Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 20 November 2012

भाग ~ ~ ३० Illusion .... एक भास..????

क्षमा करा मित्रांनो एवढे दिवस कथा पोस्ट न केल्या बद्दल

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३०  

आजचा सुविचार: - आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका

घटनेच्या पुढे.... 


रम्या लगेच निघून गेला राहुलला शोधायला पण सोनालीने त्याला बजावून सांगितले कि हे सगळं काम अश्या प्रकारे कर जेणे करून घरातील पाहुण्यांना पण ह्याची जाणीव झाली नाही पाहिजे. रम्याने हि गोष्ट लक्षात ठेवून आपलं काम सुरु केलं. सोनालीने हि गोष्ट आत्ता पर्यंत गुरव साहेबांना पण सांगितली. अपेक्षेनुसार हि गोष्ट ऐकताच त्यांना पण चिंता व्हायला लागली पण पाहुणे असल्यामुळे त्यांनी तसं दाखवलं नाही.

देवाच्या कृपेने काही वेळातच राहुल घरातील एका रूममध्ये बेडखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याच्या पूर्ण शरीराला पाहून हे निश्चिंत करण्यात आलं कि त्याला कुठलीच जखम झाली नाही. सोनालीने डॉक्टरांना बोलावून घेतलं... डॉक्टरांनी पण कुठलीच जखम झाली नाही असे सांगितले, पण क्लोरोफोर्म सारख्या वस्तूचा वापर करण्यात आला होता हे सांगितलं. गुरव साहेबांनी हि गोष्ट आपल्या पर्यंतच सीमित ठेवायला सांगितली, जे मान्य करायला डॉक्टरांना पण काहीच हरकत नव्हती.

डॉक्टरांचं येण्याचं कारण जेव्हा मामांनी विचारलं तेव्हा त्यांना हे सांगण्यात आलं कि राहुलला काल रात्री झालेल्या फूड पॉईजनिंगमुळे आलेल्या कमजोरीमुळे त्याला चक्कर आली होती, अतः काही खास चिंतेचं कारण नाही आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रूम खाली करण्यात आलं, फक्त अनघाच तिकडे एकटी राहिली. थोड्या वेळाने राहुल शुद्धीवर यायला लागला. अनघा त्याच्या जवळच बसली होती, तिने राहुलचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्याच्या केसांमध्ये प्रेमाने हाथ फिरवून त्याचे डोळे उघडण्याची प्रतीक्षा करत होती. राहुलने आपले डोळे उघडताच चारही बाजूने बघत स्वतःला अनघाच्या मांडीवर झोपलेल्याची जाणीव झाली.

त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण अनघाने त्याला आराम करण्याचं बोलून परत झोपवलं. अनघा त्याचं डोकं आपल्या मांडीवरून खाली ठेवून रूममधून बाहेर जायला लागली, कारण बाकी सगळ्यांना पण राहुल शुद्धीवर आला आहे हे सांगण्यात यावं. पण राहुलने तिचा हात पकडून तिला कुठेही न जाण्यास सांगून आपल्या जवळच बसायला सांगितले....

अनघा... "(त्याच्या केसांमध्ये प्रेमाने हात फिरवत)... तुला काय झालं होतं राहुल...? हे सगळं कसं झालं...!"

राहुल... "मला तर माहिती पण नाही पडलं कि कधी हे सगळं माझ्या सोबत झालं... मी तर तुझ्या पासून वाचण्याच्या चक्करमध्ये पळत जात होतो कि अचानक कोणी तरी माझ्या पाठी येवून माझ्या तोंडावर काही तरी ठेवण्याचा प्रयत्न करत होता... मी खूप प्रयत्न केला त्याच्या पासून दूर हटण्याचा पण नंतर मी कधी बेशुद्ध झालो मलाच माहिती नाही पडलं..."

अनघा... "हे जरूर त्याच काळे कपडेवाल्या माणसाने केलं असणार... (हैराणीने) माहिती आहे... तुझ्यासारखाच तो मला इथून जाण्यासाठी बोलत होता..."

राहुल... "तो तुला कुठे भेटला...?"

अनघाने त्याला सगळं काही सांगितलं जे पण तो गेल्या नंतर झालं होतं. हे पण सांगितलं कि काळे कपडेवाला गार्डनमध्ये गायब झाला होता आणि नंतर शोधून पण कोणाला सापडला नाही. पूर्ण गोष्ट सांगितल्या नंतर तिने राहुलची तबियत आत्ता कशी आहे हे विचारून त्याला आराम करण्यास सांगून जायला लागली....

राहुल... "(तिचा हात पकडत).... नको जाउस ना... इथेच बस माझ्या जवळ... मी ठीक आहे आत्ता..."

अनघा... "(त्याची गोष्ट ऐकून बसत बोलते)... ठीक आहे मी इथेच बसते पण तू फक्त आराम करशील... आणि काहीच नाही..."

राहुल... "(खट्याळ पणे)... असं बोलून तू माझं लक्ष दुसरीकडे भटकवतेस... तुम्ही मुली आमच्या मनात प्रेम उत्पन्न करता आणि नंतर बोलता कि हे नाही करायचं, ते नाही करायचं... हूह..."

अनघा लाजते आणि त्याच्या छातीवर एक हळूच मुक्का मारते. राहुलच्या तोंडून आउच ऐकून ती त्याची छाती प्रेमाने चोळते....

राहुल... "
jis dard ko mitaane ki nahi koyi jarurat,
Us dard ko bhala kyo mitaate ho,
Uth rahe hai toofaa e jazbaat jab seene me ,
chhoo kar Haath se inhe kyo aur bhadkaate ho….
.”


एवढं बोलून राहुल तिला आपल्या बाहूपाश्यात घेवून आपल्या जवळ खेचून घेतो. अनघा पण कोणत्या वेलीच्या झाडावानी त्याला बिलगते....

अनघा... "(तशीच पडून)... जर तू बेटर फील करत असशील तर मला ते सगळं सांग जे तू मला संध्याकाळी सांगणार होतास..."

राहुल... "बेटर फील करण्याचं असं आहे कि जो पर्यंत तू माझ्या छातीशी अशी बिलगून राहशील... I do feel great (अनघा ने जेव्हा खोटा राग दाखवत स्मित हास्य दिलं... नंतर गंभीर होत)... काय ऐकायचे आहे तुला..., विचार...! मी आज सगळं काही सांगतो..."

अनघा... "मला सगळं काही ऐकायचं आणि जाणून घ्यायचं आहे, तुझ्या आई विषयी, प्रिया विषयी... तुझ्या ह्या हालाती विषयी... आणि सगळ्यात मोठी गोष्ट... तुला आपल्या स्वतःच्या भावावर एवढा संशय का आहे...?"

राहुल... "संशय तिथे असतो अनघा जिथे कोणता तरी संशयाची आशंका असते... जेव्हा सगळं काही माझ्या डोळ्या समोर आहे तेव्हा भलं संशयाची गोष्टच कुठून आली... मी तुला जे काही सांगितलं आहे किंवा जे काही आत्ता सांगणार आहे ते कोणत्या शंके किंवा संशयापायी नाही, मी जे काही आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे ते सांगणार आहे..."

अनघा त्याच्याकडे पाहून आपली उत्सुकता जाहीर करते...

राहुल... "माझ्या आईच्या मरणाची खबर मला त्या वेळी भेटली जेव्हा मी कॉलेजच्या एका टुरसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. मला परत येता येता ४-५ दिवस लागले होते अतः मला माझ्या आईचे शेवटचे दर्शन पण नाही झालेत. असो...! मी ह्याला आपल्या नियतीच खेळ समजून संतोष केलं... (एक दीर्घ श्वास घेत) दादा विषयी मी जे काही तुला सांगितले ते त्यावेळी मी माझ्या सगळ्यात वाईट स्वप्नात पण विचार करू शकत नव्हतो पण हि सगळी गोष्ट एका कडू खरेपणात बदलली जेव्हा माझी भेट प्रियाशी झाली.."

राहुलच्या चेहऱ्यावर काही आठवणारे भाव बघून अनघा त्याच्या केसांमध्ये प्रेमाने हात फिरवते आणि त्याला सांत्वना देण्याचा प्रयत्न करते.

राहुल... "(शून्यात बघत)... प्रिया माझ्या जीवनात एका शीतल हवेच्या झोक्या प्रमाणे आली होती... फार्मच्या विषयी माझी भेट तिच्याशी झाली होती. ती एका प्रोपरटी अजेन्सिला रीप्रेजेन्ट करत होती जे आमचे फार्म विकत घ्यायला बघत होते."

अनघाला काही तरी आठवतं...
अनघा... "एक गोष्ट खरी खरी सांगशील...(राहुलने तिच्याकडे प्रश्नात्मक मुद्रेने पाहिले)... काय मीप्रियासारखी दिसते...?"

राहुल तिच्या ह्या प्रश्नावर थोडा बिचकला पण नंतर आपले डोळे बंद करून आपली मान नकारार्थी हलवायला लागला. त्याच्या इशाऱ्याला पाहून अनघा हैराण होते....

अनघा... "तरी पण तू मला प्रिया प्रिया बोलत माझ्या मागे लागला होता, (थोडा रागाने)... का...?"
राहुल... "(हळू आवाजात...)...मला सांगितलं गेलं होतं असं करायला..."
अनघा... "पण कोणी सांगितलं होतं आणि का...?"
राहुल... "तू मला मध्येच टोकून कंटीन्यूटी तोडू नकोस, मी तुला सगळं काही सांगेन तुला जे काही माहिती करायचं आहे.."
अनघा काहीच नाही बोलली पण तिचा क्रोध तिच्या डोळ्यांमध्ये साफ दिसत होता, जे पाहून राहुलने लगेच आपली नजर खाली केली.

अनघा... "(थंड आवाजात)... ठीक आहे...! तू बोल तुला जे काही बोलायचे आहे, मी ऐकत आहे..."
राहुल... "(दीर्घ श्वास घेत...) प्रिया पहिली मुलगी होती जिने माझ्यावर एक प्रकारचा जादू केला होता. मला भेटली तर फक्त माझ्या फार्मला विकत घेण्याच्या चक्करमध्ये पण तिने माझं मनच काबीज करून घेतलं. फार्म तर मला विकायचा नव्हता पण तिला भेटण्याच्या चक्करमध्ये मी तिला कधीच सरळ उत्तर दिलं नाही. ती सारखी सारखी मला भेटायची आणि मी इकडची तिकडची गोष्ट करून आपली वेळ तिच्या सोबत घालवायचो. काही वेळा नंतर तिला पण जाणीव झाली कि मी तिला उल्लू बनवत आहे, त्यामुळे तिने रागाने मला भेटणेच बंद केलं. मला ती त्यावेळी माझ्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा वाटत होती. तिच्या घराचा पत्ता काढून मी तिच्या घरी पोहोचलो. मला तिथे एक माणूस भेटला जो माझ्याशी त्यावेळी खूप वाईट वागला आणि मला त्या घराच्या जवळ पण दिसलास तर बघून घेईन अशी धमकी देत मला धक्के द्यायला लागला. मला वाईट तर वाटले पण मी करू तरी काय शकलो असतो. मी २-३ पावलंच चाललो असेल कि कोणी तरी माझ्यावर एक छोटासा दगड फेकला ज्यावर एक कागद गुंडाळला होता. खोलून बघितल्या वर माझ्या पाया खालून जमीनच सरकली... (अनाघाकडे बघतो, तिच्या डोळ्यात उत्सुकता बघून) त्याच्यामध्ये लिहिलं होतं 'आपल्या आईच्या विषयी जाणायचे असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोच' आणि खाली एक पत्ता लिहिला होता."

राहुल... "मला काहीच सुचत नव्हते कि हे सगळं काय आहे, सगळीकडे नजर फिरवून बघितली पण दिसलं नाही कोणी ज्याने हा दगड मारला. प्रियाशी भेटणं तर मी आत्ता पूर्णपणे विसरूनच गेलो होतो. आत्ता फक्त काही आठवत होतं तर ते फक्त तो पत्ता जिथे माझ्या आई विषयी सांगण्यासाठी मला बोलावण्यात आलं होतं. माझं मन करत होतं कि मी ह्या विषयी दादा बरोबर बोलू पण माझ्या डोक्याने मला रोकले आणि पहिल्यांदा मी आपल्या डोक्याचं ऐकलं आणि त्या पत्त्याच्या दिशेने निघालो. हा पत्ता जवळ जवळ शहरापासून खूप लांब एका सामसूम स्थळी बनलेल्या एका मोठ्या आणि खूप जुना झालेल्या वाड्याचा होता. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. एक विचित्र शांतता त्या वाड्या जवळ पसरली होती. कोणत्याही परीस्थित मी त्या वाड्यात जाणे तर सोडा तो वाडा बघणं पण पसंत केलं नसतं पण आज इथे गोष्ट माझ्या आईची होती. धडधडणाऱ्या हृदयाने मी वाड्यात प्रवेश केला."

राहुलने एक दीर्घ श्वास घेतला आणि अनाघाकडे बघायला लागला, तिच्या डोळ्यात पुढे काय होतं हे ऐकण्याची खूप उत्सुकता दिसत होती...

राहुल... "तो वाडा एक दम हीन-दिन आणि दरिद्री अवस्थेत उभा होता, बघूनच असं वाटत होतं कि जसं खूप वर्षांपासून त्या वाड्याजवळ कोणी गेलंच नाही. धडधड करण्याऱ्या हृदयाने मी आत प्रवेश केला. बाउन्ड्री वाल पासून वाड्याच्या मुख्य दरवाज्या पर्यंत सुखलेल्या पानांचा ढीग लागला होता, ज्यांच्यावर पाय पडल्या पडल्या चर्रर चर्ररच्या आवाजाने वातावरण अजूनच रहस्यमयी बनत होतं. मला स्वतः माझ्या पायांचा आवाज विचित्र वाटत होता. माझं मन ओरडून ओरडून सांगत होतं कि, 'परत निघून जा'... 'परत निघून जा'... पण मनावर जसं तसं ताबा ठेवून मी आतल्या दिशेने चालतच राहिलो. वाड्याचा मुख्य दरवाजा बंद होता ज्याला ठोकवल्यावर मला आतून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. बाहेर काळोखाच साम्राज्य पूर्ण पणे पसरलं होतं आणि आतमध्ये वाड्यात प्रकाशाचं काहीच स्त्रोत्र दिसत नव्हतं. चर्ररच्या आवाजाने दरवाजा हळूच उघडला गेला, आतमधून प्रिया आपल्या हातात एक टोर्च (torch) घेवून माझ्या समोर उभी होती.." राहुल परत काही वेळासाठी शांत झाला.

अनघा... "(आपल्या उत्सुकता एकदम खुलून जाहीर करत) मग काय झाले...?"

राहुल... "मी आपल्या हैराणीवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत तिला विचारून बसलो, 'तू इथे कशी, तूच तो दगड मला मारला होता काय... तू माझ्या आईला कशी ओळखतेस.... आणि...?' मी एकाच श्वासात सगळे प्रश्न विचारात जात होतो ज्याला प्रियाने माझ्या तोंडावर हात ठेवून मला गप्प केलं आणि इशाऱ्याने मला तिच्या मागे यायला सांगितले. मी पण काहीच न बोलता तिच्या मागे मागे चालायला लागलो. वाड्याची हालत बाहेरच्या पेक्षा आत खूप चांगली होती. पण दिवाळावर लागलेले जाळे आणि जागोजागी उतरलेले प्लास्टर वाड्याची दुर्दशा सांगत होते. खिडकीला काळे कागद लागले होते का कोणास ठावूक मी त्यावेळी ह्यावर आपलं लक्ष केंद्रित करणार नव्हतो.

प्रियाच्या मागे मागे चालत आत्ता आम्ही हॉलमध्ये आलो. मला माझ्या प्रश्नांचे उत्तर जाणण्यासाठी जेवढी घाई लागली होती तेवढीच प्रिया सांगायला विलंब करत होती. शेवटी तिने मला एका सोफ्यावर बसवले आणि माझ्याकडे बघत स्मित हास्य द्यायला लागली. दुसरं काही क्षण असते तर त्यावेळी मी त्या स्मित हास्याने हुरळून गेलो असतो पण ह्या वेळी ते स्मित हास्य मला खूप टोचत होतं. 'तू आपल्या आईला परत मिळवण्यासाठी काय काय करू शकतोस...? म्हणजे तू मला किती पैसे देवू शकतोस जर मी तुला तुझ्या आईशी भेटवल तर, जी तुझ्यासाठी मेली आहे...?' तिचे शब्द माझ्या कानांमध्ये एका ज्वलंतशील पदार्थावानी पडले..."

 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment