Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 9 October 2012

भाग ~ ~ २० Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ २०

घटनेच्या पुढे.... 

राहुल... "(थोडा रागात) तिथे का जाणार मी...? हे पण बोलला होता का तो माझ्या कम्प्लेंटमध्ये... विचित्र माणूस आहे... तिथून निघून आम्ही सरळ घरीच आलो... त्याने आमचा मूड एवढा खराब केला कि ज्या फेमस 'जावेदची बिर्याणी' खाण्यासाठी मी प्रियाला तिथे घेवून गेलो होतो ती आम्ही नीट खालली पण नाही.."

बिर्याणीच नाव ऐकताच रम्या लगेच मध्ये बोलला...
रम्या... "हवालदारीण बाई हे काम त्या माणसाने खूप चांगलं केलं जे ह्या लोकांना बिर्याणी खायला दिली नाही ती... त्यासाठी त्या माणसाला क्षमा करा..."

रम्याच्या तोंडून आपल्यासाठी हवालदारीण बाई ऐकून शर्वरीला खूप राग येतो पण ती बोलत काहीच नाही कारण 'गाढवा पुढे गीता वाचल्यासारखी झाली असती' असं समजून ती रम्याला रागाने बघून सोडून देते.

शर्वरी... "नाही नाही...! हे त्याने नाही विचारलं होतं हे तर मी विचारत आहे... माहित नाही अजून काय काय खोटं बोलला असता तो... मला तर माहितीच होतं कि आमचा राहुल आमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही .."

राहुल आपली प्रशंसा ऐकून खुश झाला आणि अनाघाकडे बघायला लागला. त्याला आपल्याकडे बघताना पाहून अनघा पण स्मित हास्य देवून आपली सहमती प्रकट करते. इकडे शर्वरीला आपल्या फायद्याची कोणतीच खास गोष्ट न निघताना पाहून गुरव साहेबांना राहुलला बाहेर घेवून जाण्याचा इशारा करते. गुरव साहेबांनी त्याला आपल्या रूममधून कोणती तरी बुक आणायला सांगितली, जिच्यासाठी त्याने आधी रम्याकडे पाहिले पण रम्याला काहीतरी विचारायचे आहे असं बोलून शर्वरीने त्यालाच जायला सांगितले. राहुल बाहेर जाता जाता अनघाला पण आपल्या सोबत घेवून गेला... ज्यावर शर्वरीला काहीच हरकत नव्हती... रूममधून बाहेर येताच राहुलने अनघाच्या खांद्यावरती हात ठेवून एकदम आनंदी होवून तिला आपल्या जवळ खेचले आणि तिच्या कानात बोलायला लागला...

राहुल... "(खुश होत) तुला माहिती आहे, आज मी त्या पोलीसवालीला कसं मूर्ख बनवलं ते... काल मध्य-रात्री जेव्हा सगळे जण झोपले होते तेव्हा मी गुपचूप घरातून बाहेर निघून त्या माणसाच्या हॉटेलच्या रूम पर्यंत गेलो होतो... तो पहिले त्याच रेस्टोरंटमध्ये होता नंतर तिथून निघून तो ट्याक्सीने जायला लागला मग मी माझ्या ट्याक्सीने त्याचा पाठलाग केला... आपल्या कारने असतो तर मध्येच त्याला पकडून खूप मारलं असतं, पण माझा ट्याक्सी वाला खूप स्लो होता म्हणून आम्ही त्या माणसाला रस्त्यामध्येच रोखू शकलो नाही... मग त्याच्या हॉटेलमध्ये पाठलाग करून जसाच तो आपल्या रूममध्ये घुसला... मी त्या साल्याला खूप मारलं... खूप मारलं... मग जेव्हा तो हाता-पाया पडून क्षमा मांगायला लागला तेव्हा मी त्याला सोडले आणि त्याला ताकीद पण दिली कि ह्या पुढे जर माझ्या प्रियाला त्रास दिलास तर मी तुला अजून मारणार..."

अनाघावर तर हे सगळं ऐकून वीजच पडली, ती हैराणीने एकटक राहुलला बघत होती... आणि राहुल तर ह्या प्रकारे उभा होता कि जसं त्याने खूप महान कार्य केलं आहे आणि त्यासाठी त्याला शाबासकी भेटणार आहे... अनघाला असं दचकल्यासारखं उभं असलेलं पाहून, तो जवळ जवळ तिला आपल्या सोबत खेचतच आपल्या रूममध्ये घेवून गेला आणि रूममध्ये पोहोचताच तिला मिठी मारली. अनघासाठी हि हरकत अजून एका झटक्या सारखी होती... ती आत्ता पहिल्या झटका जो राहुलचं बोलणं ऐकून लागला होता त्यापासून सावध पण झाली नव्हती कि राहुलचं असं तिला मिठीत घेणं तिला झटक्या पेक्षा कमी नाही वाटत होतं. राहुल तिला एकदम गच्च मिठी मारून आपल्या शरीराच्या एकदम जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता. अनघा त्याच्या ताकदीपुढे खूप कमजोर पडत होती तरी पण तिला राहुलने अशी मिठी मारलेली आवडली नाही... तिने आपला पूर्ण जोर लावून राहुलला ढकललं आणि आवेशमध्ये येवून राहुलला एक जोरदार कानाखाली वाजवली.

सटाssssssssssssक आवाज पूर्ण रूममध्ये फिरायला लागला आणि राहुल गाल पकडून हतप्रभसा उभा राहिला. राहुलला कानाखाली वाजवून अनघा मुसमुशीत रडायला लागली. तिने आपल्या दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवला होता... आणि खूप जोरात रडत होती... राहुल तिला रडतांना पाहून आपल्या गालावर मारलेला झापड विसरून गेला आणि अनघा जवळ जाऊन तिच्या डोक्यावरती प्रेमाने हात फिरवायला लागला.

--------************---------

तिथे राहुल आणि अनघा गेल्या नंतर शर्वरीने आपलं बोलणं सुरु ठेवलं...

शर्वरी... "गुरव साहेब...! तुम्ही ह्या मुलीला पहिल्या पासून ओळखता का..?"

गुरव साहेब... "अनघा विषयी विचारात आहात काय (शर्वरीने होकारार्थी मान हलवल्यावर)... नाही नाही... आम्ही तर आमच्या इथे नोकरी करण्यासाठी पेपरमध्ये माहिती छापली होती... ज्याच्या प्रतिक्रियेमध्ये खूप लोकांनी रिप्लाय केला होता... आमच्या पूर्ण शर्ती मान्य करून आमच्या इथे काम करण्यासाठी होकार देणारी हीच अनघा होती... आणि ज्या दिवशी आमच्या ड्राईवरने रेल्वे स्टेशनवरती हिच्या सोबत घडलेली घटना सांगितली तेव्हा आम्हाला हिच्याशी सहानुभूती झाली. नंतर तर ह्या मुलीच्या सादगीने पूर्ण घरातल्या लोकांचं मन मोहित केलं... (काही वेळ थांबून) आम्हाला माहिती आहे कि अजून पर्यंत तुम्ही अनघाला तुमच्या शंकेतून बाहेर काढलं नाही आहे... त्या खुनांच्या पाठी ह्या मुलीची काहीच भूमिका नाही आहे... आणि तुम्ही खाली फुकट तिलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहात..."

शर्वरी... "माझं काहीच पर्सनल शत्रुत्व नाही आहे अनघाशी.. आणि राहिला प्रश्न अनघाला शंकेच्या बाहेर काढण्याचा... तर त्यासाठी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते... गुरव साहेब..! जो पर्यंत असली खुनी पकडत नाही तो पर्यंत मी स्वतःला पण शंकेच्या बाहेर काढत नाही ... अनघा विषयी विचारपूस केल्यावर काही खास गोष्टी माहिती नाही पडली शिवाय हेच कि अनघा लहान पणा पासून आपल्या आजीकडे (कोल्हापूरला) राहायची. माझी एक टीम कोल्हापूरला गेली आहे... काल रात्री झालेल्या हत्या प्रकरणी पडताळणी करण्यासाठी. तिथून जसंच अजून काही पुरावे भेटतील... मी तुम्हाला पुन्हा त्रास देणार... (मग रम्याकडे बघत) तुझी जखम आत्ता कशी आहे..?"

रम्या... "(आपल्या डोक्यावर हात फिरवत)... पट्टी तर मी कालच काढली होती, पण अजूनपर्यंत थोडं दुखतंय तिथे... देव करो तो काळे कपडेवाल्या माणसाला जरूर आपल्या कर्माची शिक्षा भेटो... असो तुम्ही खूप चांगल्या आहात हवालदारीण बाई (शर्वरीचा राग बघून) अरे माझं म्हणणं असं आहे कि डी.एस.पी. म्याडम...! बस आपल्या मनातून अनघाला पकडण्याची गोष्ट काढून टाका... ती एकदम देवी आहे म्याडम... एकदम देवी... तिने मला आपला भाऊ बनवलं आहे... आणि माझी बहिण कोणतं असलं तसलं तर काम करणार नाही... तुम्ही बस तिचा पाठलाग सोडा... मी तर बोलत आहे कि..."

सोनाली... "परत सुरु झालास तू... तिने फक्त तुझ्या जखमे विषयी विचारलं होतं... सांगितलं ना तू... तर बस आत्ता आपल्या तोंडाला विश्राम दे..."

शर्वरी... "(सुटकेचा श्वास घेत) तुमचे खूप खूप आभार सोनालीजी, जे तुम्ही ह्या माणसाच्या एके-४७ ला बंद केलात ते... ह्याचं फक्त ऑन बटन काम करतं... ऑफचं स्वीच तर ह्याच्यात आहेच नाही..."

रम्या... "(चीढ्लेल्या स्वरात)... मी काय कोणी पंखा आहे जो माझं स्वीच लागेल... जेव्हा ऐकायला नाही होत तर मला विचारता का... मी जातोय साहेब इथून... मला अजूनही खूप कामं आहेत..." एवढं बोलून रम्या तिथून निघून जातो... गुरव साहेब त्याला जातांना बघून स्मित हास्य देतात...

गुरव साहेब... "थोडा बडबड्या जरूर आहे पण मनाचा एकदम साफ आणि इमानदार आहे, (शर्वरी कडे बघत)... तुम्ही अजून पर्यंत अनघाच्या पाठी का लागला आहात, उलट आत्ता तर हे सुद्धा माहिती पडलं आहे कि त्या काळेकपडेवाल्याचं अस्तित्व आहे... मग तुम्ही ऐकत का नाही आहात..?"

शर्वरी... "कारण ह्या घराच्या बाहेर त्या काळे कपडेवाल्याचं काहीच अस्तित्व आमच्या समोर अजून आलं नाही... उलट तुमच्या नोकराची जखम पण एकदम मामुली आहे... एवढ्या क्रूरतेने दोन दोन खून करणारा माणूस भलं ह्याला एवढ्या हळूच का मारेल..."

गुरव साहेब आणि सोनाली हि गोष्ट ऐकून खूप खोलवर विचार करायला लागतात...

----------------------------

आपल्या डोक्यावरती राहुलच्या हाताचा स्पर्श जाणवून अनघा जी अजून पर्यंत आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून रडत होती ती आपले दोन्ही हात बाजूला करून राहुलकडे बघायला लागते. राहुलच्या डोळ्यात ग्लानी आणि पश्चाताप दोघांचे भाव होते. त्याच्या डोळ्यात असले भाव बघून अनघाचं कोमळ हृदय पिघळळं आणि तिला लगेच राहुलच्या मानसिक अवस्थेची जाणीव झाली. हे डोक्यात येताच तिला आत्ता राहुलला मारलेल्या झापडचा पश्चाताप होत होता. ती जेव्हा राहुलकडे बघून सॉरी बोलली तेव्हा राहुलने लगेच तिचे डोळे पुसून... आपल्या हरकतीवरती सॉरी बोलला आणि ह्या वेळी तो स्वतःच रडायला लागला... अनघाला त्याचं रडणं चांगलं नाही वाटलं.. तिने पुढे येवून राहुलला आपल्या मिठीत घेतलं.

अनघाने मिठी मारताच राहुलने तिला एकदम गच्च आपल्या बाहुपाश्यात सामावून घेतलं. ह्या वेळी अनघाला हे आलिंगण सुखद वाटत होतं... जिथे पहिलेवालं आलिंगण तिला आवडलं नव्हतं तिथेच हे वालं आलिंगणा मध्ये तिला एक रोमांचाची जाणीव होत होती. खरं तर हे आहे कि कोणत्याही मुलीला आपल्या सोबत केलीली जबरदस्ती आवडत नाही.

राहुल... "माझ्याशी नाराज होवून तू मला सोडून तर नाही जाणार ना... मी मरून जाईन तुझ्याशिवाय..."

अनघा... "मी कुठेच नाही जाणार तुला सोडून... पण मला वचन दे कि, माझ्या सोबत ह्या प्रकारे ह्या पुढे असं कधीच नाही वागणार... ह्या गोष्टीचं पण वचन दे.."

राहुल.. "मी काय केलं होतं... (तो अजूनपर्यंत रडत होता) फक्त तुला मिठीत तर घेतलं होतं, जसं प्रत्येकवेळी घ्यायचो... पहिल्या सारखं... मग तू ह्यावेळी नाराज का झालीस...?"

अनघा... "पहिल्याची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे... आत्ता मी इथे तुझ्या घरात आहे.. प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आजूबाजूला असतं... तुला समजत का नाही आहे कि मला तुझ्यासोबत असं बघून तुझ्या दादा आणि वहिनीला काय वाटणार.."

राहुल... "(काही समजल्याच्या अंदाजमध्ये आपले डोळे पुसत) हो मला तर ह्या गोष्टीची जाणीवच नव्हती... मी पण ना एकदम पागल आहे काहीच विचार नाही करत बस करून बसतो... तू एकदम ठीक केलंस.. ह्यापुढे पण मी जर असं तसं केलं तर अशीच लावून दे मला..."

हि गोष्ट राहुल अशी निरागसपणे बोलला कि अनघा आपलं हसणं आवरू शकली नाही... ह्या वेळी तिच्या हसण्यामध्ये राहुलने पण साथ दिली... आणि दोघे परत आलिंगणबद्ध झाले. हळू हळू दोघेही ह्या चमक्तारी मिठीत हरवले गेले. अनघा पण पहिल्यांदा स्वतःच्या इच्छेने कोणत्या नव-युवकाला आलिंगणबद्ध झाली आहे आणि कोणाच्या जो आत्ता तिला खूप आवडायला लागला आहे आत्ताच काय पहिल्या भेटीत सुद्धा तो तिला आवडायला लागला होता (कारण राहुल दिसायला होताच तसा कोणत्या मुविच्या हिरो सारखा), कारण ती आत्ता त्याच्या प्रेमात पडली आहे. एकमेकांच्या श्वासाशिवाय ते दोघे एकमेकांच्या हृदयाचे ठोके पण ऐकू शकत होते.

श्वास जिथे प्रत्येक क्षणी वाढत होता आणि त्याच प्रमाणे हृदयांच्या ठोक्यांची गती पण वाढायला लागली होती. अश्या वेळी जिथे राहुलला आपल्या भावनांवर्ती कंट्रोल करणे अवघड जात होते तेव्हा त्याने स्वतःला आलिंगण मधून मुक्त करून अनघाच्या चेहर्याला बघायला लागला... ती अजून पर्यंत त्या आलिंगणच्या सुखद जाणीवेतून बाहेर आली नव्हती आणि आपल्या जोर जोरात चालणाऱ्या श्वासा बरोबर आपले डोळे बंद करून आपल्या खुल्या ओठांनी राहुलला निमंत्रित करताना प्रतीत होत होती.

राहुलने पण त्या लाजणाऱ्या ओठांच्या निमंत्रणाला जास्त वेळ पर्यंत थांबवणं उचित नाही समजलं आणि आपल्या कंपन पावणाऱ्या ओठांना आपल्या प्रियाच्या गरम आणि लाजणाऱ्या ओठांवरती ठेवलं... ओठांच एकमेकांना मिळणं होतं बस... जसं दोघांचेही श्वास घेणे थांबले होते. दोघांनी हळू हळू एकमेकांच्या श्वासांना प्यायला सुरुवात केली होती आणि ते दोघे ह्या अलौकिक चुंबनात हरवून गेले.

----------------------------------

इथे शर्वरी आणि गुरव साहेबांचं संभाषण सुरूच होतं...

शर्वरी... "काल रात्री खूप वेळ तो माणूस त्या रेस्टोरंटमध्ये कोणाची तरी वाट पाहत बसला होता... आज-कल समता नगरचा टूरिस्ट सीजन असल्यामुळे पण तो रेस्टोरंट रात्र पर्यंत चालू होता... तो माणूस त्या रेस्टोरंटमधून निघणारा शेवटचा माणूस होता... जेव्हा तो बाहेर निघाला तेव्हा पर्यंत कदाचित तो खूप प्यायला होता,  ज्यामुळे तो चालत पण दारुड्यावानी होता. सकाळी वृत्त पत्रात खुनाची माहिती वाचताच रेस्टोरंटच्या म्यानेजर ने स्वतःच रात्रीच्या घटनेची (राहुलची मारामारी) माहिती त्याने पोलिसांना दिली होती... हॉटेलच्या गेटकीपरने पण ह्या गोष्टीची पुष्टी केली होती, जेव्हा तो माणूस हॉटेलमध्ये पोहोचला होता तेव्हा त्याने खूप पिली होती... असो आम्ही आत्ता सी.सी.टी.वी.ची फुटेज मांगावली आहे, आत्ता बघायचे आहे कि काल रात्री तिथे कोण कोण आलं होतं... देव न करो कि तुमच्या घरातील कोणत्या माणसाचा चेहरा मला पाहायला मिळो..." एवढं बोलून शर्वरी आपल्या चेहऱ्यावर कोणतेच भाव न आणता दोघांना बघायला लागली. सोनाली जी अजूनपर्यंत पूर्ण गोष्ट ऐकत होती ती मध्येच बोलते...

सोनाली... "डी.एस.पी. म्याडम..! मी एवढ्या वेळे पासून तुमची गोष्ट ऐकली... तुम्ही मला सांगू शकता का कि तुम्ही अजून पर्यंत कुलकर्णी विषयी काय काय माहिती काढली आहे...?".


क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment