Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 21 December 2012

भाग ~ ~ ४५ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ ४५  

आजचा सुविचार: - जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

घटनेच्या पुढे.... 

राहुल हॉस्पिटलमध्ये आपल्या बेडवर झोपलेला होता, त्याला ह्यावेळी एका प्राईवेट वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतंत्याची हालत पहिल्यापेक्षा आत्ता जरा बरी होती पण कमजोरी त्याला जाणवतच होती. गुरव साहेबांनी त्याला अजूनही रम्या मेला आहे हि बातमी सांगितली नव्हतीकदाचित त्यांना वाटलं असेल कि हि बातमी ऐकताच राहुल अजूनच चिंतीत होईलसोनालीच्या मृतदेहाला पण आत्ता गुरव साहेबांनी शवविच्छेदनासाठी त्यांचं शव आपल्या ताब्यात घेतलं होतं ते राहुलची हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्याची वाट पाहत होतेराहुलच्या जवळ त्याचा फोन ठेवला होता ज्यामधून तो कोणाचा तरी नंबर शोधत होता, तो नंबर मिळाल्यावर आणि तो नंबर लावल्यावर दुसरीकडून काय बोललं जात आहे ते तो लक्षपूर्वक ऐकतो आणि फोन कट  करतोबेडला लागलेल्या एका स्विच-बेलला दाबून त्याने नर्सला बोलावले आणि नर्स आल्यानंतर त्याने तिच्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या आपल्या बायकोला म्हणजेच अनघाला भेटण्याची इच्छा जाहीर केली. ज्याच्यासाठी नर्सने सीनिअर डॉक्टरांची परवानगी घ्यायला सांगितली. आत्ता भलं राहुलला कोण अडवणार शेवटी होता तो पण गुरव परीवारातुनच नाथोड्या वेळानेच राहुल अनघाच्या रूमच्या बाहेर होताकाही तरी विचार करून तो तिच्या रूममध्ये शिरतोअनघाचं डॉक्टर हेगडे सोबत एक सेशन संपलं होतं ज्यामुळे डॉ. ने तिला आराम करायला सांगून तिला झोपेची गोळी देवून झोपवलं होतंअनघाच्या रूमच्या बाहेर पण एक कॉन्स्टेबल बसला होता पण राहुलला थांबवणं त्याने पण उचित समजलं नाहीराहुल रूममध्ये शिरतो आणि पाहतो कि अनघा औषधांच्या प्रभावामुळे गाड झोपलेली होतीतो थोडा वेळ अनघाला प्रेमाने निरखून पाहत राहतो आणि मग तिच्या जवळ जाउन उभा राहतोतो आपला एक हात पुढे करून अनघाच्या चेहऱ्याला स्पर्श करतोआणि मग हळू हळू आपला हात तिच्या पूर्ण चेहऱ्यावर फिरवतोझोपलेली अनघा खूप प्रेमळ आणि सुंदर दिसत होती राहुलला 

*****-----*****-----*****
 

शर्वरीने लोकल आणि रेल्वे पोलिसांकडून रम्यावर झालेल्या हल्ल्याची रिपोर्ट मांगवली. रेल्वे पोलिसांनी सांगितलं कि काही लोकल प्रवाश्यांनी रम्यावर बसण्याच्या जागेवरून हल्ला केलापण प्रत्यक्ष्यदर्शी लोकांनी सांगितलं कि हल्लेखोर उगाचच रम्या बरोबर कारण नसतांनाही भांडण करत होते त्यात काहीच तथ्य नव्हतंशर्वरीला रम्याच्या गावी म्हणजेच सोलापूरला गेलेल्या पोलिसांनी पण हेच सांगितलं कि त्याच्या घरातून अशी काहीच सूचना रम्याला पाठवण्यात आली नव्हती… “ह्या केस मध्ये सगळं काही एकदम सरळ सरळ का नाही होत आहे…” विचार करत करत शर्वरीने आपलं डोकं पकडलंजेव्हा तिला वाटायचं कि आत्ता केस संपेल, पण त्या केसला एक वेगळंच वळण लागायचंशेवटी ह्या केसची शिदोरी कोणाकडे आहे…?? लोकल पोलिसांना तिने ह्या केसच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी सांगितले आणि रम्याच्या मृतदेहाला आपल्या देखरेखी खाली ती समता नगरला घेवून पुन्हा निघाली... 

*****-----*****-----***** 

गुरव साहेबनानी डॉ. हेगडेकडून अनघासोबत झालेल्या त्यांच्या पहिल्या सेशन विषयी विचारण्यासाठी त्यांना आपल्या घरी बोलावलेज्यामुळे ह्या वेळी हेगडे गुरव साहेबांच्या घरी पोहोचले होतेहेगडेशी अनघाच्या विषयी दीर्घ चर्चा केल्या नंतर जेव्हा गुरव साहेबांनी हेगडेला आपल्या घरातून निरोप दिला तेव्हा हेगडेचा खिसा भरलेला होताहेगडेने जाते वेळी एक तैयार करून ठेवलेली रिपोर्ट गुरव साहेबांच्या स्वाधीन केली होती ज्याला वाचल्यावरती गुरव साहेबांच्या चेहऱ्यावर एक संतोषाने भरलेली स्मिता चमकायला लागली होती 

*****-----*****-----*****
 

राहुलने जसं अनघाच्या ओठांना स्पर्श केला आणि त्यांच्या वर आपले बोट फिरवायला लागला तेव्हा तिचे डोळे हळू हळू उघडायला लागलेअनघाच्या उघडणाऱ्या डोळ्याने जेव्हा तिला राहुलचा चेहरा दिसतो ती ताडकन दचकून उठून बसते 

अनघा… “तू इथे काय करतोयसनिघून जा इथून…” 

राहुल काही न बोलता तिला पाहत राहतो आणि स्मित हास्य देत राहतोमग जसाच तो आपला हात अनघाच्या पुढे करतो अनघा त्याचा हात झटकतरागाने त्याला पाहायला लागतेमग अचानक ती पण त्याच्या हसण्यात शामिल होतेआत्ता दोघेही एकत्र हळू हळू आवाजाने हसायला लागतात... एकदम हळू हळू... 

हसत हसतच दोघेही एकमेकांना आपापल्या मिठीत घेतात… “मला तर वाटले कि तू अजूनही क्यारेक्टरमध्येच राहशील…” राहुल तिला मिठीत घेत बोलला 

मी अजून पर्यंत तेच करत आहे जे तू बोलला होतासशेवटी तुझी बायको जी आहेमरेपर्यंत तुझीच साथ द्यायची आहे मला…” अनघा पण त्याला मिठी मारत बोलली 

ज्यांनी माझ्या आईवर अत्याचार केले आहेत  त्यांच्यासाठी एवढीशी शिक्षा पण कमी आहे अनघा…!!! त्या दिवशी रात्री तुझ्या बोलण्यावर जेव्हा मी सरळ सरळ विचारले होते तेव्हा तू पाहिलेच होते कि त्याचा शेवट काय झाला होता तेसर्वात मोठी दुःखाची गोष्ट हि आहे कि मला अजूनही माझ्या आई विषयी काहीच माहिती सापडली नाही आहे…” राहुल निराश होत बोलला आणि अनघा जवळच तिच्या बेडवर बसला 

अनघा ती रात्र आठवायला लागली जेव्हा ती गुरव साहेबांच्या रूममधून परत आपल्या रूममध्ये आली होती 

*****-----*****-----***** 

त्या रात्री 

अनघा आपल्या रूममध्ये पोहोचली, तिच्या रूममध्ये काळोख होता पण ती लाईट न लावताच आपल्या बेडवर पहुडलीतिच्या मनात गुरव साहेब आणि सोनालीने सांगितलेली गोष्ट सारखी सारखी घुटमळत होतीएवढं जास्त भासित ती आपल्या पूर्ण जीवनात कधी झाली नव्हती जी आत्ता झाली होतीकाही वेळ बेडवर पडून ती ह्याच विषयी विचार करत राहिली आणि आपली कुशी बदलत राहिली पण जेव्हा झोप तिच्या डोळ्यांमधून लांब होत गेली तेव्हा ती कावरीबावरी होवून उठून बसलीथोडा वेळ बसून ती स्वतःच प्रश्न आणि स्वतःच उत्तर द्यायला लागली पण तिला काहीच सुचत नव्हतेतेव्हा तिला आभास झाला कि तिच्या रूममध्ये तिच्याशिवाय दुसरं कोणी तरी आहेती दचकून उभी राहिली आणि रूमच्या त्या कोपऱ्याकडे पाहायला लागली ज्या कोपऱ्यात तिला वाटले कि जसं कोणी तरी तिच्यासारखच दीर्घ श्वास घेत आहेलक्षपूर्वक पाहिल्यावर तिला कळलं कि हा दुसरा तिसरा कोणी नसून राहूलच आहे 

अनघा… “तू इथे (हैराण होत) आणि ते पण ह्या वेळीआणि असा लपूनछपूनका…??” 

राहुल… “(चिडलेल्या आवाजात)… ‘का’..!! हे तू मला विचारात आहेस का’… (दीर्घ श्वास सोडत)ह्या घरात एक तूच होतीस जिच्यावर मी विश्वास करत होतो पण आत्ता (राहुलने आपली गोष्ट अर्धवट सोडली…)” 

अनघाला काहीच बोलता आलं नाही पण आत्ता ती स्वतःलाच दोषी समजायला लागली होतीएकदम बरोबरच तर बोलत होता राहुलशेवटी ती त्याची बायको आहे 

अनघा… “मला आत्ता हे सर्व सहन नाही होत राहुल..!! मी खरोखर पागल होईनतू सरळ सरळ जाउन विचारत का नाही सोनालीला कि खरं काय आहेएकदाच गोष्ट पूर्ण संपून जाईनजर ह्यांनी तुझ्या आईला कुठे बंधिस्त करून ठेवलं आहे तर त्याचं कारण एकंच आहे तुझी संपती पण तू जेव्हा स्वतःच आपली संपती त्यांना ऑफर करशील तेव्हा भलं का ते लोकं तुझ्या आईला का बंधिस्त करून ठेवतील…!!”  

राहुल… “ठीक आहेउद्या सकाळीच मी तुझ्या मनासारखंच करेन... मी तुला बोलावून घेईनवहिनी सकाळी उठून सर्वात पहिले पूर्ण घरातून एक चक्कर मारतातत्याच्या नंतर मी त्यांना आपल्या रूममध्ये बोलावून हि गोष्ट साफ करण्याचा प्रयत्न करेनजेव्हा मी वहिनीला बोलावेल तेव्हा तुला पण फोन  करेनतू पण येतुझ्या समोरच पूर्ण गोष्ट साफ होऊन जाईनठीक आहे…??” एवढं बोलून राहुल अनाघाकडे पाहायला लागतो 

त्याला आपल्याकडे पाहतांना पाहून अनघा दचकून जाते मग तिला ध्यानात येतं कि राहुलने काही तरी विचारले आहे ज्याचं उत्तर देणं अजूनही बाकी आहे 

अनघा… “हो…!! हे ठीक आहे… for once and all… just… let it be… (होवून जाउदे जे होतंय ते…)” 

राहुल तिच्या जवळून उठून आपल्या रूमकडे जायला लागतोमग अचानक थांबून अनाघाकडे पाहतो आणि 

राहुल… “तू माझ्या वर प्रेम तरी करतेस ना अनघा…!!!” 

आणि उत्तराची काहीच प्रतीक्षा न करता तो सरळ बाहेर निघून जातोअनघा अवाक होवून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत राहते पण काहीच बोलत नाही 

रात्र तर अशीच निघून गेलीती वाट पाहत होती फक्त सकाळ होण्याचीअसो सकाळतर आपल्या वेळेनुसारच होणार होती आणि ती झाली सुद्धा 

अनघा आपल्या रूममध्ये ठेवलेल्या इंटरकॉमच्या जवळच बसली होती आणि राहुलच्या फोनची वाट पाहत होतीथोड्या वेळानेच फोन वाजायला लागलाएक बेल पण पूर्ण झाली नसेल कि अनघाने पटकन फोन उचललादुसरीकडे अपेक्षेनुसार राहूलच होता पणपण तो खूप घाबरलेला होता…!!! आणि लवकरात लवकर तिला आपल्या रूममध्ये बोलावत होता 

अनघा पण फटाफट आपल्या रूममधून तडकीफडक त्या रूमकडे पळत सुटतेरूममध्ये घुसताच तिने जे पाहिला ते कोणालाही अचंबित करण्यासारखं होतंसमोर फरशीवरती सोनाली मृत अवस्थेत रक्त बंबाळ होवून पडली होती आणि राहुल आपल्या बेडवर बसलेला होता, हातामध्ये बंदूक घेवून, थरथर कापत होता  त्याच्या बंदुकीतून अजूनही धूर निघत होतासोनालीचा श्वास अजूनही चालत होता 

अनघाला पाहिल्या पाहिल्या लगेच तो तिच्या जवळ येवून तिला कडकडून मिठी मारतोआणि हमसाहमशी रडायला लागतो 

अनघा… “(घाबरलेल्या आवाजात)हे काय केलं तूह्यांना गोळी का मारली…” 

राहुल… (चीडचीड्या आवाजात) तू बघत नाही आहेस कायहिने साइलेन्सर लावून बंदूक आणली होतीत्यामुळे हिचा उद्देश्य काय असू शकतो ते…??” 

तेव्हा कुठे जाउन अनघाचं लक्ष गेलं कि बंदुकीच्या पुढे जिथून धूर निघत होता तिथे एक छोटी नळी पण लागली होती ज्याला आत्ता राहुलच्या म्हणण्यानुसार तिने सायलेन्सर नावाने ओळखलं 

अनघा… “पण आज हि अशी कशी तुला मारायला पळत सुटलीआणि ते पण दिवसाढवळ्यातू हिला बोललास तरी काय ज्यामुळे हिने हि गोष्ट केली…” 

राहुल... " अरे यार (रागाने)... जसं तू काल रात्री सांगितलं होतंस तेच केलं मी आज... ह्यांना आपल्या रूमकडे येतांना पाहून मी ह्यांना वार्ता करण्यासाठी बोलावले... मग मी ह्यांना सांगितलं कि 'कश्या प्रकारे प्रियाने मला त्या रूमपर्यंत घेवून गेली होती आणि मी तुम्हाला तिथे पाहिलं होतं... मग मी आपल्या आई विषयी ह्यांना विचारलं...' तो प्रश्न ऐकताच हि गोंधळली... मग ताडकन बाहेर निघून गेली... थोड्या वेळानेच ती पुन्हा परत आली आणि माझ्यावर बंदूक ताणली..."

राहुल बोलतच होता कि सोनालीचा वेदनेने कळवळन्याचा आवाज आला आणि ती राहुलकडे पाहत होती... तिच्या डोळ्यात राहूलसाठी घृणा साफ दिसत होती... तिला आपल्याकडे बघतांना पाहून राहुल घाबरून अनघाच्या आणखीनच जवळ झाला... सोनालीला काहीतरी बोलायचे होते पण वेदनेमुळे तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता...

राहुल... "(घाबरलेल्या आवाजात)... बघ बघ ती परत उठत आहे... ह्या वेळी हि जरूर मला मारेल.. आत्ता तर मी हिच्या हातून जशितशि बंदूक हिसकावून घेतली होती पण एकदा जर हि उठली तर माझं काय होणार... अनघा...! मला वाचव अनघा...! मला मरायचे नाही आहे... मला माझ्या आईला वाचवायचे आहे... जर हि मेली तर दादाची अपुरी पडेन... मग त्यांना सांभाळणं सोप्प जाइल... अनघा..!! तू ऐकत आहेस ना मी काय बोलतोय ते..." अनघाच्या समोर सर्व काही खूप लवकर लवकर होत होतं... वेळ पळत होती आणि अजूनही तिच्या समोर दुविधा आपल्या विक्राळ अवस्थेत उभी होती... तिला काहीच सुचत नव्हते... आणि वरून तिच्या कानी राहुलचे शब्द पडत होते... तिची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमी पडत होती... राहुलची भीती तिच्या डोक्याला स्थिर होवू देत नव्हती.. बंदूक कधी त्याच्या हातून तिच्या हातात आली तिला समजलेच नाही... सोनाली अजूनही उठण्याचा खूप प्रयत्न करत होती... तिला उठतांना पाहून राहुल ओरडला..."

राहुल... "अ-न-घा....!!!! प्लीज मला वाचव..."

राहुलच्या ओरडण्यामुळे अनघा घाबरली... "ढिश्क्यांव-ढिश्क्यांव"... तिच्या हातातून गोळी निघाली... सायलेन्सर लागल्यामुळे आवाज दाबला गेला... गोळी सरळ जाउन सोनालीला लागली आणि पुन्हा ती जमिनीवर कोसळली... सोनालीला गोळी लागताच राहुलने अनघाला आपल्या बाहुपाश्यात घेतले आणि तिला "थ्यांक यु  - थ्यांक यु" बोलायला लागला... सोनालीच्या डोळ्यात दुनियाभरची हैराणी दिसत होती आणि तिच्या तोंडून निघाले "माझ्या सोबत धोका झाला आहे..." कदाचित हे शब्द तिने आपली पूर्ण ताकत लावून बोलली होती कारण हे शब्द तिचे शेवटचे शब्द होते... ह्या वेळी ती जेव्हा कोसळली ती केव्हाच न उठण्यासाठी... राहुल तिच्या पडलेल्या देहाकडे गेला आणि त्याच्यावर ओरडायला लागला...

राहुल... "तुला वाटत होतं माझी अनघा मला वाचवणार नाही... ती माझी बायको आहे... प्रत्येक वेळी ती माझी साथ देणार आहे... जशी तू देतेस तुझ्या नवऱ्याची... आत्ता मी एकटा नाही आहे ह्या घरात..." एवढं बोलून तो पुन्हा अनघाच्या जवळ येतो आणि तिच्या दोन्ही हातांना आपल्या दोन्ही हातांनी पकडून उभा राहतो..

राहुल... "आत्ता काय विचार करतेस तू... आत्ता तर सगळं व्यवस्थित होईल... आत्ता कोणत्या गोष्टीची चिंता करतेस..."

अनघा...!! जी कोणत्यातरी पुतळ्यावानी एकप्रकारच्या मनःस्थापात उभी होती... राहुलची गोष्ट ऐकून चिडते...

अनघा... "(रागाने)... तू आत्ता खरोखर पागल तर झालास नाही ना...!! आपल्या हातून हत्या झाली आहे समजलास काय... हत्या... आणि ती पण सोनाली वहिनीची हत्या... गुरव साहेबांना काय बोलणार..." राहुल...! जो आत्ता अनघा समोर एकदम शांत उभा होता... काही तरी विचार करत...

राहुल... "तुला आठवतंय मी एकदा काय बोललो होतो ते..."

अनघा... "काय बोलला होतास...???"

राहुल... "TRUTH IS STRANGER THAN FICTION"
राहुलने हि गोष्ट अश्या गुपित स्टाईलमध्ये बोलला होता कि अनघा एकवेळेस तर विचारात पडली...

अनघा... "(रागाने)... आणि आत्ता ह्या गोष्टीचा अर्थ काय आहे..."

राहुल... "आपण दादाला म्हणजेच गुरव साहेबांना सगळं काही खरं खरं सांगणार आहोत... पण थोडंसं ट्विस्ट करून... खरेपणा मानण्यासाठी सर्वांसाठी असंभव सारखंच असतं..."

अनघा... "लवकर बोल जे काही बोलायचे आहे... असं फिरून फिरून बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ कुठे आहे... कोणत्याही क्षणी कोणीही येवू शकतं.."

राहुल... "का नाही आपण स्वतःच सर्वांना बोलावून घेवू..."

अनघा... "म्हणजे...???"

राहुलने त्या बंदुकीतून सायलेन्सर बाजूला केला आणि बोलला...

राहुल... "(खूप रहस्यमयी अंदाजमध्ये)... आत्ता ह्या बंदुकीतून गोळी निघेल तर सगळ्यांना ऐकायला जाईल... तू माझ्या शेल्फमध्ये अशीच एक बंदूक ठेवली आहे ती काढून आण.... आत्ता तू मला ह्याने गोळी मार... आणि मी त्या बंदुकीतून रूममध्ये ३-४ गोळ्या झाडतो... ज्याच्या आवाजाने सगळे इथे येतील... केस बनेल सेल्फ-डिफेन्सचा... समजलीस..."

अनघा... "(थोडं रागाने आणि हैराणीने).. हे सर्व पहिल्या पासूनच प्लान करून ठेवलं होतं काय...!!!"

राहुल... "मी एक काम करतो... हि गोळी माझ्या डोक्यात मारून पूर्ण कथाच संपवून टाकतो... !!"

एवढं बोलून राहुल तिच्या हातातून बंदूक घेण्यासाठी हात पुढे करतो... ज्याला झटकून अनघा त्याच्या मिठीत शिरते...

अनघा... "ह्या वेळी माझ्या कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेवू नकोस राहुल...!!! मी विचार करण्याच्या आणि समजण्याच्या हालातीमध्ये नाही आहे... हे सर्व एवढं सोप्प नाही होणार जेवढं तू विचार करत आहेस..."

राहुल... "सोप्प कोण समजत आहे... पण दरवेळी सारखं माझं डोकं फास्ट चालत आहे... जे तुला विचित्र वाटत आहे आणि तू माझ्यावर संशय खात आहेस... हुंह... माझ्या आईच्या जीवाची जर मला चिंता नसती तर मी हसत हसत सर्व आरोप स्वतःवरती घेतले असते आणि फासावर चढलो असतो... पण आत्ता तर मी मारण्यासाठी पण तैयार नाही आहे..."

अनघा... "काही तरी विचार करत... ती बंदूक कुठे आहे..."

राहुल... "समोरच्या कपाटात आहे... त्या बंदुकीला घेवून आण आणि काही कामं तुला खूप पटकन करायचे आहेत... (एकदम विचार करत)... तू मला ह्या बंदुकीने गोळी मार... इथे माझ्या खांद्यावर मारशील तर मी फक्त जखमी होईन आणि जास्त चिंतेची गोष्ट होणार नाही... लवकर कर आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे..."

अनघाने, राहुलने सांगितलेल्या जागेवरून बंदूक काढून आणली आणि राहुलकडे बघायला लागली...

राहुल... "मी फायर करताच माझ्यावर इथे गोळी चालव... आत्ता सगळं काही खूप लवकर करायचे आहे... कारण आत्ता गोळी निघण्याचा आवाज सर्वांना ऐकायला जाईल..."

आत्ता ती बंदूक देण्यासाठी अनघा जशीच पुढे आली तिचा पाय सोनालीच्या पायांना लागला आणि ती पडली... तिला पकडण्यासाठी जेव्हा राहुल तिच्या जवळ आला तेव्हा दोन्ही बंदुका खाली जमिनीवर पडलेल्या त्याला दिसल्या... तो कन्फ्युज झाला कि कोणत्या बंदुकीतून गोळी निघाली आहे आणि कोणत्या नाही ते... बंदुकीला उघडून पाहिल्यावर दोघातही ४-४ गोळ्या शिल्लक होत्या... "आत्ता काय करायचे..." अनघाने त्याला विचारले... ते लोकं विचारच करत होते कि त्यांना घरातील नोकरांचा आवाज ऐकायला आला...

राहुल... "आता आपल्यांकडे वेळ नाही आहे... जे पण होईल ते बघितलं जाईल... तू गोळी चालव..."

अनघाचे हात थरथर कापत होते... असली परिस्थिती तिला पहिल्यांदा जाणवत होती जिथे तिच्याजवळ विचार करण्यासाठी आणि समजण्यासाठी वेळच नव्हती... प्रेमाची शपथ देवून आणि गोंधळ नाचवून राहुलने पहिलेच तिच्या डोक्याला सुन्न केलं होतं... तरी पण वेळेचे भान ठेवून आणि आपले डोळे बंद करून तिने गोळी चालवली... गोळी लागताच राहुल ओरडला आणि आपल्या बेडवर जाउन पडला... त्याला वेदना होतांना पाहून अनघा त्याच्या जवळ जाते..

राहुल... "(वेदनेने)... गोळी कदाचित थोडी खाली लागली आहे... खांद्याला लागली असती तर कदाचित एवढं दुखलं नसतं..."

अनघा घाबरते आणि राहुलला जिथे गोळी लागली असते तिथे प्रेमाने हात फिरवते...

राहुल... "(हळू आवाजात)... तू लांब हो, गोळीचा आवाज सर्वांनीच ऐकला असेल... आणि लक्षात ठेव... तुला आजचा दृष्टांत थोडा ट्विस्ट करून सांगायचा आहे सगळ्यांना... सगळ्यांना हेच वाटले पाहिजे कि तू आपल्या शुद्धीवर नाही आहेस... बाकी मी सांभाळून घेईन... मला कमजोरी जाणवत आहे.. कदाचित मी आत्ता बेशुद्ध होईल... (अनघाच्या चिंतीत चेहऱ्याला पाहून) चिंता नाको करूस अनघा...!!! मी मारणार नाही..."

आणि तो बेशुद्ध होतो...

*****-----*****-----*****  
हॉस्पिटलमध्ये अनघाच्या रूममध्ये...

अनघा... "तू तर बेशुद्ध झाला होतास आणि मला काहीच सुचत नव्हते कि काय करू वा काय न करू..."

राहुल... "चिंता नको करूस... सर्व काही आपल्या कंट्रोलमध्ये आहे... डॉ. हेगडे पण तेच करत आहे जो मी विचार केला होता..."

अनघा... "तू त्याला पण सर्व काही सांगितलं होतं काय...??"

राहुल... "मला बघायचे होते कि तो डॉ. आहे कि माझ्या शत्रुंचा मित्र... पण तो खरोखर डॉ. निघाला... त्याने माझ्या गोष्टीला कोणत्या तरी पागलची गोष्ट समजली... हुंह... (हसायला लागतो...)"

अनघा... "(त्याच्या छातीवर एक ठोसा मारत).. जो तुला पागल समजेल तो त्याच्यापेक्षा पागल कोणीच नसू शकतो... (काही तरी आठवत) पण तू माझ्या आईशी कधी बोलला होतास..."

राहुल.. "(हसत) तुझ्या आईशी मी काहीच वार्ता केली नाही..."

अनघा... "(हैराणीने)... म्हणजे काय...??"

राहुल... "म्हणजे हे... तुझ्या आईने काहीच खोटं बोललं नाही..."

अनघा... "तर तुला माहिती होतं माझ्या सोबत झालेल्या घटने बाबत..."

राहुल... "हो..!! गेल्या वेळीच आईने मला सांगितलं होतं कि तुझ्यासोबत लहानपणी असं काही तरी झालं होतं पण आत्ता सर्व ठीक आहे..."

अनघा... "तू पहिल्या पासूनच तर नाही ना विचार करून ठेवला होतास हे सर्व करण्यासाठी..."

राहुल तिची हि गोष्ट ऐकून रागावतो आणि ताडकन उठून उभा राहतो...

राहुल... "कठीण प्रसंगी जेव्हा माझं डोकं फास्ट चालत त्याला तू माझी प्लान्निंग समजायला लागतेस... तू आज पर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला नाही आहेस... आत्ता मी निघतो... जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर तेच कर जे मी तुला सांगितले आहे नाहीतर जशी तुझी मर्जी..."

अनघा... "हुंह... आत्ता मी माझ्या मर्जीने भलं काय करू शकते... मी खूप पुढे आली आहे आहे... इथून मागे वळणे कठीण आहे माझ्यासाठी... उलट खूपच कठीण आहे हे तर..."

राहुल आपले पाय आपटत बाहेर निघून जातो...

*****-----*****-----***** 

डि.एस.पी. शर्वरी आपल्या चेंबरमध्ये बसलेली होती आणि सोनाली मर्डर केसची फ़ाइल चाळत होती. तिच्या टेबलावरती कुलकर्णी आणि त्या व्यापाऱ्याची पण मर्डर केसची फ़ाइल होती... ती सारखी सारखी त्या फ़ाइल्स चाळत होती आणि आपल्या डायरीत काहीतरी मुद्दे लिहित होती... कोणत्या तरी खास मुद्द्याला नोंदवून ती खूप एक्साईटेड नजर येत होती... तिचा फोन वाजायला लागला...

शर्वरी... "हो सांगा...!! (दुसरीकडून काही तरी ऐकून) अच्छा..!! असं आहे काय... मला पहिल्या पासूनच संशय आला होता... (पुन्हा काहीतरी ऐकून)... त्याच्यावर नजर ठेव... आणि ओब्जर्व करत रहा... लक्षात ठेवा कोणालाही ह्या गोष्टीची भनक लागली नाही पाहिजे... ह्यात खूप मोठा धोका असू शकतो... ओके ठीक आहे..." फोन ठेवून ती खूप एक्साईटमेंट फील करत होती...

शर्वरी... "(काहीतरी विचार करत)... आत्ता बघते माझ्या हातून कसे वाचतात ते लोकं...!!"

*****-----*****-----*****

राहुल अनघाच्या रूममधून बाहेर तर आला होता पण त्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता... काही लांब गेल्यानंतर त्याचा फोन वाजायला लागला... त्याने फोन पिक केला.. तिथून काही तरी विचारले गेले ज्याच्या उत्तर पायी तो फक्त हो किंवा नाही उत्तर देत गेला... काही 'हो' आणि काही 'नाही' ह्या उत्तरानंतर तो फोन कट करत बोलला. "अजूनही एकदम अचूक वेळ आलेली नाही..." तर मित्रांनो काय झालं असेल पाहूयात पुढच्या भागात... पण त्या साठी थोडीशी कळ सोसावी लागणार... :)


टीप: - जर तुम्हाला हिंदीमधून काही कथा वाचायच्या किंवा लिहायच्या असतील तर कृपया करून www.dreamnfun.com ह्या संकेत स्थळावर भेट द्यावी.
 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment