Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 4 December 2012

भाग ~ ~ ४० Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~  ४०

आजचा सुविचार: - ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.

घटनेच्या पुढे.... 

गुरव साहेब… “(रागाने) … काय बकवास करतेस… डोकं वैगेरे फिरलं आहे काय तुझं राहुलसोबत राहून राहून. तू असा विचारही कसा करू शकतेस कि आम्ही कोणा मुलीचा खून करणार… आणि ते पण तेव्हा जेव्हा मला चांगल्या प्रकारे माहिती आहे कि ती आमच्या बहिणीसमान नाही बहिणच आहे…”


गुरव साहेबांना रागावतांना अनघाने पहिल्यांदाच पहिले होते, डि.एस.पी शर्वरीच्या समोर पण ते कधीच आपली उद्दुंडता कधीच हरवली नव्हती पण तिच्या ह्या प्रश्नाने त्यांच्यावर खूप आतपर्यंत वार केला होता. ते ह्यावेळी आवेशाने थरथरत होते, सोनाली पण त्यांच्या डोक्यावरून सारखी सारखी हात फिरवत त्यांना चुचकारत होती पण त्यांचा राग शांत होतंच नव्हता…


सोनाली… “प्लीज तुम्ही शांत व्हा… असं असू शकतं कि कोणी तरी अनघाला चुकीची माहिती दिली आहे… आत्ता ती भासित आहे… आणि मग तुम्ही हे का विसरत आहात कि तिच्या ह्याच भासेला दूर करण्यासाठीच तर आपण तिला आज इथे बोलावले आहे…”


सोनाली त्यांना सारखी सारखी समजावत असल्यामुळे थोड्यावेळाने त्यांचा राग शांत झाला पण त्यांचे डोळे पाणावलेले होते… अनघाला पण आत्ता आपल्या ह्या प्रश्नावर पश्चाताप होत होता… पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय तिने अधीरतेच प्रदर्शन करत आपला प्रश्न विचारला होता...


अनघा… “सर…! प्लीज मला क्षमा करा, मी माझ्या अधिरतेवर संयम बाळगू शकली नाही आणि त्याच आवेशात काही ना काही तरी बोलत गेली… तुम्ही प्लीज मला क्षमा करा…”


गुरव साहेब शांतच राहिले… मग थोड्यावेळाने...


गुरव साहेब… “(अनघाला)… तुम्हाला हि गोष्ट राहुलने सांगितली काय… खरं खरं सांगा… आमच्यासाठी खूप जरुरी आहे कि आमचा छोटा भाऊ आमच्याविषयी काय विचार करतो… त्या रात्री जेव्हा तो तुम्हाला कहाणी सांगत होता तेव्हा मी काही जास्त तर ऐकलं नाही पण एवढं तर समजून चुकलो कि, आमच्या दोघांची त्याच्या डोक्यात काही तरी चुकीची छवी बनली आहे… पण खरी गोष्ट कुठपर्यंत पोहोचली आहे हे मला माहित नाही… आत्ता तुम्ही मला सांगा कि ‘छोट्या’ने तुम्हाला काय काय सांगितलं…”


अनघा… “(दचकून) त्यांनी मला काहीच सांगितले नाही… मी तुम्हाला सांगितलं ना हे सगळं मी आपल्या अधिरतेवर संयम हरवून बोलले होते…”


गुरव साहेब… “आम्हाला माहिती आहे कि तुम्ही त्याची कुठलीच गोष्ट आम्हाला सांगणार नाही… एका परीने तर हि गोष्ट चांगली आहे कि तुम्ही त्याला एवढं प्रेम करता पण गोष्ट आत्ता त्याच्या मानसिक आजाराला ध्यानात ठेवून करायची आहे… असो हे आम्ही तुमच्यावरच सोडतो कि तुम्ही आपल्या विवेक बुद्धीचा उपयोग करून हा निर्णय स्वतः घ्यावा…”


अनघा… “तुम्ही प्लीज माझी गोष्ट टाळू नका… मला ऐकायचे आहे कि प्रिया आत्ता कुठे आहे… (थोडं रागाने)… आणि गोष्टीला दुसरं वळण देवू नका… मी पण आत्ता ह्या सर्व गोष्टींना कंटाळली आहे… डोकं फुटायची पाळी आली आहे हे सगळं सहन करता करता… मी कोणावरही काही आरोप नाही लावत आहे पण तुम्ही लोकं कदाचित माझी मनस्थित समजत असाल…”


सोनाली… “तुला आम्ही ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठीच तर इथे बोलावले आहे अनघा…! त्यामुळे चिंता नको करूस… तुझ्या प्रत्येक शंकेच आम्ही यथासंभव निवारण करण्याचा प्रयास जरूर करणार… (गुरव साहेबांकडे बघत)… तुम्ही हिला सगळं काही सांगून टाका… सर्व गोष्टी तुम्ही आपल्या जवळ ठेवून, तुम्ही केव्हापर्यंत घुटमळत राहणार…”


गुरव साहेब… “कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहात… (अनघाशी)… तर आम्ही सांगत होतो कि प्रिया खूप जिद्दी झाली होती आपल्या प्रेमासाठी… समजावण्याच्या प्रयत्नावर पाणी टाकून तिने पण साफ-साफ सांगितलं कि ती राहुलला सोडून कोणा दुसऱ्याची कदापि होवू नाही शकत… लहानपणापासून ज्याला आपल्या मनात उच्च स्थान दिलं आहे आणि आत्ता अचानक कोणत्यातरी खोट्या कारणामुळे तर ती बाहेर काढू शकत नव्हती… तेव्हा आम्ही तिला धमकी दिली कि जर ती ऐकली नाही तर आम्ही ह्या सर्व गोष्टी राहुलला सांगून हा वादच संपवून टाकणार. ह्या गोष्टीमुळे ती शांत झाली पण तिचे डोळे लालभडक झाले होते.. मग एक दिवस ती न सांगताच आमचं घर सोडून निघून गेली… नैनिताल मधून आपलं शिक्षण पण पूर्ण केलं नाही आणि कोणास ठावूक कुठे गेली ती… आम्ही हा पण विचार केला कि हि गोष्ट राहुलला पण सांगितली पाहिजे… पण जोपर्यंत आम्ही त्याला काही सांगणार तर त्याच्या सोबत ती दुर्घटना झाली आणि आमच्या पदरी निराशाच हाती लागली… इथपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं पण राहुल जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा आम्ही त्याच्या तोंडून प्रियाचं नाव ऐकून उडालोच… आम्ही ह्या गोष्टीचा तपास करण्याचा खूप प्रयत्न केला पण आमचे हात अजूनही खालीच आहेत…”


त्यांची गोष्ट ऐकून अनघाच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचा पूर आला होता… पण तिला समजत नव्हते कि ते विचारले पाहिजेत कि नाही… राहुलने तिला काहीपण करायला सरळ सरळ मनाई केली होती. त्याच्यानुसार असं काही केल्याने त्याच्या आईच्या जीवाला धोका होवू शकतो… “पण आपल्या डोक्यात माजलेल्या प्रश्नांच्या गडबडीला काय करणार…?” अशी बिकट समस्या तिच्या समोर उभी होती ज्याचा काहीच समाधान तिला सुचत नव्हतं.. आत्ता ती असा विचारच करत होती कि गुरव साहेबांनी तिला टोकले…


गुरव साहेब… “राहुलने आमच्या विषयी तुम्हाला काय काय सांगून ठेवलं आहे अनघा…? एकदा खरं खरं सांग… आमच्यासाठी आमच्या छोट्याच्या आजाराचा खरेपणा जाणणे खूप गरजेचे आहे… न जाणो प्रियाने त्याच्या डोक्यात काय काय भरलं असेल… (आपले दोन्ही हात जोडत)… आम्ही तुमच्याशी दोन्ही हात जोडून विनंती करतो कि तुम्ही प्लीज आमच्यावर विश्वास करा आणि राहुलने सांगितलेली गोष्ट आम्हाला जरूर सांगा…”


गुरव साहेबांचं अश्या प्रकारची विनंती पाहून अनघाची दुविधा आणखीनच वाढली, तिला काहीच समजत नव्हते कि काय केलं पाहिजे… ती गप्प बसून हा सगळा विचारच करत होती कि तिच्या कानांमध्ये सोनालीचा आवाज पडला…


सोनाली… “आत्ता जर तू कोणत्याही
निर्णयावर पोहोचू शकत नाहीस तर उद्या सकाळ पर्यंत आरामात विचार करून सांग… तुझ्यावर काहीच दडपण नाही आहे… बस हे ध्यानात ठेव कि तू जो काही निर्णय घेणार त्या वरती राहुल आणि ह्या गुरव घराण्याचं भविष्य अवलंबून आहे… आत्ता तू जा आणि आराम कर…”


सोनालीचं बोलणं ऐकताच अनघा चुपचाप काहीच न बोलता आपल्या रूमकडे निघाली…


आपल्या रूममध्ये जातांना पण तिला कोणाची तरी नजर आपल्यावर आहे असं प्रतीत झालं पण चारही बाजूने एकवार नजर फिरवल्यावर तिला कोणीही दिसलं नाही तेव्हा परत ह्या घरातील रहस्यमयी वातावरणाचा प्रभाव समजून डोक्याला झटकते आणि आपल्या रूममध्ये घुसते…


*****…..*****…..*****

दुसऱ्या दिवसाची सकाळ समता नगरमध्ये एक वादळ घेवून आली… शहरात सगळ्यांच्या तोंडावर फक्त आणि फक्त गुरव साहेबांच्याच वाड्याची चर्चा होती… जेवढी तोंडं तेवढी गोष्ट… सगळेच्या सगळेजण हि बातमी ऐकूनच गुरव साहेबांच्या वाड्याजवळ गर्दी करायला सुरुवात करत होते आणि जो तो आपण ऐकलेली बातीमी खरी आहे कि खोटी ह्याची पुष्टी करायला पाहत होता. वाड्याच्या चारही बाजूने लोकांची जमवा जमाव झाली होती… पोलिसांच्या गाड्या एका नंतर एक येत आणि जात होत्या… त्याच एका गाड्यांमधून एक गाडी डि.एस.पी शर्वरीची पण होती जी घटनेची बातमी कळताच ताबडतोप तिथे पोहोचत होती. वाड्याच्या बाहेर असलेली गर्दी हा पुरावा देत होती कि गुरव साहेब आणि त्यांच्या परिवाराची ह्या शहरात आणि शहरातील लोकांच्या मनात “त्यांची काय प्रतिष्ठा होती…” शर्वरीने वाड्यात पोहोचतात आपल्या देखरेखी खाली पूर्ण हलातीची समीक्षा करण्यासाठी… आणि ह्या कामासाठी तिने त्या शहरातील एस.एच.ओ. (स्टेशन हाऊज ऑफिसरला) जाऊन भेटली…


टीप: - जर तुम्हाला हिंदीमधून काही कथा वाचायच्या किंवा लिहायच्या असतील तर कृपया करून www.dreamnfun.com ह्या संकेत स्थळावर भेट द्यावी. 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

1 comments:

  1. eagerly waiting for next post plzzz do post fast....
    really nice story...

    ReplyDelete