Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 9 November 2012

भाग ~ ~ २९ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  २९

आजचा सुविचार: - चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

घटनेच्या पुढे.... 


न जाणो किती वेळ अनघा तिथेच उभी राहिली होती. रम्या जेव्हा तिला शोधत आला तेव्हा जाऊन तिला जाणीव झाली कि ती तिथे एकटी उभी आहे. तिला आपल्या हालातीवर रडायला येत होतं. असा कोणी एक पण नव्हता ज्याच्या प्रती तिच्या मनात शंका नसेल. उलट ती ज्याच्यावर प्रेम करायची त्या माणसाच्या मानसिक आजार असून सुद्धा तीने त्याला पण आपल्या संशयामध्ये ठेवलं आहे. काय करू वा काय नाय करू असंच तिला झालं होतं. तिला आपल्या स्वप्नात हरवतांना पाहून रम्याने तिला परत आवाज दिला आणि तिच्या तंद्रीला भंग करून तिला आतमध्ये चलण्यास सांगितले.

तिला रम्या सोबत येतांना पाहून सोनालीने तिला आपल्या जवळ बोलावले. राहुलला शोधणारी अनघाची नजर जेव्हा चारही बाजूने फिरून जेव्हा सोनाली वर पडली तेव्हा सोनालीने तिला चिडवनाऱ्या अंदाजमध्ये तिला राहुल विषयी विचारले... अनघा लगेच बोलली कि.. "मी तर राहुलच्या पाठी पाठी इथे आली आहे..." पण सोनालीने राहुलच्या त्याच्या रूममध्ये नसल्या विषयी हैराणीने आपली मान नकारार्थी हलवली. अनघाने रम्याला आपल्या जवळ बोलावले..


अनघा... "काय 'हे' माझ्या पहिले इथे आले नव्हते...?"


रम्या... "नाही...! तुमचे जे 'हे' आहेत ते इथे अजून पर्यंत नाही आले आहेत... मी तर मोठ्या मालकांनी सांगितल्या नुसार तुम्हाला बोलावण्यासाठी तिथे आलो होतो पण तुम्ही तर मला कॉरीडॉरमध्येच दिसलात... त्यामुळेच मी लगेच तुम्हाला इथे खेचून घेवून आलो कारण तुम्ही इथे आलात तरच छोटे मालक इथे येतील... (स्वतःला शाबासकी देत).. बघितली माझी चतुराई... "


सोनाली... "(चिडलेल्या अंदाज मध्ये) हो हो बघितली आहे आणि खूप वेळा बघितली आहे... आत्ता जा आणि राहुलला पण इथे घेवून ये... जास्तवेळ त्याला बाहेर थांबवायचं नाही आहे ... आज काल धुकं पडायला लागले आहेत... जा आणि त्याला आतमध्ये घेवून ये..."


अनघा... "पण त्यांच्याच पाठी तर मी इथे आली होती... रस्त्या मध्ये मला काही तरी दिसले त्यामुळे मी थांबली होती, रम्या दा जेव्हा आले तेव्हा मला हेच वाटले कि ह्यांनीच मला घेण्यासाठी पाठवले आहे... पण आत्ता माहिती पडलं आहे कि ते इथे आलेच नाही..."


सोनाली... "चिंता नको करूस अनघा...! इथे खूप सारे रस्ते आहेत रूममध्ये येण्यासाठी... हे असू शकतो कि राहुल दुसरी कडून गेला असेल... रम्या आत्ता त्याला लगेच शोधून येईल..."


हे ऐकून अनघाने आपली मान होकारार्थी हलवली. थोड्या वेळातच रम्या पण परत आला आणि राहुलच्या विषयी विचारायला लागला...


सोनाली... "तूच तर त्यांना आणण्यासाठी गेला होतास... आम्हाला सांगण्या उलट तूच आम्हाला विचारत आहेस..."


रम्या... "अरे मालकीण बाई...! मला जेव्हा ते कुठे भेटले नाहीत त्यामुळे मला वाटले कि ते कोणत्या दुसऱ्या रस्त्याने इथे आले असतील... बस मी तेच कंफर्म करत होतो... तुम्ही तर खालीफुकट नाराज होत आहात..."


अनघा... "(बेचैन होत)... मी तुम्हाला सांगितलं नाही... पण आत्ता काही वेळापूर्वी तो काळे कपडेवाला माणूस मला भेटला होता... म्हणजे दिसला होता... 'हे' ज्या रस्त्यामधून माझ्या पुढे पुढे चालत होते त्याच रस्त्यावर जेव्हा राहुल माझ्या नजरेतून आड झाला... तो काळे कपडेवाला माणूस मला दिसला होता. मग तो पाठच्या गार्डन मध्ये गेला आणि काळोखात कुठे गायब झाला..."


त्या तिघांच्यामध्ये हि गोष्ट खूप हळू आवाजात होत होती ज्याला त्या तिघांशिवाय कोणीच ऐकत नव्हतं....


रम्या... "अच्छा तर हि गोष्ट होती... जेव्हा तुम्ही काही तरी विचार करत होता... पहिलेच सांगितलं असतं तर मी तिथेच पकडून त्याची वाट लावली असती...!"


सोनाली... "(आत्ता थोडी चिंतीत होत)... रम्या...! लवकर जाऊन घरातील सर्व गार्डस घेवून घरचा पूर्ण कोपरा शोधून काढा... जा लवकर... कर... एक मिनिट पण टाईम घालवू नका... अनघा...! तू खूप मोठी चूक केली जे तू आम्हाला हे सगळं आल्या आल्या न सांगून... अरे देवा...! सगळं ठीक असायला पाहिजे..." 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment