Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 29 November 2012

भाग ~ ~ ३७ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३७

आजचा सुविचार: - चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.

घटनेच्या पुढे.... 
सोनाली चिंतेमुळे आपल्या रूममध्ये शतपावली करत होती. कोणती तरी गोष्ट तिला खूप त्रास देत होती... आतल्या आत खात होती... जी तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती. अनघाचे कपडे 'तिच्या' कपड्यांशी एवढी समानता असणे, मनातल्या मनात हि गोष्ट तिला खूप खुपत होती... "पण हे कसं संभव आहे" तिच्या डोक्यात हा प्रश्न आला, पण त्याचं उत्तर सध्यातरी तिच्या जवळ नव्हतं. गुरव साहेब तिला पाहत होते आणि त्यांना तिच्या चिंतेची पण जाणीव होत होती, सुरुवातीला तर त्यांनी ह्याला काल रात्री घडलेल्या प्रसंगाला रिलेटेड काही तरी असेल पण तिची चिंता जेव्हा त्यांना तिच्या चेहऱ्यावर जास्त दिसली तेव्हा त्यांनी लगेच हस्तक्षेप केला.

गुरव साहेब... "जर तुम्हाला काल रात्रीची गोष्ट सतावत आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो कि जास्त चिंतीत होवून काहीच नाही होणार, आज माझी वार्ता लंडन रिटर्न विख्यात क्लिनिकल सायकोलॉंजिस्ट मिस्टर हेगडेशी झाली आहे... मी त्यांना राहुलच्या विषयी सगळं काही सांगितलं आहे... त्यांनी आज दुपारच्या जेवणाच्यावेळी येण्याची गोष्ट मान्य केली आहे... आशा करतो कि त्यांचं इथे येण्यामुळे राहुलच्या स्वास्थ्यात सुधार जरूर होईल... राहुलच्या डॉक्टरांनीच त्यांचं नाव रेफर केलं होतं."

सोनालीने ह्या गोष्टीवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, ती कदाचित आपल्याच विचारात होती, ज्याच्यासमोर तिला गुरव साहेबांची हि गोष्ट पण महत्वपूर्ण वाटली नाही. तिची चिंता पाहून गुरव साहेबांनी पण तिला जास्त न विचारणे उचित समजलं. शेवटी जेव्हा तिला राहवलं गेलं नाही तेव्हा तिने हि गोष्ट गुरव साहेबांनाच विचारणे ठीक समजलं... 


*****-----*****

अनघा आपल्या आई आणि भावंडांसोबत नाश्त्याच्या टेबलवर बसून गुरव साहेब आणि सोनालीची वाट पाहत होती. ती रोहितची साथ देत तर होती पण अजूनही तिला गुरव साहेबांवरती शंका घेणे कुठे ना कुठे तरी खुपत होतं. तिने मनात पक्का निश्चय केला कि बस तिची आई आणि भावंडं गेल्यावर सरळ सरळ ती सगळी गोष्ट राहुलला विचारणार कारण तिला हि गोष्ट जास्त लांब खेचायची नाही आहे... 


*****-----*****

सोनाली... "(गुरव साहेबांना)... तुम्ही अनघामध्ये काही बदल नोट केला आहे काय...?"

गुरव साहेब... "कसला बदल...! मी काही समजलो नाही..."

सोनाली... "तिच्या कपड्यांमध्ये किंवा तिच्या बोलण्या चालण्यामध्ये आलेले बदल.."

गुरव साहेब... "(कन्फ्युज्ड टोनमध्ये...) तुम्ही साफ काय आहे ते बोला ना... कोणती गोष्ट तुम्हाला मनातल्या मनात खात आहे... (काही समजणाऱ्या अंदाजमध्ये)... तुम्ही आत्ता पर्यंत फक्त अनघाविषयीच विचार करत होता काय...?"

सोनाली... "तुम्ही काही दिवसांपासून अनघाच्या कपड्यांवरती लक्ष दिलं आहे काय...?"

गुरव साहेब... "(कन्फ्युज्ड टोनमध्ये...),... तुम्हाला बोलायचे काय आहे... साफ साफ का नाही बोलत... मी भलं का अनघाचे कपड्यांवर लक्ष देणार... आणि तिचे कपडे तुम्हाला भलं का त्रास देत आहेत... चांगले कपडे तर घातले आहेत तिने... जसं कि आपल्या... (काही तरी आठवतं आणि ते दचकतातच..)... तुमचा म्हणणं आहे कि... नाही हे होवू नाही शकत... असं कसं असू शकतं... ते तर तुम्ही जाळून टाकले होते... अनघाला सगळं काही सांगायला पाहिजे... ते पण लवकरात लवकर..."

सोनाली... "तेच तर माझ्या चिंतेचं कारण बनलं आहे... तिला माहिती नाही कोणी आणि काय सांगितलं आहे... पण एवढं तर जरूर आहे कि ती 'त्या सांगणाऱ्याच्या' प्रभावात आली आहे..."

गुरव साहेब... "मी पहिलेच बोललो होतो कि तिला सगळं काही सांग पण तुम्ही माहिती नाही का तिला सांगितलं नाही (रागाने)... आत्ता माहिती नाही तिच्या डोक्यात काय काय विचार येत असणार... आत्ता तुम्ही अजून जास्त वेळ न घालवता तिला सगळं काही सांगून टाका... जास्त वेळ घालवणे चांगली गोष्ट नाही आहे... शेवटी आत्ता ती आमची म्हणजे ह्या घराची सून बनली आहे... तिला पण ह्या घराविषयी सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी माहिती असल्या पाहिजेत..."

सोनाली... "मी त्याच दिवशी तिला सांगण्यासाठी जात होते पण डि.एस.पी. येण्यामुळे ती गोष्ट अधुरी राहिली... नंतर लग्नाच्या घाई गडबडीत एवढ्या दिवसांसाठी हि गोष्ट अशीच टाळत राहिलो... तुम्हाला आठवणीत असेल कि त्या दिवशी तिने तोच सूट घातला होता जो प्रियाला खूप जास्त पसंत होता..."

गुरव साहेब... "हैराणी तर मला पण झाली होती पण आम्ही त्याला फक्त एक को-इंसिडेंस समजून लक्ष नाही दिलं.... पण आत्ता तुम्ही आठवण करून दिल्यामुळे मला आठवलं कि अनघा रोज रोज तेच कपडे घालत आहे, जसे ती घालत होती.."

सोनाली... "पण तिला हे कपडे कोण देवू शकतो... मी स्वतः आपल्या हातांनी ते कपडे जाळले होते... मग अनघाला हे सगळे कपडे सापडले कुठून..."

गुरव साहेब.. "ह्याच्या पुढे गोष्ट खूप पुढे जाईल त्यापेक्षा आधीच तुम्ही तिला सगळं काही सांगून टाका नाहीतर अर्थाचं अनर्थ होईल... "

ते लोकं आत्ता बोलतच होते कि रम्या त्यांना नाश्त्यासाठी बोलवायला आला... 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment