Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 21 November 2012

भाग ~ ~ ३१ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३१

आजचा सुविचार: - दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि  मुंगीच्या पावलांनी जातं.

घटनेच्या पुढे.... 


तरी पण अनघा आपल्या हैराणीचे रोज नवीन बांध तुटतांना पाहतच होती, पण आत्ता ह्या नवीन गोष्टीने तिला अजूनच हैराण केलं होतं. ज्या प्रियाला राहुल आपली प्रेमिका सांगत होता, ती त्याच्याकडून पैसे का मांगत होती आणि पैसे मांगत जरी होती तर भलं राहुल का तिला आपली प्रेमिका म्हणून सारखा सारखा आठवण काढत असतो… तिच्या डोक्यात चालणाऱ्या प्रश्नांचे काहूर राहुलच्या आवाजाने शांत झाले…

राहुल… “मला हि गोष्ट एवढी वाईट कदाचित ह्या साठी पण वाटत होती कि, कारण मी प्रियाशी प्रेम करायला लागलो होतो आणि तिचं हे रूप पाहून मीच हैराण झालो होतो. तिने मला शांत पाहून परत हीच गोष्ट विचारली… ‘तू सांगितलं नाही… तू मला किती पैसे देशील जर मी तुला तुझ्या आईशी भेटवलं तर… लवकर सांग माझ्याजवळ जास्त वेळ नाही आहे…’… मी तुला तू सांगशील तेवढी रक्कम देवू शकतो, पण तू मला हे सांग कि मी तुझ्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवू…? माझ्या आईला मरून एक जमाना होवून गेला आहे… हजार लोकांच्या समोर त्यांचा अंत्य विधी झाला आहे… तर भलं ती आत्ता जिवंत कशी होवू शकते…? ‘पण तुझ्या समोर तर नाही झालं होतं ना..!’ प्रियाने लगेच माझ्या प्रश्नाच उत्तर दिलं… तिचं असं बोलण्याने मी निरुत्तर झालो…. ‘मी नसलो तर काय झालं…! माझे दादा आणि वहिनीसमोर तर झालं होतं ना, किंवा त्यांना पण माहिती नाही कि माझी आई जिवंत आहे…?’ मी आपला पक्ष ठेवत बोललो... ‘जर मी तुला हे सांगू कि त्यांना माहिती आहे कि तुझी आई जिवंत आहे तर…! उलट हे बोलू कि त्यांनीच हे सगळं केलं आहे जे आज तुझी आई जिवंत असतांना सुद्धा तू आईच्या प्रेमाशिवाय जगत आहेस…’ ‘बस खूप झालं, ह्याच्या पुढे एक शब्द पण नको बोलूस, नाही तर मी हे विसरून जाईन कि तू एक मुलगी आहेस आणि आत्ता इथेच तुझा गळा दाबून टाकेन' माझ्या वाढणाऱ्या रागाला पाहून ती उठून वाड्यात कुठे तरी गेली आणि काही वेळानेच आपल्या हातात एक फोटो आणि एक लाकडीचा डब्बा घेवून आली आणि मला आणून दिला... त्या फोटोमध्ये माझ्या आईची प्रतिमा होती जी प्रिया सोबत बसली होती. फोटो कोणत्या तरी रूममध्ये घेतला होता ज्यामध्ये माझ्या आईची हालत आपल्या आजारपणाच्या दिवसापेक्षा जास्त दयनीय दिसत होती.

‘आत्ता हा डब्बा पण खोलून बघ तुझी उरली सुरलेली शंका पण निघून जाईन...’ प्रियाने मला विचारांमध्ये हरवलेला पाहून माझ्या हातात तो डब्बा दिला. मी माझ्या कंपन पावणाऱ्या हातांनी तो डब्बा खोलला तर त्यामध्ये ते सगळे आभूषण होते जे माझ्या आईच्या रोजच्या वापरात असायचे. तिच्या जवळ तो डब्बा असणेच माझ्यासाठी हैराण करणारी गोष्ट होती… कारण जर माझी आई मेली आहे तर हे आभूषण माझ्या दादा आणि वाहिनीच्या जवळ असायला पाहिजेत आणि जर जिवंत आहे तर तर मग हैराणीच हिराणी व्हायला पाहिजे मला, जी मला होत पण होती. माझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक वेळी बदलणारे भाव पाहून ती माझ्या जवळ येवून उभी राहिली… ‘मी समजू शकते कि आत्ता तुला माझ्या गोष्टींवर विश्वास बसला असेल… आत्ता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे फटाफट… मी इथे जास्त वेळ थांबू नाही शकत…’ प्रिया बोलली…

‘तुला काय पाहिजे…?’ ‘पूर्ण ५ करोड दे आणि आपल्या आईचा पत्ता घे..’ माझ्या विचारण्यावर तिने उत्तर दिलं… ‘माझे दादा आणि वहिनी ह्या मध्ये कसे शामिल आहेत ते पण सांग..’ मी विचारलं तर ती बोलायला लागली ‘बस एवढं समजून जा कि हे जे काही तुझ्या आईसोबत होत आहे, ते सगळं तुझ्या मोठ्या भावानेच केलं आहे..’ तेव्हा कोणत्या तरी गाडीचा येण्याच आवाज ऐकायला आला,  ज्याला ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंग पिवळा पडला तिने माझा हात पकडून त्याच हालातीमध्ये ठेवलेल्या एका कपाटात मला लपवलं आणि ती जो पर्यंत बोलवत नाही तो पर्यंत मला बाहेर यायला नाही सांगितलं. कपाटाच्या दोन्ही दारांमधून थोडसं बघण्या लायक जागा होती. थोड्या वेळाने मला कोणत्या तरी बाईचा आवाज ऐकायला आला, जो ऐकून मी एकदम दचकलोच, जर मी कपाटात नसतो तर मी उडालोच असतो. तो आवाज माझ्या वहिनीचा होता, माझी ती वहिनी जिला मी आपल्या आईपेक्षा प्रेम आणि सम्मान दिला होता… ती वहिनी आत्ता माझ्या डोळ्यासमोर आली होती. वहिनीला तिथे पाहून मी प्रियाच्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवायला विवश झालो होतो. एका सामसूम वाड्यात जो शहरी दुनियेतून एवढ्या लांब होता तिथे त्यांच्या येण्याचं भलं काय कारण असू शकतं..? पण माझ्या मनात येण्याऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला वहिनीच्या आवाजाने दिलं… ‘कुठे आहे ती, तिचा बी.पी. वैगेरे सगळं काही चेक करत जा… जेवण देत जा तिला… खात तरी आहे ना ती…?’ तिचे प्रत्येक प्रश्न माझ्यासाठी माझे उत्तर ठरत होते जे मी प्रियाला विचारत होतो… कि हि कोणा विषयी बोलत आहे… अरे देवा…! माझं मन करत होतं कि हि जमीन फाटली पाहिजे आणि मी तिथेच गाडलो गेलो पाहिजे, पण नाही… जर मी असं केलं तर माझ्या आई वर झालेल्या अत्याचाराचा बदला कोण घेणार… मी गप्प उभा राहून स्वतःला कोसत राहिलो. त्या प्रत्येक क्षणाला कोसत राहिलो जेव्हा मी आपल्या आईपेक्षा जास्त आपल्या दादा आणि वहिनीला प्रेम दिलं होतं… उफ्फ…”

राहुल गप्प झाला होता… त्याने आपल्या मुठीत चादर घट्ट पकडून ठेवली होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ज्याला बघून अनघाची पण अवस्था खराब झाली होती. तिने त्याचे अश्रू पुसले आणि उठून त्याच्यासाठी पाणी आणायला गेली, जे तिथेच एका बाटलीत ठेवलं होतं. थोड्या वेळाने शांत झालेल्या राहुलने पुन्हा आपली कहाणी सांगायला सुरुवात केली…

राहुल… “मला असं काहीच कारण समजत नव्हतं ज्यामुळे माझ्या दादाने माझ्या सोबत असं केलं होतं… त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं कि त्यांनी जरी एक इशारा केला असता तरी मी माझी संपत्ती पूर्णच्या पूर्ण त्यांच्या नावावर तर काय त्यांच्यासाठी आपला जीव पण दिला असता, मग शेवटी असं काय होतं जे ते मला धोका देत होते… शेवटी का… का… का.. हे ‘का’ माझ्या मनात येत होतं, पण ह्याचं उत्तर माझ्या जवळ कुठे होतं…. आणि जो उत्तर देवू शकतो तो पण माझ्यासाठी एक भास बणून होता तो म्हणजे माझा दादा…! आत्ता माझी वहिनी माझ्या नजरेतून आड झाली होती ती कुठून तरी लांबून काहीतरी बोलत होती पण मला स्पष्ट काही ऐकायला येत नव्हतं ती काय बोलत होती ते, ती कदाचित प्रियाला दटावत होती पण जे काही होतं अस्पष्टच होतं… ती हॉलमध्ये असलेल्या एका जिन्यावरून वरती कुठे तरी निघून गेली मग जवळ जवळ १५ - २०  मिनिटांनी परत आली… मग ती माझ्या डोळ्याच्या समोरून बाहेर निघून गेली. काही वेळाने तिच्या गाडीचा आवाज ऐकायला आला ज्याच्या नंतर मी प्रियाची वाट पाहत राहिलो… थोडा वेळ तरी प्रिया तिथे आली नाही त्यामुळे मी स्वतःच कपाट थोडसं खोलून हॉलमध्ये पाहायला लागलो… कोणालाच तिथे न पाहून मी कपाट पूर्णपणे खोलून बाहेर निघालो…

वाड्यात पूर्णपणे शांतता पसरली होती... तेव्हा कोणाची तरी किंकाळी माझ्या कानात पडली… हा आवाज वाड्याच्या बाहेरून आला होता मग एका गाडीच्या स्टार्ट होण्याचा आवाज आणि हळू हळू लांब जाण्याचा आवाज आला… मी बाहेर पळत सुटलो… बाहेर प्रिया जखमी अवस्थेत पडली होती. तिच्या पोटात कोणीतरी चाकू मारला होता आणि ती वेदनेमुळे तडफडत होती. तिला बघताच मी पळत तिच्या जवळ आलो… ती आपले शेवटचे श्वास घेत होती. उखडलेल्या श्वासाने तिने माझं नाव घेतलं आणि हळू आवाजात बोलायला सुरुवात केली ‘त्यांना काय माहित कसं माझे मनसुबे माहिती पडले ते.. आणि ते आत्ता इथून तुझ्या आईला घेवून कुठे तरी निघून गेले आहेत... तू खूप चांगला वाटायला लागला होता मला, मी तुझ्यावर प्रेम पण करायला लागली होती… ह्या शेवटच्या क्षणी मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार…! हि माझी मजबुरी होती जे मी ह्या लफड्यात फसली… माझा इरादा तर फक्त तुला तुझ्या दादा आणि वहिनीच्या विषयी सांगायचे होते. तुझ्याकडून पैसे मांगणे पण फक्त एक नाटक होतं कारण तू मला चालू आणि मतलबी समजून राग करशील, माझा तिरस्कार करशील… आपल्या आईला वाचव राहुल…! ती बेचारी ह्या राक्षशांच्या चंगुलमध्ये प्रत्येक क्षणी तुलाच आठवत असते आणि तुझं नाव घेवून घेवून रडत असते… हे सगळं तुझ्या करोडोच्या संपत्तीमुळे होत आहे आणि जो पर्यंत तुझी आई किंवा तुझ्या होणाऱ्या बायकोला नाही वाटत तोपर्यंत त्यांना तुझ्या संपत्ती मधून एक पायी पण नाही भेटणार… हे लोक खूप खतरनाक आहेत राहुल…! ह्यांना जरा सुद्धा भनक लागली कि तुला त्यांचे इरादे समजले आहेत... तर हे लोकं तुला आणि तुझ्या आईला संपवण्यासाठी एक सेकंड पण वाया नाही घालवणार. रम्या…!’.. तिचा श्वास आत्ता उखडायला लागला होता. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्यासाठी उचलले पण तेव्हा कोणी तरी पाठून माझ्या डोक्यावर खूप जोराने कश्याने तरी प्रहार केला, एक वेदनेची लहर माझ्या डोक्यातून तळ पायापर्यंत गेली. मला त्या प्रहाराने चक्कर आली… आत्ता माझ्या पहिल्या प्रहाराचा आभास संपला पण नव्हता कि अजून एक प्रहार माझ्या डोक्यावर झाला. माझे डोळे आपोआप बंद व्हायला लागले हळू हळू बेशुद्ध व्हायला लागलो. प्रिया माझ्या हातातून कधीच खाली पडली होती. कोणी तरी होतं जो तिला खेचून कुठे तरी घेवून जात होता. खेचून घेवून जाण्यामुळे तिचं शरीर रस्त्यावर खरचटत होतं ज्या मुळे तिला खूप वेदना होत होत्या... वेदनेमुळे ती ओरडत होती पण तो जो कोणी होता त्याच्यावर त्या ओरडण्याच काहीच परिणाम होत नव्हता, आणि तो तिला खेचतच जात होता. मी पूर्ण प्रयत्न करत होतो कि कश्या तरी प्रकारे स्वतःला बेशुद्ध होण्या पासून रोखण्यासाठी पण…’ राहुल शांत झाला.

रूममध्ये अनघाच्या रडण्याचा आवाज येत होता जो रूमच्या शांततेला भंग करत होता. मग तिने राहुलकडे बघितलं जो अजूनही शून्यात हरवला होता…

अनघा… “(हळू आवाजात…) जर तुला ते सगळं सांगण्यामध्ये त्रास होत असेल तर राहू दे… मला आत्ता अजून काहीच नाही ऐकायचे आहे…”

राहुल… “(एका फिक्या स्मित हास्याने) मी प्रत्येक त्रासातून गेलो आहे अनघा… आत्ता त्रासाची जाणीव माझ्यासाठी खूप कमी झाली आहे. माझ्या कानात आज पण राहून राहून प्रियाचं ते ओरडणं ऐकायला येतं, तिचे ते प्रेमाचे दोन शब्द जे तिने मरता मरता बोलले होते. तिने आपल्या जीवनात जे काही केलं ते मला माहित नव्हतं… पण मरता मरता तिने माझ्या एक तर्फ्या प्रेमाला स्वीकृती देवून माज्या प्रेमावर कुरबान झाली होती. मी न जाणो किती तरी दिवस बेशुद्धच होतो, आणि न जाणो कसं मला तिथून कोणी हॉस्पिटलमध्ये आणलं. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी रम्यालाच आपल्या समोर पाहिलं. प्रियाच्या शेवटच्या शब्दांमध्ये ‘रम्या’चं नाव होतं… त्याला बघताच मला त्याच्या नालायकपणा वर खूप राग येत होता. मी गप्प राहून रूममध्ये इकडे तिकडे बघत होतो. रूममध्ये ते सगळे होते ज्यांच्यावर मला आत्ता घृणा आणि राग येत होता. मला इकडे तिकडे बघतांना पाहून रम्या बोलला… ‘हे असं इकडे तिकडे पागल सारखं काय बघत आहात छोटे मालक.. मला ओळखलं नाही का…?’ ‘पागल’ जसं हे शब्द ऐकूनच मला माझी पुढची योजना समजली… मी निश्चय केला कि ह्या हुशार लोकांच्यामध्ये मी पागल बनूनच आपल्या आईच्या आणि स्वतःच्या जीवनाचे रक्षण करू शकतो… आणि बस…! त्यांच्या नजरांमध्ये मी पागल बनलो… कधी पागल सारखा प्रिया प्रिया आणि तिच्या विचित्र गोष्टी ह्या हुशार लोकांना भासीत करण्यासाठी बोलायचो…”

अनघा… “माझ्यासाठी तू हा सगळा विचार कसा केला जे तू माझ्या सोबत केलं… म्हणजे मला प्रियाचं रूप का सोपवलं उलट माझा चेहरा प्रियाशी कुठूनही मेळ नाही खात… (काही तरी आठवताच) एक मिनट… पण त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये तो माणूस मला प्रिया का बोलला होता आणि तुने त्याच्या सोबत काय केलं होतं… तुझ्या शर्टावर लागलेले डाग कोणाच्या रक्ताचे होते…” 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment