोड्यूस करणार आहेत पण गोष्ट तशी पण नाही आहे जशी तू मला सांगितली होतीस... ते लोकं फक्त आणि फक्त तुझं भलं करत आहेत... आणि तुझ्या चांगल्या स्वास्थ्यासाठी दृढ संकल्प करून बसले आहेत... तुझ्या मनात त्यांच्यासाठी द्वेषाची भावना कशी जागृत झाली... हे मला नाही माहित... तुने तर तुझ्या वफादार रम्याला पण संशयामध्ये ठेवलं आहे... उलट तो बेचारा तर दिवस रात्र तुझीच चिंता करत असतो... ह्या वेळी पण बघ तो तुझ्यासाठी किती चिंतीत आहे..."


राहुल... "काहीच चिंता नाही आहे कोणाला... हे सगळे माझ्या पैशांच्या पाठी लागले आहेत... बस माझी पूर्ण संपत्ती ह्याच्या हाती लागली कि हे लोकं मला पण मारून टाकतील..."


अनघा... "कोणीच तुला मारायचं नाही बघत आहेत ये सगळं तर तू.. (मध्येच कोणत्या तरी गोष्टीवर लक्ष जाताच... हैराणी ने...) 'मला पण' म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे तुझा... अजून कोणाला मारलं आहे ह्या लोकांनी..."


राहुल... "(एकदम विस्फोट करत.... खूप हळू आवाजात)... माझ्या 'प्रि - या' ला..." 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment