Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 12 December 2012

भाग ~ ~ ४३ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ ४३ 

आजचा सुविचार: - न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.

घटनेच्या पुढे.... 
अनघाच्या आईने काहीच उत्तर दिलं नाही...

"मी तुमच्याशी चांगल्या प्रकारे वागते आई... मला पोलिसी खाक्याने विचारपूस करायला लावू नका... ह्या प्रश्नाच्या उत्तराने कदाचित तुमच्या मुलीचा जीव वाचेल सुद्धा... हे नका विसरू नका कि हिच्यावर पुराव्यानिशी खून करण्याचा आरोप आहे ज्याने हि आत्ता वाचू शकत नाही... त्यामुळे जर तुम्हाला आपल्या मुलीचा जीव वाचवायचा आहे तर माझ्यासोबत को-ऑपरेट करा..." शर्वरी बोलली...


"माझी मुलगी वाचेल ना ह्यातून..." अनघाच्या आईने शर्वरीला आशेने भरलेल्या नजरेने पाहत विचारले...


"आई ते सगळं तुमच्या दिलेल्या माहिती वर अवलंबून आहे... ! तुम्ही पहिले मला त्या गोष्टी सांगा ज्या तुम्ही मला अजूनपर्यंत सांगितल्या पाहिजे होत्या..." शर्वरी आईला बोलली...


अनघाच्या डोळ्यातही आत्ता उत्सुकता दिसत होती... तिला विश्वासच बसत नव्हता कि तिच्या विषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट तिच्या आईने अजूनपर्यंत तिच्या पासून लपवून ठेवली होती किंवा आज पर्यंत तिला आपल्याविषयी काही खास गोष्ट माहिती पडली नाही...


अनघाच्या आईने बोलायला सुरुवात केली...


"हि गोष्ट खूप पहिल्याची आहे जेव्हा अनघा खूप छोटी होती... आमच्या शेजारी एक कुटुंब राहायचं... त्या कुटुंबाला अनघा खूप आवडायची... दरवेळी अनघाला त्या घराचा कोणी ना कोणीतरी खेळवायचाच... त्या कुटुंबामध्ये नवरा बायको सोबत त्यांचा एक छोटा मुलगा आणि एक लग्न झालेली मुलगी राहायची... त्या मुलीवर तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा खूप छळ केला होता ज्यामुळे ती त्रासित होवून आपल्या आई वडिलां सोबतच राहायची... तिचा सोडचिट्ठीचा केस न्यायालयात चालू होता ज्यामुळे तिला आपल्या सासरच्यांकडून रोज धमकी मिळत होती ती आपल्या सासरच्या लोकांना शिक्षा देण्यासाठी एकदम ठाम होती... मग एक दिवस अनघा त्यांच्या घरी खेळत होती कि तेव्हा त्या घरावर काही अज्ञात लोकांनी हमला केला आणि पूर्ण घरातील माणसांना खूप क्रूरतेने मारण्यात आलं... अनघा...! कदाचित लपाछपीचा खेळ खेळत होती त्यामुळे ती एका बेड खाली लपून बसली होती आणि त्या लोकांना आभास पण झाला नव्हता कि त्या चार जणांशिवाय अजूनही कोणीतरी त्या घरात असू शकतं... ती क्रूर हत्या पाहून माझ्या छोट्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला... ती भीती आणि क्रूरता तिच्या मनात घर करून बसली... कारण त्या लोकांनी काळे कपडे घालून ठेवले होते... हिला स्वप्नात पण काळे कपडेवाला येवून घाबरवायचा... नंतर त्या मुलीच्या सासरच्या लोकांना त्या आरोपामध्ये पकडण्यात आले पण आमच्या अनघाच्या मनात ते क्रूर दृश्य कधीच नष्ट न होण्यासाठी छापलं गेलं..."


एवढं बोलून अनघाची आई काही वेळासाठी शांत झाली... शर्वरी...! जी आत्ता पर्यंत सर्व गोष्ट शांत पण ऐकत होती, तिने पुढे होवून त्यांना पाणी पाजलं... अनघा पण ह्या सर्व गोष्टी खूप हैराणीने ऐकत होती... तिला तर ह्या गोष्टी आठवत पण नव्हत्या... पण आपल्या आईच्या गोष्टीला भलं ती कशी खोट्यात पाडू शकते... पाणी पाजल्यानंतर शर्वरीने त्यांना पुढे बोलण्याचा आग्रह केला... आणि आईने पण दीर्घ श्वास घेवून थोडा वेळासाठी अर्धवट राहिलेल्या कहाणीला पुढे सांगण्यासाठी सुरुवात केली...


"अनघाची चंचलता जणू कुठे हरवलीच... ती एकदम गंभीर झाली होती... तिचं हसणं जणू कायमस्वरूपी गायब झालं होतं... होणारच ना...! ज्या मृतदेहाला आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं त्यांचा मृत्यू होतांना तिने स्वतः आपल्या डोळ्याने पाहिलं होतं... कोणीही घरातील दरवाजा उघडला तर ती घाबरायची... अचानक हि ओरडायला लागायची... हिला काळे कपडेवाले लोकं दिसायला लागायचे... आम्ही खूप चिंताक्रांत होवून हिचा उपचार सर्व जागी करायला लागलो होतो पण कुठेच काहीच फायदा झाला नाही... मग हिच्या आजोबांनी म्हणजे हिच्या वडिलांच्या बाबांनी जे त्यावेळी जिवंत होते, आपल्या सोबत घेवून गेले... जागा बदलल्यामुळे कदाचित तिची स्वास्थ्य सुधारेल हा विचार करून हिच्या वडिलांनी आणि मी हिला हिच्या आजोबांसोबत पाठवले... आजोबांनी हिला त्यांच्या आध्यात्मिक गुरूला दाखवले, त्यांनी अनघाचा उपचार प्राचीन पद्धतीने सुरु केला... वेळ खूप लागला पण शेवटी आमची मुलगी ठीक झाली... आज जेव्हा गुरव साहेबांनी सर्व गोष्टी सांगितल्या कि कसं इथे येतेवेळी ट्रेनमध्ये अनघाच्या समोर त्या काळे कपडेवाल्याने खून केला आणि कसा तो सारखा सारखा त्या घरात दिसत होता... तर मला लगेच हिच्या लहानपणीच्या गोष्टी आठवायला लागल्या... हलातीमुळे माझ्या मुलीचा आजार कदाचित परत तिच्या मनावर प्रबळ झाला आहे..." हे सगळं बोलता बोलता अनघाची आई हमसाहमशी रडायला लागली...


शर्वरी ह्या सर्व गोष्टी ऐकून आणि त्यांना रडतांना पाहून दुविधेमध्ये फसली होती... तिला काहीच सुचत नव्हते... आणि अनघा... अनघा आपल्या मनातच त्या सर्व घटना आठवायला लागली होती जेव्हा त्या रात्री ट्रेनमध्ये, तिच्या कॅबीनमध्ये तो कुलकर्णी आला होता... त्याच्या नंतर जेव्हा तो काळे कपडेवाला त्या कॅबीनमध्ये घुसला होता तेव्हा पासून ती काय एका भासेमध्ये जगत होती... तो काळे कपडेवाला तिच्या कॅबीनमध्ये आला नव्हता तर कुलकर्णीची हत्या कोणी केली...? शर्वरीच्या आवाजाने तिचे विचारचक्र तुटले...


"मला तर पहिल्या पासून संशय होता कि ती हत्या अनघाने केली होती... कारण आमच्या कोणत्याही पडताळणीमध्ये त्या काळे कपडेवाल्याच कोणतंच अस्तित्व मिळत नव्हतं... आत्ता तुमच्या गोष्टीने तर सर्व साफ झालं आहे कि ती हत्या अनाघानेच आवेशात येवून केलं असणार... कारण कुलकर्णीने स्वतःच्या खिश्यातून चाकू काढून अनघाच्या गळ्यावर ठेवणारी गोष्ट मला सुरुवाती पासून पचत नव्हती... हे चाकू-फाकू तर गुंड्यांच्याच हातामध्ये शोभून दिसतं कुलकर्णी सारख्या प्रसिद्ध माणसाच्या हातात नाही... आणि त्याच्या खिश्यात चाकू... (आपली मान नकारार्थी हलवून) almost impossible...  (अनाघाकडे पाहत)... बस आत्ता एवढी माहिती मिळालीच आहे तर ती हॉटेलवाली हत्या पण स्वीकार कर मी ह्या केसमध्ये तुझ्या आजाराला ध्यानात ठेवून तुला कमीत कमी शिक्षा होवू देणार..." शर्वरी आपल्या चेहऱ्यावर स्मिता आणत बोलली...


"तिच्या आजाराला तुम्ही तुमच्यासाठी वरदान मानत असाल डी.एस.पी. म्याडम जिने बसल्या बसल्याच तुम्हाला एक केस सोल्व करून ज्याने तुमच्या केस बुकमध्ये हाई ग्रेड्स जोडले गेले असतील पण आम्ही तिच्या आजारामध्ये तिने केलेल्या अनभिज्ञ अपराधाला तिच्या जीवनावर काहीच प्रभाव पडू देणार नाही..." गुरव साहेब आपल्या व्हील चेयरवर बसून ढकलत ढकलत त्या रूममध्ये घुसतात जे केव्हा पासून बाहेर बसून ह्या सर्व गोष्टी ऐकत होते...


"माझ्या मुलीला जर होवू शकेल तर क्षमा करा गुरव साहेब...! हिने जे काही केलं ते आपल्या आजारपणामुळे केलं..." अनघाच्या आईने आपल्या जागेवरून उठून आणि आपले हात जोडत बोलली...


"काश... जर तुम्ही ह्या सर्व गोष्टी मला आधीच सांगितल्या असत्या... तर आज माझी सोनाली जिवंत असती... अरे जर आम्ही आपल्या 'छोट्या'ला त्याच्या आजारासाहित आपलं करू शकतं तर भलं अनघाला कसं नाकारू शकतो... चुकून तिच्या हातून जे पाप झालं आहे त्यापासून तिला कमीत कमी शिक्षा भेटली पाहिजे, हेच माझं ध्येय असेल... डी.एस.पी. म्याडम...! ह्या मध्ये तुमची काहीच अडचण नसेल अशी आम्हाला अपेक्षा आहे... " गुरव साहेब आपली गोष्ट संपवत बोलले...


"माझी कोणती जाती-दुष्मनी थोडी आहे हिच्यासोबत जे मी हिच्या पाठी लागेल... बस गुन्हेगारला त्याने केलेली शिक्षा भेटली पाहिजे...! हाच माझा मुख्य ध्येय असतो... कुलकर्णीचा मामला आत्ता तर साफ झाला पण त्या हॉटेलवाल्या खुनाचं काय होणार...? अनघा आणि राहूलच त्या केसचे मेन अपराधी आहेत..." शर्वरी बोलली...


"कोणत्याही एका केसमध्ये अनघाची संलग्नता नाही दर्शवत कि प्रत्येक खून तुम्ही तिच्याच नावावर करून टाकल... मदत करण्याच्या बहाणे तुम्ही तुमचा स्वार्थ नका सिद्ध करू... सात खून माफ तर जकीण पण देते... तुम्ही तर तरीपण माणूस आहात... त्या खुनात जोपर्यंत तुमच्याकडे ठोस पुरावे नसतील तर तुम्ही त्यामध्ये अनघाचं नाव नाही घेवू शकत... त्या खुनासाठी तर उलट तुम्हाला राहुलची चौकशी केली पाहिजे होती जी कदाचित तुम्ही केली पण होती... आत्ता अनघाचं त्या खुनात लांब लांब पर्यंत काहीच लिंक दिसत नाही आहे..." गुरव साहेब बोलले...


अनघा आणि तिची आई...! दोघीही गुरव साहेबांकडे हैराणीने पाहत होत्या आणि विचार करत होत्या कि कसा कोणी माणूस असल्या माणसाचा पक्ष घेवू शकतो ज्याच्यावर त्याच्या बायकोच्या खुनाचा आरोप लागला आहे... गुरव साहेबांचा सन्मान दोघांच्याही डोळ्यात किती तरी पटीने वाढला होता...


पण अनघाला ह्यावेळी अजून एक दुसरंही गोष्ट त्रास देत होती... ती हाच विचार करत होती कि भलं ती आपल्या भासेला कशी दूर करेल... मी एवढं सगळं केलं पण आणि मला आभास पण नाही झाला... असं कसं झालं माझ्यासोबत... माझा खरेपणा आज माझ्यासाठीच कसा खोटा ठरू शकतो... मी आपल्या आईने सांगितलेल्या गोष्टीचं काय उत्तर देवू... ती हा सगळा विचारच करत होती कि शर्वरीच्या आवाजाने ती भानावर आली...


"आई...! ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत... त्यांची आम्हाला पडताळणी करावी लागणार त्यामुळे तुम्ही अनघाच्या आजीचा आणि त्या स्वामीच्या आश्रमाचा पत्ता आम्हाला द्या... तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचं क्रॉस वेरीफिकेशन केलं जाणार तेव्हाच अनघाच्या केसला दुसऱ्या दृष्टीने पाहिलं जाईल... नाहीतर..." शर्वरीने आपली गोष्ट मध्येच सोडली पण रूममध्ये उपस्थित प्रत्येक माणसाला त्या गोष्टीचा
अर्थ समजायला कठीण नव्हतं... 


*****-----*****-----*****

 
अनघाच्या आईने दिलेल्या पत्त्याच्या आधारावर शर्वरीने त्यांनी जे काही सांगितलं त्याला क्रॉस चेक केलं गेलं... गोष्ट खूप जुनी होती पण काहीच त्रास न होता पूर्ण चौकशी झाली आणि हे माहिती पडलं कि अनघाच्या आईने सांगितलेली सर्व गोष्टी खऱ्या आहेत... ज्या स्वामीने अनघाचा उपचार केला होता ते तर स्वर्गवासी झाले होते पण त्यांच्या डायरीत अनघाची माहिती नोंदवली होती... ज्याला आधार बनवून शर्वरीने कोर्टात अनघाचा केस
सादर केला... ठरलेल्या वेळेप्रमाणे कोर्टाची कार्यवाही सुरु झाली...

कोर्टात ह्यावेळी खूप गर्दी होती... कुठलीच जागा खाली नव्हती... ह्या गर्दीत अनघाला काही ओळखीचे चेहरे दिसले पण ती एका चेहऱ्याला खूप मिस करत होती... ज्याचा चेहरा दिसला नव्हता तो होता रम्या... रम्या कोणास ठावूक कुठे होता जो तिला दिसत नव्हता... पण आत्ता ह्यावेळी तिला जास्त ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता... न्यायाधीश आल्यानंतर एका ठरलेल्या वेळेप्रमाणे अनघाच्या केसच्या नंबरची घोषणा करण्यात आली... सरकारी वकीलने अनघावरती आरोपांची झडीच लावायला सुरुवात केली... ज्यामध्ये अपेक्षेनुसार सोनालीच्या खुनासोबत राहुलवर जीवघेणा हमला आणि कुलकर्णीच्या खुनाचा आरोप तर होताच... शिवाय हॉटेलमध्ये मारला गेलेल्या व्यापाराचा पण खून तिच्या डोक्यावर थोपवण्यात आला होता. ज्यासाठी पोलिसांचा तर्क होता कि त्यांना मिळालेला सीसीटीवी वीडीओ फुटेजमध्ये ज्या महिलेचा प्रतिबिंब दिसला होता आणि तिने जे कपडे
घातले होते, ते अनघाच्या वार्डरॉबची तपासणी घेता घेता मिळालेल्या कपड्यांमधून एक होता... त्यामुळे त्या हालातीमध्ये अनघा वरतीच सगळ्यात जास्त संशय ध्यानात घेवून हि कार्यवाही पुढे चालू ठेवणार होते. न्यायाधीशाने ह्यासाठी आपली परवानगी पण दिली...

अनघा अजूनही स्वतःला ह्या गोष्टीसाठी मानसिक रूपाने तैयार करू शकत नव्हती कि हे सगळं काही तिने केलं आहे.. तिला आपल्या डोक्याच्या आजारावर विश्वासच बसत नव्हता... पण सोनालीला मारल्या नंतर पण गुरव साहेबांच्या वागणुकीवर ती खूपच हैराण होती... पण ते काय होतं जे तिला मनातल्या मनात खात होतं... असं काय होतं जे तिचं मन अजूनही तिच्या आईची गोष्ट ऐकल्यानंतर पण ती त्या गोष्टी स्वीकार करत नव्हतं... असं भलं तिच्या सोबत का होत आहे... कोर्टात सरकारी वकील तिच्यावर आरोपांची झडीच लावतोय... ज्याच्या उत्तरामध्ये आज कोणास ठावूक किती वर्षानंतर गुरव साहेब कोर्टात तिची बाजू मांडत होते...

"मी खरोखर पागल आहे
काय...?" हा एकच प्रश्न अनघाच्या मनात सारखा सारखा येत होता... "माझ्याच सारखा दुनियेचा प्रत्येक पागल स्वतःसाठी हाच विचार करत असेल जशी मी स्वतः विषयी विचार करते... काय खरेपणा आहे आणि काय भास... ह्याचा खुलासा कसा होणार..." कोर्टात चालणाऱ्या वादावादीत अनभिज्ञ अनघा आपल्या मनातच चाललेल्या वादावादीत फसली होती... "माझं अस्तित्वच आज माझ्यासाठी सगळ्यात मोठा भास बनला आहे..." तिचं डोकं दुखायला लागलं होतं आणि ते तिला असहनीय होतं, तिने आपल्या डोक्याला दोन्ही हातांनी दाबून ती स्वतःलाच सांत्वना द्यायला लागली... पण जेव्हा तिचं डोकं दुखणं असहनीय झालं तेव्हा ती एक किंचाळी मारून बेशुद्ध झाली...

टीप: - जर तुम्हाला हिंदीमधून काही कथा वाचायच्या किंवा लिहायच्या असतील तर कृपया करून www.dreamnfun.com ह्या संकेत स्थळावर भेट द्यावी. 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment