Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 24 November 2012

भाग ~ ~ ३४ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३४

आजचा सुविचार: - संवादातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ’जे बोलंलंच गेलेलं नाहिये ते ऐकणं’ – पीटर ड्रकर.

घटनेच्या पुढे.... 
शर्वरी... "तुमच्या सगळ्यांच्या मनात जो प्रश्न उठत आहे त्याचं उत्तर तर तुमच्याच मधून कोणा एका जवळ असेल ना... किंवा (सगळ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवून)... सगळ्यांच्या जवळ... (गुरव साहेबांना बघत)... माझे हात अजुनहि पुराव्यापायी बांधले गेले आहे गुरव साहेब... (स्मित हास्य देवून).. नाहीतर मी आपल्या कामाच्या वेळी कोणत्याही उंच पदावरच्या व्यक्तीला पण घाबरत नाही..."

गुरव साहेब... "आपण धमकी देत आहात...?"

शर्वरी... "नाही...! तुमची शंका दूर करते... राहुलच्या पहिले त्या रूममध्ये कोणी दुसरं पण गेलं होतं, जो हॉटेलच्या वीडीओ फुटेजमध्ये क्लीअर दिसत नाही आहे... आमचे एक्स्पर्ट त्याचा चेहरा समोर आणण्यामध्ये लागले आहेत... जसेच काही क्लीअर होतं.. आम्ही आमच्या कार्यवाहीला शेवट पर्यंत घेवून जाणार... पण तुमच्यापैकी मला कोणी हे सांगेल का...! कि त्या व्यापाऱ्याशी कोण वार्ता करायचं..? (कोणीच काही उत्तर नाही दिलं)... तुमच्या सगळ्यांची शांतता ह्या घरावर माझा संशय अजून वाढवतं... (अनाघाकडे बघत)... तो काळे कपडेवाला पुन्हा आला होता का... आय मीन पुन्हा दिसला होता काय...?"

अनघा काही बोलणार त्याच्या पहिले गुरव साहेबांनी बोलणं सुरु केलं...

गुरव साहेब... "काळे कपडेवाल्याला शोधायचं काम तुमचं आहे... ज्यामध्ये तुम्ही असमर्थ नजर येत आहात. राहिला प्रश्न घरातील ल्यांड-लाइन वरून त्या माणसाला कॉल जाण्याचा तर तुम्ही कोणी नवीन ऑफिसर तर नाही आहात जे ल्यांड-लाइनच्या सरळ उपलब्धते पासून अजाणते आहात... घराच्या बाहेर लागलेल्या बॉक्समधून कोणी पण आमचा नंबर ह्याक करू शकतो... त्यामुळे तुम्ही हा पोइंट सारखं सारखं बोलू नका तर चांगलं राहील... आणि राहिला प्रश्न अनघाचं त्या काळे कपडेवाल्याला पुन्हा पाहण्याचा, तर तुम्हाला सांगू इच्छितो कि तो पुन्हा दिसला होता अनघाला... इथेच ह्या घरात... आणखीन काही...?"

शर्वरी... "(गुरव साहेबांच्या हस्तक्षेपाने चिडत)... मी तर विसरलेच होते कि ह्या घरात फक्त तुमच्याच जवळ बोलण्याची कला आहे... (मग रम्याला बघून)... किंवा मग तुमच्या ह्या नोकराकडे..."

रम्या... "(स्वतःला नोकर संबोधलं जाऊन चिडत)... हवालदारीण बाई...! तुम्ही मला का हि सगळी गोष्ट सुनवत आहात...  जर माझ्यावर संशय आहे तर घेवून चला मला पकडून... मला माझ्या देवावर आणि आपल्या मालकावर पूर्ण विश्वास आहे, कि हे दोघं मला काहीच होवू देणार नाहीत... तुम्हाला जे काही करायचे आहे ते लगेच करा नाही तर मनात काही करू न शक्य्लाची एक खंत राहील... दरवेळी जेव्हा पण तुम्ही इथे येता तोंडावरतीच आपटता आणि इथे पुन्हा पुन्हा येता... आम्ही तर बोलतो तुम्ही..."

सोनाली... "(रम्यावर चिडत) रम्या...! तुम्हाला कोणी बोललं आहे का मध्ये बोलण्यासाठी, एकदम गप्प उभा राह इथे आणि जर उभं नाही राहवत तर निघून जा इथून... (शर्वरीकडे बघत)... तुम्ही ह्याच्या गोष्टीला जास्त आपल्या मनावर लावून नका घेवू... आणि जर तुम्हाला वाईट वाटले असेल तर मी तुमच्याशी क्षमा मांगते..."

शर्वरी... "त्याची काहीच गरज नाही आहे... ह्या घरातील हालत खरोखर गडबडीचे आहेत... तुम्ही लोकं ह्या पुढे कुठल्या कार्यात फसले नाही पाहिजेत देवाशी हीच प्रार्थना करते आणि आत्ता मी निघते... (स्मित हास्य देत)... नंतर तर यायचेच आहे मला..."

ह्या वेळी तिने गुरव साहेबांशी हात मिळवण्या बदली नमस्ते करून निघून गेली...

ती गेल्या नंतर जिथे सोनालीने दीर्घ श्वास घेतला तिथे गुरव साहेब येणाऱ्या वादळा विषयी विचार करत होते, जो शर्वरी गेल्यानंतर फक्त टळला होता पूर्ण पणे संपला नव्हता...

सोनालीचं लक्ष पुन्हा एकदा अनघाच्या सूटवर जातं, तिला सारखा सारखा हा सूट खूप विचलित करत होता. जेव्हा तिच्यानं राहवलं गेलं नाही तेव्हा तिने अनाघालाच विचारणे चांगलं समजलं...

सोनाली... "हा सूट खूप चांगला आहे प्रिया...! कुठून घेतला तुम्ही...?"

अनघा... "(हैराणीने) हे तुम्ही काय विचारत आहात...! तुम्हीच तर दिला होता मला त्या कपड्यांसोबत... त्यांच्याच मधला एक आहे हा..."

सोनाली.. "(अविश्वासाने)... काय...! हा सूट मी दिला होता... शक्यच नाही... absolutely impossible.... हा तर... हा तर... (काही बोलता बोलता ती थांबते)... असो जाऊ दे..."

तिचा विचलित पणा आज अनघाचं हसण्याचं कारण बनलं होतं. अनघाच्या चेहऱ्याच्या हसण्याची जाणीव कोणालाच झाली नाही... पण सोनालीने विचारल्यावर बाकी सगळ्यांनी पण तो सूट लक्ष्यपूर्वक पाहिला तेव्हा त्यांच्यामधील दोन डोळे आश्चर्याने वटारले होते. कदाचित त्याला पण ह्या सूट विषयी काही गोष्ट माहिती असणार...
……*****……..******……..*********……


थोड्या वेळानंतर सगळे जण खुश होवून बाहेर निघाले होते, काही कमी, काही जास्त पण होते सगळेच जण खुश. शेवटी अनघाने लग्नासाठी आपला होकार जो दिला होता. पण तिने आपल्या आई वडिलांना ह्या विषयी वार्ता करण्याची शर्त पण ठेवली होती, ज्याच्यासाठी गुरव साहेब आणि सोनाली स्वतः तिथे जाण्यासाठी तैयार झाले होते. राहुल अनघा बरोबर लग्न करण्यासाठी तर खुश होता पण समस्येने त्याचा आनंद कमी केला होता. देव जाणो का, पण ‘प्रियावाल्या' गोष्टीला जाणण्यासाठी आत्ता अनघा काहीच इंटरेस्ट दाखवत नव्हती. सोनाली पण तिच्या होकारानंतर त्या गोष्टीला जास्त तुल्य देत नव्हती आणि त्याच्यातच भलाई समजत होती.


अनघाने आपल्या आईशी वार्ता करून गुरव साहेब आणि सोनालीचं प्रपोजल सांगितलं. तिची आई एकीकडे आपल्या मुलीला एवढ्या मोठ्या घराण्यातून आलेल्या मांगणीने खूप खुश झाली होती तिथेच दुसरीकडे आपल्या वर्तमान स्थितीला बघून अजूनच विचार करून चिंताक्रांत पण होती. सगळ्यात मोठी गोष्ट जी होती ती म्हणजे त्यांच्याजवळ वेळ पण नव्हता कारण कि आपल्या छोट्या मोठ्या आशा अपेक्षा जी प्रत्येक आई आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवते, ते ती पूर्ण पण करू शकत नव्हती. सोनालीने त्यांच्या सोबत लग्नासाठी वार्ता करण्यासाठी त्यांच्याच जवळ येवून भेटण्याची इच्छा जाहीर केली ज्याला स्वीकार करण्यामध्ये भलं अनघाच्या आईला काय आपत्ती असणार. जास्त वेळ तर नव्हता त्यामुळे दुपारच्याच फ्लाईट मधून गुरव साहेब आणि सोनालीच्या सोबत अनघा आपल्या घरी निघून गेली.

अनघाच्या घरात तिच्या आईने आपल्या क्षमतेनुसार गुरव साहेब आणि सोनालीचं स्वागत-सत्कार केलं. त्यांच्यासाठी तर जसं सुदामाच्या छोट्याश्या कुटीत साक्षात देव श्री कृष्णच आला आहे. गुरव साहेब आणि सोनालीने अनघाच्या आईला सगळ्या चिंतेतून मुक्त राहायला सांगितले आणि लग्नाची जवाबदारी आपल्या खांद्यावरच घेवून त्यांना चिंता मुक्त पण केलं. अनघा ह्याच दरम्यान आपल्या वडिलांना पण बघून आली होती ज्यांची हालत अजूनही पूर्वी सारखीच होती, पण गुरव साहेबांमुळे डॉक्टर्स त्यांची खास देखरेख करत होते. दरवेळी पडणारे फिट्स आत्ता त्यांना पडत नव्हते. जो कि भविष्यात त्यांच्या बरं होण्याच्या संभावनाचं एक चांगलं संकेत होतं.

शेवटी..! निश्चिंत करण्यात आलं कि गुरव साहेबांच्या घरीच लग्न होणार आणि एका दिवसा आगोदरच अनघा आपल्या आई आणि छोट्या भावंडांसोबत येईल. आणि अन्य दुसऱ्या कोणत्याही नातेवाईकांना त्यांच्यासोबत येण्याची पूर्ण सूट गुरव साहेबांनी त्यांना दिली होती. लग्नाचा दिवस जो नवरात्रीचा पहिला दिवस ठरवण्यात आला होता, आणि त्याच दिवशी लग्नाच्या सगळ्या विधी, जसे साखरपुडा, उटणे आणि हळदी वैगेरे पण त्याच दिवशी करण्याची गोष्ट निश्चिंत करण्यात आली होती.

असं बोलायला गेलं तर हे सगळं एवढ्या घाई गडबडीत होत होतं पण गुरव साहेबांची लायकी आणि हुद्यामुळे हे सगळं करण्यामध्ये ते समर्थ होते. असो लग्नासाठी सगळं ठरवून गुरव साहेब आणि सोनाली तर परत निघून गेले पण अनघा आपल्या आईकडेच थांबली. लग्नाच्या पहिले फक्त दोन दिवस ती आपल्या आई आणि भावंडांसोबत त्या घरात राहणार होती. तिच्या भावंडांसाठी पण हे सगळं एवढ्या घाई घाईने होणे कोणत्या आजुब्यापेक्षा कमी नव्हतं. अनघाच्या आईने आपल्या नवऱ्याला हि बातमी सांगितली, ते कोणत्या दुसऱ्या पद्धतीने तर नाही पण आपले अश्रू गाळून आपला आनंद व्यक्त करत होते. जाता जाता गुरव साहेब आणि सोनालीने लग्नासाठी छोटी-मोठी खरेदी करण्यासाठी अनघाच्या आईने लाख मनाई केल्यानंतर पण त्यांना एक चांगली रक्कम सोपवून गेले होते. त्यांची अशी माणुसकी पाहून अनघाची आई अजूनच अस्वस्थ झाली. पहिल्या पासूनच ती आपल्या नवऱ्याच्या डॉक्टरी सहाय्यतासाठी कृतज्ञ होती मग आत्ता तर बस काय बोलणार...! तिला तर वर पासून खाल पर्यंत उपकाराखाली दबलेगेल्याची जाणीव होत होती.

अनघाची आई आणि अनघा जेवढं होवू शकेल तेवढं आपल्या सर्व खास खास नातेवाईकांना आणि पाहुण्यांना लग्नासाठी आमंत्रित करायला लागले. कोणाला संक्षेपमध्ये तर कोणाला विस्ताराने ह्या घाई गडबडीच्या लग्नाबद्दल समजावले गेले. समजणारे समजून गेले आणि जे नाही समजले त्यांना समजावण्यासाठी पण जास्त वेळ नव्हता. त्यांना हे दोन दिवस पूर्ण पणे वापरायचे होते. आजच्याच्या 'म्यानीप्युलेशन' (manipulation)वाल्या दुनियेत जर तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं अरेंजमेंट चुटकी वाजवून काही सेकंदात करू शकता आणि इथे गुरव साहेबांच्या कृपेने त्यांच्या जवळ सध्या पैशांची काहीच समस्या नव्हती. बघता बघता हे दोन दिवस पण कसे निघून गेले कोणालाच समजलं नाही. अनघा सध्या आपल्या लग्नाला घेवून खरोखर खुश होती कि नाही..? हे सांगणं थोडं कठीण आहे...

ठरलेल्या वेळेनुसार अनघा आपल्या परिवार, आणि काही नातेवाईकां आणि काही पारिवारिक मित्र-मैत्रीणींसोबत परत समता नगरमध्ये पोहोचली... गुरव साहेबांच्या वाड्याला किंवा बंगल्याला पाहून त्यांच्या सोबत आलेल्या सगळ्या लोकांनी आश्चर्याने आपल्या तोंडावर हात ठेवला.... अनघाची आई तर आपल्या मुलीच्या नशिबावर खूप खुश होती. सारखी सारखी तिला वाईट नजरेपासून वाचण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून आपली बोटं मोडायची...

पण वाईट नजर तर लागलीच होती अनघाला (कदाचित)....

गुरव साहेबांनी अनघाच्या सर्व नातेवाईकांचं चांगल्या प्राकारे सु-स्वागत केलं. सर्व नातेवाईकांचं मन त्यांची माणुसकी पाहून खूप खुश आणि त्यांना खूप सम्मान द्यायला लागले. अनघाला ह्याच दरम्यान राहुलशी बोलायला काहीच अवधी मिळाला नाही. एक-दोन वेळा तर ते दोघे एकमेकांसमोर आले खरे पण कोणी ना कोणी सोबत असल्या कारणामुळे त्या दोघांमध्ये काहीच खास गोष्ट झाली नाही. राहुलचे डोळे दरवेळी काही ना काही तरी सांगायचे प्रयत्न करत होते पण अनघा त्यांना समजत नव्हती किंवा कदाचित समजण्याचा प्रयत्नच करत नव्हती.

ठरलेल्या वेळेप्रमाणे पूर्ण विधींनुसार त्यांचं लग्न संपन्न झालं. राहुलला पाहून अनघाच्या आईचा आनंद अजूनच वाढला. त्यांना राहुल खूप सज्जन आणि सभ्य मुलगा वाटला. लग्नाच्या घाई गडबडी मागे फक्त कुंडली दोषच सांगितले गेले होते सगळ्यांना, आणि सगळ्यांना ह्यावर काही खास आपत्ती पण वाटली नाही. "मोठ्या लोकांमध्ये चालतं असं...?" असं बोलून जवळ जवळ सगळ्यांनीच आपले खांदे उचकावले...

आशीर्वाद समारोहमध्ये सर्व नातेवाईकांनी आपापल्या क्षमतेनुसार त्यांना यथोचित भेट वस्तू दिली आणि आशीर्वाद दिला. त्याच नातेवाईकांमध्ये जेव्हा राहुलच्या मामा आणि मावशीचा नंबर आला तेव्हा दोघांनी आशीर्वादासोबत एक 'फाईल' पण अनघाच्या स्वाधीन केली. "आत्ता हि तुझी जवाबदारी आहे" दोघांनी अनघाला आशीर्वाद दिला. अनघाने जेव्हा फाईलला हैराणीने बघितल्यावर त्या दोघांनी तिला आठवण करून दिली कि हे राहुलच्या आईचे मृत्यूपत्राचे पेपर्स आहेत जे त्यांच्या इच्छेनुसार आत्ता तुझ्या नावावर केले जात आहेत.

अनघा... "पण आत्ता इथेच काय देण्याची गरज होती...! नंतर पण देवू शकला असता तुम्ही..."

मावशी... "नंतर पण द्यायचेच होते ना बेटा... ह्याला आम्हा दोघांकडून आशीर्वाद आणि आपल्या स्वर्गीय सासूची शेवटी इच्छा समजून घे... आज माझी ताई जिथे पण असेल...! हे बघून खूप खुश असणार त्याच्या मुलाला एकदम तशीच बायको भेटली आहे जशी ती प्रत्येकवेळी विचार करायची... तू आपल्या मनात कुठलाच संकोच न बाळगता हि फाईल आपल्यापाशी ठेव... तरी पण इथे ह्यामध्ये तुझ्या स्वाक्षऱ्या पण पाहिजेत... (स्मित हास्य देत) लवकर त्यांना करून टाक आणि आम्हाला आमच्या जवाबदारी पासून मुक्त कर..."

अनघाने त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी सांगितलेल्या जागी स्वाक्षरी केली ज्याची एक कॉपी त्यांनी आपल्या जवळ ठेवली आणि दुसरी अनघाच्या स्वाधीन केली. राहुल हे सगळं बघून विचित्रच स्वप्नाच्या दुनियेत हरवला होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभाववरून तो खुश आहे कि दुःखी ह्याचा अंदाज लावणं सध्यातरी थोडं कठीण होतं. अनघाच्या भावंडांना राहुल खूप पसंत आला. त्या दोघांना तर गुरव साहेबांनी आणि सोनालीने तर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम द्यायला लागले होते. अनघा आपल्या भावंडांची आणि नातेवाईकांचा एवढा सम्मान पाहून अजूनच अभिभूत झाली होती. सगळ्या विधी होईपर्यंत रात्र झाली होती. सकाळ पासून सुरु झालेलं हे लग्न आत्ता आपल्या शेवटच्या चरणात होतं.

गुरव साहेबांच्या नातेवाईकांनी आत्ता घरी जाण्याची सुरुवात केली होती. अनघच्याहि परिवाराला सोडून बाकी सगळ्यांचं पण रात्रीच्या गाडीने परत जाण्याचे निश्चिंत झालं होतं. ते लोकं पण आपापल्या घरी जाण्याची तैयारी करत होते. अनघाचे वडील तिथे नव्हते, त्यांना त्यांच्या वर्तमान हालातीमध्ये कुठे घेवून जाणे रिस्की असू शकतं, त्यामुळे डॉक्टरांनी ह्याची परवानगी दिली नव्हती. त्यांनाच आठवण करून अनघा आपल्या जीवनातल्या सगळ्यात महत्वपूर्ण दिवशी पण सारखी सारखी उदास व्हायची.

असो...! सगळं मिळवून सगळा कार्यक्रम एकदम शांतेत पार पडला. आत्ता अनघाला राहुलच्या रूममध्ये घेवून जाण्याची जवाबदारी सोनालीची होती. अनघाच्या आई आणि भावंडांना घरातल्याच एका रूममध्ये राहण्यासाठी जागा दिली होती. अनघा आपल्या नवीन रूममध्ये धडधड करण्याऱ्या काळजाने येणाऱ्या आनंदाच्या क्षणांची वाट पाहत होती. हा तो क्षण असतो जो जवळ जवळ सर्व मुली आपल्या जीवनात येण्याची वाट पाहत असतात. त्याच येणाऱ्या क्षणांची वाट पाहत ती आपल्या वैवाहिक शैय्यावर बसलेली होतीच कि तिला राहुलच्या येण्याची चाहूल लागली... 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment