Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 13 December 2012

भाग ~ ~ ४४ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????




भाग  ~ ~ ४४ 

आजचा सुविचार: - जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

घटनेच्या पुढे.... 




न्यायाधीशाने अनघाची हालत खूप लक्षपूर्वक पाहिली आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचं बोलून केसला पुढची तारीख दिली... गुरव साहेबांनी अनाघासाठी तातडीने डॉक्टरांच्या टीमसोबत डॉक्टर हेगडेला पण बोलावले... डॉक्टरांनी अनघाची तपासणी करून तिला मेंटल स्ट्रेस आहे असे सांगून आराम आणि कॉन्सेलिंग करण्याचा सल्ला दिला... कॉन्सेलिंगसाठी डॉक्टर हेगडे तिथे उपस्थित होतेच... डॉ. हेगडेने अनघाच्या आरमानंतरच तिच्यासोबत कॉन्सेलिंग सेशन ठेवणं उचित समजलं...

-------------------------------------------------

हॉस्पिटलमध्ये अनघाला गुरव साहेबांमुळेच वी.आय.पी. ट्रीटमेंट मिळत होती... पण ह्या वेळी तिची सर्वात मोठी चिंता तिचे स्वतःचे विचार ज्यावर जोर देवून सुद्धा तिला आपल्या प्रश्नांचे उत्तर सापडत नव्हते... तिच्या आईने सांगितलेली तिची लहानपणीची गोष्ट तिच्या आठवणीत जणू कुठे लपली होती जी तिला शोधून पण सापडत नव्हती... तिने असं काय केलं पाहिजे ज्याने तिची हि चिंता सोल्व होईल... नर्सने तिला सांगितले कि डॉ. हेगडे तिची कॉन्सेलिंग करणार आहेत... तिच्या ओठांवरती एक स्मितेची रेष आली... "हेगडे साहेब भलं कोणाला बघायला आले होते आणि कोणाला बघत आहेत..." पण ती स्वतःच ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला पाहत होती कि शेवटी तिची खरी समस्या आहे तरी काय...???

आता तिच्या जवळ हेगडे साहेब पण आले होते... त्यांच्या चेहऱ्यावर एक चमक आणि स्मित हास्य होतं जे त्यांच्या प्रोफेशनमध्ये असणं पण जरुरी आहे...

हेगडे... "(आपली स्मिता तशीच ठेवत)... आत्ता कसं वाटतंय अनघा...!! मी तुझ्याहून मोठा आहे त्यामुळे मी 'तू' किंवा तुझ्यानावानेच तुला बोलावणार... तुला ह्यामध्ये काही आपत्ती आहे काय..?"

अनघाने नकारार्थी मान हलवून आपली संमती दिली..

हेगडे.. "गुड... आता जरा सांग... आत्ता तुझी सर्वात मोठी चिंता काय आहे.. तुला सर्वात पहिले काय जाणायचे आहे...?"

अनघा... "(चिडलेल्या स्वरात)... तुम्हाला काय वाटतं... माझ्यासोबत जे काही होत आहे ते माझ्या भासेचं कारण आहे... माझ्यावर एक नाही ३-३ हत्येचे आरोप आहेत ज्यामध्ये मी कोणत्या एकाचंही नीट उत्तर देवू शकत नाही... असल्या हालातीमध्ये माझ्यासाठी सर्वात आधी भलं काय जाणणे जरुरी असू शकतं...???"

हेगडे... "तुला आठवत नाही आहे काय, कि तू त्या हत्या कश्या आणि का केल्या होत्या...??"

अनघा... "(रागाने)... तुम्ही स्वतःच पागल नाहीत ना..!... मी कोणाचीही हत्या केली नाही आहे... माझ्या हातांनी फक्त एकाचा जीव गेला आहे आणि तो पण सेल्फ डिफेन्समध्ये... (चीडचीड्या स्वरमध्ये)... मला आत्ता असं वाटायला लागलं आहे कि मी उगाचच सोनालीला गोळी मारली, त्या हरामखोर माणसाला गोळी मारून उलट त्या किती चांगलं काम करत होत्या... हुंह..."

हेगडे... "पोलिसांच्या एक्स्पर्टच्या रिपोर्ट नुसार राहुलला आणि सोनालीला एकाच बंदुकीतून गोळी मारली गेली आहे..."

अनघा... "(हैराणीने हेगडेला बघत)... असं कसं असू शकतं...?? राहुलला जी गोळी लागली होती ती सोनालीच्या बंदुकीतून निघाली होती... माझ्यासमोर झालं होतं हे सगळं... त्याच्या नंतरच मी सोनालीला गोळी मारली होती... म्हणजे माझ्याने ट्रिगर दाबला गेला होता तेव्हा त्यांनी त्यांच्या बंदुकीतून गोळी झाडली आणि ती राहुलला लागली होती..."

हेगडे... "तू पुन्हा कन्फ्युज होत आहेस... तुला हे लक्षपूर्वक आणि एकदम नीट बोलायचे आहे कि पहिले तू गोळी झाडली होती किंवा पहिले सोनालीने... आपल्या डोक्याला शांत ठेवून हि गोष्ट लक्षपूर्वक विचार करून बघ..."

अनघा... "मी फ्लोमध्ये बोलून गेली पण अजूनही मी आपल्या पहिल्या स्टेटमेंट वर ठाम आहे... राहुलने मला गोळी चालवायला सांगितली आणि माझ्याकडून ट्रिगर दाबला गेला... ज्याच्या नंतर सोनालीने गोळी चालवली जी राहुलला लागली..."

हेगडे... "जर पहिले तू गोळी चालवली होती तर हा सेल्फ डिफेन्स कसा झाला...? उलट सेल्फ डिफेन्समध्ये सोनालीने गोळी चालवली ना... ती बेचारी तर खाली फुकट मारली गेली... आत्ता तुला आयुष्यभर गिल्ट राहणार कि तुने एका निर्दोषला का मारलं..."

अनघा खरोखर विचारात पडली... "एकदम बरोबर तर बोलत होता हा डॉ., सेल्फ डिफेन्स तर सोनालीचा झाला, ना कि तिचा किंवा राहुलचा... राहुल हुंह..." राहुलचं नाव मनात येताच तिने तोंड वाकडं केलं आणि डॉ. हेगडेला बघत विचारलं...

अनघा... "डॉ. एक गोष्ट खरी खरी सांगा... तुम्ही इथे माझी कॉन्सेलिंग करण्यासाठी आला आहात कि माझ्याकडून माझा गुन्हा कबुल करवण्यासाठी... काही पण बोलायच्या आधी एवढं लक्ष्यात ठेवा कि तुमच्या समोर जी मुलगी बसली आहे ती एक वकील पण आहे..."

हेगडे... "(हसत)... हा पण तुझा एक भास आहे... मी आपल्या प्रोफेशनशी काहीच दगा करू शकत नाही... तुझं वाईट वाटून घेणं कुठल्याही प्रकारे चुकीचं नाही आहे... कोणीही अश्या हालातीमध्ये असाच प्रतिकार करतो जशी तू करतेस... मी फक्त तुला आठवणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे... तू चिंता नको करूस माझ्याकडून तुझी कोणतीही गोष्ट कोणाच्या जवळ नाही जावू शकत... आम्ही डॉक्टर्स एका शपथमध्ये बांधले गेलो आहोत... ज्यामुळे आमच्या कोणत्याही पेशंटची इन्फोर्मेशन गुपित ठेवणं आमची जवाबदारी असते उलट आमचा परम धर्म पण असतो... जर तू माझ्याशी काहीतरी लपवून गोष्ट करशील तर मी तुझी मदत कशी करणार... आणि माझ्या समोर बसलेली मुलगी जी एक वकील पण आहे, एवढं तर समजू शकते कि तिला सध्या मदतीची किती गरज आहे ती..."

अनघा आता शांतपणे विचार करत होती... ती खूप गोंधळली होती कि काय करू आणि काय न करू... मग शेवटी तिने विचार केला कि तिच्यासमोर सर्वात मोठा धोका कोणत्या गोष्टीचा आहे... जेवढं वाईट व्हायचं होतं ते झालंच आहे आत्ता ह्या पेक्षा जास्त वाईट काय होवू शकतं कि हत्येच्या आरोपामध्ये तिला जन्मठेपची शिक्षा भोगावी लागेल...

अनघा... "डॉ....! माझी सर्वात मोठी घाळमेळ तेव्हा सुरु झाली जेव्हा माझ्या आईने मला माझ्या लहानपणीच्या घटनेची गोष्ट सांगितली... कारण ह्यातलं मला काहीच आठवत नाही आहे कि माझ्यासोबत असं पण काहीतरी झालं आहे... पण आत्ता तर 'डी.एस.पी.'ने पण सर्व काही वेरीफाय करून घेतलं आहे ज्यामध्ये माझ्या आईने सांगितलेल्या सर्व गोष्टींचं प्रमाण मिळालं आहे... ठीक आहे मी हे मानते कि कुलकर्णीची हत्या ट्रेनमध्ये झाली होती जिथे दुसरं कोणीच उपस्थित नव्हतं पण त्या व्यापाऱ्याची हत्या मी कशी करू शकते... मी गुरव साहेबांच्या घरातून कोणाचीही नजर चुकवता कशी त्याच्याकडे पोहोचू शकते... पण सर्व पुरावे माझी गोष्ट खोट्यात पाडत आहेत.. मी जेव्हा पण हा विचार करते तेव्हा स्वतःला खूप गोंधळलेली जाणवते... काय करू, काय न करू मला काहीच समजत नाही आहे..."

हेगडे... "काही पण असंभव नाही आहे अनघा... माझ्या जवळ असेही पेशंट आले होते जे शुद्धीवर असतांना सुद्धा बाथटबमध्ये जाण्यास घाबरत होते पण आपल्या निश्चयावर ठाम असले कि ते नदीच्या प्रवाहात उलट दिशेने पण पोहू शकत होते... ह्याला आमच्या मेडिकल भाषेत 'ruled by subconscious mind' बोलतात ज्यामुळे आपला चैतन्य मेंदुच्यावर आपल्या अर्ध-चैतन्य ज्याला आपण subconscious mind बोलतात... त्याच्या आधीन होतो आणि जी काही आपल्या आतील भीती असते त्याचा विरोध करण्यासाठी आपल्यांना उकसवतो आणि आपल्यांना माहितीही नाही पडत... किती तरी लोकांची तर पूर्णच्या पूर्ण पर्सनालिटीच चेंज होते... पण तो केस तुझ्यासोबत नाही होवू शकत कारण स्प्लिट पर्सनालिटीच्या केसमध्ये माणूस एकदम वेगळेच बेहेविअर फॉंलोव करत असतो..."

अनघा... "तुमच्या म्हणायचा अर्थ काय आहे... मी कोणत्या पागलपणाची शिकार झाली आहे जी अशी वर्तणूक करते... तुम्हाला अंदाजापण नसेल कि मी इथे किती मोठ्या कट कारस्थानची शिकार बनली आहे... (घृणासोबत दात खात) ज्या माणसाचा उपचार करण्यासाठी तुम्ही आला होता त्यानेच मला त्याच्या गोष्टींमध्ये फसवून हे सर्व करवून घेतलं आहे... आणि मी पागल...! त्याच्या चालीची शिकार बनली..."

हेगडे... "त्याने तुला पण प्रिया आणि आपल्या आईची कहाणी ऐकवली होती काय...???"

अनघा... "(हैराणीने)... तुम्हाला कसं माहिती पडलं...!!!"

हेगडे... "मला सर्व काही माहिती आहे अनघा... पण मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे..."

अनघा... "(हैराणीने)... पण तुम्हाला हे सर्व कसं माहिती पडलं... त्याने तर हि गोष्ट फक्त मलाच सांगितली होती..."

हेगडे... "नो... (आपली मान नाकार्थी हलवत)... नाही... फक्त तुलाच नाही... तुला 'पण' सांगितली आहे..."

अनघा... "म्हणजे तो खरोखर... (हैराणीने विचार करत)... अरे देवा...! आत्ता मी काय करू..."

हेगडे... "त्याचा खरेपणा तर नंतरची गोष्ट आहे, आत्ता फक्त तू आपल्या खरेपणावर लक्ष केंद्रित कर... तुझं पूर्ण जीवन आता तुझ्या खरेपणावर अवलंबून आहे.."

अनघा... "माझ्यासाठी ह्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असणार कि मी एका पागलच्या हाती पागल बनली... माझा तर अस्तित्वच बेकार आहे जर मी एका पगालला आपल्या सोबत एवढं सगळं काही करू दिलं... त्याने मला त्याच्या हाताचा एक प्यादा बनवून ठेवलं आणि मी हि गोष्ट समजू पण शकले नाही..."

हेगडे... "तुला सर्वात जास्त खेद कोणत्या गोष्टीचा आहे... एक 'सो कॉल्ड' पागलच्या हातून पागल बनण्याचा कि आपल्या हातून काहीतरी चुकीचं करण्याचा...!!"

अनघा... "दोघांचाही... पण मी जास्त खेद प्रकट करेन कि मी चुकीचं केलं.. खास करून गुरव साहेब आणि सोनाली वहिनीला अपराधी समजून..."

हेगडे... "राहुल is suffering from a very critical mental disease called ‘schizophrenia’.... ह्यांना साध्या भाषेत तर पागल बोलतात पण हे साधारण लोकांपेक्षा खूळ वेगळे असतात... हि लोकं खूप थंड डोक्याने प्लानिंग करू शकतात... ह्यांचा व्यवहार दिसायला तर खूप सामान्य असतो पण ह्यांच्या डोक्यात ज्या काही चुकीच्या गोष्टी ह्यांनी भरून ठेवलेल्या असतात ज्यामुळे हे कधी काय करतील... कोणी काहीच सांगू शकत नाही... सर्वात मोठी गोष्ट हि आहे कि ह्यांचा हा आजार लवकर डायग्नोज पण होवू शकत नाही... पण जेव्हा होतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो..."

आपली गोष्ट पूर्ण करून ते थोड्यावेळासाठी अनघाची प्रतिक्रिया पाहत राहतात पण तिच्याकडून काहीच प्रतिउत्तर न मिळाल्यावर आपल्या गोष्टीला पुन्हा सुरुवात करतात...

हेगडे... "कदाचित तुलाही आपलं व्यतीत झालेलं जीवन आठवत नसेल पण तुझ्या subconscious mind मध्ये तो हादसा कुठेतरी लपून बसला असेल आणि स्वतःवर कोणत्या तरी अनहोनीच्या आशंकेने तू स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी काही पण करून बसत असशील..."

अनघा... "ठीक आहे चला एक वेळ मी हे गृहीत धरते कि त्या कुलकर्णीची हत्या माझ्या हातून झाली असेल पण हॉटेलमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्याची हत्या भलं मी कशी करणार... कारण मला त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता..."

हेगडे.. "आत्ता हि गोष्ट तर तुझी पूर्ण चौकशी केल्यावरच समोर येईल कि असं होणं कुठपर्यंत संभव आहे..."

हेगडे आणि अनघाच्या वार्तेच्या वेळी तिथे गुरव साहेबांचं येणं झालं, ज्यांना पाहून अनघाला तिचा 'गिल्ट' पुन्हा त्रास द्यायला लागला... त्यामुळे तिने आपली मान लगेच खाली केली...

गुरव साहेब... "(हेगडेशी...) तुम्ही कोणत्या अश्या ठोस निर्णयावर पोहोचलात का ज्याने आम्हाला अनघाच्या केसमध्ये मदत मिळू शकते... (त्रासित स्वरमध्ये)... आमच्यासाठी हे खूप गरजेचे आहे कि आम्ही आमच्या घरातील छोट्या सुनेला वाचवू शकू नाहीतर मी आपल्या छोट्या आईला काय उत्तर देणार..."

हेगडे... "मी त्या कामासाठी तुमची काय मदत करू शकतो भलं...!!"

गुरव साहेब... "तुम्हीच तर सर्व काही करू शकता... तुमच्या एक्स्पर्ट ओपिनिअनच्या नंतर सरकारी डॉक्टर पण तेच बोलणार जे तुम्ही बोलणार..."

हेगडे... "मी समजतोय कि तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून पण मला क्षमा करा... मी तेच करणार किंवा बोलणार जे सत्य आहे..."

गुरव साहेब... "हेगडे साहेब..! आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत... फक्त तुमच्यामुळेच आम्ही आमच्या छोट्या सुनेला वाचवू शकतो.."

अनघा, गुरव साहेबांचं बोलणं ऐकून त्यांच्या प्रती केलेल्या अविश्वासामुळे स्वतःला खूप गिल्टी फील करते... एवढं सगळं होवून सुद्धा गुरव साहेब तिची आणि तिच्या परिवाराची किती मदत करत आहेत आणि ती शी... तिला स्वतः वरतीच घृणा होत होती पण गोष्ट आता तिच्या हातून निसटली होती... पण नाही...!!! अजूनही खूप काही बाकी आहे... ती आत्ता विचारच करत होती कि गुरव साहेबांच्या फोनच्या घंटीने तिची विचार करण्याची शृंखला भंग केली...

गुरव साहेब... "(फोनवर)... हो बोला..! कसा फोन केलात... (हैराणीने...) काय...! नाही - नाही असं नाही होवू शकत... तुम्ही थट्टा तर नाही करत आहात ना... आम्हाला पहिले का नाही सांगितलं तुम्ही... ???? आम्ही आत्ताच निघतो तिकडच्यासाठी... (फोन खिश्यात ठेवत)... अरे देवा...! कोणास ठावूक काय होत आहे आमच्या सोबत आणि आमच्या परिवारासोबत.." एवढं बोलून ते रूममधून बाहेर निघून जातात...

-------------------------------------------------

डी.एस.पी. शर्वरी आपल्या चेंबरमध्ये बसून सोनाली मर्डर केसची फाईल चाळत होती... तिने रम्या विषयी पण चौकशी केली, पण तिला राम्याविषयी काहीच माहिती मिळाली नाही... रम्याचं असं अचानक गायब होणं एकंदरीत तिच्या मनात खूप सारे प्रश्न येत होते... गुरव साहेबांच्या घरातील नोकरांना आणि स्वतः गुरव साहेबांना विचारल्यावर हेच माहिती पडले कि त्या दिवशी अर्ध्या रात्रीच तो सोनालीच्या जवळ येवून आपल्या कोणत्या तरी पर्सनल कामासाठी २-३ दिवसांची सुट्टी घेवून निघून गेला होता... त्याच्या घरच्यांकडून त्याला कोणतीतरी वाईट बातमी मिळाली होती ज्यामुळे तो आपल्या गावी म्हणजे सोलापूरला गेला होता... त्याच्यानंतर आज पर्यंत त्याची काहीच खबर मिळाली नव्हती... आज सकाळीच शर्वरीने सोलापूरच्या पोलिसांशी ह्यासंबंधी मदत मांगितली होती, पण त्याचा पण काहीच फायदा झाला नाही... शर्वरीला पूर्ण विश्वास होता कि रम्याच्या ह्या रहस्यमयी गायब होण्याच्या मागे काहीतरी मोठं गुपित आहे...

तेव्हा तिचा एक हावलदार पळत येतो ज्याला तिने रम्याच्या मॉंनिटरिंग वर लावलं होतं... हवालदारने पळत येवून पहिले तिला एक जोरदार सलाम ठोकला आणि त्याने जी बातमी ऐकवली ती ऐकून शर्वरीची शुद्धच हरपण्याची पाळी आली होती... रम्या आपल्या घरी जाण्यासाठी निघाला तर होता पण ट्रेनमध्ये कोणासोबत तरी त्याचं जबरदस्त भांडण आणि मारहाण झाल्यामुळे तो खूप जखमी झाला होता ह्या वेळी तो समता नगरहून जवळ जवळ २०० कि.मी. लांब एका छोट्याश्या हॉस्पिटलमध्ये भरती होता. रम्यासोबत झालेली ह्या घटनेला शर्वरी सोनालीच्या मर्डर केसशी जोडूनच पाहत होती... त्यामुळे तिने लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला जिथे आत्ता ह्यावेळी रम्या असण्याची तिला बातमी मिळाली होती.. तिने त्या जागीच्या ऑफिसर इन्चार्जशी वार्ता करून रम्याची सिक्युरिटीचा बंदोबस्त करायला सांगितलं आणि लगेच तिथे जाण्यासाठी निघाली... जवळ जवळ साढे तीन तासांच्या ड्राईविंग नंतर ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली जिथे आत्ता ह्यावेळी रम्या असण्याची तिला बातमी मिळाली होती... हॉस्पिटलमधल्या पोलिसांचा पहारा पाहून ती संतुष्ट झाली आणि लगेच रम्याच्या रूमच्या इथे गेली...

रम्या ह्यावेळी हॉस्पिटलच्या आय.सी.यु.मध्ये भरती होता, तो अजूनही धोक्यातून बाहेर आलेला नव्हता, त्याचं रक्त खूप वाहून गेलं होतं... डॉक्टर्स त्याच्या स्वास्थ्यासाठी बिलकुल पण ठाम नव्हते... शर्वरी...! आय.सी.यु.मध्ये जावून त्याच्याशी भेटण्यासाठी डॉक्टरांशी विचारपूस करते... स्वीकृती मिळाल्यावर ती आय.सी.यु.मध्ये दाखल होते... थोड्या वेळानेच ती रूममधून निराश अवस्थेमध्ये बाहेर येते आणि कोणाला तरी फोन लावून सांगते...

शर्वरी... "आता तुमचं इथे येण्याने काहीच फायदा नाही आहे गुरव साहेब... रम्या राहिला नाही...!!!" पुन्हा प्रश्नच प्रश्न... :) तर मित्रांनो काय झालं असेल पाहूयात पुढच्या भागात... पण त्या साठी थोडीशी कळ सोसावी लागणार... :) 



टीप: - जर तुम्हाला हिंदीमधून काही कथा वाचायच्या किंवा लिहायच्या असतील तर कृपया करून www.dreamnfun.com ह्या संकेत स्थळावर भेट द्यावी.



 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment