Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 22 November 2012

भाग ~ ~ ३२ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३२

आजचा सुविचार: - जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!

घटनेच्या पुढे.... 


राहुल... "(हळू आवाजात) ते त्याच माणसाचे मृत शरीर होते जो त्या दिवशी तुला प्रिया म्हणून हाक मारत होता... (अनघाचे डोळे हैराणीने मोठे झालेले पाहून)... त्याचं तिथे अचानक येण्यामुळे आणि तुला प्रिया म्हणून हाक मारण्यामुळे मी पण हैराण झालो होतो, कारण फक्त मलाच माहिती होते कि तुझा चेहरा प्रियाशी कुठेच मेळ खात नव्हता, वा त्यांना माहिती होतं ज्यांनी प्रियाला मारलं होतं. तर तो कुठून आला तुला प्रिया प्रिया बोलत...? बस हेच जाणून घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि जसं कि मी तुला सांगितलं होतं कि मी त्याचा पाठलाग 'जावेदच्या बिर्याणी' वाल्या हॉटेलपासून त्या हॉटेलपर्यंत केला जिथे तो थांबला होता. मी त्याला लिफ्टमध्ये चढतांना पाहून त्याच्या फ्लोअरचा अंदाजा तर लावला होता... मग जेव्हा मी त्या फ्लोअर वर त्याचं रूम शोधत पोहोचलो तर मला काहीच समजत नव्हते कि मी कसं त्याचा रूम शोधू किंवा त्याच्या रूममध्ये दाखल होवू...? ह्याच विचारात होतो कि थोड्या वेळाने मी पाहिले कि एका रूमचा दरवाजा उघडला गेला... आणि त्यामधून एक सावली बाहेर पडली... सावली ह्या साठी बोलत आहे कि रात्रीच्यामुळे त्या फ्लोअर वरची लाईट हॉटेलच्या स्टाफ वाल्यांनी एकदम डीम  करून ठेवली होती. मी एकदम विरुद्ध दिशेने उभा होतो, ज्यामुळे मला हेच समजत नव्हते कि ती सावली एका माणसाची आहे कि बाईची आहे हे सांगणं कठीण होतं. न जाणो का मी त्याच रूमला बघण्याचं मन बनवलं..."

अनघा... "(राहुल गप्प होताच) मग काय झाले...?"
तिची अधीरता पाहून असल्या गंभीर वातावरणात पण राहुल आपल्या हसण्याला रोकु शकला नाही पण अनघाने ह्या हसण्यामध्ये त्याची साथ दिली नाही...

राहुल... "मी हळू हळू त्या रूममध्ये प्रवेश केला... त्याचा रूम बंद नव्हता पण रूममध्ये पूर्णपणे काळोख पसरला होता... मी खूप दुविधेमध्ये होतो कि आत जाऊ कि नको जाऊ पण जाण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हतं... रूममधील लाईट लावायची रिस्क मला घ्यायची नव्हती अतः काळोखातच मी रूम बघण्याचा निर्णय घेतला आणि हळू हळू रूममध्ये पुढे पुढे चालायला लागलो. बाहेरच्या स्ट्रीट लाईट आणि निओन साईन बोर्डच्या हलक्या हलक्या प्रकाशाच्या सहाय्याने मी रूमच्या हालातीचा रीव्युव घेत होतो. रूममध्ये ठेवलेला बेड जो रूमच्या मधोमध ठेवला होता त्याच्या दुसऱ्या बाजूला असं वाटत होतं कोणीतरी झोपलं आहे... पण त्याच्या शरीरात काहीच हरकत होत नव्हती... त्याला बघण्यासाठी जेव्हा मी पुढे झालो तर न जाणो कोणत्या तरी वस्तूमध्ये माझा पाय लागला आणि मी त्या शरीरावर पडलो... आणि मला जाणीव झाली कि तो तोच माणूस आहे जो हॉटेलमध्ये तुला प्रिया प्रिया बोलत होता... आणि मृत अवस्थेत पडला होता..."

राहुल... "मी लगेच त्या मृत शरीरावरून उठलो आणि पहिले माझ्या मनात विचार आला कि ह्या रूममधून पळून जाण्याचा... माझ्या शर्टावर रक्ताचे डाग लागले होते... शर्टाच्या खाली मी एक टी-शर्ट घालून ठेवला होता अतः मी आपल्या शर्टाला काढून आपल्या हातात घेतलं... रूममधून बाहेरच येताच मी जसं जसा आत आलो होतो तसाच परत आलो. पण परत आल्यावर मला समजलं कि रम्या माझी वाट पाहून पाहून झोपून गेला होता त्यामुळे मला बंगल्याची दिवाळ ओलांडून आत यायचे होते. आतमध्ये आल्यावर माझ्या हातात असलेला शर्ट मला त्रास देत होता... त्यामुळे तो परत मी माझ्या अंगावरच चढवला... आपल्या रूममध्ये येताच मी आपल्या बेडवर पडलो. मी विचार करतच होतो कि हे शर्ट कुठे लपवायचं आहे आणि हा विचार करता करता आणि थकल्यामुळे मला झोप कधी लागली समजलेच नाही..."

अनघा... "आणि ती मारहाण करणारी तुझी गोष्ट... रम्याला त्या कामाशी काय घेणं देणं होतं...? त्याला काय काय माहिती आहे तुझ्या विषयी...? तू त्याच्या साथीने सगळं काम करतोस आणि मला सांगतोस कि त्याच्यावर भरोसा नको करूस... का...?"

राहुल... "रम्या माझ्यापेक्षा जास्त आपल्या मोठ्या मालकाचा वफादार आहे... त्यांनी बोललेली गोष्ट त्याच्यासाठी शेवटचं वाक्य आहे. प्रिया पण रम्या विषयी काही सांगता सांगता राहिली होती. त्यामुळे माझा संशय रम्यावर पण आहे, त्याच्यावर मी पूर्ण भरोसा नाही करू शकत..."

अनघा... "(चिडत)... भरोसा नाही करू शकत पण त्याची मदत घेवून घराच्या बाहेर जावू शकतोस... कमालचा अविश्वास आहे तुझा... वाह वाह.."

राहुल... "माझ्या जागी जीवन जगून तर बघ तेव्हा तुला माहिती पडेल कि हे बोलणं किती सोप्पं आहे जे तू बोलत आहेस... प्रत्येक पाउल किती जाणीवपूर्वक ठेवायला पाहिजे हे मलाच माहिती आहे... माझी आई जिवंत आहे पण मी तिच्याशी भेटू शकत नाही, जे माझ्या आईचे गुनेह्गार आहेत ते माझे अभिभावक बनून बसले आहेत आणि माझ्या आईच्या जीवा पायी मी काहीच करू शकत नाही... (दीर्घ श्वास घेत)... रम्या माझ्याशी किती वफादार आहे आणि किती नाही, हे मला नाही माहित पण तुला समजावणं गरजेचे होते... ते मी केलं... आत्ता विश्वास कर किंवा नको करूस तुझी मर्जी.."

अनघा... "पण मला नाही वाटत कि त्याने तुझ्या सोबत काही विश्वासघात केला असेल... त्याला मी तुझ्या स्वास्थ्यासाठी जीन्युन्ली (genuinly) चिंतीत होतांना बघितलं आहे आणि जिथपर्यंत मला आठवतंय त्याने अजून पर्यंत गुरव साहेबांना आणि सोनाली वहिनीला तुझं बाहेर जाण्याविषयी काहीच सांगितलं नाही... जर तो तुझा नमक हलाल नसता तर भलं त्याने अजून पर्यंत तुझी गोष्ट गुपित का ठेवलं...?"

राहुल... "कारण गेल्या काही दिवसांमध्ये बोलण्या बोलण्यामध्ये त्याला त्याच्याच गावी ५० एकर जागा देण्याचं वचन दिलं होतं. आत्ता जर त्याला ती जमीन पाहिजे तर माझा जीव आणि गुपित पण त्याची जवाबदारी बनेल ना..."

अनघाने घड्याळात पाहिले जो अर्धी रात्र झाल्याचा इशारा करत होता, तिने राहुलला घड्याळाच्या दिशेने इशारा करत आता आपल्या जाण्याची आणि त्याला आराम करण्याची गोष्ट बोलली आणि त्याच्या शरीरावर एक चादर टाकून ती रूममधून बाहेर आली. अनघाच्या मनात खूप साऱ्या गोष्टी येत होत्या. प्रियाचं मरणं, सोनाली आणि गुरव साहेबांचं संदेहात्मक चरित्र आणि रम्याचं नमक हलाल होणं... हे सगळे विचार तिच्या डोक्यात फिरत होते. पण राहुलच्या आईची आठवण येताच तिच्या मनात गुरव साहेब आणि सोनालीचा हसरा चेहरा फिरायला लागला, ज्याला विचार करून तिला दोघांची घृणा वाटायला लागली. हेच सगळं विचार करत अनघा रूममधून बाहेर आली, रूमच्या बाहेर घरातील सगळे लाईट्स बंद करण्यात आले होते. जेवणासाठी तिने पहिल्या पासून मनाई केली होती अतः जेवण पण आत्ता तिला जेवायचे नव्हते. रूममधून बाहेर येताच तिने गुरव साहेबांची व्हील चेयर पाहिली जी रूमच्या खिडकीला लागली होती. उजेड तिकडे कमीच होता अतः लक्षपूर्वक बघितल्यावरच तिला माहिती पडले कि गुरव साहेब पण तिथेच बसले होते. ती एकदम दचकलीच... आणि गुरव साहेबांच्या जवळ जायला लागली... जवळ येता येता आत्ता तिची काळोखात पाहण्याची क्षमता वाढली होती. जवळ येताच तिला गुरव साहेबांचा चेहरा पण साफ साफ दिसायला लागला. पण हे काय... गुरव साहेबांच्या डोळ्यात अश्रू होते... "तर... काय गुरव साहेबांनी राहुल आणि तिची पूर्ण गोष्ट ऐकली कि काय...?" अनघाने आपल्या मनात विचार केला.

गुरव साहेब... "(अनघा पासून आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत)... अरे देवा...! मला नाही माहित कि माझ्या छोट्या भावाचा आजार एवढा वाढला आहे... असं वाटतंय आत्ता ह्याला हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंच पाहिजे..." हे ऐकून अनघा स्वतःला पुन्हा दोन बाजूच्या भासेच्या जाळेत पुन्हा अड्कतांना पाहते..

गुरव साहेब आपल्या रूममध्ये निघून गेले होते. अनघाने त्यांच्या चेहर्यावर जे काही पाहिलं होतं ते बघून ती परत दुविधेत पडली होती. "हे काय होत आहे माझ्यासोबत...!" बस हीच एक गोष्ट तिच्या डोक्यात फिरत होती. ती आत्ता आपल्या रूममध्ये आली होती. विचार करता करता तिचं डोकं दुखायला लागलं होतं त्यामुळे तिने आंघोळ करण्याचा निर्णय घेतला आणि बाथरूममध्ये घुसली. आंघोळ केल्या नंतर अनघाला एक ताजेपणाची जाणीव होत होती. ती आपल्या ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळून बाहेर आली. बाथरॉब उतरवून तिने आपला नाईट ड्रेस घातला. आपल्या बेडवर पडून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती पण झोप तिच्या डोळ्यांपासुन खूप लांब नजर येत होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोबत ज्या काही घटना घटीत झाल्या त्या सगळ्या एक एक करून तिच्या नजरे समोरून जात होत्या... ट्रेनमध्ये झालेल्या हत्येपासून.... हॉटेलमध्ये भेटलेल्या माणसाची मृत खबर, ह्या घरातील विचित्र वातावरण... सगळं काही एवढं चांगलं असून सुद्धा केव्हा केव्हा किती घराब वाटत होतं. सगळ्यात मोठी गोष्ट हि होती कि आपापल्या जागी सगळ्यांची गोष्ट तिला ठीक वाटत होती पण पूर्ण सत्य काय आहे हे तिला समजत नव्हते. हेच सगळं विचार करता करता तिला कधी झोप लागली तिला पण नाही समजले.

------------------------------------------------------

सकाळ परत आळस देवून जागी झाली होती आणि काल आलेले पाहुणे आत्ता आपापल्या घरी जाण्याची तैयारी करत होते. सोनाली आणि मावशीने कोणा तरी मोठ्या बाबाला बोलावले होते ज्याला ते लोकं राहुल आणि अनघाची जन्म प्रत्रिका दाखवणार होते. ह्या बाबावर त्या लोकांचा खूप भरोसा आणि विश्वास होता. सोनालीच्या अनुसार ह्या घरासाठी त्या बाबाने ज्या पण भविष्यावाणी केल्या होत्या, त्या आत्ता पर्यंत खऱ्या झाल्या होत्या. अतः मावशीला आपल्या बहिणीने जी जवाबदारी दिली होती ती स्वतः तिच्या समोर पूर्ण करायला बघत होती. अनघाला सकाळी सकाळीच हि गोष्ट सांगून बाबासाठी आपल्या हातांनी जेवण बनवण्याची जवाबदारी सोपवली गेली होती. हो बरोबर आहे कि अनघाला रात्री झोपायला उशीर झाला होता पण ती कोणत्या तरी आदर्श नारीवानी आपली जवाबदारी पार पाडत होती आणि मामा आणि मावशीचं मन जिंकत होती. असो बाबा पण आपल्या ठरलेल्या वेळेवर आले. त्यांना बघून अनघा खूप प्रभावित वाटत होती. कारण त्या बाबाचं व्यक्तित्व खूप प्रभावशाली होतं ज्यांच्यासमोर गुरव साहेबांसमवेत सगळेच जण नतमस्तक नजर येत होते. अनघाची जन्म कुंडली तैयार करून तिला राहुलच्या कुंडली बरोबर मिलन करवले गेले. दोन्ही कुंडली मिळवतेवेळी बाबा सारखे सारखे अनघाचा चेहरा लक्षपूर्वक पहायचे. त्यांचं असं सारखं सारखं आपल्याकडे पाहणं अनघाला अस्वस्थ करत होतं.

बाबाने अनघाला तिच्या लहानपणीच्या जुडलेल्या काही गोष्टी सांगितल्या ज्या एकदम खऱ्या होत्या. त्यांच्या अनुसार कुंडलीचं मिलन अदभूत होतं पण काही दिवसातच राहुलच्या वर मारकेश लागत होता जो कोणाच्या कुंडलीमध्ये त्याची अचानक मृत्यूचं योग सांगत असतो. हे ऐकून सगळे जण दचकले आणि चिंतीत होवून बाबांना ह्याचा उपाय विचारतात. बाबांच्या अनुसार अनघाची कुंडली अशी होती ज्याच्या प्रभावामुळे राहुलला त्याच्या जीवनातील वाईट ग्रहांपासून सुरक्षा प्रदान होवू शकते, परंतु हे लग्न श्राद्ध संपताच नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच झालं पाहिजे. हे ऐकून सगळे जण अनघाला पाहायला लागले, ती भलं एवढ्या लवकर कशी बोलणार. हे पण खरं होतं कि तिच्यावर राहुलचं प्रेम आणि गुरव दम्पत्तीने केलेल्या उपकारच एवढा प्रभाव होता कि ती एकदम नकार पण देवू शकत नव्हती. पण घरातील रहस्यमयी वातावरणात तिला लग्नासारख्या निर्णयावर पोहोचायला संकोच वाटत होता. तिची चिंता आणि काही दुसऱ्या गोष्टी समजून गुरव साहेबांनी घरातील आलेल्या सगळ्या पाहुण्यांना थांबण्याचा अनुरोध केला आणि अनघाला आपल्या सोबत घेवून आपल्या स्टडी रूममध्ये गेले.

स्टडी रूममध्ये गुरव साहेबांसोबत जातांना अनघाच्या मनात विचित्र दुविधा चालत होती. लग्नासारख्या निर्णयावर ती एवढ्या लवकर कशी काय उत्तर देवू शकते. "आपल्या घरच्यांना काय सांगणार, तिचे वडील आत्ता आजारी आहेत... त्यांचं येणं कसं होणार...? सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या अनुमती शिवाय ती कोणत्या छोट्याश्या पण निर्णयावर पोहोचू शकत नाही.... लग्न तर खूप लांबची गोष्ट आहे. राहुलशी प्रेम तर करायला लागली आहे पण ल-ग्न... हे मी कशी करू शकते..?" ती हा सगळा विचार करतच होती कि गुरव साहेबांच्या आवाजाने तिची विचार करण्याची शृंखला भंग झाली...

गुरव साहेब... "तुमच्या डोक्यात जे काही प्रश्न किंवा विचार उठत आहेत, आम्ही त्यांच्या पासून अजाणते नाही आहोत अनघा...! हा निर्णय प्रत्येकवेळी सारखा तुम्हीच घेणार. ना पहिले आणि ना आत्ता, आम्ही तुमच्यावर कोणताच दबाव नाही टाकला. अतः तुम्हीच ह्या गोष्टीवर विचार करून निर्णय घ्या. राहुलच्या डोक्याचा आजार नजरे समोर ठेवून तुम्ही तुमच्या भविष्याला नजरेसमोर ठेवूनच निर्णय घ्या. तुमच्या प्रत्येक निर्णयला मी समर्थन करेन, मग भलं ते काही पण असो.." आणि स्मित हास्य देत तिला बघायला लागले. प्रत्येक मोठ्या गोष्टीला गुरव साहेबांचं स्मित हास्य एक सहज रूप प्रदान करतं....

अनघा... (हळू आवाजात) माझ्यासाठी हे सोप्पं नाही आहे सर...! मी आपल्या आई वडिलांना विचारल्याशिवाय असल्या कुठल्याच निर्णयावर पोहोचू नाही शकत. राहुलचा आजार माझ्यासाठी काहीच मायने नाही ठेवत, परंतु अन्य दुसऱ्या गोष्टी माझ्यासाठी एक महत्वाचे प्रश्न बनले आहेत, ज्यांच्या पासून मी अजून पर्यंत सुटलेली नाही आहे... आणि मला कुठलाच दुसरा रस्ता दिसत नाही आहे त्यातून बाहेर पडण्याचा... कोणताही साधारण माणूस हे सगळं सहजतेने पेलू नाही शकत... वरून माझ्या परिवाराची हालत पण तुम्हाला माहिती आहे सर...! आमची आणि तुमची कुठूनही बराबरी नाही आहे सर... " एवढं बोलून ती गप्प बसते आणि आपले नखं चावायला लागते...

तिला नर्वस होतांना पाहून.... गुरव साहेबांनी सोनालीला पण तिथेच बोलावले... सोनाली शीघ्र तिथे पोहोचली, गुरव साहेबांनी तिला आपल्या आणि अनघाच्यामध्ये झालेला संवाद सांगितला ज्याला ऐकून सोनाली थोडावेळ शांत राहून काही तरी विचार करायला लागली आणि मग...

सोनाली... "अनघा...! आम्ही तुला त्या दिवसापासूनच आपलं मानलं होतं ज्या दिवसापासून तू राहुलसाठी प्रिया बनण्यास  तैयार झाली होतीस. आज जर हालात असे नसते तर.... गोष्ट तुझ्याशी नाही तुझ्या आई-वडिलांशी करण्यासाठी तुझ्या घरी पण गेलो असतो, जे आत्ता पण जाणारच आहोत, पण त्या आधी आम्हाला तुझा निर्णय जाणून घायचा आहे. ह्याला माझा अंध-विश्वास समज किंवा लालच मला माझ्या मुलासमान दिराच्या भविष्यासाठी... मी बाबाने सांगितलेलं कार्य लवकरात लवकर पूर्ण करायला बघत आहे... फक्त तुझ्या होकाराची देरी आहे अनघा... आत्ता नवरात्रीच्या पहिल्या दिवसासाठी आज पासून ४ दिवस आहेत... आम्ही लोकं तुझ्या आई वडिलांना पण विचारणार जर तुझा होकार असेल तर..."

सोनाली आपली गोष्ट संपवून अनाघाकडे पाहायला लागली. गुरव साहेब पण कोणत्या तरी उत्तरासाठी अनाघाकडे पाहत होते. त्या गोघांना आपल्याकडे असं पाहतांना पाहून तिने एकांतात काही तरी विचार करण्याची वेळ मांगितली... तिची मनोदशा समजून गुरव दम्पत्तीने तिला आपल्या रूममध्ये जाण्याची परवानगी दिली.... स्टडी रूममधून बाहेर येता येताच तिच्या मनात अचानक एक प्रश्न आला म्हणून ती लगेच मागे फिरली...

अनघा... "राहुलचं लग्न अनघाशी होणार कि प्रियाशी...!"

अनघाचं हे प्रश्न कदाचित त्या दोघांसाठी अनएक्स्पेक्टेड होतं त्यामुळे ते दोघेही हा प्रश्न ऐकून अवाक राहिले. त्यांना असं अवाक पाहून अनघा काहीच न बोलता आपल्या रूमच्या दिशेने गेली... ती गेल्या नंतर गुरव दम्पत्तीमध्ये एक शांतता पसरली ज्याला फक्त घड्याळाची सुईच भंग करत होती. काही वेळ शांत राहिल्या नंतर...

गुरव साहेब... "तुम्हाला आत्ता नाही वाटत का आत्ता आपल्यांना अनघाला हि गोष्ट सांगितली पाहिजे कि तिचं प्रिया बनण्याच्या मागे मुख्य कारण काय आहे."

सोनाली... "हो...! तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात... मी पण हाच विचार करत होते... मी आत्ताच तिला हे सगळं सांगून येते..."

हे बोलून सोनाली अनघाच्या रूमकडे जायला निघाली. तिथे अनघा आपल्या रूममध्ये पोहोचलीच होती कि कोणीतरी पाठून तिच्या तोंडावर हात ठेवून तिला पकडलं... अनघा घाबरली पण तिला काहीच करायला जमत नव्हतं. तिच्या मागे उभा असलेल्या व्यक्तीने एका हाताने तिचं तोंड बंद करून ठेवलं होतं आणि दुसऱ्या हाताने तिला ह्या प्रकारे पकडलं होतं कि तिला हलायला पण वाव मिळत नव्हता. तिच्या मागे उभा असलेल्या माणसाने आपल्या लातेने दरवाजा बंद केला आणि अनघाला घेवून तो रूमच्या मधोमध आला. अनघा त्याच्या बाहुपाश्यात पूर्ण ताकत लावून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण त्या व्यक्तीच्या ताकती पुढे तिची एक ना चालत होती. रूमच्या मधोमध पोहोचल्यावर स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात अनघाची नजर समोर लागलेल्या आरश्यावर पडली ज्यामध्ये तिला स्वतःला पकडलेल्या व्यक्तीचा प्रतिबिंब दिसला आणि त्या प्रतिबिंबाला पाहताच अनघाचे डोळे जड झाले आणि बंद व्हायला लागले.... बंद होणाऱ्या डोळ्यांमधून तिला बस तोच काळे कपडेवाला माणूस दिसत होता जो तिला ह्यावेळी पकडून उभा होता...

------------------------------------------------------------

सोनाली अनघाच्या रूमकडे येत होती, रस्त्यामध्ये तिला मावशी भेटली जी लग्नाच्या संभावनेवर गोष्ट करण्यासाठी खूप उत्सुकत दिसत होती. त्यांच्याशी जसं तसं आपली पाठलाग सोडवून सोनाली पुढे आली तर रम्याने तिला रोकले आणि दुपारच्या जेवणा विषयी आदेश मांगायला लागला. असलेच छोटे मोठे बाधा पार करत सोनाली अनघाच्या रूम पर्यंत पोहोचली. रूमचा दरवाजा बंद होता, त्याला हळूच ठोकत सोनालीने अनघाला आवाज दिला... प्रतिउत्तरमध्ये तिला कोणताच आवाज न आल्यावर तिने परत दरवाजावर थाप मारली... ह्यावेळी पण तीच हालत होती. सोनालीने परत दरवाजावर थाप मारली.... आणि ह्यावेळी जोराने दरवाजावर थाप मारली होती पण काहीच फरक पडला नाही. सोनालीने चिंतीत होवून रम्याला आवाज दिला. तिचा आवाज ऐकून रम्या काही क्षणामध्येच तिथे हजर झाला. सोनालीने त्याला अनघा दरवाजा उघडत नाही आहे अशी चिंता व्यक्त केली. ज्याला ऐकून रम्या लगेच खाली पळत सुटला आणि घराच्या मागे जिथे गेल्या वेळी तो बेशुद्ध अवस्थेत भेटला होता तिथे जावून बघायला लागला. त्याला पहिले तो काळे कपडेवाला आठवला जो आजकल ह्या घरात जास्तच दिसत होता.

पण तिथे ह्यावेळी काहीच नव्हते, ना शिढी आणि ना त्या काळे कपडेवाल्याचा काही निशाण. ज्याला बघून रम्या थोडा अस्वस्थ झाला. मग तो स्वतःच एक शिढी घेवून आला अनघाच्या रूमच्या खिडकी पर्यंत जाण्यासाठी.... त्याच्यावर चढून तो अनघाच्या रूममध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करायला लागला. रूममध्ये त्याला काहीच नाही दिसले. तो आत्ता चिंतीत होताच कि अनघा त्याला बाथरूममधून बाहेर येतांना दिसली. रम्याने तिला खिडकी मधूनच आवाज दिला ज्याला ऐकून अनघा दचकली आणि ओरडलीच...

अनघा... "हि काय हरकत आहे...! तुझं डोकं खराब झालं आहे काय...? अश्या प्रकारे कोणी कोणत्या मुलीच्या रूममध्ये डोकावून बघतं का...? मी आत्ताच तुझी कम्प्लेंट सोनालीशी करते थांब..."

रम्या... "(थोडा रागाने) जास्त लांब तुला जायला नाही पडणार ताई... ती तुझ्या रूमच्या बाहेरच उभी आहे... जा कर माझी कम्प्लेंट... "

अनघा... "(हैराणीने)... त्या माझ्या रूमच्या बाहेर काय करत आहेत... आणि तू इथे केव्हा पर्यंत लटकत राहशील..."

एवढं बोलून अनघाने दरवाजा उघडला आणि बाहेर सोनालीला चिंतीत अवस्थेत उभं असलेलं पाहिलं. तिने एकदा सोनाली तथा मग खिडकीकडे बघितले जिथे रम्या आत्ता नव्हता. सोनाली अनघाला वर पासून खाल पर्यंत सारखी सारखी बघत होती...

अनघा... "काय झालं...! तुम्ही एवढं चिंतीत का दिसत आहात...? काही झालं काय...?"

सोनाली... "मी किती वेळे पासून दरवाजा ठोकत होती पण तू दरवाजा उघडलाच नाही आणि काही प्रतिउत्तर पण दिलं नाही... मी घाबरली कि परत काही गडबड तर झाली नाही ना.... (चिंता दाखवत) तसं पण आपल्या घरात काही पण होत असतं..."

अनघा... "मला क्षमा करा...! ते मी जरा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. नळातून पाणी टबमध्ये पडत होतं ज्याच्या आवाजामुळे तुमचा काहीच आवाज ऐकायला नाही आला.."

सोनाली... "चल ठीक आहे काहीच हरकत नाही... मी तर इथे बस हेच सांगायला आली होती कि प्रिया..."
तो पर्यंत रम्या तिथे आला...

रम्या... "काय ताई...! केली का माझी कम्प्लेंट कि नाही केली... जर नाही केली असेल तर आत्ता कर फटाफट नाही तर तुम्ही विसरून जाल हे सगळं आणि तुमची इच्छा मनातल्या मनातच राहेल... हुंह..."

अनघा... "मला क्षमा करा रम्या दा...! मी तुम्हाला चुकीचं समजलं.... आपल्या बहिणीला तुम्ही क्षमा नाही करणार काय...?"

रम्या... "अरे का नाही करणार ताई...! तुम्ही हेच तर काम खूप चांगल्या प्रकारे करता... जिथे वाटतं कि चूक तुमची आहे तर लगेच तुम्ही विनम्रतेने क्षमा मांगता... आत्ता भलं असल्या देवी समान बहिणीशी कोणी नाराज कसं होवू शकतं... तुम्हीच सांगा तुम्ही क्षमा मांगितली तर मी भलं का तुमच्याशी नाराज होणार... तुम्ही तर बस.."

सोनाली... (चिडत)... गप्प बस...! एकदम शांत... बोलायला लागला तर शांतच नाही होत... मूर्ख कुठला.."

रम्या... "(बडबडत)... जसं माहितीच नाही कि मी कुठला आहे... हुंह..."

सोनाली... "(न समजणाऱ्या भावात चिडत)... आत्ता जा इथून..."

रम्या... "जातोय मालकीणबाई...! (जाता जाता परत मागे वळून)... अरे हो..! मी तुम्हाला सांगायला विसरलोच ती हवालदारीण बाई आली आहे... आणि साहेब तुम्हाला बोलवत आहेत..."

सोनाली... "(हैराणी ने)... तुझं म्हणणं आहे कि घरात डी.एस.पी. शर्वरी आली आहे... (रम्याने हामि भरल्यावर चिंतीत होत)... आत्ता हिला परत काय भेटलं जे हि इथे निघून आली.. चल मी येते..."


 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment