Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 27 November 2012

भाग ~ ~ ३६ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३६

आजचा सुविचार: - आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

घटनेच्या पुढे.... 
त्या दिवशी पुढे काय झाले...

अनघा सारखी सारखी आपल्या केसांना पकडून आपली हैराणी व्यक्त करत होती आणि ह्या गोष्टीवर विश्वास करण्याचा प्रयत्न करत होती, पण राहुल आज कदाचित एका वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याच्या चेहऱ्यावर ह्या गोष्टींदरम्यान एक गंभीर स्मिता दिसत होती. अनघाच्या चेहरा आपल्या दोन्ही हातांनी पकडून तिला आपल्याकडे बघायला सांगितले आणि तिच्या डोळ्यात बघून बोलायला लागला...

"मी काय बोलतोय ते ऐकून तरी घे एकदा...! माझ्या जवळ उलट आपल्या जवळ जास्त वेळ नाही आहे... हे काळे कपडे मी फक्त ह्या घरात घातले आहेत... ह्या घराच्या
बाहेर मी कधीच हे कपडे घालून गेलो नाही. तुझी गोष्ट ऐकूनच मी हे कपडे घातले होते आणि सारखा सारखा तुझ्या समोर यायचो कारण तू घाबरून इथून पळून जाशील पण तू होतीस कि बस..." आणि एक दीर्घ श्वास सोडतो...

हे ऐकून अनघाच्या चेहऱ्यावर एक आस दिसायला लागली कि तिचं प्रेम काही
गुन्हेगार नाही आहे, आत्ता थोड्यावेळा पूर्वी ज्या गोष्टीच्या कल्पनेनेच ती शहारली होती आत्ता त्या गोष्टीची आशंका संपताच एकाएक ती स्वतःला खूप खुश होतांना पाहत होती. राहुलला मिठी मारण्यामध्ये पण तिने जास्त वेळ दवडला नाही. दोन्ही प्रेम करणारे प्रेमी एकमेकांना आलिंगणबद्ध झाले पण राहुलला वास्तूस्थितीची जाणीव होती त्यामुळे त्याने अनघाला आपली काही गोष्ट संक्षेपमध्ये आपल्या प्रेमाचा हवाला देत सांगितली ज्याच्या अंतर्गत बदललेल्या वातावरणात अनघाच्या कोणत्याही नाराजगी विरुद्ध लग्नासाठी होकार पण शामिल होता. अनघाला कोणत्याही गोष्टीवर काहीच आपत्ती नव्हती ती आत्ता आपल्या प्रेमाचीच साथ देणार होती. राहुलच्या अनुसार हे सगळे कपडे प्रियाच्या ड्रेसिंग स्टाईलशी मेळ खातात, ज्याला त्याने आपल्या आठवणीनुसार बनवले होते. ह्या कपड्यांना घालण्यामागचा एकच हेतू होता, जो प्रियाच्या दोषींना स्वतःहून समोर यायलाच लागणार होते. तो फक्त त्यांची प्रतिक्रिया काय येते ते बघणार होता जे प्रियाच्या रूपात अनघाला बघून येणार होतं. राहुलने हे पण सांगितले कि पहिल्या दिवशी अनघाला हॉस्पिटलमध्ये सोडून सोनाली परत आली होती, तेव्हा तिच्याच तोंडून काळे कपडेवाल्या विषयी ऐकून त्याने पक्कं केलं कि तो ह्या मुलीला घाबरवून, धमकावून पिटाळून लावेल पण झाले काही दुसरेच... अनघाच्या खिडकीच्या बाहेर पहिल्याच दिवशी काळ्या कपड्यांमध्ये तिला घाबरवले होते, नंतर पण किती तरी वेळा असं केलं होतं त्याने, पण अनघा आपल्या पारिवारिक हालतीसमोर हि भीती खूप कमी वाटायची. त्यामुळे आज राहुलला हा रस्ता वापरण्यातच फायदा दिसला आणि तो आपल्या काळे कपडेवाल्याच्या गेटअपमध्ये अनघासमोर होता. सोनालीच्या बाहेर येण्याने आणि दरवाजा वाजवण्यामुळे दोघेही हाच विचार करत होते कि सोनालीच्या समोर ह्या काळे कपड्यांमध्ये राहुलचं जाणं कसं असेल पण अनाघानेच त्याला बाथरूममध्ये जाण्यास सांगितले. मग स्वतःपण जे कपडे राहुलने तिला दाखवले होते त्यांच्यामधून एक निवडून ती पण बाथरूममध्ये घुसली...

*****-----*****-----*****


राहुल आणि अनघा एकमेकांच्या मिठीत सामावले होते आणि ते दोघे खूप हळू आवाजाने बोलत होते...


राहुल... "(अनघाच्या केसांमध्ये बोटं फिरवत)... आठवतंय तुला...! त्या दिवशी कशी तू बाथरूममध्ये माझ्या समोर कपडे बदलण्यासाठी लाजत होतीस. मी आपलं तोंड दुसरीकडे पण करून ठेवलं होतं, तरीसुद्धा तू किती लाजत होतीस..."


अनघाने पुन्हा लाजून त्याच्या छातीवर एक हळूच मुक्का मारला जो होता खूप कमजोर पण राहुलने खूप जोरात लागण्याचं नाटक केलं... आणि तिला चिडवत हसायला लागला...

अनघाने काही वेळासाठी आपला चेहरा त्याच्या छातीवर लपवला... काही वेळ असंच राहिल्या नंतर अनघाने विचारले...

अनघा... "मला एक सांग...! हे सगळं काम तुम्ही माझ्याकडून जे ह्या रूममध्ये करून घेतलं... तुम्हाला लात मारणं आणि तुम्हाला शिव्या देणे... ह्याची गरज होती काय... म्हणजे तुम्ही त्यांना असेही जाऊन सांगू शकला असता... खरोखर कश्याला माझ्याकडून करवून घेण्याची गरज काय होती... (आपल्या आवाजात दुखः घेवून)... तुम्हाला काहीच अंदाज नाही आहे कि मला किती वाईट वाटलं होतं ते करते वेळी... तुम्ही आजच माझे पतीदेव बनलात आणि आजच मी... ह्या गोष्टीसाठी मी जरूर नरकात जाणार..." आणि रडायला लागते.


राहुल... "(खूप प्रेमाने तिचे अश्रू पुसत)... जे काम स्वतः तुझ्या पतीदेवाने बोललं आहे ते काम करण्यासाठी भलं तू कशाला नरकात जाशील... अरे पागल हे लोकं इथे दरवेळी माझ्यावर पहारा देत असतात.... जर हे काम झालं नसतं तर ते सगळे माझ्यावर एवढी त्यांनी सहानुभूती दाखवली नसती. बस एकदा माझ्या आईचा पत्ता सापडला पाहिजे बस त्याच्या नंतर मला ह्यांच्यामधून एकाची पण गरज नाही आहे अनघा...!... बस काही दिवसताच माझ्या अनुमानाच्या मते सगळं काही व्यवस्थित होईल... तिथून तशीच प्रतिक्रिया यायला लागली आहे जसा मी विचार करत होतो... वहिनीचा चेहरा त्या दिवशी बघण्या लायक होता... जेव्हा तू तो ड्रेस घातला होता... माझी नजर खास करून त्यांच्यावरच होती जेव्हा त्या तुला आणि तुझ्या घातलेल्या ड्रेसला ड्रेसलाच बघत होती...  अनघा...! आत्ता कदाचित काही अजूनही काम करायला लागणार जे कदाचित तुला पसंत पण नाही पडणार, पण ते काम करणे खूप गरजेचे आहेत... बस माझ्यासोबत आत्ता तूच अशी आहेस जिला मी आपला 'बोलू' आणि 'मानू' शकतो... माझी साथ देत राह... खूप लवकरच आपल्याला ह्या कामापासून मुक्ती भेटेल... आणि आपल्या आईचा आशीर्वाद पण आपल्याला भेटेल.."


अनघा... "(समजणाऱ्या अंदाजमध्ये आपली मन हलवते आणि हसून राहुलच्या डोळ्यात पाहते).. हो... पण त्या दिवशी जेव्हा रम्याने तुम्हाला पकडलं होतं त्या दिवशी त्याला सांगण्या व्यतिरिक्त तुम्ही त्याला मारलं का...?"


राहुल... "(गंभीर मुद्रेत) फक्त तोच एक दिवस होता जेव्हा मी ते काळे कपडे घातले नव्हते..."


अनघा... "काय...? ह्याचा अर्थ काळे कपडेवाला ह्या घरात येवू शकतो.. "


राहुल... "हीच तर एक अशी गोष्टी आहे जी अजूनही मला समजली नाही कि कोणी दुसरा काळे कपडेवाला ह्या घरात येवू शकतो... मी नव्हतोच, दादा-वहिनी नसू शकतात, रम्याच्याच डोक्यावर जखम झाली होती... तेव्हा भलं तो होता कोण जो काळे कपड्यात ह्या घरात फिरू शकतो... असो माझ्या मते आत्ता मला इथून निघायला पाहिजे... मला इथे बघितलं जाणं आपल्या योजनेसाठी खतरनाक असू शकतं... आत्ता पर्यंतच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरेल... जे पण मी आणि आत्ता ' आपण ' केलं आहे..."


एवढं बोलून तो तिथून उठतो आणि बाहेर जायला लागतो. राहुलच्या जाण्या आगोदर ते दोघे एकदा एक छोटासा, चुंबन घेणं-देणं विसरत नाहीत. दरवाज्यावर पोहोचून अचानक राहुलला जसं काही तरी आठवतं आणि तो अनाघाकडे फिरतो... त्याला आपल्याकडे परत येतांना पाहून... अनघा विचारात पडते मग जेव्हा आजच्या रात्रीचा दर्जा त्यांचा जीवनात काय आहे हे आठवून तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं... "काय महाराज...! आपण आपला इरादा बदलत आहात काय.." अनघाने थोडं लाडी-गोडीने विचारले... "खरं म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगायला विसरलोच..." राहुल थोडा रहस्यमयी अंदाजात बोलला ज्याला ऐकून अनघाच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उत्पन्न झाले.. मग राहुलने तिच्या कानाजवळ आपलं तोंड न्हेत हळू आवाजाने बोलला... "त्या दिवशी बाथरूममध्ये जेव्हा तू आपले कपडे माझ्या मागे बदलले होतेस तेव्हा माझ्या समोर असलेल्या आरश्यात मला सर्व काही दिसत होतं.." एवढं बोलून तो पळून जातो... आणि अनघा हे ऐकून शरमेने लाल लाल होते...


रात्र निघून गेली आणि सकाळ पुन्हा आळस देत झाली. गेल्या रात्री विषयी गुरव साहेबांच्या डोक्यात जी गडबड चालली होती ती त्यांना राहून राहून व्याकूळ करत होती. त्यांचा खरा त्रास जो पण असेल पण त्या त्रासेमुळे ते रात्रभर झोपले पण नाहीत.
ज्याचा पुरावा त्यांच्या चेहऱ्याचा थकवा आणि डोळे देत होते. राहुलच्या गोष्टींमुळे ते चिंतीत होते, त्यांची विचारशक्ती आणि समज इथे कमी पडत होती.

अनघाची आई आणि तिचे भावंडं आपल्या रूममध्ये झोपून उठले होते. कोणत्या तरी मोठ्या रूममध्ये राहण्याची जाणीव त्यांना बाहेर येण्यापासून थांबवत होती. अजूनपर्यंत त्या लोकांमध्ये आपल्या हालातीची जाणीव घेवून एक कॉम्प्लेक्स होता जो कि स्वाभाविक पण होता. अनघाचे भावंडं तर केव्हा पासून वाट पाहत होते कि ते कधी एकदाचे जाऊन अनघाला आणि आपल्या भावजींना भेटून यावं.. पण अनघाच्या आईने त्यांना जसं तसं थांबवून ठेवलं होतं. तिची आई काही पण करायला थोडी घाबरत होती कारण त्यांच्यामुळे आपल्या मुलीची मान शरमेने झुकली नाही पाहिजे.

अनघा पण झोपून उठली होती. आज तिच्या लग्नाचा पहिला दिवस होता, ह्याच जाणीवे पायी तिचे गाल सगळ्या त्रासांच्या पलीकडे पण लाल झाले होते. आज पासून तिची ओळख बदलणार होती, तिचं नाव दुसऱ्या नावाशी जोडलं जाणार होतं... हा सगळा विचार करता करता तिच्या चेहऱ्यावर एक स्मिताची रेषा आली. ती उठून फ्रेश व्हायला निघून गेली, फ्रेश होवून तिने राहुलने तिला दिलेले ड्रेसेसमधून एक ड्रेस निवडून जो कि एक सिल्कन साडी होती, ती घातली. राहुलची साथ आत्ता ती कुठल्याही लेवल पर्यंत द्यायला तैयार होती. साडी घालून ती बाहेर आली होती, आणि ह्याच विचारात होती कि पहिले आपल्या नवऱ्याकडे जावू कि आपल्या आईकडे... तिच्या ह्या त्रासेला सोनालीच्या आवाजाने लांब केलं जी खाली उभी दिसत होती...

सोनाली... "(स्मित हास्याने)... सगळ्यात पहिले जाऊन आपल्या आईचा आशीर्वाद घे... आज तुझ्या नवीन जीवनाचा पहिला दिवस आहे... आणि दुसरी गोष्ट... त्या आज संध्याकाळी इथून निघून पण जाणार आहेत त्यामुळे तू आज आपला जास्त वेळ त्यांच्याच सोबत घालव... कारण त्या..."

एवढं बोलता बोलता सोनालीची नजर अनघाच्या साडीवर खिळली ज्याला बघून ती बोलता बोलता मध्येच अटकली. तिचं अटकण पाहून अनघाचं लक्ष आपल्या साडीवर गेलं, तिने मनातल्या मनात सोनाली आत्ता काय विचारणार आहे ते विचार करायला सुरुवात केली. पण तिच्या विचारांच्या पलीकडे सोनालीने तिला काहीच विचारले नाही, पण आपली गोष्ट पूर्ण पण न करता सरळ तिथून निघून गेली. तिची अशी प्रतिक्रिया पाहून अनघा आपल्या राहुलसाठी खुश पण होती आणि तिचा सोनालीवर आपला संशय अजूनच वाढत चालला होता.

अनघाच्या आईला ग्राउंड फ्लोअरवर बनलेल्या एका रूममध्ये राहायला दिलं होतं. जिथे जाण्यासाठी अनघाला आत्ता काहीच त्रास नव्हता. ती आपल्या आईच्या रूममध्ये गेली तेव्हा तिथे तिला राहुल दिसला जो तिथे पहिल्या पासूनच त्या रूममध्ये आला होता. राहुलला त्या रूममध्ये स्वतःपेक्षा आधी पाहून अनघा खूप खुश झाली. अनघाची आई त्या दोघांना एकत्र पाहून खूप खुश झाली आणि देवाशी प्रार्थना करते कि दोघांना कोणाचीही नजर लागली नाही पाहिजे.

आई... "देव करो तुम्हा दोघांना कोणाचीही नजर लागली नाही पाहिजे..."

राहुल... "ज्याची लागायची होती त्याची लागली आहे आई (सगळ्यांना कन्फ्युज पाहून... स्मित देत)... आत्ता तुमच्या मुलीवर माझी पण नजर पडली नाही पाहिजे काय...?"

त्याचा अर्थ समजून सगळे जण हसायला लागले. अनघाच्या बहिणीने आपलं मेव्हणी होण्याचा फायदा घेत राहुलला चिडवायला सुरुवात केली... "काय भावजी...! काल काय काय गिफ्ट दिलं तुम्ही माझ्या ताईला..?"

राहुल... "(स्मित हास्याने)... काल रात्री मी तिच्यासोबत नव्हतोच तर भलं मी तिला काय गिफ्ट देणार..."

हि गोष्ट ऐकून अनघा उडालीच आणि बाकी सगळे हा राहुलच्या मस्करीचाच एक भाग समजून हसायला लागले, पण अनघाला राहुलचं खरं सांगणं वाईट वाटलं. तिच्या हिसाबाने ह्या सगळ्या गोष्टी निदान तिच्या आईला तरी सांगायला नाही पाहिजेत. राहुलला तिची नाराजगी लपली गेली नाही, त्याने सगळ्यांना नाश्त्याच्या टेबलवर जायला सांगितले... आणि सगळे जण बाहेर निघते वेळी अनघाचा हात पकडून तिला आपल्या सोबत थांबवले. आपल्या आईच्या समोर असं केल्यामुळे अनघा थोडी शरमेने आणि थोड्या रागाने राहुलला डोळे वटारून बघायला लागली.

राहुल... "जान एवढी नाराज का होतेस...?"

अनघा... "आईच्यासमोर हे सर्व बोलायची काय गरज होती... त्यांना किती वाईट वाटले असते जर त्यांना काल रात्री विषयी समजले असते तर.."

राहुल... "‘TRUTH IS ALWAYS STRANGER THAN FICTION’... तू बघितले नाहीस... ते सगळे माझ्या खरेपणाला थट्टा समजून हसायला लागले होते. आत्ता चल राग काढून टाक आणि नाश्ताच्या टेबल वर चल जिथे सगळे आपली वाट पाहत असणार..."

‘TRUTH IS ALWAYS STRANGER THAN FICTION’...... हि गोष्ट राहून राहून अनघाच्या मनात येत होती... तिच्या मनात पुन्हा आशंका डोकावू पाहत होती... 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment