Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 25 November 2012

भाग ~ ~ ३५ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३५

आजचा सुविचार: - आज तुम्ही शांतपणे झाडाखाली स्वस्थ बसू शकताय, याचं मुख्य कारण म्हणजे फार पूर्वी कोणीतरी हे झाडं लावून, वाढवलंय – वॉरेन बफे.

घटनेच्या पुढे.... 
Note: - मित्रांनो ह्याच्या आगोदर जो भाग मी दिला होता तो खूप घाई गडबडीत दिला होता त्यामुळे त्याच्यात काही चुका होत्या त्या दुरुस्त करून मी तो भाग पुन्हा इथे पोस्ट केला आहे.. ज्यांना तो भाग पुन्हा वाचायचा आहेर तर पुन्हा वाचू शकता नाही तर आपण आत्ता पुढे बघूया काय होतंय ते... आणि त्या बद्दल मी तुमच्याकडून क्षमा मांगतो..

गुरव
साहेब आपल्या बेडवरती पहुडले होते... सोनाली बाथरूममधून फ्रेश होवून बाहेर आली आणि गुरव साहेबांवर एक स्मित हास्य टाकीन एक सरसरती नजर फिरवते. दिवसभरातील फंक्शनमुळे उत्पन्न झालेला थकवा त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. सोनाली खूप प्रेमाने गुरव साहेबांजवळ जाऊन त्यांच्या केसांमध्ये हात फिरवायला लागते. थकलेल्या गुरव साहेबांसाठी हा स्पर्श खूप सुखावत होता. त्यांचे डोळे सुखद आनंदाने बंद झाले. चेहऱ्यावर एक हास्य घेवून गुरव साहेब सोनालीला बोलले...

गुरव साहेब... "तुमच्या अश्या स्पर्शाने मला आज 'सारिका'ची आठवण आली... (सोनालीने जेव्हा डोळे वटारून गुरव साहेबांना पाहिले)... अरे बाबा...! ती आमच्या माली काकांची मुलगी होती... माझ्यापेक्षा खूप छोटी होती (हसत) तुमच्याच सारखी जेव्हा पण मला थकलेला बघायची अशीच येवून खूप इंनोसेन्टली ती, सारिका माझ्या डोक्याची मालिश करायची. ज्यामुळे मला खूप बरं वाटायचे. तिचं लग्न खूप आनंदाने आपल्या हातांनी लावून दिलं होतं मी... ती तर इथून निघून गेली पण तिची मालिश आज पण मी मिस करतो..."


सोनाली... "(खोटा राग दाखवत)... ठीक आहे मग...! तिच्याकडूनच करून घ्या मालिश..."


गुरव साहेब... "(सोनालीला प्रेमाने आपल्या बाहुपाश्यात घेत)... अरे तुम्ही तर नाराज झालात... माहिती नाही का पण आम्ही तिला काल पासून खूप मिस करत आहोत... आणि आत्ता ज्या प्रकारे तुम्ही माझ्या केसांमधून हात फिरवला... तिच्या आठवणी अजून ताज्या झाल्या. पण तुमच्या समोर तर ती पण काहीच नाही..."


आणि अजून जोराने आपल्या आलिंगनाला अजून सख्त करत सोनालीला आपल्या बाहुपाश्यात घेतलं. नवऱ्याच्या ह्या प्रेमळ अंदाजाला पाहून सोनाली आपलं हसणं रोकु शकली नाही. ते दोघे आपली प्रेमलीलेला अजून पुढे वाढवणार तेच त्यांच्या दरवाजावर एक थाप पडली. कोणी तरी त्यांचं दार वाजवलं होतं... आणि आत्ता तर अजून जोराने कोणीतरी दरवाजा वाजवत होतं...


दरवाज्यावर पडणाऱ्या थापेला ऐकून दोघेही हैराण होते. कोणत्या तरी अनहोनीच्या आशंकेने दोघांचंही मन धडधड करायला लागलं होतं..


गुरव साहेब... "अरे थांबा तरी... येत आहे... कोण आहे..."


सोनालीने दरवाजाजवळ जाऊन त्याला उघडते... दरवाजाच्या बाहेर रम्या उभा होता जो खूप घाबरलेला दिसत होता. त्याला पाहून सोनाली तोंड वाकडं करते...


सोनाली... "हा काय वात्रटपणा आहे.. रम्या...! अश्या प्रकारे कोणी दरवाजा ठोकत का आणि वेळ काय झाली आहे... कोणतं डोंगर पडलं तुझ्यावर, जो एवढा घाबरलेला दिसत आहेस...?"


रम्या.. "(जो कोणत्या तरी गोष्टीमुळे घाबरलेला होता पण सोनालीच्या बोलण्यामुळे चिडतो...) मला पण माहिती आहे मालकीणबाई कि रात्रीच्या ह्या वेळी तुम्हाला डिस्टर्ब केलं पाहिजे नव्हतं... पण माझ्यावर विश्वास ठेवा मालकीण बाई कि मी इथे कोणती मस्करी करण्यासाठी आलो नाही... (श्वास घेण्यासाठी थोडावेळ थांबून)... राहुल दा ना..."


गुरव साहेब... "(राहुलचं नाव ऐकताच)... काय झालं राहुलला... कुठे आहे तो... तो ठीक तर आहे ना..."


रम्या... "माहिती नाही त्यांना काय झाले आहे... जिन्याजवळ बसले आहेत आणि थरथर कापून कोणास ठावूक काय बडबड करत आहेत... कधी प्रिया प्रिया बोलत आहे तर कधी अनघा अनघा नावाचं जप करत आहे... कोणास ठावूक काय बघितलं आहे जे एवढे घाबरले आहेत... अनघा तर बेचारी त्याची वाट पाहत असणार आपल्या रूममध्ये आणि ते आहेत कि माहित नाही... हुंह... आत्ता तुम्हीच लोकं येवून त्याला बघा कि त्याला काय झाले आहे... मला तर काहीच समजत नाही आहे..."


सोनाली लगेच बाहेर निघते... आणि रम्या गुरव साहेबांची व्हील चेयर घेवून त्यांना त्याच्यावर बसवतो तथा बाहेर घेवून येतो. जिन्यावर जिथून त्या खाली ग्राउंड फ्लोअरच्या दिशेने जात होत्या तिथे राहुल एका पिलरच्या जवळ लपलेल्या हालातीमध्ये बसला होता. सोनाली तिथे पोहोचली होती आणि जसेच तिने राहुलच्या डोक्यावरून हात फिरवला, राहुल तिला मिठी मारून हमसाहमशी रडायला लागला. गुरव साहेब पण जेव्हा तिथे पोहोचतात तेव्हा ते हा दृश्य पाहतात... ते बेचैनीने आपली व्हील चेयर पुढे ढकलत ढकलत राहुलच्या जवळ येतात.


गुरव साहेब... "काय गोष्ट झाली छोटे...! काय झालं तुला आणि ह्यावेळी इथे काय करतोयस... अन.. म्हणजे प्रिया कुठे आहे...?"


राहुलचे डोळे शून्यात काही तरी पाहत... 

 
*****-----*****-----*****-----***** 

 
राहुल रूममध्ये घुसला तेव्हा त्याची नजर सरळ लग्नाच्या जोड्यात बसलेल्या अनाघावर पडली जी रूममध्ये ठेवलेल्या बेडवर गूढघ्यांवर हात ठेवून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर आज शेरमेच्या लालीसोबत एक विचित्र उत्तेजना पण दिसत होती जी कदाचित येणाऱ्या क्षणाला आठवून होती. हे कोणत्याही नवविवाहित युवतीसाठी स्वाभाविक पण होतं. राहुल पण असाच चालत बेडच्या जवळ पोहचून अनघाला लक्ष पूर्वक पाहायला लागतो जी ह्या वेळी आपले डोळे बंद करून बसली होती. राहुल आपले सर्व चिंता विसरून फक्त अनघाच्या सौंदर्यातच हरवला होता. अनघा सुंदर होती, हि गोष्ट त्याला माहिती पण होती आणि तो मानत पण होता, पण आज तर बस जसं.. उफ्फ्फ...!

अनघाचे बंद डोळे जणू त्याच्या हृदयावर हजारो सुऱ्या चालवत होत्या. बंद डोळे राहून राहून कंपन पावत होते जे अनघाच्या
उत्तजनेचं अजूनच प्रदर्शन करत होते. तिच्या रूपात हरवलेल्या राहुलची नजर कोणत्या एकाच जागेवर टिकत नव्हती... अनघाचे बंद डोळे, तिचे लाजणारे ओठ, गालांवरती लाजेची लाली, परत एक उफ्फ...! तो कोणता अश्या छोट्या मुलावानी कन्फ्युज होता ज्याला त्याच्या वाढदिवशी खूप सारे खेळणं भेटतं आणि तो कन्फ्युज असतो कि पहिले कोणतं खेळणं खेळू.

राहुल आपल्या वाढणाऱ्या उत्तजेनाला कंट्रोल करायला पाहत होता पण उत्तेजना आज खूपच वाढत चालली होती. एवढ्या उत्तेजनेमध्ये राहुलची अनघाच्या संगमरवरी शरीराला हात लावायची पण परवानगी देत नव्हती. सुकलेल्या गळ्याने राहुलने जसं तसं अनघाला खूप प्रेमाने स्पर्श करत आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला कि अचानक एक जोरदार लात त्याच्या पोटात पडली. ह्या अप्रत्याशित हमल्यासाठी राहुल तैयार नव्हता त्यामुळे तो सरळ जावून फरशीवर पडला. आपल्या पोटावर पडलेल्या लातेमुळे त्याला असहाय्य वेदना होत होत्या. काही वेळाने त्याने जेव्हा पाहिलं कि त्याला लात मारली कोणी आहे तर तो अजूनच हैराण झाला.

राहुल फरशीवर पडल्या पडल्याच अनाघाकडे पाहत होता जी आत्ता पण आपले डोळे बंद करून बसली होती. पण ह्या वेळी तिच्या बंद डोळ्याच्या पापण्यांखाली घालमेल दिसत होती. राहुलला काहीच समजले नाही कि अनघाने त्याला लात का मारली. वेदनेपेक्षा त्याला त्याची हैराणी जास्त सतावत होती.


राहुल... "हि काय हरकत आहे अनघा...? असं पण कोणी थट्टा करतं काय.... तुला माहिती आहे मला किती वेदना होत आहे ते..."


अनघा... "(बंद डोळ्यानेच) वेदना देण्यासाठीच तर लात मारली आहे तुला ह-रा-म-खो-र..."

आणि आपले डोळे उघडते. पहिले तर आपल्यासाठी शिवी ऐकूनच राहुलची बुद्धी चक्रावली होती. वरून तो आत्ता जे काही पाहत होता त्याने मोठ मोठी माणसे पण हादरून गेली असती. कारण लालभडक अनघाची नजर राहुलवर पडली. . तिच्या डोळ्यांमध्ये काही वेळापूर्वी जो काजळ तिची सुंदरता वाढवत होता तोच ह्यावेळी पसरून तिच्या सुंदर चेहऱ्याला अत्यंत भयावह करत होता... राहुल आत्ता शाहरुही शकत नव्हतं. तो आत्ता केवळ जीवन शरीर उरलेला होता.

राहुल... "(घाबरून) अनघा..! हे काय झालंय तुला... तू स्वतःचे काय हाल बनवून ठेवले आहेस... तुझं डोकं तर जाग्यावर आहे ना... बंद कर हे नाटक... मला असली मस्करी बिलकुल पण पसंत नाही आहे.."


अनघा... "(एका वाघिणीवाणी )... हे तुला नाटक वाटत आहे हरामखोर...? मस्करी तर तुने माझ्या जीवनाशी केली आहे... वाटोळं करून ठेवलं होतं तुने माझ्या जीवनाचं... मला कुठलंच नाही ठेवलं तू आणि आत्ता बोलतो कि तुला मस्करी पसंत नाही..."


अनघाचा आवाज येत तर होता तिच्या गळ्यातून पण असं वाटत होतं जसं दुसरंच कोणी तिच्या तोंडून बोलत आहे एकदम घोगरा आवाज. ती आपल्या जागेवरून उठून आत्ता राहुलकडे यायला लागली होती. ती त्याला डोळे वटारून पाहत होती... तिच्या डोळ्यातील लालसर पणा बघून राहुलची हालत खराब झाली होती... त्याला काहीच समजत नव्हते कि हा सगळा काय प्रकार आहे... अनघाला आपल्या कडे येतांना पाहून तो आपल्याला पाठी ढकलतो आणि...


राहुल... "मी काय केलं अनघा...! उलट मीच तुला नकार द्यायला सांगितलेला लग्न करण्यासाठी... तू स्वतःच माझ्याशी लग्न करायला होकार दिलास आणि आत्ता हे सगळे आरोप का लावत आहेस... आत्ता बंद कर हे सगळं नाटक... मी कोणालाच काहीच नाही सांगणार..."


अनघा... "(तोच राग कायम ठेवत).. तू कोणाला सांगितलेच काय आहेस अजूनपर्यंत हरामी... जर तू बोलला असतास तर माझी हि अवस्था झाली नसती..."


त्या दरम्यान ती त्याच्याजवळ पोहोचली होती आणि हे बोलून अजून एक लात त्याच्या पोटात मारते... राहुल परत वेदनांनी आडवा तिडवा लोळत होता... 


राहुल... "(वेदनेने ओरडत)... अ-न-घा....!"


अनघाने आत्ता राहुलची कॉलर पकडून त्याला अर्धवट उचलते... तिचा श्वास रागाच्या आवेशाने एकदम जोराने चालत होता ज्यामुळे राहुलला त्या श्वासेची जाणीव आपल्या चेहऱ्यावर होत होती...


अनघा... "(राहुलच्या चेहऱ्या जवळ आपला चेहरा न्हेत)... हे तू अनघा-अनघा काय लावून ठेवलं आहेस हरामखोर... मी प्रिया आहे प्रिया... ओळखलं नाही काय..?"


आणि त्याला अर्ध्यावरूनच खाली सोडते ज्यामुळे राहुल परत खाली फरशीवर पडतो... एखादा अत्यंत दर्जेदार किंवा अति मजेशीर विनोद व्हावा तशी अनघा खदाखदा हासू लागली. डोळे प्रचंड विस्फारलेले, जणू त्यात ते हासणे मावतच नाही आहे असे...! जबडा हासण्यासाठी  पूर्ण फाकलेला आणि मागे पुढे जोरजोरात डोलत अनघा भेसूर हासत होती. भेसूर म्हणजे तिच्यामते अगदी नेहमीसारखीच, पण दिसायला अत्यंत भेसूर वाटत होते ते हास्य..! तिचं हासणं असं वाटत होतं जणू तिच्यात अजून एका स्त्रीचा संचार झाला आहे... तिचं हसणं पाहून राहुलचा थरकाप उडाला होता. तिच्या तोंडून प्रियाचं नाव ऐकून राहुलचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते. हसता हसता अनघा मागे वळते, तिला मागे वळताना पाहून राहुल एकदम फुर्तीने आपल्या जागेवरून उठून त्या रूममधून बाहेर पळून जातो...

 
*****-----*****-----*****-----*****

 
गुरव साहेब राहुलच्या गालांवर चापट मारून त्याला गदागदा हलवतात ज्यामुळे तो आपल्या विचारांच्या तंद्रीतून पुन्हा बाहेर येतो...

राहुलने सगळी गोष्ट रडत रडत सांगितली ज्याला ऐकून ते तिघेही त्याला डोळे फाडून बघत असतात. लगेच सगळेजण राहुलच्या रूमकडे जायला निघतात... रूमचा दरवाजा बस ढकलून बंद केला होता... हाताने ढकलल्यावर तो दरवाजा उघडला गेला. रूमच्या आतमध्ये काळोख पसरलेला होता... रूमच्या बाहेर जळणाऱ्या लाईट्सने आतमध्ये अंधुक प्रकाश येत होता. ज्यामुळे रूमच्या स्थितीचा अंदाजा लागत होता. रूममध्ये एकदम शांतता पसरली होती. रम्याने पुढे होवून रूमची लाईट्स ऑन केली, सगळ्यांच्या नजरा एकसाथ बेडवर खिळल्या जिथे अनघा आपल्या गुढघ्यामध्ये तोंड खुपसून झोपलेली प्रतीत होत होती. बघून असं वाटत होतं कि बसून बसूनच डुलक्या मारत होती...


गुरव साहेब... "हि तर इथे झोपली आहे...! किती वेळ झाला तुला इथून गेल्यावर... रूममध्ये सगळं काही आपापल्या जागेवर तर आहे छोटे... (प्रेमाने त्याला चुचकारत) तुम्ही कोणतं स्वप्नं वैगेरे तर नाही ना पाहिलं छोटे... ज्याला बघून तुम्ही एवढे घाबरलात.."

गुरव साहेबांनी आपली गोष्ट अर्धी सोडत राहुलकडे बघायला लागले..

राहुल... "मी कोणतंच स्वप्नं नाही बघितलं दादा...! इथेच ह्या रूममध्येच तो सगळा प्रकार घडला होता, जे मी तुम्हाला सांगितलं... हि माझ्या अंगावर अशी धावून आली जशी आज मला मारूनच हिला शांती मिळेल. प्रियावाली गोष्ट पण माहिती नाही का करत होती हि...? आणि वरून शिव्या पण घालत होती हि मला. असं वाटतच नव्हतं कि हि तीच आहे जिच्याशी माझं लग्न झालं आहे, जिला तुम्ही लोकांनी माझ्यासाठी पसंत केलं आहे."

राहुलची गोष्ट ऐकून आणि गुरव साहेबांच्या इशाऱ्यावर सोनालीने पुढे होवून अनघाच्या खांद्यावर आपला हात ठेवून तिला खूप प्रेमाने हलवलं. अनघा आपल्या खांद्यावर कोणाचं तरी आभास जाणवताच लगेच उठते. राहुल तिच्या डोळ्यांना खूप लक्षपूर्वक पाहत असतो. राहुलच्या सांगण्यानुसार तिथे कुठलाच लालसर पणा दिसत नव्हता आणि तिच्या डोळ्यांमधला काजळ पण तसाच्या तसाच होता, ती एकदम त्याच प्रकारे सुंदर आणि गोजिरवाणी वाटत होती. सगळ्यांना एकत्र आपल्याकडे पाहतांना बघून अनघा दचकते आणि बेडवरून खाली उतरते...

अनघा... "काय झालं...! तुम्ही सगळे एकत्र इथे... ह्या वेळी... सगळं ठीक तर आहे ना..."

सोनाली... "(ह्याला राहुलचा भास समजून... गोष्ट सांभाळण्याचा प्रयत्न करत) सगळं ठीक आहे.. घाबरणारी कुठलीच गोष्ट नाही... (स्मित हास्याने) हे आमचे भावजी जरा आज जास्तच घाबरत होते इथे येण्यासाठी... त्यामुळे आम्ही इथे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आलो आहोत. तुला झालेल्या असुविधेमुळे आम्ही खेदी आहोत... (गुरव साहेब आणि रम्याला इशारा करत)... चला निघा तुम्ही सगळेजण इथून... नवरा-बायकोला प्राईवसीची गरज आहे... भावजी...! तुम्ही दरवाजा बंद करून आरामात झोपून जावा... (चावटपणे) किंवा जी तुमची मर्जी असेल ते करा... शेवटी रूम तुमचीच आहे... बायको पण तुमचीच आहे..." आणि सगळ्यांना घेवून बाहेरच्या दिशेन जायला लागते... तेव्हा अचानक राहुल पुढे होवून सगळ्यांना थांबवतो...

राहुल... "मी आज ह्या रूममध्ये नाही झोपणार वहिनी...! माझा श्वास कोंडत आहे या रूममध्ये..."

गुरव साहेब... "काय उलट सुलट बोलत आहेस तू...! आज तुम्हाला ह्याच रूममध्ये झोपायचे आहे... शेवटी हा तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे.."

राहुल... "जर तुम्ही मला जास्त जबरदस्ती करत असाल इथे झोपण्यासाठी तर हि माझी शेवटची रात्र पण असू शकते..." कदाचित अनघाला हि गोष्ट काहीच समजत नव्हती, तिने पुढे होवून राहुलचा हात पकडून विचारले...

अनघा... "तुम्हाला काही त्रास होत आहे काय माझ्यासोबत...? जर असं आहे तर तुम्ही इथे झोपा मी त्याच रूममध्ये जाते जिथे मी आजपर्यंत राहायची..."

गुरव साहेबांनी रात्रीच्या ह्या वेळी जास्त आर्ग्युमेंट करणं जरुरी नाही समजलं आणि ह्याला राहुलच्या आजाराचा एक भाग समजून अनघाची गोष्ट लक्षात घेता त्यांनी नवीन सुनेला तिच्या लग्नानंतर पहिल्या रात्रीच दुसऱ्या रूममध्ये पाठवणं त्यांना उचित नाही वाटलं. त्यांनी राहुललाच त्या रूममध्ये पाठवले जिथे अनघा राहायची. रम्याला सांगितले गेलं कि जे पण गरजू सामान राहुलला पाहिजेत त्या त्याच्या रूममध्ये द्या जिथे आजपर्यंत अंगाघा राहायची. रम्या राहुलला घेवून निघून जातो. रम्या समवेत गुरव दाम्पत्तीला हि नवीन परिस्थिती रुचली नाही पण राहुलच्या मानसिक स्थितीला समजून त्यांनी त्याचावर जास्त जोर टाकला नाही. आणि अनघाशी खेद व्यक्त करत त्या रूममधून बाहेर आले. अनघा डोळ्यात पाणी घेवून त्या सगळ्यांना जातांना पाहते आणि आपल्या डोळ्यातून येवू पाहणाऱ्या अश्रूंना थांबवू पाहत होती...

जसेच ते सगळे जण त्या रूममधून बाहेर पडतात अनघाने रोखून ठेवलेल्या अश्रुंचा बांध लगेच फुटला आणि ती हमसाहमशी रडायला लागली. “ह्या दुनियेत कोणत्या मुलीच्या लग्नानंतर पहिली रात्र अशी असते काय... जशी तिची जात होती…”… नाराजीने ती आपले आभूषण उतरवून उतरवून ठेवत होती. लग्नाचा जोडा तिने खूप आनंदाने घालून ठेवला होता ते पण ती बदलून नाईट ड्रेसमध्ये येते. हे सगळं करता करता तिचं रडणं थांबण्याचं नावच घेत नव्हतं. थोडा वेळ ती आपल्या बेडवर बसून रडत राहिली मग दिवस भराचा थकवा तिच्यावर हावी होवू लागला आणि तिचे डोळे बंद व्हायला लागले. काही वेळातच ती झोपून गेली होती.

अनघा ज्या रूममध्ये झोपली होती त्या रूमचा दरवाजा खूप हळू आवाजाने खुलतो आणि कोणीतरी चुपचाप आत येतो. जो पण आत येत होता तो चुकून सुद्धा काहीच आवाज होवून नये त्यामुळे चालत पण खूप हळू होता.. एकदम चोरावानी. रहस्मयी अंदाजमध्ये ती सावली रूमच्या प्रत्येक खिडकीला तपासून पाहत होता, कि त्या पूर्ण रूपाने बंद आहेत कि नाही. सगळ्या खिडकींना चेक केल्यानंतर तो अनघा जवळ जातो. झोपलेल्या अनघाच्या चेहऱ्यावर तो आपले हात फिरवतो. अनघा थोड्या वेळानेच त्या स्पर्शाने लगेच हालचाल करायला लागते आणि तिचे डोळे उघडायला लागतात. समोर ज्याचा चेहरा तिला दिसतो तो पाहून तिच्या चेहऱ्यावर एकदम हलकीशी स्मिताची रेषा येते आणि ह्याला आपल्या स्वप्नाचाच एक भाग समजून ती आपली कुशी बदलते. रूममध्ये घुसणारी ती सावली तिच्या ह्या हरकतीवर हसायला लागते आणि ह्या वेळी तिला गदागदा हलवतो. अनघा ह्या वेळी दचकून उठून बसते, रहस्यमयी सावलीचा चेहरा बघून पहिले तर एकदम खुश होते... मग थोडं नाराजीने…

अनघा… “दरवेळी मला असंच घाबरवता तुम्ही (लाडीगोडीने त्याच्या छातीवर एक मुक्का मारते) ..! हि काय हरकत झाली आपल्या प्रेमिकेशी वागणूक करायची… त्या दिवशी पण मला असंच घाबरवलं होतं… हुंह…!”

रहस्यमयी सावली… “(हसून) त्या दिवशी पण तू केवढी घाबरली होतीस…"

त्या दिवशी….


*****-----*****-----*****


गुरव साहेब आपल्या रूममध्ये अजूनही आपल्या व्हील चेयरवरच बसलेले होते त्यांना खूप बेचैनी होत होती, ज्या प्रकारे राहुल आणि अनघाची लग्नाच्या नंतरची पहिली रात्र जात होती ती त्यांना जास्त बोचत होती. जेव्हा पासून ते राहुलच्या रूममधून परत आले होते तेव्हा त्यांना राहून राहून पहिले राहुलने सांगितलेली सगळी कहाणी आठवते आणि मग ते अनघाच्या वस्तुस्थिती विषयी विचार करतात. राहुलची गोष्ट तर त्यांना कुठल्याही परीने खरी वाटत नव्हती. सोनाली आपल्या बेडवर आत्ता पर्यंत झोपली पण होती, तिने गुरव साहेबांना पण किती तरी वेळा झोपण्यासाठी बोलली होती पण भावाच्या प्रेमामध्ये डूबलेले गुरव साहेब पण आजच्या गोष्टीला ओवरलूक करू शकत नव्हते. जेव्हा जास्त विचार केल्यावरही त्यांना काहीच समजले नाही तेव्हा त्यांनी आपला फोन काढून कोणाला तरी फोन लावला. थोडा वेळ तरी बेल जात राहिली मग कदाचित दुसरीकडून कोणीतरी फोन उचलला ज्याच्याशी गुरव साहेबांनी काही वार्ता केली मग त्याला काही सूचना देवून गुरव साहेब आपल्या बेडवर पहुडले आणि कुशी बदलून बदलून झोपण्याचा प्रयत्न करायला लागले.*****-----*****-----*****

त्या दिवशी…

 
अनघा आपल्या रूममध्ये पोहोचलीच होती कि कोणीतरी पाठून तिच्या तोंडावर हात ठेवून तिला पकडलं... अनघा घाबरली पण तिला काहीच करायला जमत नव्हतं. तिच्या मागे उभा असलेल्या व्यक्तीने एका हाताने तिचं तोंड बंद करून ठेवलं होतं आणि दुसऱ्या हाताने तिला ह्या प्रकारे पकडलं होतं कि तिला हलायला पण वाव मिळत नव्हता. तिच्या मागे उभा असलेल्या माणसाने आपल्या लातेने दरवाजा बंद केला आणि अनघाला घेवून तो रूमच्या मधोमध आला. अनघा त्याच्या बाहुपाश्यात पूर्ण ताकत लावून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण त्या व्यक्तीच्या ताकती पुढे तिची एक ना चालत होती. रूमच्या मधोमध पोहोचल्यावर स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात अनघाची नजर समोर लागलेल्या आरश्यावर पडली ज्यामध्ये तिला स्वतःला पकडलेल्या व्यक्तीचा प्रतिबिंब दिसला आणि त्या प्रतिबिंबाला पाहताच अनघाचे डोळे जड झाले आणि बंद व्हायला लागले.... बंद होणाऱ्या डोळ्यांमधून तिला बस तोच काळे कपडेवाला माणूस दिसत होता जो तिला ह्यावेळी पकडून उभा होता...

अनघा जवळ जवळ बेशुद्धच व्हायला आली होती… काळे कपडेवाल्याने तिला आपल्या हातांनी उचलून तिला तिच्या बेडवर झोपवले आणि तिच्या चेहऱ्यावर आपला हात फिरवायला लागला. अनघा अजूनही पूर्णपणे बेशुद्ध झाली नव्हती त्यामुळे ती लगेच शुद्धीवर पण आली. आपल्या समोर त्याच काळे कपडेवाल्याला पाहून ती परत एकदा घाबरली आणि ओरडण्यासाठी आपलं तोंड उघडणारच होती कि त्या काळे कपडेवाल्याने तिच्या तोंडावर आपला हात ठेवला… घाबरलेल्या अनघाचा आवाज तिथेच तिच्या गळ्यात गडप झाला, “मी हात बाजूला करत आहे अनघा…! तू ओरडू नकोस प्लीज…” असं बोलत त्या काळे कपडेवाल्याने आपला हात अनघाच्या तोंडावरून बाजूला केला. आज पहिल्यांदा त्या काळे कपडेवाल्याचा आवाज हळू नसून खूप जास्तच मोठा होता. जो कदाचित अनघाने पहिले पण कितीतरी वेळा ऐकला होता ती आवाजा विषयी विचारच करत होती कि काळे कपडेवाल्याने परत बोलायला सुरुवात केली… “जास्त विचार नको करूस आज तुझ्यासमोर आपली ओळख आणि काही विचित्र गुपित सांगण्यासाठी आलो आहे, पण पहिले तू मला जाणून घे नाही तरी दरवेळीसारखी हैराणीने घुटमळत राहशील…” आणि त्याने आपल्या चेहर्यावरून बांधलेला तो  काळा कपडा बाजूला केला…

अनघा… “तुम्ही…! हे तुम्ही आहात (आपल्या कपाळावर हात मारून) एवढ्या दिवसापासून तुम्ही मला त्रास देत होता (तिचा आवाज हैराणीच्या चरम सीमेला पार करत होता) ह्या काळे कपड्यात तू लपलेला होतास.. (आपल्या केसांना हातांनी खेचत) अरे देवा…! हे काय केलं तू… आणि का..? का... राहुल का??"

 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment