Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 1 December 2012

भाग ~ ~ ३९ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ३९

आजचा सुविचार: - जे दुसयाचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.

घटनेच्या पुढे.... 
अनघा... "काय व्यवस्थित करणार... ज्या हालातीमध्ये सध्या आपण आहोत काय माहित त्या हालातीमध्ये किती वेळ लागले... ते लोकं एकदम खुलून काहीच करत नाही आहेत... आईच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही.... खूप विचित्र वाटत आहे..."

अनघाची हताशा आत्ता खूप जास्त वाढली होती. राहुल ह्या गोष्टीला समजून सुद्धा काहीच करू शकत नव्हता किंवा आता सध्या तरी काही जास्त करण्याच्या विचारात नव्हता. त्याने गाडी स्टार्ट करून पुन्हा आपल्या घराकडे वळवली. ह्या नंतर पूर्ण रस्त्यात त्याच्यामध्ये ह्या विषयी काहीच वार्ता झाली नाही. घरी पोहचून जेव्हा ते लोकं घरात प्रवेश करतात तेव्हा रम्या त्यांना घराच्या लिविंग रूममध्ये जाण्यासाठी सांगतो. अनघाच्या ध्यानात एक गोष्ट आली कि पहिल्या सारखा रम्या जास्त आनंदी दिसत नव्हता, त्याच्या चेहऱ्यावर उदासपणा साफ दिसत होता. अनघाने वेळ मिळताच ह्या विषयी रम्याशी वार्ता करण्याचे ठरवले.

लिविंग रूममध्ये गुरव साहेबांसोबत एक माणूस बसून बोलत होता जो राहुल आणि अनाघासाठी सर्वतः अपरिचित होता... जशीच गुरव साहेबांची नजर त्या दोघांवरती पडली त्यांनी त्या दोघांना आपल्या जवळ यायला सांगितले... आणि बसण्याचा इशारा केला..

गुरव साहेब... "छोटे...! ह्याच्याशी भेट... हे आमचे खूप जुने मित्र 'मिस्टर हेगडे' आहेत जे आजच लंडनहून आले आहेत आणि आत्ता काही दिवस आपल्या जवळच राहतील... हे समता नगरमध्ये आपला बिजनेस सुरु करायला जात आहेत..."

राहुलने पुढे होवून त्यांच्याशी हात मिळवला आणि अनघाने नमस्ते करून त्यांचं स्वागत केलं... अनघा त्या रूममधून परत आपल्या रूममध्ये जाण्यासाठी वळली होतीच कि गुरव साहेबांनी तिला बसायला सांगितले आणि राहुलला त्या 'मित्राला' पूर्ण घर दाखवायला सांगितले. राहुलने त्यांच्या आज्ञाचे पालन करत त्यांना सोबत घेवून घर दाखवायला निघून गेला. राहुल जाताच...

गुरव साहेब... "अनघा..! मिस्टर हेगडे माझे मित्र नाही आहेत, उलट लंडन रिटर्न चर्चित मनो-चिकित्सक आहेत जे राहुलला इथे थांबून ऑबजर्व करतील, खरंम्हणजे हे दिवस तर येणारच होते पण तुमच्या आईच्या जाण्याच्या विषयी लक्षात ठेवून हि मुलाखत संध्याकाळची ठेवली. इथे येण्या नंतर आमच्याशी जी थोडीशी चर्चा झाली आहे त्याच्या नंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे कि आत्ता हे काही दिवस इथेच थांबून राहुलवर नजर ठेवणार. ह्यांच्यानुसार आमचा 'छोटा भाऊ' खूप कॉम्पलीकेटेड आहे. आज रात्री जेव्हा सर्वजण जेवून झोपतील तेव्हा तुम्ही आमच्या आणि सोनालीच्या रूममध्ये या... तुमच्याशी खूप जरुरी गोष्टी करायच्या आहेत... (अनघाच्या चेहऱ्यावर असमंजसचे भाव बघून)... हि खूप जरुरी गोष्ट आहे अनघा, सध्याची हालत तुम्हाला जाणून घेणे खूप जरुरी आहे... तुम्ही चुकीच्या विचारांचं शिकार बनून उलट सुलट निर्णयावर पोहोचू नका... त्यामुळे आज रात्री जेव्हा घरातील लाईट बंद होतील तेव्हा तुम्ही आमच्या रूममध्ये या.."

अनघा तेच चेहऱ्यावरचे असमंजसचे भाव घेवून बाहेर निघण्याचा उपक्रम करते तेव्हा लगेच गुरव साहेब तिला बजावून सांगतात कि... "राहुलला हि गोष्ट कळली नाही पाहिजे..." ... ज्याला ऐकून अनघा पुन्हा विचारांच्या समुद्रात डुबायला लागते... मग आपल्या डोक्याला एक झटका देवून पुन्हा पुढे होते...

*****-----*****-----*****

अनघा आपल्या रूममध्ये येवून फ्रेश होवून आपले केस विंचरत होती तेव्हा तिच्या रूममध्ये रम्याने प्रवेश केला. रम्या तिला जेवणासाठी बोलवायला आला होता, आणि बोलावून लगेच जायला लागला तेव्हा लगेच त्याला पाहून अनघाला आपली गोष्ट लक्ष्यात आली जी तिला रम्या सोबत करायची होती...

अनघा... "रम्या दा...! जरा थांबा तरी..."

रम्या... "(गंभीर मुद्रेत)... जी मालकीणबाई...! बोला काय गोष्ट आहे...?"

अनघा... "(हैराणी व्यक्त करत)... मी तुमची मालकीणबाई कधी झाली... दादा...? तुम्ही तर रोज मला 'ताई-ताई' म्हणून बोलवायचे मग आत्ता का आपलं नाते बदलत आहात..."

रम्या... "का माझी थट्टा करत आहात मालकीणबाई... ती तर माझं मस्करी करायची सवय होती जे तुम्हाला मी सारखं सारखं ताई बोलायचो.... पण आत्ता तर तुम्ही ह्या घरची छोटी मालकीण आहात... आत्ता भलं आम्ही तुम्हाला मालकीणबाई शिवाय काहीच बोलू शकत नाही... त्याच्यासाठी तुम्ही माझ्यावर जोर नका टाकू..."

अनघा त्याची गोष्ट ऐकून स्वतःला हसण्यापासून थांबवू शकली नाही...
अनघा... "ठीक आहे मी जोर नाही टाकणार पण कधी कधी बोलत जावा... मला चांगलं वाटतं जेव्हा तुम्ही मला ताई बोलावता तेव्हा... असो हि गोष्ट तर चालत राहणार पहिले तुम्ही मला तुमचे चिंतेचे कारण सांगा... ते काय कारण आहे ज्यामुळे तुमचा हसरा चेहरा असा एवढा उदास झाला आहे.. मला तुम्हाला असं पाहून चांगलं नाही वाटत..."

रम्या... "काही खास गोष्ट नाही आहे मालकीणबाई... बस असंच आजकाल मन घाबरल्या सारखं वाटत आहे... माहिती नाही का पण मला खूप वाईट स्वप्न येत आहेत आणि मी त्याच स्वप्नामुळे खूप चिंतीत आहे... एक तर च्याआईला... माझं स्वप्न खास करून वाईट स्वप्न तर, जरूर खरे होतात... त्याचमुळे मी आज काल थोडासा... जास्त पण नाही थोडा चिंतीत जरूर आहे... आत्ता तुम्ही हे सगळं सोडा आणि जेवणासाठी खाली चला... मी आपल्या स्वप्नाविषयी नंतर सांगेन..."

अनघाने पण जास्त विचारणे जरुरी नाही समजले आणि कारण तशी पण आजची रात्र तिला गुरव साहेबांकडून काहीतरी 'हलवून' टाकणारी गोष्ट ऐकायला मिळणार आहे...

*****-----*****-----*****

डायनिंग टेबलवर पण काहीच उल्लेखनीय गोष्ट झाली नाही शिवाय ह्याचे कि राहुल अजूनही अनघाच्या सोबत एका रूममध्ये रात्र घालवण्यासाठी तैयार नव्हता. मिस्टर हेगडे त्यांच्या रूममध्ये गेल्यावरच त्याने गुरव दम्पत्ती समोर हे जाहीर करून टाकलं कि तो अजूनही मानसिक रूपाने अनघासोबत एका रूममध्ये रात्र घालवण्यासाठी पूर्णपणे तैयार नव्हता. त्याच्या अनुसार त्याला अजूनही ती कालच्या रात्रीची ती घटना विसरून पण विसरता येत नाही आणि तो घाबरलेला आहे. गुरव साहेबांनी ह्या गोष्टीवर पुन्हा एकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण राहुल आपल्या गोष्टींवर ठाम होता आणि कोणत्याही परीने ऐकत नव्हता. अनघाच्या डोळ्यात अश्रू आपोआप यायला लागले उलट तिला माहिती असूनही कि हा सगळा राहुलचा एक प्लान आहे… पण ती आपल्या मनाला कसं समजावणार जो आपल्या प्रेमाशी दुरावापण सहन करू शकत नाही … जेवण जेवल्या नंतर ती राहुलकडे जाते आणि त्याला आज आपल्या रूममध्ये येण्यासाठी नकार देते… राहुलच्या विचारण्यावर ती बोलली कि… “गेल्या किती तरी रात्रीपासून ती बरोबर झोपली नाही आहे त्यामुळे आज रात्री ती झोपेची गोळी खावून झोपणार..”.. गुरव साहेबांची गोष्ट ती पहिले आपल्या परीने परखून पाहणार होती मग जर जरुरत पडली तर राहुलला सांगणार होती...

थोड्या वेळातच घरातील होणारी हालचाल शांत व्हायला लागली आणि रात्रीची शांतता आपले पाय पसरू लागली. पण अनघा वाट पाहत होती गुरव साहेबांच्या इशाऱ्याची जे ते आपल्या इंटरकॉममधून कॉल करून देणार होते. असो ती वेळ पण आली, तिच्या रूममध्ये लागलेल्या टेलिफोनची बेल वाजली जिला तिने पहिल्याच घंटीमध्ये उचललं… दुसरीकडून गुरव साहेब होते जे तिला आपल्या रूममध्ये येण्यासाठी सांगत होते… अनघा चुपचाप त्या दिशेने निघाली…

घरात ह्यावेळी चारही बाजूला शांतता पसरली होती. एखाद्या डीम लाईट्सला सोडून जवळ जवळ सर्वच लाईट्स बंद होत्या. घराच्या वातावरणात घरातील रहस्यमयी सुगंध दरवळायला लागला होता. अश्यामध्ये अनघाला स्वतःच्या हृदयाचे ठोके पण ऐकायला येत होते. न जाणो का पण आज तिला खूप जास्तच रोमांचाची जाणीव होत होती… ती गुरव साहेबांच्या रूमच्या दिशेने पुढे जात होती तेव्हा कोणाची तरी नजर तिला आपल्यावर वारंवार जाणवली… ती ह्या गोष्टीला आपला भास समजून सारखी सारखी आपल्या डोक्यातून काढत होती पण तिची सिक्स्थ सेन्स वारंवार तिला हि जाणीव देत होती कि कोणीतरी आहे जो तिच्यावर नजर ठेवून बसला आहे. एकदा तर तिला राहुलची आठवण आली तर ती राहुलच्या रूममध्ये पण एक नजर मारून आली, राहुलचा रूम आतमधून बंद होता आणि राहुलच्या घोरण्याचा हलकासा आवाज तिच्या कानी पडला ज्याला ऐकून ती अश्वस्त झाली कि राहुल झोपला आहे… बाकी ह्या घरात कोणी असं नव्हतं ज्याची तिला खास भीती वाटणार… ती राहुलला पण घाबरत नव्हती आणि कदाचित उद्या त्याला पण आजच्या सर्व गोष्टी ती त्याला सांगेल पण आत्ता तर असला कोणताच इरादा तिच्या मनात नव्हता...

गुरव साहेबांचा दरवाजा बंद होता ज्याला ठोकवल्यावर सोनालीने दरवाजा उघडला. रूममध्ये फक्त एक साईड ल्यांप जळत होता ज्याच्यामुळे रूममध्ये काळोख तर नव्हता… पण खूप उजेडही नव्हता. न जाणो का पण अनघाला अभूतपूर्व रोमांचाची जाणीव होत होती. कदाचित हे सगळं रात्रीच्या शांततेचा प्रभाव असेल… ती चुपचाप रूममध्ये दाखल होवून निशब्द बसलेली होती… रूममध्ये गुरव साहेब अजूनही व्हील चेयर वरच बसले होते… सोनाली पण अजूनपर्यंत आपल्या जनरल पेहनाव्यात होती… हेच दोन इशारे अनाघासाठी पुरे होते कि आज होणारी गोष्ट किती गंभीर आहे ती… थोड्या वेळातच अनघाची बेचैनी तिच्या चेहऱ्यावर साफ दिसायला लागली होती… रूमची शांतता तिला खूप जास्तच सतावत होती ज्यामुळे ती सारखी सारखी आपल्या बसण्याची स्टाईल बदलत होती...

गुरव साहेब… “आरामात बस अनघा… आत्ता तू आमच्या परिवारातील एक भाग बनली आहेस… त्यामुळे आम्हाला असं वाटतं कि आमच्या घरातील काही अश्या गोष्टी आहेत ज्या कदाचित पुढे जाऊन तुमच्या चिंतेचे कारण बनतील… ज्या तुम्हाला सांगितल्या पाहिजेत… आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लग्नाच्या आधीच सांगितल्या पाहिजे होत्या पण कोणत्या ना कोणत्या तरी कारणांमुळे असं झालं नाही… (थोडावेळ थांबून) सगळ्यात पहिले तुम्ही मला हे सांगा कि तुम्हाला अजूनही कधीही आपल्या प्रती माझ्या व्यवहारामध्ये काही असं प्रतीत झालं कि ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल… तुम्ही एकदम मनमोकळे पणाने सांगू शकता… निसंकोच होवून मनावर कुठलेच दडपण न ठेवता आपली गोष्ट सांगा… आम्हाला जराही वाईट वाटणार नाही जर तुमचं उत्तर नकारात्मक असलं तरी…"

अनघा… “असं काहीच नाही आहे सर…! तुम्ही तर उलट प्रत्येकवेळी माझी मदत केली आहे… पण तुम्हाला असं का वाटतं आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी का करत आहात… जर तुम्हाला मला काही सांगायचे आहे तर मनमोकळेपणाने तुम्ही सांगू शकता… पण फक्त तेव्हाच जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर… जर नाही तर तुम्ही मला काहीच सांगितलं नाही पाहिजे…” अनघाचं वकिलीच डोकं आज कदाचित पहिल्यांदा काम करत होतं ज्यामुळे ती आज एवढ्या आत्मविश्वासाने अशी बोलली कारण तिला माहिती आहे कि ह्यांना उक्सवल नाही तर काहीच गुपित बाहेर पडणार नाही, किंवा कदाचित आत्ता ती सगळी गोष्ट एकदम निसंकोचपणे करणार होती ज्यामुळे हा सगळा खेळ लवकरात लवकर संपेल.

गुरव साहेब… “तुमच्या वर विश्वास नसता तर भलं आम्ही आपल्या ‘छोट्या’चं लग्न तुमच्याशी का लावून दिलं असतं ते पण तेव्हा जेव्हा आम्हाला माहिती असूनही कि त्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे… ज्या गोष्टी आत्ता तुम्हाला आमच्या पासून माहिती पडणार आहेत ती गोष्ट आमच्या घराण्याचं एक घृणास्पद सत्य आहे… आणि प्रत्येक मोठ्या घराच्या सारखं इथे पण आम्ही लोकं आपल्या पूर्वजांनी बनवलेल्या सगळ्यात जुन्या इज्जतीला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहोत… पण एवढं ध्यानात ठेवा कि आम्ही तुमच्याकडून पण हीच अपेक्षा बाळगतो कि आत्ता तुम्ही ह्या परिवारचा एक भाग होण्यामुळे हि गुपनियता तुमच्याकडून पण अपेक्षा केली जाईल... (थोडा वेळ थांबून)…. माझी एवढी भूमिका बनवल्यामुळे तुम्हाला वाटत असेल जरूर काही तरी खूप घृणास्पद गोष्ट असणार ज्याला गुपित ठेवण्यामध्येच गुरव घराण्याचं हित असणार… पण आमच्यावर विश्वास ठेवा कि असं काहीच नाही आहे जे काही तुमच्या मनात येत आहे…"

अनघा… “सर…! प्लीज (आपली आतुरता जाहीर करत)… तुम्ही वाईट वाटून घेवू नका पण तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते लवकरात लवकर सांगा नाही तर मी आपल्या आतुरतेवर संयम ठेवू शकणार नाही… ह्याला माझी द्रीष्टता न समजून माझी विनंती समजा… पण ‘जर' तुम्हाला सांगायचे आहे तर सांगू शकता, नाही तर राहू द्या…"

सोनाली… “आम्ही तुमच्या आतुरतेला जाणत आणि समजत पण आहोत अनघा... पण गोष्टच अशी आहे कि गुरव साहेब अश्वस्त झाल्याशिवाय काहीच सांगू शकणार नाहीत… शेवटी हि गोष्ट त्यांच्या स्वर्गीय वडिलांच्या इज्जतीशी जुडलेली आहे …”

अनघा… “(हैराणीने) काय…. वडिलांशी…?"

सोनाली… “(एका फिक्या स्मिताने) हैराण झालीस ना... जेव्हा मला हि गोष्ट समजली होती तेव्हा माझी पण हालत काही अशीच झाली होती जशी आत्ता तुझी झाली आहे आणि आत्ता पुढे अजून जास्त होणार… (कुजबुजल्या प्रमाणे एकदम हळू आवाजात)… ज्या प्रियाची गोष्ट इथे ह्या घरात होत असते ती राहुल आणि गुरव साहेबांची ‘बायोलॉजिकल सिस्टर’ आहे…”

अनघा… “कायययय…?"

ती अवाक होवून एक एक करून रूममध्ये बसलेल्या दोघांना म्हणजेच गुरव दम्पात्तींना डोळे वटारून बघायला लागली आणि ते दोघेही तिला शांत राहून बघण्याशिवाय काहीच करत नव्हते… मग जेव्हा अनघाला राहवलं गेलं नाही तेव्हा ती ताडकन उभी राहिली...

अनघा… “हि काय बकवास गोष्ट आहे… भलं राहुल एवढा खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो कि आपल्याच बहिणीला प्रेमिका सारखा प्रेम करायला लागतो… आणि…"

गुरव साहेब… “(तिला मध्येच टोकत)… माझ्या छोट्या भावाला हि गोष्ट माहितीच नव्हती… तुम्ही कदाचित लक्षपूर्वक ऐकलं नाही… प्रिया आमची ‘बायोलॉजिकल सिस्टर’ होती… सगी किंवा सावत्र नाही…(कठोर आवाजात) तुम्ही खाली बसा आणि लक्षपूर्वक ऐका… तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकणं खूप गरजेचं आहे… येण्याऱ्या काळात राहुलचं भविष्य खूप काही तुमच्यावरच अवलंबून आहे… त्यामुळे हि गोष्ट तुम्ही एकदम लक्ष पूर्वक आणि शांत डोक्याने ऐकून घ्या…”

अनघाने कदाचित पहिल्यांदाच गुरव साहेबांचा असला आवाज ऐकला होता ज्याला ऐकून अनघाची आत्मा पण थंडी पडली होती. ती चुपचाप तिथेच बसली… तिला बसतांना पाहून… गुरव साहेबांनी बोलायला सुरुवात केली…

गुरव साहेब… “(जवळ ठेवलेल्या टेबलावरून पाणीचा ग्लास उचलून पाणी प्यायले)… हि गोष्ट खूप विचित्र आहे पण सत्य आहे… असं बघायला गेलं तर आमच्या वडिलांनी एक खूप मोठं पुंण्याचं काम केलं होतं... पण समाजाच्या नजरेमध्ये तो खूप मोठा पाप ठरू शकला असता आणि कोणाच्या जीवनाची आणि कोण्याच्या मृत्यूची ती गोष्ट बनू शकत होती… (अनघाची बेचैनी बघत)… तुम्ही संयम बाळगा आणि लक्षपूर्वक ऐका… (आपल्या आवाजाला गंभीर करत)… गोष्ट खरं म्हणजे अशी आहे कि आमच्या वडिलांचे खूप जुने मित्र होते ज्यांनी किती तरी प्रसंगी आपल्या जीवाची परवा न करता आमच्या वडिलांचा जीव वाचवला होता… पण त्यांना एका नैसर्गिक समस्येने ग्रासित केलं होतं… त्यांच्या ‘विर्यात’ शुक्राणुचा कमीपणा होता… ज्यामुळे ते शारीरिक रूपाने तंदुरुस्त असूनही संतान सुखापासून वंचित होते....

एकदा कोणत्यातरी भावूक क्षणांमध्ये त्यांनी आमच्या वडिलांकडून त्यांच्या ‘शुक्राणू’चं दान मांगीतलं होतं, कारण त्यांना कोणत्याही शुक्राणू ‘संग्रहालयातून (स्पर्म ब्यांक)’तून कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा शुक्राणू आपल्या संतानासाठी घ्यायचं नव्हतं… आमचे वडील त्यांच्या उपकाराखाली एवढे दबले गेले होते कि ते ह्या गोष्टीला नकारू शकले नाही… हि गोष्ट आमचे वडील आणि त्यांच्या मित्राशिवाय कोणालाच माहिती नव्हती कि ते दोघे असं काही तरी करत होते… शेवटी गोष्ट दोघांच्याही घराणाच्या इज्जतीची होती… (दीर्घ श्वास सोडत)… असो ‘आय.वी.एफ. ट्रान्सप्लांट (कृत्रिम गर्भधारण)’ सक्सेसफुल झाल्या नंतर... दोघांनी शप्पथ पण खालली कि केव्हाही हि गोष्ट कोणालाच सांगणार नाहीत… त्यांना देवाच्या कृपेने एका सुंदर बाहुली सारखी एक गोंडस मुलगी झाली जिचं नाव वडिलांनीच प्रिया ठेवलं होतं..."

गुरव साहेब… “पण नियती पुढे कोणाचे काही चालले आहे काय… वडिलांच्या मित्राचा एका अपघातात मृत्यू झाला… ज्यामुळे वडिलांनी त्यांच्या बायकोला आणि मुलगीला इथे आपल्या सोबत ह्या घरात घेवून आले…”

अनघा… “मध्येच तुम्हाला टोकून क्षमा मांगते पण हि गोष्ट ‘आईंना’ माहिती होती काय… आय मीन प्रीयाविषयी…"

सोनाली… “नाही…! त्या पहिल्या पासूनच खूप आजारी असायच्या त्यामुळे अचानक ह्या गोष्टीची त्यांना माहिती मिळणे म्हणजे त्यांना त्यांच्या मृत्युच्या तोंडाजवळ घेवून जाणे... त्यामुळे वडिलांनी हि गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवली होती… त्यांच्याशीच का उलट हि गोष्ट तर त्यांनी आपल्या शेवटच्या क्षणी पण आम्हा सर्वांपासून लपवून ठेवली होती…"

अनघा… “(दीर्घ श्वास सोडून)… पण ह्याचा अर्थ हे पण झाला कि राहुलची प्रियाशी ओळख इथेच, ह्याच घरात असेल…?”

अनघाचे डोळे पाणावले होते आणि ती स्फुंदत होती, कदाचित आपल्या राहुलद्वारे सांगितल्या गेलेल्या गोष्टीला आत्ता ती खोट्यापणात पडतांना पाहून ती खूप दुखी होत होती...

गुरव साहेब… “खरंम्हणजे असं काहीच नव्हतं जसं तुम्ही समजत आहात… खरंम्हणजे राहुलला मी इथून लांब ठेवलं होता कारण छोट्या आईच्या दिवसंदिवस वाढणाऱ्या आजाराने मी त्याला लांब करणार होतो… राहुल लहानपणा पासूनच खूप सेन्सेटिव राहिला आहे… जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं छोट्या आईचं जेवढं प्रेम त्याला मिळायला पाहिजे होतं, तेवढं त्याला मिळालं नव्हतं… अश्यामध्ये त्याला इथून लांब ठेवणेच मला एकदम बरोबर वाटलं आणि मी तेच केलं जे माझ्या ‘छोट्याच्या’ हितामध्ये होतं… आणि जेव्हा ‘छोटा’ इथे येत होता तेव्हा प्रिया सुट्टीमध्ये आपल्या आजोबांकडे असायची… त्यामुळे राहुलचा सामना प्रियाशी इथे झाला नव्हता…"

अनघा… “(गळा भरलेल्या आवाजाने)… मग दोघांमध्ये प्रेम कसं झालं…”

गुरव साहेब… “ते पण सांगणार पण जेव्हा त्याचा क्रम येईल तेव्हा… मध्येच क्रम तोडल्यामुळे कदाचित कोणती तरी गोष्ट अधुरी सुटेल…"

अनघा… “(काहीच एक्स्प्रेशन न देता) ठीक आहे… तुम्ही तुमचा क्रम तसाच ठेवा… ह्यावेळी तो खूप गरजेचा आहे…"

गुरव साहेब… (अनघाची अधीरता समजून)… आम्ही तुमच्या हालातीला समजू शकतो पण जर कोणती गोष्ट सुटली तर असं होवू शकतं कि पुढे ती तुमच्या भासेचं कारण बनेल… त्यामुळे कोणत्याही प्रकारचं दडपण मनावर ठेवू नकोस आणि धैर्याने माझी गोष्ट एकदा लक्षपूर्वक ऐक…”

अनाघाकडून कोणतीच प्रतिक्रिया न पाहून गुरव साहेबांनी आपली गोष्ट पुढे सुरु ठेवली…

गुरव साहेब… “आमच्या वडिलांनी हि गोष्ट आपल्या मनातच ठेवली होती पण जेव्हा त्यांची शेवटची वेळ आली तेव्हा त्यांनी आम्हाला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि प्रियाची काळजी घ्यायला सांगितलं कारण छोट्या आईचं तिच्याशी जवळीक वाढत चालली होती आणि त्या प्रियाच्या आईला नेहमी सांगायच्या कि ‘प्रियाला तर मी आपल्या राहुलची आणि ह्या घरातील सून जरूर बनवणार…’ त्यांना काय माहिती होतं कि हि गोष्ट नीतीच्या विरुद्ध होती पण आपल्या अनभिज्ञतेमुळे, मध्ये त्यांनी प्रियाच्या आईशी ह्या गोष्टीसाठी वचन पण दिलं होतं… राहुल ह्या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होता पण प्रियाने त्याला आपल्या मनात खूप उंच स्थान दिलं होतं… कदाचित हे आमच्या छोट्या आईने दिलेलं आश्वासनच होतं जे त्या बेचारीने राहुलशी प्रेम करायला सुरुवात केली होती… आम्ही ह्या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होतो…"

गुरव साहेब कुठेतरी शून्यात पाहून थोड्यावेळासाठी शांत झाले होते… त्यांच्या शांततेची जाणीव होताच जेव्हा अनघाने त्यांना लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा तिने पाहिलं कि गुरव साहेबांच्या पापण्या भिजल्या आहेत… सोनाली पुढे होवून त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला लागली...

गुरव साहेब… “(स्वतः वर संयम बाळगण्याचा प्रयत्न करत)… प्रिया खूप प्रेमळ मुलगी होती… माझ्यासाठी तर ती तशी पण एका बाहुलीवानी गोंडस होती… काश वडिलांनी तिच्या विषयी मला पण हि गोष्ट सांगितली नसती तर तिच्या सोबत जे झालं ते झालं नसतं… जे पण काही तिच्यासोबत झालं ते ती हे सगळं डीजर्व करत नव्हती…”

अनघा… “(हळू आवाजात)… काय झालं होतं तिच्या सोबत…?"

गुरव साहेब… “माहिती नसूनसुद्धा ती राहुलला खूप प्रेम करायला लागली होती… छोटी आई गेल्यानंतर आम्हाला माहिती पडलं कि छोट्या आईने प्रियाला आणि तिच्या आईला वचन देवून ठेवलं होतं कि प्रियाच त्यांची सून बनणार… आणि उलट त्यांनी आपल्या मृत्युपत्रात पण ह्या बाबी लिहून ठेवल्या कि राहुलची सर्व संपत्ती त्याला तेव्हाच मिळणार जेव्हा त्याचं लग्न प्रियाशी होईल…”

अनघा… “ह्यामुळे तुम्ही लोकांनी मला प्रिया बनवून सर्व नातेवाईकांशी इंट्रोड्युस केलं होतं..."

गुरव साहेबांनी आपली मान होकारार्थी हलवली… अनघाच्या तोंडून उफ्फ शिवाय काहीच निघू शकलं नाही. ती स्वतःला प्रियाच्या हक्काचा चोर समजत होती आणि हि गोष्ट तिला खूप आतपर्यंत खुपत होती टोचत होती… तिच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले होते… सोनालीसाठी आत्ता कठीण झालं होतं कि ती कशी एकसाथ दोघांना सांत्वना देईल. तिला चांगल्या प्रकारे माहिती होतं कि अनघाच्या मनावर काय परिणाम झाला असेल...

सोनाली… “तू गिल्टी फील का करत आहेस अनघा…! हे सगळं तर नियतीचा खेळ आहे ज्यामध्ये आम्ही सर्वजणच पडलो आहोत…”

अनघा… “(स्फुंदत)… मग प्रियाचं काय झालं…?”

गुरव साहेबांनी एक थंड दीर्घ श्वास भरला आणि सोनालीला इशारा केला ज्याला समजून सोनालीने बोलायला सुरुवात केली…

सोनाली… “जसं कि गुरव साहेबांनी सांगितलं कि प्रियाला छोट्या आईने लहापणा पासून अश्वस्त करून ठेवलं होतं कि ती प्रियालाच आपली सून बनवणार… तिच्या नॉर्मल हृदयात लहानपणा पासूनच ह्या भावना उठायला लागल्या कि राहूलच तिचा जीवनसाथी आहे… दिवस प्रतिदिवस हि भावना खूप वाढत गेली. ह्यामध्ये काहीच हैराणीची गोष्ट पण व्हायला नाही पाहिजे… गुरव साहेबांना वडिलांनी जेव्हा हि गोष्ट सांगितली होती तेव्हा त्यांनी पण हा विचार केला नव्हता कि पुढे अशी हालत बनणार ते… एवढ्या दिवसांपासून प्रिया इथे असल्यामुळे ती आम्हाला पण पसंत पडायला लागली होती… पण ह्या नवीन कोनाने बनलेल्या नात्याने सर्व समीकरणं बदलून टाकले… आम्ही सर्व सगळं जाणून सुद्धा कसं ह्या नात्याला पुढे वाढवू शकणार… छोट्या आईच्या नंतर जेव्हा प्रियाच्या आईचा पण मृत्यू झाला तेव्हा गुरव साहेबांनी प्रियाला अभ्यासासाठी नैनितालला पाठवले…”

थोडा वेळ सोनाली शांत राहिली आणि अनाघाकडे पाहायला लागली… तिला आपल्याकडे पाहतांना पाहून अनघा स्वतःला थोडी अस्वस्थ जाणवते...

सोनाली… “माहिती आहे… जसे कापडे तू आज-काल घालत आहेस तो प्रियाचं एक खास ट्रेंडी स्टाईल होता… तिच्या कपड्यांमध्ये एक खास प्रकारची इम्ब्रोयडरी (embroidery) असायची जो तिचा सिग्नेचर स्टाईल बनली होती… गुरव साहेब पण कधी कधी तिची मस्करी करायचे पण ती आपली आवड कधीच बदलायची नाही, ती वात्रट तर नाही पण हट्टी जरूर होती… एकदा ती सुट्टीमध्ये इथे आली होती तेव्हा बोलण्या बोलण्यामध्ये तिने इशाऱ्याने मला स्वतः आणि राहुलविषयी सांगितलं होतं… तिने सांगितलं कि तिने आणि राहुलने एकमेकांना फेसबुक वर पण add करून  ठेवलं आहे… मी लगेच हि गोष्ट गुरव साहेबांना सांगितली… खूप विचार करून आम्ही हि गोष्ट प्रियाशी बोलण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस तिला हि गोष्ट सांगितली. त्या दिवशी आम्हाला कळलं कि ती आपल्या प्रेमासाठी किती जिद्दी बनू शकते... तिने आमच्या गोष्टीला लगेच नकार दिला आणि ह्यामध्ये आमचा चांगुलपणा
आहे असं बोलली. तिच्या अनुसार तिला वाटत होतं कि एका गरीब बापाची मुलगी ह्या घराची सून बनेल असं आम्हाला कदापि आवडणार नाही त्यामुळे आम्ही लोकं हि कहाणी ऐकवत आहोत. गुरव साहेबांनी तिला डि.एन.ए. चाचणीसाठी पण सांगितलं, पण ती कुठल्याच गोष्टीसाठी तैयार नव्हती... ती एकदम कोणत्या जंगली वाघिणीवानी रागावली होती आणि आम्हा लोकांना सरळ सरळ धमकी द्यायला लागली होती... ती कोणत्याही हद्दी पलीकडे जाण्यासाठी तैयार होती... गुरव साहेबांनी, मी... आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला कि तिला हि गोष्ट समजावी... पण ती ऐकतच नव्हती... शेवटी आम्ही..."

अनघा... "(अधीर होत)... काय केलं तुम्ही लोकांनी तिच्या सोबत... सांगा ना... काय केलं तुम्ही लोकांनी... ती जिवंत तर आहे ना... तुम्ही लोकांनी तिला मारून तर नाही ना टाकलं..." 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment