Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 23 November 2012

भाग ~ ~ ३३ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३३

आजचा सुविचार: - आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

घटनेच्या पुढे.... 
सोनाली खाली जाण्यासाठी वळणारच होती कि ती अनघाला परत एकदा लक्षपूर्वक बघते. अनघाने ह्या वेळी एक पिवळ्या रंगाचा एक सलवार-सूट घातला होता जो कोणत्या तरी मोठ्या डिजाइनरचा ब्रांडेड वर्जन होता. ह्या सलवार सूटला बघून सोनाली थोडी हैराण झाली… तिला हा सूट कुठेतरी पाहिल्या सारखा वाटला. सोनालीला असं आपल्याकडे बघतांना पाहून अनघाने तिला आठवण करून दिली कि तिला खाली गुरव साहेबांकडे जायचे आहे, ज्या वर सोनालीने तिला पण आपल्या सोबतच यायला सांगितले. अनघाला पण माहिती होते कि डि.एस.पी. शर्वरी आली आहे, आणि ती नक्की तिला बोलवणार, त्यामुळे नंतर कोणी बोलवायला येण्यापेक्षा चांगलं आहे कि ती पण सोनाली सोबतच खाली गेली.

लिविंग रूममध्ये शर्वरी एका सोफ्यावर बसून कोणत्या तरी पुस्तकाची पानं चाळत होती, जेव्हा अनघा गुरव दम्पत्ती सोबत त्या रूममध्ये प्रवेश करत होती (सोनालीने गुरव साहेबांना त्यांच्या स्टडीरूम मधून आपल्या सोबत घेतलं होतं). त्या सगळ्यांना एकत्र पाहून शर्वरी दरवेळी सारखी आपल्या जागेवरून उठून आणि पुढे होवून गुरव साहेबांशी हात मिळवते. तिच्या चेहऱ्यावर तिची सदाबहार हास्य कायम होतं…. पण तिला आपल्या समोर आलेल्या तिन्ही लोकांच्या चेहऱ्यावर असं काहीच दिसत नव्हतं….

शर्वरी… “(थट्टा करत) असं वाटतंय माझं इथे येण्यामुळे तुमच्या पैकी कोणालाच आनंद झालेला दिसत नाही…?”

गुरव साहेब.. “(शर्वरीच्या थट्टेला कॉपी करत)… तुम्ही पण कशी वार्ता करताय डि.एस.पी. म्याडम…! तुम्ही इथून गेल्या पासून आज पर्यंत प्रत्येक श्वासा गणिक आम्ही सगळ्यांनी तुमची आठवण काढली बरं का… पण हो हि दुसरी गोष्ट आहे कि तुम्हाला कधीच उचकी आली नाही… आत्ता तुमच्या येण्याचे कारण पण सांगा… काही सुखद बातमी आली आहे काय ह्या वेळच्या टेलिग्राममध्ये…?”

शर्वरी… “कमाल आहे साहेब तुमची…! तुम्ही तर अंतर्यामी निघालात… भलं तुम्हाला कसं माहिती पडलं कि मी तुमच्यासाठी कोणती सुखद बातमी आणली आहे ते… खरं खरं सांगा..! गुप्तहेर तर नाही ना लावून ठेवला तुम्ही माझ्या मागे…”

गुरव साहेब… “पोलीसवाल्यांच्या मागे भलं कोण गुप्तहेर लावणार म्याडम…! आम्ही तर असेच एक न होणाऱ्या संभावनेवर विचार करत होतो… आत्ता थट्टा पुरी झाली आणि मुद्द्याच्या गोष्टींवर या…”

शर्वरी… “जसा तुमचा आदेश साहेब…! हि नाचीज गेल्या २ - ३ दिवसांपासून जरा व्यस्त राहिली होती त्यामुळे तुमचे दर्शन करू शकले नाही. खरं म्हणजे आमची जी टीम कोल्हापूरला गेली होती ती तर खूप विचित्र गोष्ट आमच्या समोर घेवून आली… (सगळ्यांचे चेहरे एक एक करून पाहून पुन्हा बोलायला सुरुवात करते).. जो कोल्हापूरवाला व्यापारी मेला होता तो दरवेळी तुमच्या एन.जी.ओ. मध्ये पैसे डोनेट करायचा. आत्ता असल्या माणसाशी तुम्ही लोकं कसे अपरिचित असू शकता, जो रेगुलर तुमच्या एन.जी.ओ. मध्ये पैसे देत होता..”

अनघा हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि एक एक करून गुरव दम्पत्तीकडे पहायला लागली …

गुरव साहेब… “आमचं एन.जी.ओ. अंतराष्ट्रीय लेवलचं एन.जी.ओ. आहे आणि तिथे तर खूप सारे लोकं डोनेशन करत असतात, आम्ही सगळ्यांच्या विषयी माहिती करत बसणार काय…”

शर्वरी… “अच्छा चला सोडा ह्याला… मामुली गोष्ट आहे हि तुमच्यासाठी पण मला एक गोष्ट समजली नाही कि हे डोनेशन देण्याची प्रथा जवळ जवळ ४ वर्षा आधी सुरु झाली होती, त्याच्या पहिले तुम्ही लोकांनी त्याच्यावर एक केस पण केली होती… तुम्हा लोकांशी म्हणजे तुमच्या एन.जी.ओ.शी आहे पण हे डोनेशनचं प्रकरण सुरु होताच… तुमच्या लोकांनी केस मागे घेतला होता… ह्या बद्दल थोडं तुम्ही प्रकाश टाकू शकता का…?”

गुरव साहेब… “जरूर टाकला असता जर हि गोष्ट त्याच्या मृत्यूशी संबंदित असती तर… तुम्ही कोडं का टाकत आहात साफ साफ का नाही सांगत कि गोष्ट काय आहे…?”

शर्वरी…”साफ साफ गोष्ट हि आहे कि तुमच्या लोकांचा मामला दरवेळी संशयातच का असतो… प्रत्येक माणसाची सुई फिरून फिरून ह्याच घरावर का परत येते… वरून तुम्हा लोकांना सरकारची मदत करायला आवडत नाही वाटतं… आपल्या भावाला बोलवा फटाफट… (ह्या वेळी तिच्या स्वरात काहीशी जरब होती..)”

गुरव साहेब… “त्याच्याशी काय काम आहे तुमचं…?”

शर्वरी… “आधी त्याला तुम्ही बोलवा मग सांगते…”

ह्या वेळी शर्वरीचं हे रूप पाहून गुरव साहेब पण थोडा चरकले होते. तिचं हे रूपच त्यांच्या चिंतेचे कारण बनलं होतं. त्यांना अजून पर्यंत अशी कोणती बातमी पण मिळाली नव्हती जे त्याच्या बेसवर पूर्वी सारखं आपली तैयारी करून ठेवतील. असो त्यांनी राहुलला बोलवण्याचा आदेश दिला, आणि त्या आदेशाचं पालन पण लवकर झालं. राहुलला घेवून रम्या लगेच तिथे हजर झाला. आत्ता परत तेच काही दिवसांपूर्वीचं वातावरण होतं... डि.एस.पी. शर्वरीच्या समोर ते पाचही जण..! गुरव साहेब, सोनाली, राहुल, अनघा आणि आपला रम्या.

राहुल आल्यानंतर रूममध्ये एक प्रकारची शांतता पसरली होती. ह्या शांततेचं सगळे जण आपापल्या परीने वापर करत होते. शर्वरी कदाचित ह्या शांततेत आपल्या बोलण्याची भूमिका तैयार करत होती, गुरव साहेब आपल्या छोट्या भावावर आलेल्या संकटापासून वाचवण्यासाठी स्वतःला तैयार करत होते. सोनाली आणि अनघा फक्त गप्प बसून कधी शर्वरीकडे पाहायचे तर कधी गुरव साहेबांकडे आणि नंतर राहुलकडे पाहायचे, आणि मनातल्या मनात देवाशी प्रार्थना करायचे कि देव त्यांच्या सोबत कधीच वाईट करणार नाही . आणि रम्याच्या मनात काय चाललं होतं ते सांगणं कठीण आहे. शर्वरीने आपलं बोलणं कोणत्या भूमिकेशिवायचं सुरु करणं जास्त पसंत केलं आणि....

शर्वरी... "(राहुलकडे बघत)... त्या रात्री संबंदी सगळं काही खरं खरं सांग... आणि लक्ष्यात ठेव सगळं काही खरं खरं सांगायला बोलते मी..!"
शर्वरीने हि गोष्ट एवढ्या शांतपणे आणि जरबपणे बोलली होती कि राहुलची पण हालत खराब झाली होती..

गुरव साहेब... "(मध्येच हस्तक्षेप करत)... तुम्ही एका रोगीशी ह्या प्रकारे डॉक्टरांच्या परवानगी शिवाय काहीच विचारपूस करू शकत नाही ...." गुरव साहेबांनी राहुलला फक्त रोगी बोलले होते, 'मानसिक' रोगी बोलून ते आपल्या भावाचे मन दुखवणार नव्हते.

शर्वरी... "गुरव साहेब...! तुम्ही तुमची वकालत सध्या इथे नका दाखवू आय रिपीट, इथे नका दाखवू... माझ्या संयमाची परीक्षा पाहू नका... तुम्ही फक्त माझ्यासोबत को-ओपरेट करा आणि दुसर्यांना पण तेच करायला सांगा... (मग पुन्हा राहुलकडे बघत)... आत्ता तू बोलायला सुरुवात कर फटाफट... माझ्या जवळ जास्त वेळ नाही हि गोष्ट पुन्हा पुन्हा बोलायला..." गुरव साहेबांनी पण आत्ता शर्वरीच्या रागाला अजून भडकवण जरुरी नाही समजलं.. आणि त्यांनी राहुलला सगळं काही खरं खरं सांगायला सांगितलं...

राहुल... "मी त्या रात्री त्या माणसाच्या वाईट वागणुकीमुळे जी त्याने प्रीयासोबत केली होती, खूप जास्त हैराण झालो होतो आणि त्याला भेटून हे जाणण्याचा प्रयत्न करणार होतो कि शेवटी गोष्ट काय आहे, जे तो माझ्या प्रियाच्या मागे लागला होता. पण जेव्हा मी त्याच्या रूममध्ये पोहोचलो तेव्हा तो मृत अवस्थेत पडला होता... कोणी त्याला मारून निघून गेलं होतं... बस...!" एवढं बोलून राहुल गप्प होतो आणि शर्वरीकडे पहायला लागतो. शर्वरी त्यालाच बघत होती बघत काय होती त्याला रागाने डोळे वटारून पाहत होती.

शर्वरी... "हे सगळं तुझं नाटक आहे काय...! म्हणजे हे जे तू आपल्या आजाराचा ढोंग करतोस... ते सगळं नाटक आहे काय...?"

गुरव साहेब... "(जवळ जवळ ओरडतच)... डि.एस.पी.. शर्वरी...! आपल्या लायकीत राहून बोला... आता जोपर्यंत तुम्ही इथे कोर्टातून आदेश नाही घेवून येत तोपर्यंत ह्या घरात तुम्हाला येण्याची परवानगी नाही आहे... सोनाली...! माझा फोन आण... मी आत्ताच एस.पी साहेबांसोबत बोलून हिला हिची लायकी दाखवतो..."

सोनालीने गुरव साहेबांना शांत करून वातावरणात वाढणाऱ्या गंभीरतेला पाहून शर्वरीशी गुरव साहेबांतर्फे क्षमा मांगितली... आणि तिला आपल्या प्रश्नांवरती संयम बाळगायला सांगितल...

शर्वरी... "गुरव साहेब...! तुमचं मन दुखवायचा ह्या मध्ये माझा काहीच हेतू किंवा इच्छा नव्हती.... जरा आपल्या भरत-प्रेमी चष्म्याला उतरवून बघा जे मी तुम्हाला दाखवायला बघत आहे... तुमचा छोटा भाऊ एवढं सगळं काही करून जातो आणि तुम्ही त्याला अजून छोटा मुलगाच समजता... माझा कोणी मित्र किंवा शत्रू नाही आहे..."

गुरव साहेब... "(जे आत्ता पर्यंत शांत झाले होते)... मला तुमच्या आणि तुमच्या कायद्याच्या कामामध्ये येण्याचा माझा काहीच इरादा नाही आहे डि.एस.पी. (म्याडम आत्ता ते मध्ये नाही लावत होते जी शर्वरीला पण जाणीव झाली)... पण ह्याच्यापुढे तुम्ही पण कायद्याच्याच मार्फत विचार पूस करायला इथे या..."

शर्वरी... "(आत्ता गोष्ट अजून पुढे न वाढवता).. आमच्या पडताळणीच्या अनुसार तो व्यापारी तुमच्या... ह्या घराला चांगल्या प्रकारे ओळखून होता. ह्या घरातील एका ल्यांड-लाईन वरून दरवेळी कोणी त्याला फोन करायचं... (जवळ जवळ सगळेच्या सगळे जण बिचकलेच हे ऐकून)... तुमच्या एन.जी.ओ. ने केस करणं आणि केस परत मागे घेणे आणि ह्या दरम्यान तुमच्या एन.जी.ओ मध्ये त्या व्यापाऱ्या कडून भारी भरकम रक्कम जमा होते... आणि आत्ता सगळ्यात मोठी गोष्ट... (थोडावेळ थांबून) तो ह्यांना (अनाघाकडे इशारा करत) प्रिया प्रिया बोलवत होता पण त्याच्या इथे तर कोणीच प्रिया नावाची व्यक्ती काम नाही करायची..."

फोनवाल्या झटक्यातून अजून ते सगळे बाहेर आले नव्हतेच कि प्रियावाल्या गोष्टीने ते लोकं अजूनच हैराण झाले... "ह्या गोष्टीच्या मागे काय गुपित आहे...?" जवळ जवळ सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न येत होता.
 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment