Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 1 November 2012

भाग ~ ~ २७ Illusion .... एक भास..????

आजचा सुविचार: - दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  २७

घटनेच्या पुढे.... 


अनघा... "(काही तरी न समजल्यागत) मला क्षमा करा मी काही समजली नाही. तुम्ही कोणत्या ऑब्जरवेशनची गोष्ट करत आहात... आणि मी भलं राहुलच्या प्रोपरटीची मालकीण कशी बनणार.. उलट तो आपली जवाबदारी स्वतःच सांभाळू शकतो..."

मामा..."तुला नाही माहित कि राहुल किती सभ्य आहे. लहानपणापासून त्याने प्रत्येक काम आपल्या मोठ्या भावाच्या म्हणण्या प्रमाणेच केलं आहे... आपलं डोकं तर कधी त्याने लावलं नाही. जे त्याचे मोठे भाऊ बोलतील ते त्याच्यासाठी ब्रम्ह-वाक्य बनलं.. बस हीच गोष्ट लक्ष्यात ठेवून माझ्या बहिणीने अशी व्यवस्था केली होती आपल्या वसीयतमध्ये कि राहुलची संपत्ती त्याला लग्नानंतरच भेटणार आणि ति पण त्याला नाही त्याच्या बायकोला... आणि ह्या गोष्टीची जवाबदारी माझ्या बहिणीने आमच्यावर म्हणजे राहुलच्या मावशीवर आणि माझ्यावर सोपवली आहे... बस आपल्या त्याच जवाबदारी पायी आम्ही तुला पहिले ऑब्जरवेशनमध्ये ठेवणार नंतर आपला निर्णय सांगणार...."


आत्ता अनघा हा विचार करत होती कि ज्या राहुलला हे लोकं गुरव साहेबांचा पाठराखे समजत होते तोच राहुल त्यांच्या वर कसले कसले आरोप लावत आहे. सोनाली आत्ता त्यांच्याजवळ आली होती, हॉलमध्ये पंडितच्या तोंडातून निघणारे मंत्र ऐकायला येत होते. सोनालीने अनघाला दुसऱ्या नातेवाईकांना भेटावण्यासाठी त्यांची परवानगी घेवून आपल्या सोबत घेवून गेली. मामा पासून काही अंतर गेल्यावर सोनालीने तिला विचारले कि काय बोलले मामा तर तिने ऑब्जरवेशनवाली गोष्ट तिला सांगितली. हे ऐकून सोनाली तोंड वाकडं करून बोलली कि जसं त्यांची आणि राहुलची मर्जी. ज्याला ऐकून अनघा लाजली. सोनालीने अनघाला सगळ्या नातेवाईकांना भेटवलं जवळ जवळ सगळ्यांना अनघा आवडली.


पूजा आत्ता संपली होती आणि गुरव साहेब पण फ्री झाले होते. काही वेळाने जेवणाची वेळ झाली जमीनवरच सगळ्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. जवळ जवळ २-३ तासांमध्येच हे सगळं आटोपलं गेलं. सगळे नातेवाईक आत्ता निघून गेले होते, काही खास नातेवाईकां शिवाय आणि त्यामध्ये ते खास नातेवाईक मावशी आणि मामा पण शामिल होते. अनघाशी मामा आणि मावशी दिवस भर बोलत राहिले होते. त्यांची गोष्ट फिरून फिरून आपल्या ऑब्जरवेशनवरच येत होती. हळू हळू रात्र झाली, सगळे नोकर आज खूप थकले होते... सोनालीने पण पूर्ण काम झाल्यावर सगळ्यांना आराम करायला सांगितलं. आत्ता घरात फक्त घरातलेच माणसं होते.


सगळे लोकं लिविंग रूममध्ये बसून आपला थकवा दूर करत होते. मामाने प्रियाच्या हाताने बनलेली चहा पिण्याची इच्छा जाहीर केली. ज्याला पूर्ण करण्यासाठी अनघा किचनमध्ये सगळ्यांसाठी चहा बनवायला गेली. जेव्हा पासून अनघा ह्या घरात आली होती त्यामुळे हि पहिलीच वेळ होती जी ती किचनमध्ये काम करण्यासाठी गेली होती. बाकी सगळे नोकर आपापल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले होते पण रम्याची गोष्ट वेगळी होती, तो अजूनही घरातच होता आणि काही ना काही तरी काम करतच होता. कधी कोणाला काही देत होता तर कधी कोणाला काही... अनघा सोबत तो पण तिला मदत करण्यासाठी किचनमध्ये आला होता. आज अनघा रम्याशी माफी मांगायला बघत होती कारण तिने, काल खूप काही त्याला बोलली होती त्यामुळे, पण सकाळपासून रम्या तिला न बघितल्यासारखा आपल्या कामाला लागला होता. तेव्हा जसंच रम्या किचनमध्ये आला तेव्हा अनघाला वेळ मिळाली.


अनघा... "रम्या दादा...! मला क्षमा करा मी खूप काही बोलली तुम्हाला, मी ह्या घरातल्या वातावरणामुळे एवढी चिंतीत झाली होती कि पूर्ण राग तुमच्यावर काढला... आपल्या बहिणीच्या चुकीला तुम्ही क्षमा नाही करू शकत..." आणि हे बोलता बोलता अनघाने आपले दोन्ही हात जोडले. तिला असं हात जोडलेलं पाहून रम्याला राहवलं गेलं नाही.


रम्या... "अरे हे काय करतेस तू ताई..! मला जिवंतपणीच नरकात पाठवतेस कि काय... आणि मी कुठलीच गोष्ट मनावर घेत नाही, तर हि गोष्ट का मनावर घेणार... तुला तर मी मनापासून बहिण मानलं आहे... त्यामुळे हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे..."


हे सगळा ऐकून अनघाला थोडं बरं वाटलं. तिने चहा बनवून केटलमध्ये टाकली आणि रम्या तिला सर्विंग ट्रोलीमध्ये घेवून लिविंग रूममध्ये जायला निघाला. किचनच्या बाहेरच मावशी उभी होती, तिने अनाघाकडे पिण्यासाठी पाणी मांगीतलं. पाणी पिऊन, ती पण त्या दोघांसोबत लिविंग रूममध्ये आली जिथे नातेवाईक बसले होते. रम्याने सर्वांना चहा सर्व केली... चहा पितेवेळी अनघाला खूप सारे प्रश्न विचारले गेले, म्हणजे तिचं घर परिवार, तिचं शिक्षण वैगेरे वैगेरे. आपली चहा घेवून मामा आणि मावशी लिविंग रूमच्या बाहेर निघून गेले... पण कोणीच त्यांचं जाणं नोटीस नाही केलं, थोड्यावेळाने ते लोकं परत आले.

मामा..."तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि कृपया माझ्या गोष्टींवर जरा लक्ष द्या... (जेव्हा लोकं त्यांच्याकडे बघायला लागतात) आज तुम्ही सगळे इथे प्रियाला भेटलात.... तिला बघितलं आणि माझ्या मते तिला आपल्या राहूलसाठी पसंत पण केलं... (सगळ्यांना आपल्याकडे पाहतांना बघून) तर मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो कि (थोडा पॉज घेवून).. कि प्रिया आमच्या ऑब्जरवेशनमध्ये पास झाली आहे..."

एवढं बोलून मामाच्या चेहऱ्यावर हासू आलं... अनघा त्यांची गोष्ट ऐकून थोडा हैराण झाली कारण तिला काहीच समजत नव्हते मामाच्या ऑब्जरवेशन बद्दल. सकाळ पासून तिने असं काहीच खास केलं नव्हतं जे मामाच्या ऑब्जरवेशन स्केल वर नापू शकतो. तिच्या चेहऱ्यावरची चलबिचल पाहून मामा पुढे बोलायला लागले...

मामा... "आज सकाळ पासून जेव्हा पण मी प्रियाला एकट पाहिलं... मी तिला चिडवण्यासाठी प्रत्येक वेळी हे ऑब्जरवेशनवाली गोष्ट बोलायचो पण तिने एकदा पण माझ्यासमोर मोठ्या आवाजाने वार्ता केली नाही... ज्यामुळे हे माहिती पडतं कि ह्या मुलीची सहनशक्ती किती मजबूत आहे... आजकालच्या मुलींमध्ये हे पाहायला भेटत नाही .. प्रत्येकाला भेटते वेळी हि मुलगी सदानकदा आपला चेहरा हसरा ठेवायची.... एवढं थकून सुद्धा मी जेव्हा चहा बनवायला सांगितली हिने काहीच न बोलता ती गोष्ट स्विकार केली... किचनमध्ये हिच्या सोबत एक नोकर पण होता पण माझ्या इच्छेचा मान ठेवत तिने स्वतः चहा बनवला... आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आत्ता आत्ता घडली जी खूप खास गोष्ट आहे... ह्या मुलीने घरातल्या एका नोकराशी आपल्या कोणत्या तरी गोष्टीसाठी स्वतः पुढे येवून क्षमा मांगितली ज्याची काही खास जरुरत नव्हती पण ह्या मुलीने एका नोकराला पण आपल्या बराबरचा दर्जा देत पूर्ण सम्मान प्रदान केलं..."

मामाची गोष्ट ऐकून सगळे लोक अनघाची वाहवाह करत होते...

मामा... "(अनाघाकडे बघत) आत्ता बेटा...! तुम्हाला तर समजलंच असेल कि आमचा ऑब्जरवेशन कोणत्या प्रकारचा होता... तुम्ही आमच्या ऑब्जरवेशनमध्ये पास झाला आहात... हि सगळी गोष्ट दिसायला खूप छोटी आहेत पण प्रत्येक माणसाचं चरित्र ह्याच गोष्टींमुळे समजत..."

त्यांची गोष्ट ऐकून अनघाला खूप आनंद झाला. ती आत्ता पासूनच उद्याची स्वप्न पाहत होती... पण जशीच तिची नजर राहुलवर पडली जो तिला बघून आपली मान नकारार्थी हलवत होता.

राहुलला आपली मान अशी नकारात्मक हलवतांना पाहून ह्या वेळी अनघाने ते इग्नोर नाही केलं आणि मामाचा आशीर्वाद घेवून ती राहुलकडे आली. तिला आपल्याकडे येतांना पाहून राहुल पण उठून उभा राहिला आणि पुढे येवून त्याने अनघाचा हात आपल्या हातात घेवून तिला बंगल्याच्या गार्डनच्या दिशीने जायला लागला. पाठी त्याचे नातेवाईक ह्या प्रेमी जोडप्याला असं पाहून थट्टा करत होते ज्याला राहुल हसून आणि अनघा स्मित हास्य देत इग्नोर करत होती.

गार्डनमध्ये येताच राहुलने आत्ता पर्यंत जो हात पकडून ठेवला होता त्याला एक झटका देवून आपल्या केसांमध्ये बेचैनीने हात फिरवायला लागला. त्याचं असं हात झटकलेलं पाहून अनघा ह्यावेळी नाराज होते.

अनघा... "समजून काय ठेवलं आहे तू मला जो ह्या प्रकारे वागतो आहेस... काही समस्या आहे तुला माझ्या सोबत तर आतमध्ये जाऊन मामाला बोलत का नाही..."

राहुल... "(हळू आवाजात रागाने)... तू आहेस माझी समस्या... जी ह्या पूर्ण जगात मला सोडून बाकी सर्वांवर विश्वास करतेस... मला हेच समजत नाही कि जेव्हा तुला माझ्यावर किंवा माझ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे तर तू माझ्याशी प्रेम कशी करू शकतेस... आणि जर तू मला पागलच समजतेस तर भलं अशी माझ्याशी लग्नासाठी कशी राजी झालीस.."

अनघा... "(जवळ जवळ ओरडतच)... कारण प्रेम करायला लागली आहे तुझ्यावर... माहिती नव्हतं कि तू मला असल्या असल्या भासेमध्ये अडकवणार आहेस... काही माझी मजबुरी आणि काही माझं प्रेम... मला इथे थांबून ठेवलं आहे नाही तर इथे मी एक क्षण पण राहिली नसती... ह्या हालातीमध्ये तर मुळीच नाही... जेव्हा तूच माझ्याशी असं रागाने वागतोस तर ..."

राहुल... "मला काहीच शौक नाही आहे तुझ्यावर रागावण्याचा... वाईट हे वाटतं कि तू डोळ्यावर पट्टी बांधून माझ्या प्रत्येक गोष्टीला नजरंदाज करत आहेस आणि त्या विहिरीत पडायला जातेस ज्यामधून मी तुला पडण्यापासून वाचवायला बघतोय... (हताश होत) तू मला का नाही समजत आहेस प्रिया...?"

अनघा... "बस हीच एक गोष्ट आहे जी मला तुझी गोष्ट ऐकण्यापासून नकार देते... आत्ता आत्ता तू मला प्रिया म्हणून बोलावले कि नाही बोलावले... (जोराने ओरडत) बोल...?"

राहुल... "ते माझ्या तोंडून असंच निघालं... हे कोणती मोठी गोष्ट नाही आहे अनघा...! जरुरी गोष्ट हि आहे कि मी तुझ्यावर प्रेम करतो... तू अनघा आहेस कि प्रिया, हे माझ्यासाठी आत्ता काहीच मायने ठेवत नाही..."

अनघा... "शेवटी तुला माझ्याकडून पाहिजे तरी काय ... मला साफ साफ का नाही सांगत... असं मी काय करू ज्याने तुझ्या मनाला शांती भेटेल..."

राहुल.. "(सपाट स्वरमध्ये)... तू इथून तुझ्या घरी निघून जा..."

अनघाचं तोंड हैराणीने खुल ते खुलच राहिलं... तिला काहीच समजत नव्हते कि ती ह्या गोष्टीचं काय उत्तर द्यावं... पण थोडा वेळ गप्प राहून...

अनघा... "(एकदम थंड स्वरमध्ये.) मी आत्ता आत्ताच तुला सांगितले कि माझी मजबुरी आहे जे मी इथे थांबली आहे... नाही तर मी इथे एक क्षण पण थांबली नसती... आणि आत्ता तुला माझी चिंता करायची काहीच गरज नाही आहे... (चिडलेल्या स्वरात)... तरी पण जो माणूस आपल्या भावाचा नाही झाला ज्याने तुझ्या मरणाऱ्या आईला दिलेल्या वचना खातीर आज पर्यंत स्वतःच मुल नाही पाहिलं... ते भलं माझं काय करणार... हुंह.." एवढं बोलून अनघा पाय आपटत आतमध्ये जायला लागली...

राहुल... "(ओरडत)... 'जिवंत आहे माझी आई' मेली नाही ती..."
  
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment