Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 30 November 2012

भाग ~ ~ ३८ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३८

आजचा सुविचार: - जर तुम्ही मूर्खांशी वाद घालण्यात सगळं आयुष्य घालवलंत, तर तुम्ही थकून जालं याउप्पर तो मूर्ख मूर्खच राहिल.

घटनेच्या पुढे.... 
नाश्त्याच्या टेबलवर सगळे जन हजर होते पण फक्त गुरव साहेब आणि सोनालीचीच वाट पाहत होते. अनघाच्या आईने जेव्हा आपल्या चेयरवर उठून गुरव दम्पत्तीचं स्वागत केलं तेव्हा कुठे जाऊन त्यांना आपल्या ह्या अत्यंत नवीन पाहुण्यांच्या उपस्थितीची जाणीव झाली. अनघाच्या आईला त्यांची कुशल मंगल विचारून सोनालीने नाश्ता सुरु करण्यास सांगितले. नाश्ता करतेवेळीच अनघाच्या आईने लवकरात लवकर घरी जाण्याची आपली इच्छा पुन्हा व्यक्त केली. अनघाच्या वडिलांच्या स्वास्थ्याला पाहून कोणीही त्यांच्यावर जोर नाही टाकला. गुरव साहेबांनी संध्याकाळच्या ट्रेनने त्यांच्या जाण्याची व्यवस्था केली.

दिवस भर अनघा आपल्या आई आणि भावंडांसोबत व्यस्त राहिली. मोठ्या घरात कसं राहायचं, कसं वागायचं असल्या गोष्टी अनघाची आई तिला सतत सांगत होती. एवढ्या मोठ्या घरात आपल्या मुलीचं लग्न झालं ह्याला ती आपलं सौभाग्य समजत होती. नंतर त्यांची निघण्याची पण वेळ आली आणि त्या निघून पण गेल्या.

अनघाच्या आईला ट्रेनमध्ये बसवून जेव्हा राहुल आणि अनघा परत येत होते तेव्हा अनघाने राहुलशी बोलण्याचा विचार केला जो ह्यावेळी स्वतः गाडी चालवत होता आणि खूप गंभीर दिसत होता...

अनघा... "राहुल...! तुला पूर्ण विश्वास आहे का जे काही तू प्लान केलं आहेस..., त्यामुळे आपल्यांना तुझ्या आईचा पत्ता सापडेल..."

राहुल... "(पूर्ण गंभीरतेने)... तुला काही शंका आहे का... (अनघाला काहीच न बोलतांना पाहून...) मला माहिती आहे हा रस्ता थोडा विचित्र आहे पण माझ्यावर विश्वास ठेव आपण जरूर सफल होवू आणि मग सगळं काही सुरळीत होईल..."

अनघा... "पण मला अजूनही ह्यामध्ये त्या लोकांचा फायदा काय आहे ते समजत नाही... जर गोष्ट फक्त संपत्तीची आहे तर..., ती तर माझ्या नावावर झाली आहे.... आणि आईला बंदी करून भलं त्यांना काय भेटणार..."

राहुल... "मी हि गोष्ट त्यांच्याशी सरळ जाऊन विचारणे म्हणजे माझ्या आईच्या जीवाला धोका पत्करावा लागेल... अजूनही कदाचित त्यांना हे पण माहित नाही पडलं कि मला माझ्या आईचं जिवंत असणं मला समजलं आहे..."

अनघा... "चल तुझं तर ठीक आहे पण बाकीच्या नातेवाईकांशी मला प्रिया म्हणून भेटवण्यात का आलं... ह्यामध्ये भलं काय रहस्य असणार... म्हणजे... चल ठीक आहे कि तुझी कहाणी होती कि प्रियाशी तू प्रेम करायचा आणि तुझ्या डॉक्टरांनी पण हीच पद्धत सांगितली जेणेकरून तू बरा होशील... पण गोष्ट फिरून फिरून तीच उभी राहते कि भलं तुझ्या नातेवाईकांना ह्या गोष्टीशी काय फरक पडणार होता कि तुझं लग्न अनघाशी झालं आहे कि प्रियाशी... तुला तर ते लोकं मानसिक रोगी मानतात पण भलं माझा परिचय बाकी नातेवाईकांशी प्रियाच्या रूपात का झाला... आणि त्या पेपर्सवरती पण मला माझ्या सह्या प्रियाच्या रूपाने करायला लागले ज्याला तुझ्या मामाने माझ्यासमोर संपत्तीचे कागद म्हणून माझ्यासमोर आणले होते... प्लीज मला सांग... तू तर नाही आहेस पण मी जरूर पागल होईन हे सगळं विचार करून करून..."

राहुल गाडीला रस्त्याच्या किनाऱ्यावर साईडला उभी करतो आणि अनाघाकडे बघतो जी ह्यावेळी खरोखर चिंताक्रांत दिसत होती. तिच्या खांद्यांवरती आपल्या हाताचा दबाव वाढवत, तो खूप प्रेमाने तिला आपल्या जवळ ओढतो ज्यामुळे अनघा पण काहीच प्रतिरोध न करता त्याच्या मिठीत समावते...

राहुल... "मला माहिती आहे जान...! कि तू ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी किती उत्सुकत आहेस ती... आणि तुला व्हायला पण पाहिजे... (चेहऱ्यावर छद्मी स्मिता आणून) जर नसती तर मला तुझ्यावर पण शंका आली असती कि हि मुलगी भलं मनात कोणतीही शंका न घेवून माझ्याशी एवढं प्रेम कशी करू शकते..."

अनाघा...! जी ह्या वेळी गंभीरतेची मूर्ती वाटत होती... तिने राहुलच्या ह्या गोष्टीवर काहीच खास प्रतिक्रिया व्यक्त केली नाही बस एक निरागस भाव चेहऱ्यावर बनवून ठेवला होता ज्याला पाहून राहुलला पण जाणवले कि ती किती उत्सुकत आहे हे सर्व जाणण्यासाठी...

राहुल... "प्रियाशी संबंधित ज्या काही गोष्टी मी तुला आत्ता पर्यंत सांगितल्या आहेत त्यामध्ये काही पण खोटेपणा नाही आहे... खरं सांगू तर तिची शेवटची वेळ जी तिने माझ्या सोबत व्यतीत केली होती... किंवा तिची किंकाळी जी आजपण माझ्या कानामध्ये ऐकायला येते... त्याच गोष्टी मला तिच्या प्रती माझ्या प्रेमाची जाणीव अजून मजबूत आणि कठोर करतात... दादा-वहिनीने कोणत्या मनशापायी सर्व नातेवाईकांना तुझा परिचय प्रियाच्या रुपात केला, हे माझ्यासाठी पण एक रहस्य बनून आहे... जेव्हा मी तुला लग्नासाठी मनाई करत होतो तेव्हा तर माझ्या मनात तुला फक्त ह्या घरातून कोणत्याही प्रकारे घाबरवून पिटाळून लावायचं होतं... हो यदाकदा मी त्या दोघांच्या तोंडून हि गोष्ट ऐकली जरूर होती कि ते लोकं तुला प्रियाच्या रूपाने सर्व नातेवाईकांशी भेटवणार आहेत... ज्याचा आधार घेवून मी तुला घाबरवत होतो (खांदे उचकावत) पण तू तर बस तूच होतीस... (दीर्घ श्वास सोडत)... एक खूप मोठी जिद्दी मुलगी... माझ्या गोष्टीला जेव्हा तू नाकारलं होतंस तेव्हा मी तुझ्या समोर स्वतःला जाहीर केलं होतं... बस आत्ता तू माझी साथ देत जा अनघा... देवाची इच्छा असेल तर सर्व काही व्यवस्थित होईल..."
 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment