Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 30 October 2012

भाग ~ ~ २६ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  २६

घटनेच्या पुढे.... 


अनघा... "(रागाने राहुलचा हात सोडवत)... हे काय बोलतोयस तू...! हि कोणती नवीन कहाणी बनवत आहेस तू..? गपचूप झोपून आराम कर... डॉक्टरांनी पण तुला आराम करायला सांगितलं आहे... झोपून जा चूपचाप बस.."

राहुल... "तुला अजूनही माझ्या गोष्टींवर भरोसा नाही आहे ना...! कदाचित जेव्हा मी मरून जाईन तेव्हाच तुला माझ्यावर विश्वास बसेल..."

त्याचं असं बोलणं ऐकून तिचे डोळे पाणावले गेले. तीला स्वतःला खूप जास्तच भासेच्या जाळ्यात अडकलेलं वाटत होतं. तिला काहीच समजत नव्हते कि राहुलच्या गोष्टींमध्ये किती खरेपणा आहे... खरेपणा आहे कि नाही किंवा त्याचा आजार त्याच्या डोक्यावर हावी झाला आहे. ती आत्ता हाच विचार करत होती कि रम्याने रूममध्ये प्रवेश केला. रम्याला बघून अनघाने आपले अश्रू पुसायला सुरुवात केली पण रम्याने बघितले. त्याला एवढे तरी समजले कि दोन्ही प्रेमी जोडप्यांमध्ये काहीना काही तरी झालं आहे, पण कोणत्या गोष्टींवर झालं आहे ते नाही समजलं.

रम्याने ह्यावेळी अनघाला विचारणे उचित नाही समजलं त्या मुळे तो चुपचाप येवून रूममध्ये एका कोपऱ्यात ठेवलेल्या स्टुलावर येवून बसला. अशीच पूर्ण रात्र निघून गेली, सकाळी गुरव दम्पत्ती सांगितल्यानुसार हॉस्पिटलमध्ये पोहोचले. राहुलची डिस्चार्जची फोर्म्यालिटी फटाफट पूर्ण करण्यात आली आणि घराकडे निघाले. ह्यावेळी अनघा
गुरव दम्पत्ती सोबत त्यांच्याच गाडीमध्ये बसली होती. राहुलच्या सोबत रम्या आणि एक नर्स जी आत्ता कदाचित २-३ दिवस राहुलसोबत असणार, बसली होती. रस्त्यामध्ये सोनालीने अनघाला आपल्या येणाऱ्या नातेवाईकां संबंधी काही समजावलं, जे अनघाने चांगल्या प्रकारे समजून घेतलं. प्रोग्रामच्या अनुसार सगळे नातेवाईक ११-१२च्या सुमारास येतील. ज्यांच्या मधून राहुलचे सगे मामा आणि मावशीचं विशेष लक्ष द्यायला सांगितलं अनघाला.

घरी पोहोचून अनघा आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेली. ती आंघोळ करून बाहेर निघालीच होती कि तिच्या रूममध्ये सोनालीने प्रवेश केला. सोनालीच्या हातात काही
एक्सपेंसीव
ड्रेसेस होत्या जे हाई सोसायटीच्या मुली घालायच्या. सोनालीने आपल्या काही लेटेस्ट फ्याशनचे दागिने पण अनघाला घालायला दिले. अनघाने ह्या पूर्वी एवढे महाग ड्रेसेस आणि दागिने फक्त म्याग्जींस किंवा मुविमध्येच पाहिले होते. ती तर स्वतःला धन्य समजत होती असले ड्रेसेस आणि दागिने भेटून. मग सोनालीने स्वतःच तिला एक ड्रेस सिलेक्ट करून दिला, ज्यामध्ये अनघाचं अप्सरा दिसणे जवळ जवळ तय होतं.

तोपर्यंत एका नोकराने येवून पंडित आले आहेत अशी खबर दिली, ज्याला ऐकून सोनाली खाली निघून गेली पण जाता जाता ती अनघाला वेळेवर तैय्यार व्हायला सांगून गेली. अनघा ते ड्रेसेस आणि दागिने बघून मंत्रमुग्ध झाली होती. तेव्हा तिला आठवले कि तिने आज आपल्या घरी फोन करून आईशी वार्ता नाही केली, तेव्हा तिने लगेच आपल्या आईला फोन लावून आपल्या वडिलांची तबियत पाणी विचारलं आणि आपलं पण सखुशल त्यांना सांगितलं. अनघाने अजूनही आपल्या आईला इथे घटीत होणाऱ्या घटना नाही सांगितल्या आहेत. तिला माहिती होतं कि हे ऐकून तिची आई तिच्यासाठी चिंता करेल.


खाली घरामध्ये पुजेची तैयारी सुरु झाली होती. सोनालीच्या नेतृत्वामध्ये सगळे नोकर पूर्ण आदराने सगळं काम करत होते. पंडित पण आपल्या पूर्ण टीम सोबत आला होता. त्याने हवन कुंड सजवून पुजेची सगळी तैयारी सुरु केली. हवनमध्ये गुरव साहेब आणि राहुल दोघांनाहि बसायचे होते पण राहुलला रात्रीच्या घटनेमुळे कमजोरी आली होती त्यामुळे तो बसणार नव्हता, त्यामुळे त्याच्यावर कोणी जोर पण नाही टाकला. ठरलेल्या वेळेप्रमाणे सगळे नातेवाईक पण यायला सुरुवात झाली. १२ वाजता वाजता ते खास मामा आणि मावशी पण आले होते ज्यांच्यासाठी सोनालीने अनघाला विशेष लक्ष द्यायला सांगितलं होतं. राहुलच्या आईमुळेच आज दोघेही खूप मोठ्या पद्व्यांवर काम करत होते. मामा एक फिलोसोफर होते तिथे मावशी न्याशनल लेवलची क्लासिकल डान्सर होती. दोघांचं हि नाव पूर्ण देशात गाजलेलं होतं.


सोनालीने आत्ता अनघाला खाली यायला सांगितले होते, अनघा एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर जायला थोडा नर्वस फील करत होती. गुरव साहेब पूजेसाठी बसले होते आणि त्याच्याच सोबत ते दोघे मामा आणि मावशी बसून काही तरी बोलत होते. जेव्हा सगळ्यांनी सोनाली सोबत सजलेल्या अनघाला खाली येतांना पाहिले तेव्हा हॉलमध्ये असलेल्या सर्व लोकांनी आपापल्या मनांत अनघाची प्रशंशा केल्या शिवाय राहिले नाहीत. का नाही करणार, ती दिसतच होती एका परीवाणी सुंदर. राहुल जो हॉल मध्येच ठेवलेल्या खुर्ची वर बसला होता तो उठून उभा राहिला. तो पण आपल्या प्रेमिकाचं असं रूप पाहून मंत्रमुग्ध झाला होता.


राहुलचे मामा आणि मावशी आत्ता आपल्या जागेवरून उठले होते आणि अनाघाजवळ जात होते. त्यांना आपल्याकडे येतांना पाहून पहिले तर अनघाने आपलं डोकं झुकवून त्यांना नमस्कार केला आणि मग सोनालीच्या इशाऱ्याने पुढे होवून त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. मावशीने तर पुढे होवून अनघाला मिठी मारली.


मावशी... "(भावूक होत) आज ताई असती तर तुला बघून किती खुश झाली असती... माझा राहुल खूप सभ्य आहे, त्याची काळजी घे...(सोनाली कडे बघत)... वहिनी...! मला तर हि पसंत आहे... आत्ता लवकर तुम्ही ह्या दोघांचं लग्न करा आणि आम्हा दोघांना ह्या पासून मुक्त करा... आणि ज्यांची अमानत आहे त्याला सोपवून आम्ही पण चिंता मुक्त होवू. (मामाकडे बघत) काय बोलता तुम्ही ह्या विषयी... तुम्हाला कशी वाटली 'प्रिया'?"


मामा... "जेव्हा तुम्ही हामि भरली आहे...! तेव्हा मी भलं काय ऑब्जेक्शन घेणार... (अनाघाकडे बघत)... बेटा तुम्ही जरा आमच्या सोबत या... काही गोष्टी करायच्या आहेत तुमच्याशी.."


अनघाने एकदा सोनालीला पाहिले मग सोनालीने आपली मान होकारार्थी हलवून तिला त्यांच्यासोबत जायला सांगितले. मामा तिला हॉलमध्ये एका असल्या जागी घेवून गेले जिथे त्यांना सगळे बघू शकतात पण ते लोकं काय बोलत आहेत ते ऐकू शकत नाहीत... आपला गळा साफ करून मामा बोलायला लागले...


मामा... "प्रिया बेटा...! तुम्हाला तर माहितीच आहे कि आमचा राहुल किती भोळा आहे... आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तबियतीमध्ये पण गडबड चालू आहे..."


अनघा मनातल्या मनात विचार करत होती कि ह्यांना राहुलच्या आजाराविषयी माहिती तरी आहे कि नाही पण तिने आपल्या कडून काही बोलणं आणि विचारणं उचित नाही समजलं...


मामा... "त्याची जीवन संगिनी बनण्यासाठी तुला एक प्रेमिकाहून जास्त एका आई सारखं त्याची देख रेख करायला लागणार... (अनघा त्यांची अशी गोष्ट ऐकून बिचकते)... मला माहिती आहे कि तुम्हाला माझ्या गोष्टी पटणार नाहीत... पण काय करणार माझ्या ताईची शेवटची निशाणी आहे राहुल.... ज्याची जवाबदारी आत्ता तुला उचलायला लागणार... तुम्ही त्याच्या प्रोपरटीची मालकीण बनणार आहात... त्यामुळे तुला आमच्या ऑब्जरवेशनमध्ये तर राहायला लागणार... आणि जो पर्यंत आम्ही राहुलच्या प्रती तुझ्या कन्सर्नशी इम्प्रेस नाही होत तो पर्यंत ऑब्जरवेशन चालू राहणार..." 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment