Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 26 December 2012

शेवटचा भाग ~ ~ ४८ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????

शेवटचा भाग ~ ~ ४८

घटनेच्या पुढे....

अनघा... "(हैराणीने)... काय...!!!! तू मला एवढा मोठा धोका दिलास... आता तर मी खरोखर तुझी हत्या करणार... तू जगण्याच्या लायक नाही आहेस..." अनघा खूप संतापलेली होती...

हे ऐकून अनघाच्या संतापाची हद्दच पार झाली होती... स्वतःला मूर्ख बनवल्यामुळे आणि ते पण भावनात्मक धोक्याने... कोणाला पण मंजूर होणार नाही... आणि आज ह्या खरेपणाची उकल झाली होती कि अनघाच्या भावनेची राहुलने खूप क्रूरतेने हत्या केली होती... ती आता प्रत्येक सीमा पार करण्यासाठी तैयार होती आणि राहुलची हत्या आपल्या हातानेच करायला पाहत होती... तिथेच असलेल्या एका काचेच्या टेबलावरून एक फ्लावर-पॉट उचलला आणि फरशीवर भीतीने बसलेल्या राहुलला मारण्यासाठी पुढे जायला लागली... दारूच्या नशेमुळे राहुल पहिल्या पासूनच घाबरलेला होता, त्याने अनघाला आपल्यावरती चालून येतांना पाहून घाबरून आपले डोळे मिटले.


तेव्हा त्याला रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला ज्याला ऐकून त्याने आपले डोळे उघडले... त्याच्या रूममध्ये आता किती तरी पोलिसवाले घुसत होते... आणि अनघाच्या हातांना पकडून रम्या तिच्यापासून फ्लावर-पॉट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता...


रम्या... "शांत हो ताई... शांत... अरे ह्या जनावराची हत्या करून का आपले हात रंगवत आहेस... ह्याला जनावर बोलणं पण जनावरांचा अपमान केल्या सारखं होईल ताई...!!! तू शांत हो... बघ हवालदारीण बाई... उप्स... म्हणजे डी.एस.पी. म्याडम पण इथे आल्या आहेत..."


अनघा आज पहिल्यांदा एवढ्या आवेशात होती कि रम्याला तिच्या हातून फ्लावर-पॉट पण हिसकावून घेणं कठीण जात होतं... पोलिसांनी अनघाच्या हातून तो फ्लावर-पॉट हिस्कावण्यासाठी रम्याची मदत केली... अनघा अजूनही रागाने कापत होती... जर ह्यावेळी तिला पागल सिद्ध करायला झाले असते तर हि कोणती कठीण गोष्ट नव्हती, कोणीही तिला पागल बोलू शकलं असतं... तेव्हा शर्वरी आतमध्ये आली जिच्यासोबत एक क्यामेरामेन पण सोबत होता... त्या सर्वांना पाहून राहुल आपल्या जागी उभा राहून सर्वांना डोळे वटारून वटारून कधी अनघाला तर कधी रम्याला आणि बाकीच्या पोलिसांना पण पाहत होता...


रम्या... "अजून डोळे वटारून पाहू नकोस नाही तर बाहेर येतील... अरे आता अजून किती खेळणार छोटे मालक... देवाची खूप कृपा आहे आमच्यावर छोटे मालक जे आम्ही तुमच्या तावडीतून वाचून इथे आलो... तरी पण एका गोष्टीसाठी तुम्हाला पुरस्कार द्यायला पाहिजे... साला तुम्ही ताईला फसवण्यासाठी मलाच गंडवत होता... तुम्हाला काय वाटतं मी
असंच हिला खोटं खोटं ताई बोलायचो... मला क्षमा कर ताई... मला पण हा हरामखोर खोटं सांगत होता... जेव्हा बघू तेव्हा प्रिया प्रियाचं गुणगान गावून माझ्या डोक्याचं भजं केलं... मी एवढा मूर्ख नव्हतो जेवढा हे मला बनवत होते... मी तर तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न पण करत होतो पण तुम्ही..."

शर्वरी... "(रम्याची गोष्ट ऐकून इरीटेड होवून...)... रम्याजी... कृपाया तुमच्या तोंडाला बंद करण्याचं कष्ट घ्याल... आता तुमची स्टेटमेंट मांगितली गेले नाही आहे... जेव्हा मांगितली जाईल तेव्हा बोला... समजलात कि नाही..."


रम्या... "(आपले पाय आपटत)... मला कधीच बोलायला दिले जात नाही... हुंह..."


शर्वरी... "(हसत...)... त्या बंदुकीतच नाही राहुलजी तुमच्या पूर्ण घराच्या बंदुकीत नकली गोळ्या टाकल्या गेल्या आहेत... त्यामुळे ह्याच्याने कोणती माशी पण मारणार नाही...!!! त्यामुळे तुम्ही कष्ट नका करू..."


राहुल... "तुम्ही सर्वांनी मला फसवण्यासाठी एवढं मोठं नाटक केलं... मी तुमच्या पैकी कोणालाच सोडणार नाही... एक एकाकडून बदला घेणार..."


शर्वरी... "पहिले जेलमधून मुक्त हो तेव्हा भेट... तुझ्यावर तर किती तरी हत्येचं पक्का केस चालेल... तू स्वतःच तुझ्या तोंडून मान्य केलं आहेस... बस आत्ता ट्रेनमधील हत्येचं पण मान्य करच... (व्यंग करत)... ते काय आहे ना ह्या कामासाठी मी कुलकर्णीच्या आत्म्याला बोलावून मला त्यांना काहीच कष्ट द्यायची नाही आहे..." शर्वरीचा संताप पाहून राहुलपण घाबरला होता...


राहुल... "(हळू आवाजात)... ती हत्या मी नाही केली...!!"


अनघा... "(रागाने)... तू आणि तुझ्या गोष्टी... हुंह... (मग काहीतरी आठवत)... शर्वरीजी... लवकर गुरव साहेबांच्या रूममध्ये चला... कारण जर प्रिया...!!! जसं कि हा बोलत आहे कि ती आहेच नाही तर जी कहाणी त्यांनी मला सांगितली होती त्याचा अर्थ काय आहे...??? जरूर ह्या कामामध्ये ते पण ह्या हरामखोराचे साथीदार असणार... लवकर करा... आता माझ्याने जास्त वाट पाहवत नाही आहे... आज ह्या घरातील सर्व काळ्या करनाम्यावरून परदा उठलाच पाहिजे..."


शर्वरी... "चल...!!! त्यांना पण भेटूया आता..."


मग राहुलला कस्टडीमध्ये घेवून... त्या रूममधून सर्व लोकं गुरव साहेबांच्या रूमकडे जायला लागले... अचंबेवाली गोष्ट आहे कि खूप वेळ ह्या घरात एक हंगामा चालला होता पण गुरव साहेब आपल्या रूममधून बाहेर निघालेच नाहीत... त्यांच्या रूमची शांतता आश्चर्यचकित करण्यासारखी होती... रूमच्या दरवाजावर थाप मारण्यासाठी जेव्हा हात लावण्यात आला तेव्हा तो दरवाजा उघडाच सापडला... आतमध्ये चेक केल्यावर गुरव साहेब कुठेच दिसले नव्हते... त्यांची व्हील चेयर पण तिथेच होती ज्याला पाहून अनाघासोबत सर्वजण अचंबित होते...


अनघा... "(हळू आवाजात)... आपल्या व्हील चेयरशिवाय गुरव साहेब गेले तरी कुठे...!!!"


शर्वरी... "आता ते कुठे गेले... ह्या गोष्टीची माहिती आम्हाला कदाचित राहूलच देवू शकतो...(आणि राहुलकडे पाहत)... सांग... गुरव साहेब आम्हाला कुठे भेटणार...??"


राहुल... "मला नाही माहिती कि ते कुठे गेले आहेत... खरंच मला नाही माहित..."


शर्वरी... "(डोळे वटारून)... बेटा... तुला सर्व आठवेल जेव्हा तुझी पोलिसी काख्याने चौकशी केली जाईल तेव्हा... अजून पर्यंत तर तू तुझ्या दादामुळे वाचला आहेस..."


मग शर्वरीने मोबाइल वर सर्व चेकपोस्ट्स आणि सर्व पेट्रोलिंग टीम्सला गुरव साहेबांचं वर्णन सांगत त्यांना जिथे पण भेटतील तिथेच पकडण्याचे आदेश दिले... आणि राहुलला ताब्यात घेण्यात आलं...


गुरव साहेब तर पायांच्याविना असे पळाले कि पोलिसांना कुठेच सापडले नाही... पोलिसांच्या अथक परिश्रमाने पण त्यांना गुरव साहेबांची माहिती सापडत नव्हती... शेवटी माहिती हि सापडली होती कि गुरव साहेबांनी त्याच रात्री समता नगरहून एक खाजगी प्लेन बुक केलं होतं दिल्हीसाठी... ते दिल्हीला गेले तरी होते कि नाही, ह्या गोष्टीची पण काहीच माहिती नव्हती...


शर्वरीची पडताळणी सफल झाली आणि राहुलने ट्रेनमधील हत्येला सोडून सर्व गुन्हे स्वीकार केले... आणि त्याचा कबुलनामा जेव्हा अनघाच्या समोर आला तेव्हा अनाघाचेच नाही तर सर्व लोकांचे डोळे मोठे झाले होते...


कबूलनाम्यानुसार तो व्यापारी...!! गुरव परिवाराचा एक मामुली प्यादा होता जो बेकायदेशीरपणे जमिनी ताब्यात घेवून बिल्डरांना विकण्यामध्ये मदत करत होता... गुरव साहाबांचे एन.जी.ओ. फक्त दाखवण्यासाठी त्यांच्यावर केसेस चालवायचे कारण शहरातील लोकं गुरव परीवाराच्याच एन.जी.ओ. जवळ आले पाहिजेत आणि ते आरामात त्या लोकांचे केसेस कमजोर करत होते... ह्याच धंद्यामध्ये जेव्हा त्या व्यापाऱ्याने गुरव परिवारालाच डोळे दाखवायला लागला तेव्हा त्याचं काम संपवण्यात आलं... आणि काम कसं संपवण्यात आलं हे तर तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे...


राहुलने पहिल्या पासूनच आपला कार्यक्रम त्याला (व्यापाऱ्याला) सांगून ठेवला होता कि आज तो अनघाला घेवून येणार आणि त्याला कोणत्या प्रकारे अनघाला प्रिया म्हणून हाक मारायची आहे आणि राहुल त्याच्यासोबत भांडण करून अनघचा संशय निराधार साध्य करू शकेल... पण त्याला काय माहिती होते कि आजची रात्र त्याची शेवटची रात्र असेल ती... यद्यपि हे काम राहुलने आपल्या मर्जीने केलं होतं... सोनाली आणि गुरव साहेबांना हे करायचे नव्हते पण राहुलने आत्ता त्याला कोणत्याही किंमतीत संपवण्याचा मन बनवलं होतं... त्या रात्री जेव्हा सोनाली त्या व्यापाऱ्याला भेटायला गेली होती तेव्हा राहुल तिच्या पाठोपाठच गेला होता... जशीच सोनाली बाहेर निघाली राहुलने त्या रूममध्ये घुसून त्याची हत्या केली...


आता राहिला प्रश्न सोनालीचा..!! सोनालीला तिच्या मृत्युच्या सकाळी राहुलने तिला हे सांगून बोलावले होते कि "काहीतरी जरुरी काम आहे..." मग जेव्हा सोनाली त्याच्या रूममध्ये आली तेव्हा राहुलने त्याची बंदूक जी त्याच्याजवळ पहिल्या पासून होती... तिच्यावर ताणली आणि गोळी मारली... राहुलच्या अनुसार सोनाली त्याच्या कामांमध्ये खूप जास्तच दखल द्यायची त्यामुळे त्याने सोनालीला मारण्याचा निर्णय घेतला... त्याच्या अनुसार गुरव साहेबांची मूकसंमती पण ह्या कामासाठी त्याच्या सोबत होती... यद्यपि लोकांनी ह्या गोष्टींवर विश्वास नाही केला कारण गुरव साहेब गायब होते...


त्याच दरम्यान एक दिवस एक बिल्डर तिथे येवून गुरव साहेबांच्या सर्व प्रोपर्टीवर आपला हक्क बजवायला लागला... त्याच्यानुसार गुरव साहेबांनी आपली सर्व प्रोपर्टी त्याला काही दिवसांपूर्वी विकली होती ज्याच्या ऐवजी त्यांनी अरबो रुपये वसूल केले होते... पोलिसांच्या पडताळणीमध्ये त्याची गोष्ट खरी पण सिद्ध झाली पण गुरव साहेबांच्या ब्यांकेच्या खात्याची चौकशी केल्यावर तिथे काहीही सापडलं नाही... चौकशी केल्यावर माहिती पडलं कि त्या खात्यातील सर्व पैसे कोणत्या तरी विदेशी खात्यात ट्रान्स्फर केले होते...


*****------*****-----*****


आज खूप दिवस झाले होते राहुलला शिक्षा होवून... त्याच्या डोक्याच्या आजारामुळे कोणीच कोणत्याही ठोस निर्णयावर पोहोचत नव्हते... आश्चर्यजनक रूपाने ज्या डॉक्टरांनी अनघाला खूप सहजपणे पागल सिद्ध केलं होतं त्याच डॉक्टरांना आता राहुलच्या मामल्यात काही पण साफ साफ बोलण्यासाठी त्यांनी आपले हात सारले होते... त्यामुळे न्यायलयाने त्याच्या अस्थिर डोक्याला पाहून त्याला पागलखान्यातच जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती... अनघा एक दिवस त्याला भेटण्यासाठी गेली होती तेव्हा त्याने आपल्या हरकतीवर तिच्याकडे क्षमा सुद्धा मांगितली होती अनघाने पण त्याला माफ करत त्याला फक्त एकंच विचारले होते... "जी कपड्यांची गोष्ट होती... त्याचा काय अर्थ होता तुझा...??"


"अर्थ काहीच नव्हता बस तुला जास्तीत जास्त कन्फ्युज करून तू डोक्याने आजारी आहेस हे साध्य करायचे होते..." राहुलने आपली मान झुकवत उत्तर दिलं... "लग्नाच्या पहिल्या दिवशी पण त्या पागलपणाच्या हरकतीची रीकॉर्डींग पण फक्त तुला पागल साध्य करण्यासाठी केलं होतं..."... ह्याच्या नंतर अनघानेहि त्याला अजून काहीच विचारले नाही आणि चुपचाप आपले डोळे पुसत निघून गेली...


राहुलने त्या जागेची पण माहिती सांगितली होती ज्या जागी अनघाच्या वडिलांना ठेवलं गेलं होतं... तिथून ते सकुशल मिळाले पण होते आणि अनघाच्या आईने आपली मजबुरी सांगत आपल्याच मुलीकडून क्षमा मांगायला लागली ज्याला अनघाने त्यांना थांबवत मिठी मारली...


*****-----*****-----*****


शर्वरीला ह्या केसचा खुलासा केल्यामुळे चहुबाजुने प्रशंषा ऐकायला मिळत होती... तिच्या विभागाने पण तिचं चांगलं काम पाहून तिला आउट ऑफ द टर्न प्रमोशन पण दिलं... आता ती डी.एस.पी. पासून एस.पी. बनली होती... तिच्या मनात एक आस राहून गेली कि गुरव साहेब तिच्या हातामध्ये सापडले नाहीत... अश्याच एका दिवशी ती आपल्या घरी बसली होती... तेव्हा तिचा फोन वाजायला लागला... स्क्रीनवर प्राइवेट नंबर लिहून आलं होतं... फोन उचलल्यावर "कश्या आहेत डी.एस.पी. म्याडम...!!! अरे क्षमा करा आता तर तुम्ही एस.पी. बनल्या आहात..." तिथून जो होता त्याचा आवाज ऐकून शर्वरी आपल्या खुर्चीवरून ताडकन उठून उभी राहिली...


शर्वरी.. "कुठे निघून गेलात तुम्ही गुरव साहेब...? मी तुम्हाला खूप मिस करत आहे..." आणि एवढं बोलून ती पुन्हा खाली बसते...


गुरव साहेब... "(जोर जोराने हसत)... मिस करण्यासाठीच तर तुम्हाला नजराणा दिला होता एस.पी. म्याडम... स्वस्तामध्ये सुटू दिलं नव्हतं तुम्ही मला..."


शर्वरी.. "(हसत)... हळू बोला राव... आज काल दिवाळांचे तर नाही पण मोबाईलचे दहा दहा कान असतात... आणि तरी पण जेव्हा मी हे समजले कि तुमचं काही पण बिगडवण माझ्याने नाही होणार तेव्हा भलं तुमचा नजराणा स्वीकार करण्यात मला काय आपत्ती असणार... (व्यंग करत)... though i wasn't cheap but exlusive..."


गुरव साहेब... "सेलेबल तर सगळेचजण असतात एस.पी. म्याडम... बस त्याची किंमत एकदम बरोबर लागली पाहिजे... तरीपण १५० करोड काही छोटी रक्कम नाही होत ना..."


शर्वरी... "एकदम बरोबर बोललात तुम्ही... जेव्हा तो कागद मला रम्याच्या खिश्यातून सापडला होता ज्यामध्ये 'The Artificial Limbs Manufacturing Corporation of India' चं बिल मिळालं होतं आणि त्याच्यावर सोनालीच्या मर्डर केसपासून जवळ जवळ ५ महिन्याच्या पहिलेचि तारीख पडली होती... तेव्हा मला समजले कि हे सर्व तुम्हीच केलं आहे... पण मला तुमच्या विरुद्ध काहीच पुरावा सापडत नव्हता ज्यामुळे मी सरळ सरळ तुमच्यासारख्या शातिर माणसाचं काहीच करू शकत नव्हते... त्यामुळेच तुम्हाला घाबरवण्यासाठी मी तो कागद तुम्हाला दाखवला होता ज्यामुळे हेच साध्य होतं कि तुम्ही चालू आणि फिरू शकता... पण तो कोणताच गुन्हा नसतो... त्यामुळे न्यायालातून सुटका मिळवणे तुमच्यासाठी मामुली गोष्ट असती.. पण तुम्ही माझ्या त्या धमकीला थोडे घाबरलात आणि माझ्यासमोर एवढा मोठा ऑफर ठेवला कि मी स्वतःचा आणि माझ्या येण्याऱ्या सात पिढ्यांचं भलं करू शकते... आणि तुम्ही तर स्वतःसाठी सेफ प्यासेज मांगून माझ्यावर कोणतंच मोठं काम सोपवलं नव्हतं ज्याला मी करू नाही शकत असं नाही होवू शकत आणि वरून आपल्या घरातील रास्ते आमच्यासाठी उघडून राहुलला फसवण्यामध्ये मदत पण केली... त्यामुळे तुम्हाला शिक्षा देण्याची गोष्ट आपल्या मनातून काढून तुमची गोष्ट मान्य केली... बस मला माझ्या मनावर एकच पचतावा असेल कि... (चिडलेल्या स्वरात)... एक अपंग व्यक्ती माझ्या हातून निसटला तरी कसा..."


गुरव साहेब... "(कठोर स्वरात)... माझी अपंगता माझ्यासाठी श्राप बनून आली होती शर्वरी... मी ज्या भावासाठी आपल्या जीवनात एवढे त्याग केले होते त्याने माझ्यासोबत खूप मोठा धोका केला होता... माझ्या ह्या अपघातात त्याचाच हात होता... त्याने आणि कुलकर्णीने एकत्र मिळून माझ्यासोबत हे केलं होतं त्यामुळे मी कुलकर्णीला
तुम्हाला माहिती आहे कुठे पोहोचवलं... आणि...(हळू हसत)... राहुलचं तर तुम्हाला जास्त माहिती आहे..."

शर्वरी... "जरा तपशीलने सांगाल काय तुम्ही... ते काय आहे ना... ह्या केसने माझी बुद्धी भासित करून ठेवली आहे..."


गुरव साहेब... "(हसत)... असं आहे काय... चला तुम्ही माझी मदत केली आहे... त्याच्यासाठी भलं तुम्ही पैसे घेतले आहेत पण मदत तर मदतच आहे... लक्षपूर्वक ऐक... आज तुला ऐकवतो पूर्ण कहाणी... मला मध्येच टोकू नकोस..."


शर्वरी... "(चिडत)... आता सुरु पण करा... का फुटेज खात आहात.."


गुरव साहेब... "हि कहाणी सुरु होते जेव्हा माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं.. त्यांनी पहिले त्यांच्या संपतीचा वारसदार मला केलं होतं पण राहुलच्या जन्मा नंतर... छोट्या आईच्या सांगण्यामुळे त्यांनी संपत्तीचे ३ भाग केले होते... एक माझ्यासाठी आणि एक-एक भाग राहुल आणि छोट्या आईसाठी... त्यावर पण मी काहीच खेद प्रकट केला नाही... इथपर्यंत पण कि जेव्हा छोट्या आईने राहुलसाठी आपली चिंता व्यक्त केली... तेव्हा मी काहीच वेळ न दवडता त्यांना आजीवन संतानहीन राहण्याचं वचन पण देवून टाकलं... पण त्यांच्या मृत्यू नंतर मला माहिती पडलं कि छोट्या आईने माझ्या नावावर काहीच न सोडता आपली पूर्ण संपत्ती राहुलच्या नावे करून टाकली...


शर्वरी... "(अचंबित होत)... म्हणजे काय...!!"


गुरव साहेब... "(थट्टा करत)... बघ मी पहिलेच बोललो होतो कि मला मध्येच टोकू नकोस... आता विक्रम सारखी बोलशील तर हा वेताळ उडून जाईल आणि मग जीवनभर आपलं डोकं आपटत बसशील कि शेवटी खरी कथा काय होती.."


शर्वरी... "तुम्ही बोला... मी तुम्हाला टोकणार नाही..."


गुरव साहेब... "द्याट्स लाइक गुड गर्ल... हम्म तर मी कुठे होतो राहुल लहानपणा पासून सभ्य तर नाही पण माझ्या प्रभावात जरूर होता... त्याच्या डोक्यात ज्यापण मी गोष्टी टाकायचो त्याला तो ब्रह्म वाक्य मानायचा... ह्याच गोष्टीला ध्यानात ठेवून छोट्या आईने एक असा मृत्यू पत्र तैयार केला ज्यामध्ये मी काहीच करू शकत नव्हतो... त्या मृत्यू पत्राच्या अनुसार राहुलची संपत्ती त्याच्या बायकोच्या नावी होणार होती आणि ती बायको शोधण्याची जवाबदारी मामा आणि मावशीची होती... राहुल आणि त्याची बायको मेल्यावर पण मला ती संपत्ती मिळणार नव्हती... कोणत्याही असामान्य परीस्थित त्यांच्या असामान्य मृत्यूने संपत्ती कोणत्या तरी ट्रस्टला मिळणार होती... फक्त
एकाच कंडीशनमध्ये ती मला मिळणार होती जर राहुल आणि त्याच्या बायकोला दोघांनाही पागल साध्य केलं तर..."

शर्वरी... "(दीर्घ श्वास सोडत)... तर हि गोष्ट होती ह्या सर्व लफड्यांच्या मागे..."

गुरव साहेब... "(रागवत)... तू पुन्हा बोललीस..."

शर्वरी... "अरे बाबा...!!! मी एक माणूसच आहे... झटका मिळणाऱ्या गोष्टींवर पण काय मला प्रतिक्रिया नाही केली पाहिजे... तुम्ही पुढे सांगा..."

गुरव साहेब... "त्यामुळे मी त्याच्या डोक्यात हि गोष्ट भरत गेलो कि जर तुझी बायको नॉर्मल असेल तर सगळी संपत्ती तिलाच मिळणार... त्यामुळे तिला पागल सिद्ध करून आम्ही संपत्तीला राहुलच्या नावी करू शकतो... राहुलच्या डोक्यात जेव्हा हि गोष्ट मी भरली तेव्हा मी एक पात्र शोधण्यासाठी आपलं डोकं पळवायला लागलो... मला पाहिजे होती एक अशी मुलगी जिच्यावर पहिल्या पासूनच हजारो चिंता असतील आणि ती खूप गरजू आणि गरीब पण असायला पाहिजे... कारण तिच्यावर जेव्हा मी डोक्याचे कॉम्पलीकेशन लादायला सुरुवार करेल तेव्हा रागावली पाहिजे तिला मानसिक रूपाने अस्वस्थ सिद्ध करणं मला जास्त कठीण नसेल..."

थोड्या वेळच्या शांतते नंतर गुरव साहेबांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली, आता शर्वरीने त्यांना टोकलं सुद्धा नाही आणि त्यांच्या बोलण्याची प्रतीक्षा करायला लागली...

गुरव साहेब.. "मी गुन्हेगार नाही आहे शर्वरी पण मी ज्यांच्यावर सर्वात जास्त भरोसा केला... ज्यांच्यावर जास्त प्रेम केलं त्याच लोकांनी मला धोका दिला... जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा पण हा विचार करून शांत राहिलो कि माझ्या सोबत माझी प्रेमिका सोनाली आणि मुला सारखा 'छोटा' आहे पण..."

ह्या वेळी गुरव साहेब पुन्हा शांत झाले... काही वेळ त्यांच्या बोलण्याची प्रतीक्षा केल्यानंतर जेव्हा शर्वरीला वाटले कि गुरव साहेब भावुक झाले आहेत तेव्हा तिने गप्प राहण्यापेक्षा बोलणेच उचित समजलं...

शर्वरी... "पण काय गुरव साहेब...??"

गुरव साहेब... "त्या दोघांनी मला माझ्या अपंगत्वामुळे काहीच करू न शकणारा समजलं... ज्या एन.जी.ओ.ला मी आपल्या परिवाराची प्रसिद्धी वाढवण्यासाठी सुरु केलं होतं.. त्याला त्या दोघांनी पैश्याच्या पायी चुकीच्या कामासाठी वापर करायला सुरुवात केली..."

शर्वरी... "पण राहुल बोलला कि ह्या कामासाठी तुमची संमती होती..."

गुरव साहेब... "(रागाने...) खोटं बोलत आहे तो... त्या लोकांनी माझ्या अपंगत्वेची थट्टा करत माझ्यासमोर काहीच पर्याय सोडला नव्हता... मी कधी पर्यंत त्यांच्यावर अंकुश लावू शकलो असतो... माझी सीमा फक्त घरातच सीमित होती... त्या कामांसाठी मी फक्त आपली मूक संमती दिली होती... हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला माहिती पडलं कि आमच्या फार्म हाऊजचा उपयोग राहुल 'नेत्या' लोकांच्या मौजमस्ती करण्यासाठी वापर करत होता ज्यांच्या मदतीने तो जमीन काबीज करण्याचं काम करायचा... उलट तो फार्म हाऊज माझ्या स्वर्गवासी आईच्यासाठी माझ्या वडिलांनी खूप मोठ्या उत्साहाने विकत घेतला होता आणि राहुलला हि गोष्ट माहिती होती... पण... हुंह..."

शर्वरी... "पण सोनालीला तुम्ही का मारायला सांगितलं... तिचा काय दोष होता...??"

गुरव साहेब... "(उदास स्वरमध्ये...)... तिनेच तर कुलकर्णीला राहुलशी भेटवलं होतं शर्वरी..."

शर्वरी... "काय.. पण ती तर तुमच्या वर जीव लावायची ना..."

गुरव साहेब... "मला पण असंच वाटायचे शर्वरी... पण इथे चूक माझी पण होती... तिला विश्वासघातकी बनण्यासाठी मीच परावृत्त केलं होतं... खरं म्हणजे छोट्या आईला दिलेल्या वचनामुळे ती माझ्याशी नाराज राहायला लागली होती... ह्याच दरम्यान कोणास ठावूक तिची ओळख कुलकर्णीशी कशी झाली आणि कुलकर्णीने पण तिला आपल्या जाळ्यात अडकवले आणि ती त्याच्या हाताची कठपुतली बनून राहिली... ती एवढ्या पुढे निघून गेली होती कि तिचं मागे फिरणं कठीण होतं... (अचानक हसत) एक मजेशीर गोष्ट माहिती आहे काय...? अनघाला पागल करण्याच्या प्लानमध्ये त्या दोघांनाही मी वेग-वेगळी गोष्ट सांगून शामिल केलं होतं... दोघेही आपल्या लोभात होते आणि मला पुढे जाउन मूर्ख बनवायला पाहत होते... पण मी त्यांना संधीच दिली नाही..."

शर्वरी... "मध्येच टोकून क्षमा मांगते पण तुमची गोष्ट जरा वाकडी तिकडी जात आहे... कदाचित तुम्ही आता आवेशात आहात त्यामुळे सरळ सरळ क्रमाने न बोलता जेव्हा जे आठवत आहे तेच बोलत आहात... जास्त गोलगोल गोष्टी मला आणि पब्लिकला पण नाही समजणार..."

गुरव साहेब... "(शांत स्वरमध्ये)... कदाचित तू एकदम बरोबर बोलतेस शर्वरी... मी ह्यावेळी आवेशातच आहे... त्यामुळे हेच चांगलं असेल कि तूच मला विचारत चल... मी उत्तर देत राहील.."

शर्वरी... "पहिला प्रश्न... कुलकर्णीला मारणारे तुम्हीच काय..???"

गुरव साहेब... "हो... पण तुला संशय कसा आला...?"

शर्वरी... "राहुलने सर्व गुन्हे मान्य केले पण फक्त हाच एक गुन्हा सोडून... आणि आत्ता-आत्ता तुम्ही सांगितले कि सोनाली त्याच्या हाताची कठपुतली बनली होती कि बस फक्त तुम्हीच राहता ती हत्या करण्यासाठी... पण केलं कसं... आणि अनाघाच्याच समोर का...??"

गुरव साहेब... "खरं-म्हणजे..!! कुलकर्णीला मी राहुलच्या मार्फत त्या कॅबीनमध्ये पाठवले होते... त्याला फक्त हे सांगण्यात आले होते कि त्याला तिथे जाउन फक्त अनघाला घाबरवायचे आहे... एका गुंड्यासारखं हातात चाकू ठेवून राहुलने त्याला पाठवले होते... त्याला (राहुलला) हे सांगितलं गेलं होतं कि जेव्हा अनघाच्या समोर शहरातील एक प्रतिष्टीत व्यापाऱ्याच्या रुपात माणूस जाईल ज्याला तिने ट्रेनमध्ये एका गुंड्यावानी पाहिलं आहे तर पुढे जाउन अनघाला पागल सिद्ध करणं अजूनच सोप्प जाईल... पण जेव्हा कुलकर्णीने मला ट्रेनमध्ये पाहिले तेव्हा त्याने मला ओळखले होते त्यामुळे तो अनघाच्या पाठी लपायला लागला होता... तिला कवर करून तो वाचायला पाहत होता... पण वाचला नाही... समजलीस...??"

शर्वरी... "हो समजले... आता दुसरा प्रश्न... राहुल पागल आहे कि नाही...??"

गुरव साहेब... "schijofrenic लोकं खरं-म्हणजे स्वतःला खूप चलाख समजतात पण त्यांच्या डोक्याला तुम्ही खूप सोप्प्या पद्धतीने कंट्रोल करू शकता... बघितलं गेलं तर हि एक अशी बिमारी आहे ज्यामध्ये मूर्खता आणि अक्कल एकसाथ शामिल असतात... त्याच्या डोक्यात काही भरणं माझ्यासाठी कठीण नव्हतं... बस कोणत्याही प्रकारे तुम्ही राहुलच्या परसेप्शनने ती गोष्ट त्याला समजवली कि..., 'हि गोष्ट तुझ्या फायद्याची आहे किंवा फलाना गोष्ट तुझ्या नुकसानाची आहे...' (हसत) आता हे पण समजलीस काय...?"

शर्वरी... "(दीर्घ श्वास सोडत)... तुमच्या सारखा समजवणारा तर मला पण schijofrenic बनवेल... असो पुढचा प्रश्न... सोनालीला का मारले... आणि कसे...??"

गुरव साहेब... "(निराश होत)... हा एक असा प्रश्न आहे ज्याच्या उत्तरामध्ये मी फक्त एवढंच सांगू इच्छितो कि तिची साथ माझ्याबरोबर इथपर्यंतच होती... तिची विश्वासघातकी मला बोचायला लागली होती... मला हे पण माहिती आहे कि तिला हे करण्यासाठी मीच परावृत्त केलं आहे... मी तिला पण माझ्यासोबत घेवून गेलो असतो... आणि हे माझ्यासाठी कठीण पण नव्हतं.... पण (हळू आवाजात) मेल ईगोला तर कदाचित तू चांगल्या प्रकारे समजत असशील... हे पण समजलीस ना...!!"

शर्वरी... "कठीण होतं पण समजली... पण कसं मारलं ते तरी सांगा...??"

गुरव साहेब... "कसं काय मारलं... तिला हेच माहिती होते कि राहुल तिला काही जरुरी कामासाठी बोलवत आहे... उलट राहुल आणि मीच तो दिवस तिचा शेवट दिवस आहे हे लिखित करून ठेवलं होतं... सोनाली त्याच्या रूममध्ये येताच राहुलने तिला गोळी मारली... ह्याने मी एका बाणेने दोन शिकार केले होते... पहिला शिकार... सोनालीला मारणं जे माझ्या ईगोसाठी जरुरी होतं... दुसरा शिकार... अनघाला ज्या कामासाठी तैयार केलं गेलं होतं... म्हणजे तिच्या डोक्याच्या हालातीची जी रूपरेखा तैयार केली जात होती त्याचा वापर करण्याची वेळ आली होती... समजलीस काय... (व्यंग करत)... आता ह्यावेळी दीर्घ श्वास सोडू नकोस...!!"

शर्वाई... "(जी दीर्घ श्वास सोडायलाच जात होती एकदम थांबली आणि रागाने)... श्वास घेणं तर तुम्ही पहिलेच कठीण केलं आहे आता तुम्हाला काय वाटतं कि आम्ही श्वास पण सोडला नाही पाहिजे... आता शेवटी एक गोष्ट अजून सांगा... हा प्रियाचा काय चक्कर आहे...??"

गुरव साहेब... "प्रियाचा चक्कर फक्त आणि फक्त अनघाला गंडवन्यासाठीच केला गेला होता... अनघावर जेवढे जास्त कॉम्पलीकेशन टाकले असते तेवढंच तिला कन्फ्युज करून तिला पागल सिद्ध करणं सोप्पं होतं... काय समजलीस...?"

शर्वरी... "आणि तिच्या आईने जी कहाणी सुनावली होती... त्यामध्ये केवढं तथ्य आहे..??"

गुरव साहेब... "हुंह..!!! तिची आई काय कहाणी सुनावणार... ती बेचारी तर पाहिल्यावेळेसच आमच्या ताब्यात आली होती जेव्हा मी आणि सोनाली त्यांच्या घरी गेलो होतो... अनघाच्या वडिलांना औषधोपचार करण्यासाठी पहिलेच आम्ही आमच्या ताब्यात घेतलं होतं... बस मग काय... त्याच्या आईने तेच केलं जे आम्ही तिला सांगत गेलो... बस... आता अजून काही विचारायचे आहे काय...? माझा आय.एस.डी. कॉलरेट लागत आहे..."

शर्वरी... "म्हणजे तुम्ही सात समुद्र पलीकडे निघून गेलात... कुठे आहात हे पण सांगून टाका ना...!!"

गुरव साहेब... "(हसत)... मांजराला मलईची मटकी नाही दाखवली पाहिजे एस.पी. म्याडम... मला माहिती आहे कि ह्यावेळी तुम्ही मला सोडणार नाही ते... बाय द वे... एक काम होतं... आशा आहे तुम्ही ते काम जरूर पूर्ण कराल..."

शर्वरी... "(चिडलेल्या अंदाजात)... आपल्या 'छोट्याला' सोडण्याशिवाय दुसरं काही पण सांगा... मी करण्याचा प्रयत्न करेन..."

गुरव साहेब... "थोडं सिरिअस काम आहे... संपत्ती माझ्या नावे होताच मी त्यांना विकण्यास सुरुवात केली होती... त्यामधून मी एक भाग अनाघासाठी सोडला होता... ज्या बिल्डरने ती जागा विकत घेतली आहे त्याच्या करारात हे लिहिलं आहे कि संपत्तीच्या पोजेशनच्या वेळी त्याला अनघाला २५० करोड द्यायचे आहेत... माझ्याकडून अनघाला हि रक्कम मिळवून द्या आणि तिला सांगा कि माझी तिच्यासोबत काहीच दुष्मनी नव्हती... मला माहिती होते कि पुढे जावून मी अनघाला साफ वाचवू शकतो.. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही आता रीकॉर्डींग करत आहात... त्या पण तिला ऐकायला द्या..."

शर्वरी... "(हसत).. तर तुम्हाला माहिती पडलेच कि रीकॉर्डींग करत आहे... तरी पण (व्यंग करत)... तुमच्या सारखा देवमाणूस भेटणार नाही... आता पुढे काय इरादा आहे..."

गुरव साहेब... "बस आता पुढे काय... मी आणि माझा एकाकीपणा... जिथे नशीब घेवून जाईल तिथे जाईन... आता ठेवतो... आणि हो... पुन्हा नाही भेटणार..."

एवढं बोलून गुरव साहेबांनी फोन कट केला... ते ह्यावेळी बहामाच्या विमानतळावर उभे होते... कोणीच सांगू शकत नाही कि हा माणूस नकली पाय लावून उभा आहे... विमानतळावरून बाहेर निघताच एका मुलीने त्यांना मिठी मारून त्यांचं स्वागत केलं... "आय मिस्ड यु सो मच.." बोलत त्या मुलीने त्यांना कीस केलं...

गुरव साहेबांनी पण तिला पूर्ण गरमजोशाने कीस केलं आणि उत्तरात बोलले... "बस तुझ्याच नावाचा आधार होता जे मी आजपर्यंत जिवंत आहे शोना... आय लव्ह यु... आय लव्ह यु... प्रिया..."

समाप्त...


Previous Chapter

2 comments:

  1. Awesome story.very nice.

    ReplyDelete
  2. Story mast hoti. Ata navin kadhi suru karatay?

    ReplyDelete