Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 6 November 2012

भाग ~ ~ २८ Illusion .... एक भास..????

आजचा सुविचार: - अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  २८

घटनेच्या पुढे.... 


हे ऐकताच अनघा तिथे थांबली, ती कोणत्याच निष्कर्षावरती पोहचत नव्हती. कॉम्प्लीकेशंस एवढे जास्त वाढले आहेत कि त्यामुळे तीला वाटत होते कि मी आत्ता खरोखर पागल होणार आहे. पण राहुलने बोललेली एवढी मोठी गोष्ट ती अशीच हवेत उडवणारी नव्हती. डोळ्यात दुनियाभरची हैराणी घेवून ती वळून राहुलकडे गेली. तिने बघितले कि राहुल आपल्या डोळ्यात भरून आलेले अश्रू पुसत होता. त्याला भावूक होतांना बघून अनघाचं नारी सुलभ हृदय पाघळलं आणि अजून पर्यंत आपले अश्रू दाबून ठेवणारी अनघा हमसून हमसून रडायला लागली. तिने जाऊन राहुलला मिठी मारली आणि रडत होती. आपल्या रडणाऱ्या प्रेमिकाला सांत्वना देत त्याचा हात अनघाच्या पाठीवरून फिरायला लागला. काही वेळ दोघेही असेच आलिंगनबद्ध राहून वेगळे झाले.

राहुल... "हे खूप चांगलं आहे तुमच्या मुलींचं, स्वतःच त्रास देता आणि रडणं पण पहिलेच सुरु करता..." हे ऐकून अनघाने प्रेमाने त्याच्या छातीवर एक मुक्का मारला.

राहुल... "आऊच... आत्ता हे कश्यासाठी..."

अनघा... "मला एवढा त्रास देण्यासाठी... (मग आठवत)... आत्ता आत्ता तू काय बोलला होतास राहुल...! खरोखरंच तुझी आई जिवंत आहे का... जर ' हो ' तर ती कुठे आहे आणि माझ्याशी एवढं खोटं का बोललं जात आहे...? माझ्याशी खोटं बोलून कोणाला फायदा होणार आहे... प्लीज राहुल...! मला सांग ना, कि हे सगळं काय होत आहे माझ्या सोबत आणि का...?"

राहुल... "बस हे समजून घे अनघा कि तूझं नशीब तुला ह्या सगळ्या झमेल्यात फसवत आहे, हा पैशांच्या चक्करमध्ये खूप घाणेरडा खेळ आहे, माणसाची कदरच नसते असल्या माणसांना.. मी तर माझ्या आईच्या जीवाच्यापायी इथून निघू नाही शकत पण तू प्लीज इथून निघून जा नाहीतर ह्या खुनी खेळात तू पण फसून जाशील..."

अनघा... "तू मला पूर्ण गोष्ट का नाही सांगत, अर्ध्या गोष्टींमुळे माझी चिंता अजूनच वाढेल... मी तुला काहीच समाधान नाही देवू शकणार... आत्ता वेळ न दवडता, तू मला पूर्ण गोष्ट आत्ता आणि ह्याच वेळी सांग..."

राहुल... "आत्ता नाही अनघा...! आज रात्री जेव्हा सगळेजण झोपून जातील तेव्हा मी तुझ्या रूममध्ये येवून तुला पूर्ण गोष्ट सांगेन.. गोष्ट खूप लांब आहे आणि आत्ता इथे कोणीही आपल्यांना बोलवायला येवू शकतो..., शेवटी आपल्यांना इथे खूप वेळ झाला आहे... (चावटपणे) नाही तरी तुला तर बस माझ्याच जवळ राहायला पसंत आहे..."

एवढं बोलून तो स्मित हास्य देवून लवकरच एक चुंबन अनघाच्या ओठांवर देवून पळत आतमध्ये जातो... पहिले तर राहुलचा चावटपणा आणि नंतर अप्रत्याक्षित चुंबनामुळे पहिले तर अनघा दचकली मग आपल्या प्रेमिचा चावटपणा बघून ती राहुलच्यापाठी खोटा राग दाखवत पळत सुटते.

गार्डन पार करते वेळी त्या घराच्या चारही बाजूने बनलेल्या कॉरिडॉरमध्ये उंच आणि जाड खांब बनले होते... तिथूनच घरामधल्या कोणत्याही रूममध्ये प्रवेश करू शकतो. त्याच मुळे कॉरिडॉरमध्ये अनघा राहुलचा पाठलाग करत जात होती कि अचानक एका खांब्याच्या पाठून काळे कपडेवाला माणूस निघून तिच्या समोर उभा राहिला. त्याला बघताच अनघाचं हसणं गायबच झालं, ती ओरडणारच होती कि काळेकपडेवाल्याने तिचं तोंड आपल्या हातांनी बंद केलं.

काळे कपडेवाला... "ह्या घराच्या भासेच्या जाळेत फसू नकोस, तुझ्या जीवाला खतरा आहे, इथून निघून जा..." एवढं बोलून तो तिथून गार्डनच्या दिशेने निघून गेला. काही वेळ तो अनघाला दिसत होता पण नंतर काळोखात कुठे गायब झाला माहितीच नाही. 


 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment