Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Monday, 24 December 2012

भाग ~ ~ ४७ Illusion .... एक भास..????Illusion .... एक भास..????

भाग ~ ~ ४७

घटनेच्या पुढे....

शर्वरी… “तो तर तिथेच आहे जिथे त्याला असायला पाहिजे होतं… असो नाही तरी सगळं काही तुमच्या मनाप्रमाणेच होत आहे… एका गुन्हेगार मुलीला ‘पागल’ बनवून तिला जवळ जवळ तुम्ही वाचवलेच आहे…”

गुरव साहेब… “(तिरस्कार करत) तिने माझ्या सोनालीची हत्या केली आहे, पण कदाचित जेवढी घृणा मला व्हायला पाहिजे त्याहुनी जास्त तिरस्कार व घृणा तुम्ही करत आहात… तुम्हाला अजूनही का समजत नाही आहे कि हि मुलगी (अनघा) निर्दोष आहे… तुमच्याशी माझी एक विनंती आहे तुम्ही तुमच्या मनातून तिच्या प्रती आपल्या सगळ्या दुर्भावना काढून पुढे व्हा… माझं जेवढं नुकसान व्हायला पाहिजे होतं ते झालंच आहे… आणि हो…!!! (चेहऱ्यावर स्मित हास्य आणून) ह्या कागदाने तुम्ही काहीच साध्य करू शकत नाही… त्यामुळे आपल्या डोक्यातून सगळ्या गोष्टी काढून टाका…”

शर्वरी… “हे तर मला चांगल्या प्रकारे माहिती आहे कि, मी अजून पर्यंत काहीच साध्य करू शकत नाही पण… (एकदा अनाघाकडे आणि राहुलकडे इशारा करत)… काही तरी असं करू शकते ज्याने तुम्हाला फरक पडू शकतो…”

एवढं बोलून ती हसायला लागते… गुरव साहेबांनी तिच्या हसण्यावर काहीच प्रतीर्क्रिया दिली नाही… असो घड्याळाने जेवणाची वेळ संपण्याचा इशारा केला होता त्यामुळे सगळेजण न्यायालायची कार्यवाही सुरु होण्याची वाट पाहत होते…

ठरलेल्या वेळेप्रमाणे न्यायाधीश साहेब पण आले… त्यांनी सगळ्यांना पाहून आपला निर्णय वाचायला सुरुवात केली…

न्यायाधीश… “ह्या विचित्र आणि असमंजस केसमध्ये ‘आरोप करणाऱ्या आणि डिफेंड करण्याऱ्या’ पक्षाच्या पूर्ण गोष्टी ऐकल्यानंतर हे न्यायालय ह्या निर्णयावर पोहोचते कि सोनाली गुरवचा खून अनाघाच्याच हातातून झाला आहे पण तिच्या डोक्याच्या हलातीला ध्यानात ठेवून तिला ह्या समाजासाठी धोका मानून हे न्यायालय गुन्हेगार अनघाला डोक्याच्या औषधोपचारासाठी पागल खान्यात पाठवण्याचे आदेश देत आहे… अनघाचं औषधोपचार सरकारी देख रेखी खालीच होणार आणि तिच्या हालतीमध्ये होणाऱ्या सुधाराची रिपोर्ट डॉक्टरांना दरमहिन्यात न्यायालात सादर करावी लागणार… सरकारी डॉक्टर्स आणि न्यायालयाच्या मंजुरीविना, अनघाला ह्या शहरातून बाहेर जावू दिलं जाणार नाही… न्यायालय हे पण सुनिश्चित करतं कि अनघाची हालातीत ज्या दिवशी पूर्णपणे सुधार होईल त्या दिवशी सरकारी डॉक्टर्सकडून प्रमाणपत्र मिळाल्यावरच तिची सुटका होणार… this cas has been done now… (आपल्या ऑर्डरलीशी) call for the next case…”

न्यायाधीशाचा निर्णय ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षित भाव दिसायला लागले शिवाय अनघाच्या… तिला काहीच समजत नव्हते कि तिला खुश व्हायला पाहिजे कि दुखी…गर्दीमध्ये खूप सारे लोकं अशी पण होती जे गुरव साहेबांची प्रशंषा करत होते… त्यांच्या मोठेपणाची सगळे लोकं प्रशंषा करत होते… लेडी पोलिसांनी अनघाला आपल्या कस्टडीमध्ये घेतलं… तिची आई डोळ्यात अश्रू घेवून आपल्या मुलीला पाहायला लागली… त्या दिवशी अनघाला एकदम एकाकी पणाची जाणीव होत होती… तिची नजर फक्त राहुललाच शोधत होती जो ह्यावेळी कोणास ठावूक कुठे होता… गुरव साहेब तिच्या जवळ पोहोचून तिच्या हातावर आपले हात थोपटून तिला सांत्वना देत… “फक्त आणखीन काही दिवस तुम्हाला हे कष्ट सहन करावे लागणार आहे अनघा…!! खूप लवकर आम्ही सर्व पुन्हा एकत्र असू…” गुरव साहेब तिचं मनोबल वाढवत बोलले...

अनाघाला पोलीसवाल्यांनी पोलिस जीपच्या दिशेने घेवून गेले ज्याच्या जवळच तिला राहुल उभा असलेला दिसला… तो आपल्या डोळ्यात अश्रू घेवून अनघाला पाहत होता… जेव्हा अनघाला घेवून ते पोलिसवाले त्या जीपच्या जवळ पोहोचले तेव्हा राहुलने चुपचाप त्यांच्या ‘हेड-कॉनस्टेबलला’ काही पैसे दिले आणि अनघाला भेटण्याची विनंती केली… ‘हेड -कॉनस्टेबलला’ भलं ह्यात काय प्रोब्लम असणार, त्यामुळे तिने राहुलला ५ मिनिटांची परवानगी दिली… राहुल आत्ता अनघाच्या समोर उभा होता आणि तिला खूप प्रेमाने पाहत होता… राहुलला समोर पाहताच तिची प्रेमदिवाणी आपले सर्व दुःख विसरून त्याला मिठी मारते आणि हमसाहमशी रडायला लागते…

अनघाच्या अश्रूंनी राहुलच्या शर्टाला जवळ जवळ भिजवून ठेवलं होतं… तिच्या डोक्यावरून प्रेमाने आपला हात फिरवत राहुल तिला सांत्वना देत होता…

राहुल… “देवाची खूप खूप कृपा झाली कि तू त्या सोनालीच्या हत्येच्या आरोपातून मुक्त झालीस… बस आत्ता तर काहीच दिवसानंतर आपण पुन्हा एकत्र असणार… तू कोणालाही आपल्या विषयी माहिती पडू देवू नकोस… मी सगळं सांभाळून घेईन… आणि आपल्या घरच्यांची पण काळजी करू नकोस… ती आत्ता माझी जवाबदारी आहे…”

अनघा हे सगळं ऐकून थोडी शांत झाली… ‘तिच्या प्रेमाची कुरबानी वाया गेली नाही..’ हे जाणून तिचं मनोबल थोडं वाढलं होतं… ती आपल्या अश्रूंना पुसून पोलिस जीपमध्ये बसली…

********--------********--------********

15 दिवसा नंतर…..

आज अनघाला भेटायला राहुलचे मामा आणि मावशी आलेले होते… त्यांना कोर्टातून परवानगी घेवूनच भेटण्याची परवानगी मिळाली होती… ते खूप दुःखी झाले अनघाची हि अवस्था पाहून… अनघा त्यांना पाहून कन्फ्युज्ड होती आणि त्या दोघांशी कसे वागावे आणि कसे बोलावे हे तिला काहीच सुचत नव्हते… मग तिने आपल्या पागलपणाच्या नाटकालाच सुरु ठेवणं उचित समजलं आणि त्यांच्यासमोर पण एकदम गप्पच बसून राहिली… त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तिने दिलं नाही आणि ते लोकं निराश होवून निघून गेले…

********--------********--------********

जवळ जवळ २-३ महिन्या नंतर….

आज किती तरी दिवस झाले होते अनघाला भेटायला कोणीच आलं नव्हतं… सुरुवातीला तर तिची आई पण अधूनमधून दर-हफ्त्याला तिला भेटण्यासाठी यायची पण आत्ता तर त्यांना पण किती तरी दिवस झाले येवून… आत्ता अनघाला वाट पाहणं खूप कठीण जात होतं… साधारण लोकांसमोर पागल बनून राहण्याचं नाटक तिला जेवढं सोप्पं वाटत होतं तेवढं कठीण होतं हे नाटक पागल लोकांच्यामध्ये राहून करणं… दरवेळी कोणा ना कोणा पागलच्या किंचाळण्याचा आवाज तिला अजूनच कमजोर बनवत होता… ती लवकरात लवकर ह्या जागेतून निघायला पाहत होती पण तिला आत्ता काहीच समजत नव्हते कि आत्ता तिने काय केले पाहिजे जेणेकरून तिची ह्या पासून सुटका होईल… तिला तर आत्ता हि भीती पण वाटायला लागली होती कि ती खरोखरच पागल तर झाली नाही ना… तिने ओरडून ओरडून एक-दोन वेळा हॉस्पिटलमधल्या म्याटरॉनशी राहुल किंवा गुरव साहेबांशी भेटण्याची वार्ता केली पण तिला तिचा पागलपणामध्ये केला जाणारा प्रलाप समजून कोणीच लक्ष दिलं नाही… मग शेवटी एक दिवशी तिला भेटण्यासाठी कोणीतरी आलं…

जेव्हा तिला मिटिंग कॅबीनच्या दिशेने घेवून जाण्यात आलं तेव्हा ती हाच विचार करत होती कि कदाचित आज राहुल आला असेल किंवा तिची आई आली असेल पण जी व्यक्ती आली होती त्याला बघून अनघा हैराण झाली… ती स्वप्नात पण विचार करू शकत नव्हती कि तिला भेटण्यासाठी डि.एस.पी शर्वरी आली असेल… शर्वरी तिला बघून अनाघासाठी तोच कडूपणा चेहऱ्यावर घेवून आपल्या जागेवरून उठली…

अनघा… (फिक्या स्मिताने).. तू इथे कशी…? माझा तमाशा पाहायला आली आहेस काय…?”

शर्वरी… “तमाशा तर तू स्वतः आपला करून ठेवला आहेस… मूर्ख मुलगी…!!!”

अनघा… “(व्यंगात्मक स्मिताने) कधी जी मला एक मास्टर माइंड बोलून हत्येचे आरोप लावत होती आज तीच मला मूर्ख बोलत आहे… कमाल आहे…!!!!!”

शर्वरी… “हो..!!! मी मानते कि मी तुझ्यावर चुकीचा संशय घेतला पण आज जेव्हा मला सर्व गोष्टीची माहिती पडली तर मला हि जाणीव झाली कि तू केवढी मोठी मूर्ख आहेस…!!!”

अनघा… “(अचंबित होवून).. आत्ता काय माहिती पडलं तुला जे मला मूर्ख बोलत आहेस…!!!”

शर्वरी… “आत्ता तर तू फक्त पागल बनण्याचं नाटक करत आहेस पण जे सांगायला मी इथे आले आहे ते जर ऐकशील तर खरोखरच पागल होशील… काय समजलीस…!!!”

अनघा... “तुला जे काही सांगायचे आहे ते सांग… माझ्यासाठी तर प्रत्येक गोष्ट अचंबित करण्यासारखी असते…”

शर्वरी… “तुझा राहुल तुझ्याशी दरवेळी खोटं बोलत राहिला…!!!”

अनघा… “(एक फिकी स्मिता देत)… हे तर सगळेच बोलतात… ह्यामध्ये नाविण्य काय आहे जे तू सांगत आहेस… माझा तमाशा बघायला आली होतीस ना..? बघितला असेल तर…! निघ इथून…”

एवढं बोलून अनघा आपल्या सेलमध्ये जाण्यासाठी ताडकन उठली…

शर्वरी… (तिचा हात पकडून तिला थांबवत).. पण कोणी तुला हे सांगितलं आहे काय… कि त्याने तुझ्या वडिलांना आपल्या ताब्यात घेवूनच तुझ्या आईला तुझ्याविषयी सगळं खोटं खोटं बोलण्यासाठी बळजबरी केली…!!”

अनघा… “काय…!!! (डोळे वटारून)… नाही हे सगळं खोटं आहे… तू माझ्याशी खोटं बोलत आहेस…”

शर्वरी… “(रागाने) मला माहिती होतं मूर्ख मुली…!!! तू त्याच्या प्रेमामध्ये एवढी आंधळी झाली आहेस कि तुला हे समजत नाही आहे कि तो सुरुवाती पासूनच तुझ्या सोबत खेळत आहे… त्याची प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त एक खोट्या गोष्टी शिवाय काहीच नाही… तू कधी हा विचार नाही केलास कि शेवटी तुझी आई तुला भेटायसाठी का येत नाही ते…??”

अनघा… “(जी आता स्फुंदत होती…)… माझी आई तर ठीक आहे ना… तिला काही झालं तर नाही ना…!!!”

शर्वरी… “तुझी आई तर ठीक आहे पण तुझे वडील गायब आहेत… शेवटी त्यांना कोणी तेव्हाच पाहिलं होतं जेव्हा ते रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलला घेवून जाण्यात येत होतं… आणि हि गोष्ट तुझ्या लग्नाच्या २ - ३ दिवसानंतरची आहे…”

अनघा… “पण माझ्या आईने मला का सांगितलं नाही…?”

शर्वरी… “कशी सांगणार भलं…!!! त्यांना राहुलकडून धमकी जी मिळाली होती… अजूनही तुझ्या वडिलांना राहुलने आपल्या सिक्युरिटीमुळे आपल्या जवळच कुठे तरी ठेवलं आहे… ज्याच्यामुळे तुझी आई तुला काहीच सांगू शकत नाही…”

अनघा... “(एकदम काहीतरी आठवत)… जर माझ्या आईने मला हे सगळं नाही सांगितलं तर तुला हे सगळं कसं सांगितलं… हा बोल…?”

शर्वरी… “त्यांनी मला पण काहीच सांगितलं नाही पण आम्हा पोलिसांकडे एक वेगळीच कला असते ज्याने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी माहिती करतो…”

अनघा... “आणि तुला भलं माझ्या घरच्यांशी एवढं लळा का निर्माण झाली कि तू आपल्या आवडत्या गुन्हेगाराला पकडून सुधा शांत झाली नाहीस ती…?”

शर्वरी समजली कि अनघा तिला सुरुवाती पासून तिच्यावर संशय करण्याचा टोमणा मारत आहे…

शर्वरी… “(थोडी रागाने)… लळा फक्त ह्यासाठी झाला कारण जेव्हा तुझ्या लहानपणा विषयी चौकशी करण्यासाठी माझी टीम गेली होती तेव्हा त्यांना सगळं काही जसेच्या तसेच मिळालं जसं तुझ्या आईने सांगितलं होतं… त्या गोष्टींना होवून खूप वर्ष झाली आहेत… बस इथेच माझं डोकं ह्या गोष्टीला पचवत नव्हतं… मग संशय करण्यासाठी तुझ्या आईला मी ह्या लायक नाही समजत होती कि त्या एवढं सगळं आणि ते पण कमी वेळात अरेंज करू शकतात पण जेव्हा नजर राहुलकडे वळवली तेव्हा माहिती आहे सगळ्या गोष्टी दोन आणि दोन जोडल्यासारखी राहिली होती…”

अनघा… “साफ साफ का नाही सांगत आहेस कि शेवटी तुला माहिती कसं पडलं हे सगळं…?”

शर्वरी… “आमच्या लोकांनी जेव्हा तुझ्या घरातील लोकांवर नजर ठेवायला सुरुवात केली तेव्हा माहिती पडलं कि गेल्या किती तरी दिवसांपासून कोणीही तुझ्या वडिलांना पाहिलं नाही… ह्या विषयी विचारल्यावर तुझ्या आईने सगळ्यांना गोल गोल उत्तर दिलं… ज्यामुळे आम्हाला माहिती पडलं कि त्यांच्यावर जरूर काहीना काहीतरी दडपण आणि दबाव आहे ज्याच्यामुळे त्या हे सर्व करत आहेत… मग आम्ही त्या स्वामीची तथाकथित डायरी पण चेक केली जी आम्हाला पहिलेच चेक करायला पाहिजे होती… (काही सेकंद थांबून)… पण त्यावेळी हे सगळं डोक्यात आलं नव्हतं… पण जसंच माझी नजर ह्या गोष्टीवर गेली, आम्ही त्या डायरीतील लिखाण चेक करण्यासाठी दिलं... तर ल्याबमधून माहिती पडलं कि ते लिखाण जास्त जुनं नसून आत्ताच लिहिलं गेलं आहे…”

अनघा… “(विचार करत) पण… राहूलच का… गुरव साहेब का नाही…??”

शर्वरी… “उत्तर आहे ना…!!!... त्यांची अपंगता… त्यांचं क्रियाशील असण्याची हद्द खूप सीमित आहे त्यामुळे आमचा प्राइम सस्पेक्ट राहूलच आहे… पण तुझ्यासाठी आम्ही गुरव साहेबांना पण आमच्या संशयात ठेवणार… खुश…!!!”

अनघा… “(व्यंग करत) तर…!!! माझ्यावर एवढ्या उपकारच कारण…?”

शर्वरी… “(रागाने) काय त्रास आहे यार…!!! विचित्र पिडा आहे ह्या मुलीची… मदत केली तरी त्रास… नाही केली तरी त्रास…”

अनघा… “संशय तर होणारच ना..”

शर्वरी… “तुझी मर्जी अनघा…! मी स्पष्ट शब्दात सांगते कि जर माझ्यावर विश्वास ठेवून स्वतःचा आणि आपल्या परिवरिचा जीव वाचवायचा आहे तर माझी गोष्ट ऐक आणि माझी साथ दे… नाहीतर…!!!! (खांदे उचकावून) जशी तुझी मर्जी… माझं काय.. हुह…”

अनघा… “पण मला करायचे काय आहे आणि ते पण साफ साफ सांग कि ह्यामध्ये तुझा फायदा काय आहे…?”

शर्वरी… “जे काही करायचे आहे ते मी तुला नंतर सांगेन आणि माझा फायदा फक्त एक सॉलिड मर्डर मिस्ट्रीला सोल्व करून आपला रुबाबदारपणा वाढवायचा आहे… आत्ता जर तू समजली आहेस तर हो बोल आणि चल माझ्या सोबत…”

अनघा… “कदाचित आत्ता मला तुझी गोष्ट ऐकली पाहिजे… हो..! मी तैयार आहे तुझी साथ द्यायला…”

शर्वरी… “खूप खूप आभार देवाचे… जे तू राजी तर झालीस… आत्ता मला त्या सर्व गोष्टी सांग ज्या तुला माहिती आहेत… काहीच न लपवता मला पूर्ण गोष्ट सांग… ध्यानात ठेव, हि तुझी शेवटची संधी असेल आणि ह्यात फक्त तुझाच जीव नाही तुझ्या परिवाराचा पण जीव पणाला लागला आहे… त्यामुळे जे पण बोलशील एकदम खरं खरं बोल…”

अनघाने काही तरी विचार करून आपल्या सोबत झालेल्या सर्व घटनांचं विवरण समवेत गुरव साहेबांच्या घरात माहिती पडलेली सर्व गोष्ट ज्यामध्ये प्रिया, राहुलची आई, त्यांचं मृत्यू पत्र, प्रियाचं नातं आणि राहुलच्या प्रती तिची दिवानगी.. जेवढं पण तिला आठवलं… तिने सगळं सांगितलं… काहीच न लपवता… जेव्हा जवळ जवळ एक दीड तासानंतर अनघाने एक दीर्घ श्वास घेत आपल्या कहाणीला पूर्ण विराम दिला तेव्हा शर्वरी डोळे वटारून आणि अवाक होवून तिला पाहत होती… तिच्याने काहीच बोललं गेलं नाही कि ह्या कहाणीवर तिने काय टीका-टिपणी करायला पाहिजे… किती तरी ‘टर्न आणि ट्विस्ट’ दिसत होते तिला ह्या कहाणीमध्ये जशी कोणती मूवी चालू आहे… मग एक दीर्घ श्वास घेत तिने बोलायला सुरुवात केली… जे अनघा चूप-चाप ऐकत होती आणि समजून आपली मान पण हलवत होती… काही वेळाने जेव्हा शर्वरीने आपली गोष्ट संपवली तेव्हा अनघा आपल्या चेहऱ्यावर असमंजसचे भाव घेवून बसली होती… जो उपाय शर्वरीने तिला सांगितला होता त्याला अमलात आणण्याकरिता तिच्यासाठी किती सोप्प असणार किंवा किती कठीण… हाच विचार करत तिच्या मनातील भाव तिच्या चेहऱ्यावर विद्यमान झाले… तिला काहीवेळ असंच बसलेलं पाहून शर्वरीने तिला विचारले…

शर्वरी… “अच्छ अनघा…! मला एक गोष्ट सांगशील…? (अनघाने तिला प्रश्नात्मक मुद्रेने पाहिले..) तू खरोखरच मानते कि राहुलला काही तरी डोक्याचा आजार आहे... किंवा तो पागल आहे…?”

अनघा… “(विचार करत)… मी ह्या विषयी जेवढा पण विचार करते तेवढीच गुंतत जाते… मला त्या आजरा विषयी कधीच समजलं नाही ज्याला ‘schizophrenia’ बोलतात… बोलायला गेलं तर हे लोकं पागल असतात पण मोठ मोठे समजूतदार लोकं पण त्यांच्यासमोर आपले गुढगे टेकतात... (मग शर्वरीकडे बघत).. अचानक हा प्रश्न का…?”

शर्वरी… “‘schizophrenia’ हा आजार अस्तित्वात तर आहे पण राहुलला तो आजार आहे कि नाही… (अनघा काही बोलणार तेवढ्यात) तो ज्या जळालेल्या घरातून भेटला होता त्या घरात पोलिसांना काही माणसांचे अंग पण सापडले होते ज्यांच्या पडताळणीचा काहीच फायदा झाला नाही… त्या केसची चौकशी करणाऱ्या इन्वेस्टीगेटिंग ऑफिसरने आपल्या रिपोर्टमध्ये पण लिहिलं होतं कि त्या घरातून राहुल जिवंत सापडणंच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे… आता तू सांग, जर त्याला मरण्यासाठी तिथे फेकला गेला असेल तर त्याला तिथे जळायला पाहिजे होतं कि नाही… उलट तो काही साधारण जखमेसोबत सुकरुप बाहेर निघाला होता… बस मी त्याच ऑफिसरच्या ह्या अंडरलाईन कमेंटवर काम करत आहे…”

अनघा… “जर हि गोष्ट आहे तर राहुलची आई ज्यांच्या पण ताब्यात आहे तो खूप शातीर आहे आणि आपल्या कोणत्या तरी खास कामासाठी राहुलला जिवंत ठेवायला पाहत आहे…”

शर्वरी... “(अनघाची गोष्ट ऐकून तोंड वाकडं करून)…जेव्हा तू समता नगरमध्ये आली होतीस तेव्हा तुझी बुद्धी कुठे चरायला गेली होती काय …???”

अनघा… “म्हणजे काय…??”

शर्वरी… “म्हणजे हेच कि राहुलने स्वतःच ती घटना प्लान केली होती…”

अनघा… “(अचंबित होत) काय… पण त्याची आई…!!! त्यांचं काय झालं… (काही विचार करून… डोळे वटारून)… कुठे त्या त्याच आगीत तर जळून मेल्या नाहीत ना…??”

शर्वरी… “(स्मित हास्य देत)… जी पहिलेच मेली आहे ती पुन्हा कशी मरू शकते…!!”

अनघा… “(अचंबित होण्याच्या पराकाष्टेला पार करत)… काय…????”

शर्वरी... “(चिडलेल्या स्वरात)… आता असं कोणास ठावूक तुला किती तरी वेळा लांबलचक ‘काय’ बोलायला लागेल…!!”

अनघा तिची गोष्ट ऐकून तोंड वाकडं करत…

अनघा… “माझ्या जागी तू असतीस तर तुने सुद्धा हेच केलं असतं… हुंह…”

शर्वरी… “देवाचे खूप खूप आभार आहेत जे त्यांनी मला तुझ्या जागी ठेवलं नाही ते… (मग समजवण्याच्या अंदाजमध्ये)… अरे देवीजी …!!! त्या घरात एवढे लोकं होती… तू कोणाशी हि ह्या गोष्टीबद्दल क्रॉस-वेरिफ़िकेशन का नाही केलं… गुरव साहेबांची गोष्ट अजून पर्यंत काही तुझ्या पासून लपलेली आहे… त्यांच्या घरातील कुत्रा पण मारतो ना तर पूर्ण शहर गर्दी करतं आणि तुला काय वाटतंय त्या घरातील एका महिलेच्या मृत देहाचा अंतिम संस्कार एवढ्या गुपित प्रकारे होवू शकेल… कमाल आहे…”

अनघा… (उदास स्वरमध्ये…) आत्ता मी काय बोलू… मला स्वतःला खूप थकलेल्याची जाणीव होत आहे… त्याने माझ्या प्रेमाचा फायदा उचलला आहे… (रडत) शर्वरीजी…!! मी नाही तर पागल आहे आणि नाही मूर्ख… मी हारली आहे बस आपल्या हृदयाच्या हातून ज्याला त्या राक्षशाशी प्रेम झालं होतं, ज्याच्यासाठी कोणास ठावूक त्याच्या कोणत्या हेतूला पूर्ण करणारी फक्त एक मूळ मात्र होती…”

शर्वरी… “त्या हेतूचं पण उत्तर मिळेल अनघा…!!! जरूर मिळेल… आता तू माझ्या सोबत चल इथून पटकन…”

अनघा… “पण मला इथून जायला दिले जाईल का…??”
शर्वरी… “(थोडं हसत)… कायदेशीरपणे तर नाही पण बेकायदेशीर पणे जरूर होवू शकतं… (अनघाने थोडे डोळे वटारून पाहिल्यावर दचकून)… अरे बाबा..!!! किती तरी वेळा आम्हाला म्हणजेच पोलिसांना पण कायदा आपल्या हाती घ्यावा लागतो… आणि आम्ही हे काम आमच्या कामाच्या फायदेसाठी करतो… आता चल इथून… आणि मी सांगितल्यानुसार करून बघ मग माहिती पडेल कि काय खरं आहे आणि काय खोटं… आणि तसं पण आता तर तुला एका खूप खास व्यक्तीला पण भेटायचे आहे… माझ्यावर विश्वास ठेव… कमीत कमी त्याला भेटून तरी तू खुश होशील…” एवढं बोलून तिने आपला गोगल चुलबुल पांडेसारखा आपल्या डोळ्यांवर चढवला... :)

*****-----*****-----*****

गुरव साहेब आपल्या रूममध्ये बसलेले असतात… त्यांचं घर आत्ता त्यांनाच पूर्ण खाली खाली वाटायला लागलं होतं… सोनालीची आठवण त्यांना राहून राहून सतावत होती… ते आत्ता कोणास ठावूक किती तरी वेळ आपल्याच विचारात डुबले असते पण कोणाच्या तरी चाहुलीने ते आपल्या विचार चक्रातून बाहेर आले… त्यांच्या रूममध्ये त्यांचा लाडका 'छोटा' म्हणजे राहुल आला होता ज्याला पाहून गुरव साहेबांनी एक छोटं स्मित हास्य देवून…

गुरव साहेब… “आलास डॉक्टरांकडून…??”

राहुल… “हो…!! पण आता मी जास्त दिवस जाऊ शकणार नाही… रोज रोज मला तिथे जाणं बरं नाही वाटत….”

गुरव साहेब… “तिथे जाण्यामध्येच तुझा फायदा आहे राहुल… आता जास्त दिवस जायचे पण नाही आहे तुला…”

राहुल… “(रागात)… पण दादा…!!! आता काय गरज आहे मला तिथे जाण्याची… सगळं काही ठीक तर झालंच ना… जसं तुम्हाला पाहिजे होतं सगळं काही तसंच झालं ना… अनघाचा जीव तर वाचला ना आणि फक्त ६ किंवा ७ महिन्यातच तिची पागल खान्यातून सुटका होईल… आत्ता अजून तुम्हाला काय पाहिजे आहे कि मी पूर्ण जीवन तिच्या मागे पुढे चक्कर मारत राहू… तुम्हाला तर माहिती आहे कि ती किती खतरनाक पागल आहे…!!!”

गुरव साहेब… “ह्यामध्ये त्या बेचारिचा काय दोष आहे छोटे…!! जिला स्वतःलाच माहिती नाही आहे कि केव्हा काय करून बसेल… आम्ही तर तिला खूप आशेने इथे आणलं होतं… पण (दीर्घ श्वास सोडत)… आता जशी देवाची इच्छा… आम्ही पण भलं ह्यामध्ये काय करू शकतो… तुम्ही तिच्या घरी पैसे पाठवले होते ना…??”

राहुल… “(त्याच चिडलेल्या स्वरात)… हो…! पाठवले आहेत… नाही पाठवले असते तर तुम्ही मला अजून गोष्टी सुनावल्या असत्या… आता मी आपल्या रूममध्ये जात आहे… मी जेवून आलो आहे, तुम्ही पण जेवून घ्या…” तो एवढं बोलून रूममधून बाहेर निघतच होता कि गुरव साहेबांचा फोन वाजायला लागला… नंबर अनोळखी होता तरीपण त्यांनी तो उचलला…

गुरव साहेब… “नाही… नाही…!!! असं नाही होवू शकत… आम्ही आत्ताच तिथे येतो… (फोन कट करत)… अरे देवा…!! हे तू काय केलंस…???”

राहुल… “काय झालं दादा…!!! कोणाचा फोन होता…??”

गुरव साहेब… “मेंटल हॉस्पिटलमधून होता… अनघाने हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली…”

राहुल… “काय…!! पण तिने आत्महत्या का केली… तिला तर बाहेर येण्यासाठी मुश्किलने २- ३ महिनेच बाकी होते…”

गुरव साहेब… “माहिती नाही… आता हे सर्व तर तिथेच गेल्यावर माहिती पडेल ना… लवकर तिथे जाण्यासाठी गाडी काढायला सांग…”

थोड्यावेळातच गुरव साहेब आणि राहुल हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते… त्यांच्या समोर स्ट्रेचरवर एक देह चादरमध्ये ढाकून ठेवलेला होता… चादरीला रक्ताचे मोठ मोठे डाग लागले होते… विचारल्यावर माहिती पडलं कि अनघा गेल्या काही दिवसांपासून खूप उग्र व्यवहार करत होती… त्यामुळे तिच्याशी कोणालाही भेटण्याची अनुमती दिली जात नव्हती… आज कोणास ठावूक कशी संधी साधून ती आपल्या रूममधून बाहेर पडली आणि छतावर पोहोचली... आपल्याला चारही बाजूने भासात अडकलेलं पाहून तिने खाली उडी मारली आणि खाली जिथे हॉस्पिटलच्या बिल्डींगच्या बांधकामासाठी दगडं जमा केली गेली होती त्यांच्यावर आपल्या डोक्यावर पडली… डोकं फुटून जाण्यामुळे तिचा जागच्या जागी मृत्यू झाला…

राहुलने मृत देहाला पाहण्याची इच्छा जाहीर केली तर त्याला हे बोलून नकार देण्यात आला कि देहाची हालत खूप खराब आहे, तिचं डोकं खूप विचित्र प्रकारे फुटलं आहे ज्यामुळे देहाला बघणं उचित नसणार… गुरव साहेबांनी राहुलच्या डोक्याची हालत ध्यानात ठेवून त्याला नकार दिला आणि स्वतः आपली व्हील चेयर ढकलत पुढे आणून त्या देहावरून कपडा थोडासा बाजूला करून त्याला पाहिलं… सांगणारे एकदम खरं सांगत होते… मृतदेहाची हालत खरोखर खराब होती… त्याचं डोकं खूप विचित्र फाटलेला होता जसं कि त्याला कोणीतरी हातोडीने फोडलं आहे… मृतदेहाला ओळखणं पण कठीण होतं… गुरव साहेबांनी त्या मृतदेहाला पाहताच त्याला पुन्हा पटकन झाकलं आणि आपल्या डोळ्यात आलेल्या अश्रूंना पुसत हॉस्पिटलच्या वार्डनशी पुढची कार्यवाही करण्यासाठी बोलायला लागले… गुरव साहेबांनी जसाच त्या मृतदेहावर कपडा पुन्हा टाकला राहुल हुंदका देवून रडायला लागला… तो स्फुंदत स्फुंदत रडत होता… मृत देहाला आता पोस्ट मॉर्टमसाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले…

हे सगळं करून गुरव साहेब आणि राहुल आपल्या घरी परतले… दोघेही एकदम शांत होते… घरात एक विचित्र शांतता पसरली होती… ज्याची जाणीव होताच त्या घरात राहणं खूप कठीण जात होतं… गुरव साहेब आता सोनालीच्या जाण्याने पूर्णपणे शोकातून बाहेर आले नव्हते कि आज त्यांना अनघाची मृत्यू पण पाहायला लागली… एकमेकांना काहीच न बोलता दोघेही आपापल्या रूममध्ये निघून गेले…

राहुल जसाच आपल्या रूममध्ये पाउल ठेवतो… त्याचं सर्व दुःख उडून जातं… तो आता हसायला लागतो… कोणीच सांगू शकत नाही कि हा तोच राहुल आहे जो आता थोड्या वेळापूर्वी आपल्या बायकोच्या मृत्यूची बातमी ऐकताच पागल झाला होता… त्याने आपल्या कपाटातून एक व्हिस्कीची बॉटल काढली जी तो आपल्या खूप आनंदाच्या क्षणी प्यायचा… त्याचं आज प्यायचं मन होतं… जाहीर आहे त्याला आता स्वतःला खूप खुश असल्याची जाणीव वाटते… त्याने आपल्या रूमच्या क्याबीनेट मधून ग्लास काढून त्यामध्ये व्हिस्की टाकून दोन जळजळीत घोट घश्याला घासत पोटात घातले आणि त्याला जरा बरं वाटलं... डोकं एकदम हलके झाले. उरलेला घोटही एकादमात संपवला … त्याला व्हिस्कीचा कडूपणा पण आत्ता खूप मजेशीर वाटत होता… उभ्या उभ्यानेच ३ - ४ पेग व्हिस्कीचे घोट एकावर एक पोटात जात होते. मग ग्लास हातात घेवून तो आपल्या बेडजवळ जायला लागला कि तेव्हा त्याच्या हातून ग्लास निसटला आणि खाली पडला… तोंड वाकडं करत तो जसाच त्या ग्लासला उचलण्यासाठी वाकला कि कोणी तरी त्याचा हात पकडला, “अरे हे काय करत आहात तुम्ही छोटे मालक… आम्ही असतांना भलं तुम्ही हे काय करत आहात…” हो तुम्ही बरोबर ओळखलात त्याच्या समोर रम्या उभा होता…

रम्याला आपल्या समोर पाहून त्याने आपल्या डोक्याला एक झटका देत आपल्यावर चढलेल्या दारूच्या नशेला उतरवण्याचा प्रयत्न करायला लागला… पण डोक्याला झटकण्याच्या नंतरही रम्या त्याच्या समोर तसाच हसत उभा होता… रम्याच्या चेहऱ्यावर रक्त लागलेलं होतं… त्याच्या कपड्यान मधून पण एक विचित्र दुर्गंध येत होता… रम्याचा खिलंदरपणामुळे आज राहुलला खूप भीती वाटत होती… तो भीती पायी २ - ३ पावला मागे जायला लागला ज्यामुळे त्याचे पाय कश्यात तरी गुंतले गेले आणि तो पडणार तेव्हड्यात त्याच्या खांद्याला कोणीतरी पकडून त्याला पडण्यापासून वाचवलं… ह्या वेळी जेव्हा त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तिथे त्याला अनघा उभी असलेली दिसली… आत्ता तर राहुलची वाचाच बंद झाली... त्याला किंचाळायचे होते पण कंठातून शब्दच बाहेर फुटत नव्हते… अनघाचा चेहरा पण रक्त बंबाळ होता… तिचे केस खुललेले होते… डोळे लाल झाले होते… आणि ती ह्यावेळी पण राहुलला खूप प्रेमाने पाहत होती… त्या दोघांना एकत्र तिथे पाहणं ज्याला त्याने केव्हाच मृत मानलं आहे तर भल्या भल्या माणसांची वाचा बंद होते… हा तर तरीपण राहुल होता… राहुलने आपल्या खांद्यावरून अनघाच्या हाताला एक झटका दिला आणि रूमच्या दुसर्या कोपऱ्यात पळून जाउन उभा राहिला… तो रूममधून बाहेर पडण्याचा मार्ग बघत होता पण त्याच्या रस्त्यामध्ये रम्या उभा होता ज्याच्याशी ह्यावेळी राहुलला खूप भीती वाटत होती…

रम्या… “अरे छोटे मालक…!!! तुम्ही आमच्याशी एवढे घाबरत का आहात…!! आम्ही तर तुमचे सेवक आहोत ना… जे तुम्ही आमच्यावर हुकुम चालवायचे… मी तर त्याचीच तामिळ करत होतो मग तुम्ही का एवढं माझ्या वर नाराज झालात कि आज आमच्यापासून लांब पळत आहात… मला तुमच्या जवळ येवू द्या छोटे मालक…” आणि एवढं बोलून तो राहुलकडे जायला लागला…

राहुल… “नको नको… माझ्यापासून लांब राह… माझ्या जवळ येवू नकोस… जा इथून…पळ... दादा…!!!!”

रम्या… “अरे तुम्ही गाढव सारखे का ओरडत आहात छोटे मालक… पहिले तर कधीच तुम्ही ओरडत नव्हता जेव्हा मी इथे तुमच्या रूममध्ये तुमचा तूनतुणा … (आपल्या कपाळावर हात मारत) अरे देवा…!!! मला अजूनपर्यंत त्या इंग्रजी वाद्याचं नाव माहिती नाही… (अनाघाकडे पाहत)… अरे ताई…!! काय भूत बनून उभी आहेस… जरा मला सांग ना… ते तूनतुणाला काय बोलतात…”

अनघा… “(एक एक शब्त चावत)… त्याला गिटार बोलतात रम्या...!! पण आत्ता तू माझ्या राहुलला अजून त्रास देवू नकोस… बघत नाही आहेस का तू आज तो किती थकलेला दिसत आहे… हा चिंतीत आहे कारण आज हा आपल्या बायकोच्या मृत्यूने दुःखी झाला आहे… (राहुलकडे बघत)… हो ना राहुल…??”

रम्या… “(नाना पाटेकर सारखा हात नाचवत)… अरे भलं हे का चिंतीत होणार… चिंतीत तर मी होतो जेव्हा माझं डोकं फुटलं तेव्हा.. साले हरामखोर ..!!! त्या गुंडे लोकांनी मला एवढ्या जोराने मारलं कि आज एवढे दिवस झाले मला माझे शरीर सोडून तरीपण वेदना काही जातंच नाही… अरे छोटे मालक…!! जरा माझी व्यथा-वेदना दूर करा ना… आता माझ्या जवळ या… मला तुमच्या पासून लांब राहायला आता मजा येत नाही… बघ ना… अनघा ताई पण माझ्या जवळ आली आहे… आत्ता तू आमच्या जवळ ये…” एवढं बोलून रम्या आपले दोन्ही हात वर करून राहुलला मिठी मारण्यासाठी राहुलच्या जवळ जायला लागला… ज्याला बघून राहुल घाबरून गुरव साहेबांना ओरडून ओरडून आवाज द्यायला लागला…

अनघा… (दात खात रागाने).. आज त्यांना का बोलवत आहेस ज्यांचा तू तिरस्कार करण्याचा दम भरत होतास राहुल… तुझा तो अपंगत्व भाऊ पण तुला आज वाचवू नाही शकत…!!” एवढं बोलून अनघा पण राहुलकडे जायला लागली… त्या दोघांना आपल्याकडे येतांना पाहून राहुलची वाचा बंद पडते… शब्द तोंडातल्या तोंडातच राहतात... तो त्याच जागी बसून हमसाहमशी रडायला लागतो…

रम्या… “अरे ताई…!! आत्ता ह्याला जास्त घाबरवू नकोस नाही तर हा आपल्या प्यांटमध्येच मुतेल… बघा छोटे मालक…!! ताई पासून वाचण्याचा एकच उपाय आहे… तुम्ही केलेल्या गुन्ह्याची माफी हिच्याशी मांगा… बस ह्यांच्यावर लागलेला डाग पुसण्यासाठीच त्या इथे आल्या आहेत… नाहीतर बाकी जसं तुम्हाला ठीक वाटेल… ते तुम्ही करा…!!”

राहुल अनघाला आपल्या जवळ येतांना पाहून घाबरत होता… अनघा त्याच्या जवळ जीव घेणाऱ्या अंदाजामध्ये त्याच्यावर चालून येत होती… तेव्हा राहुलला आपल्या बंदुकीची आठवण झाली जी त्याच्या जवळ बनलेल्या एका कॅबिनेटमध्ये ठेवलेली होती… त्याने लगेच ती बंदूक बाहेर काढली. हि तीच बंदूक होती ज्याने त्याने सोनालीला गोळी मारली होती… त्याने बंदूक काढून लगेच अनाघावर गोळ्या झाडल्या… राहुलने सर्वच्या सर्व गोळ्या अनाघावर झाडल्या पण अनघा फक्त हसतच राहिली… गोळ्यांचा पण तिच्यावर काहीच परिणाम होत नसतांना पाहून राहुलला आता आपला जीव कंठाशी आलेला वाटायला लागलं होतं…

रम्या… “(आपल्या कपाळावर हात मारत).. हे घ्या…!! एकदम पागल झाले आहेत आमचे छोटे मालक… अरे छोटे मालक… जो पहिलेच मेला आहे त्याला पुन्हा कसे मारू शकता तुम्ही… अजूनही माझी गोष्ट ऐका आणि ह्यांच्यावर लागलेला आरोप खोटा आहे ते सांगा… नाही तर आज माझी ताई आपला बदला घेवूनच राहणार…”

राहुल… “(आपले दोन्ही हात जोडून).. मी सगळं करणार अनघा… तू जे सांगशील ते सगळं मी करेन… पण मला मारू नकोस प्लीज… मी मान्य करतो कि मीच सोनाली वहिनीला गोळी मारली होती आणि तुला फसवलं होतं… तुझी साथ मिळवण्यासाठीच मी स्वतःच आपल्या जेवणात विषाची छोटी मात्रा टाकून फूड पोईजनिंग केली होती… तो मीच होतो ज्याने त्या व्यापाऱ्याला मारलं होतं… सोनाली वहिनी तर फक्त त्याला समजवायला गेली होती कि माझी काहीच मदत करू नकोस म्हणून…”

अनघा… “ह्याचा अर्थ काय आहे…?”

राहुल… “तो आमच्यासाठीच काम करत होता आणि त्याला मीच सांगितले होते कि तुला हॉटेलमध्ये प्रियाच्या नावाने हाक मार आणि बाकीच्या लोकांना पण प्रियाच्या अस्तित्वावर संशय झाला नाही पाहिजे… आणि हे पण कि प्रिया तुझी प्रतिरूप आहे…” अनघा आणखीनच विचित्र पणे बिचकली पण आपल्या भुताच्या क्यारेक्टरमध्ये तिने असं दर्शवणे चुकीचं असतं… त्यामुळे तिने दात खात बोलण्यास सुरुवात केली…

अनघा… “पण प्रिया आता आहे तरी कुठे…????”

राहुल… “प्रिया कधी नव्हतीच…!!” प्रश्नच प्रश्न...!!!

क्रमशः

Previous Chapter                          Next Chapter

1 comments:

  1. Very very nice,I just can't for next post

    ReplyDelete